घुबडाचे पेलेट्स

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
21 Jun 2010 - 7:52 pm

काल आम्ही फिरायला बाहेर पडलो होतो. फ्रीवेवर नेहेमीप्रमणे लहान स्कंक, रकून सारखे प्राणी मधे मधे दिसत होते चिरडले गेलेले. यावेळेला मुलगी बरोबर असल्याने माझ्यातल्या "आई"ने ज्ञान द्यायची संधी दवडली नाही.
मी मुलीकरता एक पुस्तक आणलय जे की तिने अजून वाचायचय पण मी वाचून संपवलय.
त्या पुस्तकात- एका कुटुंबानी एक सोनेरी गरुडाचं पिल्लू पाळलेलं होतं आणि त्यांच्यापुढे समस्या ही होती की या पिल्लाला खायला काय घालायचं? कारण शिजवलेली कोंबडी, सॉसेज, मटण वगैरे खाऊन आठवड्या दोन आठवड्यात हे शिकारी पक्षी मरतात. या पक्षांकरता आख्खा उंदीर, रकून, स्कंक, खार, कोंबडी वगैरे असं खाद्य लागतं. गरूड, घार, घुबड वगैरे पक्षी हे खाद्य खातात आणि रोज सकाळी पेलेट्स (http://en.wikipedia.org/wiki/Pellet_(ornithology)) म्हणजे लंबगोल पिसं, हाडांचे गोळे बाहेर टाकतात. त्यानी त्यांची पचन यंत्रणा साफ रहाते.
मग हे कुटुंब काय करायचं रोज सकाळी असं कारमधून रपेट मारायला बाहेर पडायचं आणि वाटेत येणारे रोडकिल (रस्त्यावर गाडीखाली आलेले प्राणी) उचलत जायचं. ते रोडकिल त्या गरुडाच्या पिल्लाला खायला घालायचं.
मी हे सगळं माझ्या ४ थी तल्या मुलीला मोठ्या उत्साहानी सांगीतलं आणि आश्चर्य म्हणजे ते तिला आधीच माहीत होतं. तिने ३रीमधे शाळेत घुबडाच्या पेलेटसची चिरफाड केली होती. त्यात उंदराच्या पिल्लाची कवटी पाहीली होती. तिने माहीती पुरवली की पेलेटस हे गोल नसून लंबगोल असतात.
मला खूप बरं वाटलं की इथे मुलांना लहानपणापासून बर्‍याच गोष्टी हाताळायला देतात, त्यांची किळस दूर करतात किंबहुना निर्माणच होऊ देत नाहीत., शास्त्रीय दृष्टीकोन जोपासतात.
याच सुंदर फेरफटक्यामधे माझ्या मुलीनी मला अजून एक गंमतीशीर माहीती सांगीतली - एक पाल असते तिला "जिजझ लिझर्ड" म्हणतात. का तर ती पाण्यावर चालते : )

समाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

चित्रा's picture

21 Jun 2010 - 8:08 pm | चित्रा

छान माहिती.. लोक काय उद्योग करीत असतात ते पाहून आपण अगदीच भोटम असे वाटायला लागते.

जिजझ लिझर्डच्या नावाची उत्पत्ती आवडली...

गणपा's picture

21 Jun 2010 - 8:26 pm | गणपा

नजर चुकीनचुआधी घुबडाचे कटलेट्स वाचल. (पोटात कावळे ओरडत असले की होत असं.)
किस्सा चांगला आहे.
हल्ली ची पोरं आपल्या वयाच्या मानाने (म्हणजे आपण त्यांच्या वयाचे असताना) कैक पटीने हुशार असतात.

शुचि's picture

21 Jun 2010 - 8:32 pm | शुचि

आपल्याला "या कुंदेंदुतुषारहार धवला" येत असे त्या वयात. या पोरांना ते येत नाही त्याची काळजी वाटते : (. आयुष्यभरएक "दीपस्तंभ" म्हणून ही स्तोत्रं आपण जपली, पूजली. ही मुलं काय करणार असं वाटतं. मला तर आई म्हणून खूप काळजी वाटते मुलीला स्तोत्र येत नाहीत त्याची.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

गणपा's picture

21 Jun 2010 - 8:55 pm | गणपा

अहो शुचि तै अश्या गोष्टींची नुसती काळजू वाहुन काय उपयोग.
लहाम मुलांची ग्रास्पिंग पॉवर अफाट असते. आपण जर त्यांना या ची गोडी लावली आणि शिकवल तर ते चटकन शिकतात हा स्वानुभव आहे.
पण पाठ करण म्हणजे नुसती पोपटपंची नव्हे. त्यांना त्यातला अर्थ समजवला तर ते चांगल आणि दिर्घ काळ लक्षात रहात.
माझी लेक ज्युनियर ला असताना पसायदान, मारुती स्तोत्र म्हणायची आख्ख. पसायदानातल जेवढा अर्थ आम्हाला समजायचा तेवढा आपल्या परीने सांगीतला होता.

शुचि's picture

21 Jun 2010 - 9:18 pm | शुचि

खरं आहे. कौतुक आहे तुमच्या मुलीचं. तिला नक्की फायदा होईल पुढे.

माझे एक डेंटीस्ट होते पुण्यातले. ते नेहमी म्हणायचे - मी माझ्या मुलाला सांगतो बाबा रे आईबाप धडधाकट आहेत तोवर विद्या अशी ग्रहण कर जसा ऊंट पाणी पिऊन घेतो. नंतर जसं ऊंटाला ते पाणी उपयोगी पडतं, तसं तुझं ज्ञान, विद्या तुला निरंतर उपयोगी पडेल.

मी देखील तेच मुलीला सांगते.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jun 2010 - 9:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

किळस असण्यात काय वाईट आहे? आंघोळ न केलेला एखाद्या मनुष्यप्राण्याची गोष्ट ऐकूनही मला किळस वाटते.

या स्तोत्रात "जाड्या" असल्यामुळे मला हे स्तोत्र फार आवडायचं ... आमच्या मातेला काळजी, का शिकवलं हिला हे!!
दीपस्तंभ धोक्याची जाणीव करून देणारे असतात, "या कुंदेंदुतुषारहार धवला"मधून नक्की कोणता धोका समजतो?

अदिती

प्रियाली's picture

21 Jun 2010 - 9:24 pm | प्रियाली

या स्तोत्रात "जाड्या" असल्यामुळे मला हे स्तोत्र फार आवडायचं ...

मलाही. शाळेत म्हणताना ही शेवटची ओळ येण्याची वाट दररोज आतुरतेने पाहायचो. ;-)

गणपा's picture

21 Jun 2010 - 9:32 pm | गणपा

=)) =)) =)) =))
आमच्या वर्गातला "जाड्या" मुलगा बिचारा लाजुन पाणी पाणी व्हायचा.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jun 2010 - 9:42 pm | बिपिन कार्यकर्ते

हॅहॅहॅ!!! आमच्या वर्गातल्या जाड्याला मात्र त्याचं काहीच वाटायचं नाही. निर्लज्ज होता. ;)

बिपिन कार्यकर्ते

(सलज्ज)चतुरंग

टारझन's picture

21 Jun 2010 - 9:48 pm | टारझन

हो , तुम्ही लहाणपणी गुटगुटीत होतात म्हणाला होतात, आठवतंय मला . तुम्ही बॉन-बॉन ग्राईप वॉटर ची अ‍ॅड केलेली ना ? :)

बाकी कसली तरी फालतु सोत्र/ कविता म्हणुन काय *ट फरक पडला का ? त्याचा अर्थ तरी धड कोणाला कळत असे का ? बरं कळला , तसं आचरणात आणलं होतं का कोणी ? मला तर *ट काही कळायचं नाही , त्यामुळे आमलात आणणे .. हॅहॅहॅ

असो :) मी कविता/प्रार्थणा/स्तोत्र म्हणायच्या वेळी गाणी म्हणायचो ;)

प्रियाली's picture

21 Jun 2010 - 9:48 pm | प्रियाली

आमच्याही वर्गातला जाड्या आधी निर्लज्ज नव्हता पण "रोज मरे त्याला कोण रडे" या उक्तीनुसार निर्लज्ज झाला.

तुमच्या वर्गातला जाड्या कोण? नितीन ना? *

शुचि's picture

21 Jun 2010 - 10:00 pm | शुचि

>> या स्तोत्रात "जाड्या" असल्यामुळे मला हे स्तोत्र फार आवडायचं ... आमच्या मातेला काळजी, का शिकवलं हिला हे!!>>
=))

ह्म्म किळस ही देखील एक भावनाच आहे हे खरं.

मला दीपस्तंभ म्हणजे वादळी रात्री बेटाचं निदर्शक असा संकेत देणारं काहीतरी अशी गोष्ट म्हणजे दीपस्तंभ वाटते. वादळात हेलकावे खाणार्‍या जहाजाला, बोटींना रात्री एक धीर.

http://en.wikipedia.org/wiki/Lighthouse_of_Alexandria
वरील दीपस्तंभ सर्वात प्राचीन दीपस्तंभ असून त्याचा उपयोग खलाशांना सुखरूप बेटावर आणण्यासाठी केला जात असे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पंगा's picture

21 Jun 2010 - 9:42 pm | पंगा

आमच्या तथाकथित इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत पोरे "जाड्या पहा" म्हणून हसली की "देवाला 'जाड्या' म्हणणे म्हणजे 'यू आर फायटिंग विथ गॉड!" अशा स्वरूपाची दटावणी मिळत असे. असो.

दीपस्तंभ धोक्याची जाणीव करून देणारे असतात

ती "दीपगृहे" नव्हेत काय? "दीपस्तंभ" म्हणजे खास सारमेयांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने उभारलेली एक सार्वजनिक सुविधा, अशी माझी (पु.ल. वाचून झालेली) भाबडी समजूत होती. पुन्हा असोच. (नाहीतर पु.लं.नी तरी नेमक्या कोणत्या धोक्याची जाणीव करून दिली होती? किंबहुना, आपल्या पश्चात आपली वाक्ये लोक जिथेतिथे नको तिथे संदर्भ असो वा नसो, हवी तशी फेकतील, आणि आपल्या गौरवार्थ वाटेल ती विशेषणे त्यांचा आपल्याच लिखाणातील संदर्भ न तपासता योजतील, या धोक्याची जाणीव खुद्द पु.लं.ना झाली होती काय?)

- पंडित गागाभट्ट.

मुक्तसुनीत's picture

21 Jun 2010 - 9:49 pm | मुक्तसुनीत

"दीपस्तंभ" हा शब्द "लाईट्हाऊस" या अर्थानेही वापरला जातो. उदा. हर्णैचा दीपस्तंभ . ( श्रीना पेंडशांचे वर्णन करताना गाडगीळानी हे शब्द वापरले आहेत.)

पंगा's picture

21 Jun 2010 - 9:59 pm | पंगा

हर्णैला काय वाटेल ते म्हणत असोत, पण एकदा खुद्द पु.लं.नीच "दीपस्तंभा"चा (म्हणजे "दीपस्तंभ" या शब्दाचा, बरे का!) एका विशिष्ट पद्धतीने वापर केला असता (आणि त्यांच्याच इतर लिखाणातही अन्यत्र सारमेयाच्या आणि दीपस्तंभाच्या अन्योन्यसंबंधाचा वारंवार उल्लेख केला असता), त्यांच्याच श्रद्धांजलीत त्यांनाच "दीपस्तंभ" म्हणून संबोधणे म्हणजे... असो.

(तरीही पु.लं.नी नेमक्या कोणत्या धोक्याची पूर्वसूचना दिली होती, हा प्रश्न उरतोच. तेही असो.)

- पंडित गागाभट्ट.

मुक्तसुनीत's picture

21 Jun 2010 - 10:02 pm | मुक्तसुनीत

शब्दसंहतीच्या नेमकेपणाचा आग्रह धरणार्‍यानी संदर्भाचा नेमकेपणा जपावा असा एक विचार चाटून गेला. पुलंचे कुठले लिखाण ? "दीपस्तंभ" शब्दाचा नेमका कसा वापर ? कुठली श्रद्धांजली ? कुणी वाहिलेली ? इत्यादि इत्यादि इत्यादि ....

असो.

शुचि's picture

21 Jun 2010 - 10:04 pm | शुचि

http://misalpav.com/node/12693
असेल का?

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मुक्तसुनीत's picture

21 Jun 2010 - 10:05 pm | मुक्तसुनीत

धन्यवाद.

येथे मिसळपावावरच नुकताच पु.लं.ना श्रद्धांजली वाहण्याकरिता आलेला धागा पहावा. "सारमेय-दीपस्तंभ न्याय" हा पु.लं.चा शब्दप्रयोग. संदर्भ बहुधा 'पूर्वरंग'; तपासण्यासाठी तूर्तास माझ्याजवळ त्वरित उपलब्ध नाही. अर्थ साधारणतः "कुत्र्यास दिव्याचा खांब दिसल्यावर ज्याप्रमाणे तंगडे वर करण्याची उर्मी येते, त्याप्रमाणे एखादी गोष्ट दिसल्यावर किंवा केल्यावर दुसरी एखादी गोष्ट करण्याची उर्मी येणे" असा. कुत्र्याच्या आणि दिव्याच्या खांबाच्या या घनिष्ठ संबंधातील प्रसंगांचा उल्लेख पु.लं.नी अन्यत्रही अनेकदा केलेला आहे. उदाहरणादाखल, "हसवणूक" या संग्रहातील 'पाळीव प्राणी' या लेखात याची किमान दोन उदाहरणे सापडावीत, असे आठवणींवरून नमूद करावेसे वाटते. गरजूंनी स्वकष्टाने स्वतः पडताळून खात्री करून घ्यावी. धन्यवाद.

बाकी, कसलाही आग्रह धरलेला नाही. फक्त, भरपूर हसावेसे वाटले इतकेच. (पूर्वी पु.लं.चे लिखाण वाचून हसत असे; आता पु.लं.बद्दल लिहिलेल्याला हसतो, इतकाच फरक.)

- पंडित गागाभट्ट.

Pain's picture

21 Jun 2010 - 10:36 pm | Pain

तुमची आधी काय चर्चा चालु आहे आणि कसले उत्तर दिलेत हे माहित नाही पण

पूर्वी पु.लं.चे लिखाण वाचून हसत असे; आता पु.लं.बद्दल लिहिलेल्याला हसतो

असे का ? हल्ली भाजी खरेदी सारख्या काय वाट्टेल त्या विषयावर लेख येतात. पु.ल. त्यामानाने कितीतरी चांगला विषय आहे.

--------------

P.S. आत्ताच वाचले आणि कळले.
संपादक, हा प्रतिसाद उडवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jun 2010 - 10:42 pm | बिपिन कार्यकर्ते

हल्ली भाजी खरेदी सारख्या काय वाट्टेल त्या विषयावर लेख येतात. पु.ल. त्यामानाने कितीतरी चांगला विषय आहे.

भाजी खरेदीवरील लेख वाईट लिहिलेले असतात म्हणून नकोसे होतात की भाजी खरेदी हा विषय आहे म्हणून नकोसे वाटतात?

बिपिन कार्यकर्ते

भाजी खरेदी प्रत्येकाने* हजारो* वेळेला केलेली असते, कधीही* करू शकतो आणि जोपर्यंत त्यात काहीतरी (नविन/ अनपेक्षित / जीवन्-अनुभव/ व्यक्तिचित्र/ शिकण्यासारखे वगैरे) होत नाही तोपर्यंत लेख कसा काय होउ शकतो ~X(

आता या लेखातून ही पक्ष्यांची नविन माहिती मिळाली. त्या इजिप्तच्या लेखमालेतून प्रवासवर्णन. बहुदा इजिप्तबद्दल मिपावर ते पहिलेच असावे.
तसेच विकास यांची गोष्ट, टारझन, म्रुत्युंजय यांचे विनोदी लेख, टोमणे, श्रावण, विसोबा ( आणि अजुन १ कोणीतरी ज्याने धातु- मुंबईतील भंगार उद्योगावर लिहिले होते) यांचे अनुभव, नोंदी इंद्राज पवार, थत्ते यांनी सांगितलेल्या इतिहासातील अपरिचित घटनां वगैरे.

या आणि अशासाठी मिपावर येतो आणि भाजीखरेदी, पाउस आणि स्तोत्रे ऐकणे वगैरेवर लेख वाचून पोपट आणि चिडचिड होते. संपादकही काहीच करत नाहीत.

शुचि's picture

22 Jun 2010 - 12:06 am | शुचि

>>भाजी खरेदी प्रत्येकाने* हजारो* वेळेला केलेली असत>>
चांगला/ली साहित्यीक सामान्यातील सामान्य गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पहायला शिकवतो. मला तर जादू दिसते ऑलमोस्ट सगळ्या लेखांमधे. नवीन दृष्टीकोन, शब्द, वाक्प्रचार, मनुष्यस्वभावाचे कंगोरे शिकायला मिळतात. मी अपवाद आहे. माझे सामान्य असतात पण बहुतेक लेखक छान लिहीतात इथले. चर्चा झडतात.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

टारझन's picture

22 Jun 2010 - 12:20 am | टारझन

मला तर जादू दिसते ऑलमोस्ट सगळ्या लेखांमधे. नवीन दृष्टीकोन, शब्द, वाक्प्रचार, मनुष्यस्वभावाचे कंगोरे शिकायला मिळतात.

पेपरातले न्युज क्लासिफाईड्स , यलो पेजेस , किंवा बिझणेस टाईम्स वाचुन सुद्धा आपल्याला हेच फिलींग येत काय ? , एक कुतुहल ;)

शुचि's picture

22 Jun 2010 - 12:23 am | शुचि

नाही टारझन. मराठीची जादू आहे ही. मोहीनी आहे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

टारझन's picture

22 Jun 2010 - 12:41 am | टारझन

असो , तुर्तास कॉमा मधे गेलेलो आहे :)
आपल्या रसिकतेस णमण आहे.

एक विणंती : कृपया आपल्या जादुगर आणि मोहिनी मराठीचा वापर करुन आपण "फसवणुकीचे फतवे - भाग कितीनकाय" , "कोदांचे कुपितले बटवे", "गुर्जींचे कडवे" ," ५१२ चे गोडवे" इत्यादींच रसग्रहण टाका ना , प्लिज.

(अरषिक) टोची

टारझन's picture

22 Jun 2010 - 12:17 am | टारझन

या आणि अशासाठी मिपावर येतो आणि भाजीखरेदी, पाउस आणि स्तोत्रे ऐकणे वगैरेवर लेख वाचून पोपट आणि चिडचिड होते. संपादकही काहीच करत नाहीत.

=)) =)) फ्रस्ट्रेशन शी सहमत आहे ;)
बाकी काही वातुळ बटाटे एकमेकांच्या पाठीला साबण चोळत बसतात इथे .. असलेही अश्लिल शब्द वारंवार वारंवार लिहायचे (बहुतेक ह्यांना हल्ली 'फक्त' वाचना/लेखनातुन समाधान मिळत असावं ) आणि आपली लाल करुन घ्यायची ... वर त्यावर कोणी बोलला की संपादकाकडे जाऊन चुगली करुन यायची .. का तर म्हणे यांच्या प्रणयसाधनेत व्यत्यय येतो =))

हल्ली काय काय टुकार पणा चालतो , साला आम्हाला काँपिटिशन आलिये आता.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jun 2010 - 12:46 am | बिपिन कार्यकर्ते

भाजी खरेदी प्रत्येकाने* हजारो* वेळेला केलेली असते, कधीही* करू शकतो आणि जोपर्यंत त्यात काहीतरी (नविन/ अनपेक्षित / जीवन्-अनुभव/ व्यक्तिचित्र/ शिकण्यासारखे वगैरे) होत नाही तोपर्यंत लेख कसा काय होउ शकतो

माझ्या (खरोखरीच कुतूहलाने विचारलेल्या) प्रश्नाचे उत्तर मिळाले. बहुतांशी सहमत आहे.

आता या लेखातून ही पक्ष्यांची नविन माहिती मिळाली. त्या इजिप्तच्या लेखमालेतून प्रवासवर्णन. बहुदा इजिप्तबद्दल मिपावर ते पहिलेच असावे.
तसेच विकास यांची गोष्ट, टारझन, म्रुत्युंजय यांचे विनोदी लेख, टोमणे, श्रावण, विसोबा ( आणि अजुन १ कोणीतरी ज्याने धातु- मुंबईतील भंगार उद्योगावर लिहिले होते) यांचे अनुभव, नोंदी इंद्राज पवार, थत्ते यांनी सांगितलेल्या इतिहासातील अपरिचित घटनां वगैरे.

बहुतांशी सहमत. काही उदाहरणांशी असहमत. धातु-भंगारवाले रामदास. जालावरील सर्वोत्कृष्ट नावांपैकी एक. :)

या आणि अशासाठी मिपावर येतो आणि भाजीखरेदी, पाउस आणि स्तोत्रे ऐकणे वगैरेवर लेख वाचून पोपट आणि चिडचिड होते.

माझ्या मते भाजी खरेदी आणि स्तोत्रे वगैरे विषयांवरही लिहिले जाऊ शकते आणि ते चांगले असू शकते. परत तोच मुद्दा.

संपादकही काहीच करत नाहीत.

संपादकांनी काय करणे अपेक्षित आहे? जोपर्यंत वैयक्तिक टोकाची टीका, जातिय / वांशिक / धार्मिक इत्यादी तेढ वाढवणारी टीका, अश्लिल शिवीगाळ (लैंगिक संदर्भ असलेले लेखन आणि अश्लिल शिवराळपणा यात फरक वाटतो हे जाताजाता नम्रपणे नमूद करतो... काही सभासदांकरता हा खुलासा आवश्यक वाटतो.) आणि अगदीच पचकळपणाचा कळस असल्याशिवाय कोणीही संपादक लेख उडवत असतील असे वाटत नाही. मी एक सोप्पी युक्ती सांगतो... साधारणपणे कोण कसे लिहितो ते कळते हळूहळू. काही लेखकांचे धागे उघडूच नयेत. :) किंवा मनःस्थिती चांगली असेलच तर उघडावेत. काय म्हणता?

बिपिन कार्यकर्ते

II विकास II's picture

22 Jun 2010 - 11:27 am | II विकास II

>>मी एक सोप्पी युक्ती सांगतो... साधारणपणे कोण कसे लिहितो ते कळते हळूहळू. काही लेखकांचे धागे उघडूच नयेत. Smile किंवा मनःस्थिती चांगली असेलच तर उघडावेत. काय म्हणता?

ह्या मुळे अर्धा प्रश्न सुटतो. नावडत्या लेखकाचा लेख टाळता येईल, पण प्रतिक्रिया कश्या टाळता येतील?

राजेश घासकडवी आणि पुर्णपात्रे ह्यांच्या प्रतिक्रियांमध्ये काही चुकीचे आहे असे तरी मला वाटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jun 2010 - 12:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भाजी खरेदी आणि तत्सम गोष्टींबद्दलचा एक अतिशय सुंदर ललितलेख.

अदिती

धमाल मुलगा's picture

21 Jun 2010 - 10:23 pm | धमाल मुलगा

क्काय तिच्यायला एकेक प्रकार!
विषय काय तर "घुबडाचे पेलेट्स"
त्याच्यावर मधुनच सरस्वतीच्या श्लोकांवर घसरणं कुठुन आलं, आणि पु.लं.वर काय घरसणं झालं.....
च्छ्या:! हल्ली काही ताळमेळच लागेना बुवा.

कुणाचे कसले तर कुणाचे कसले..एकुण काय, तुंबलेले बोळे निघत नाहीत आणि पाणी वाहतं होत नाही. सखाराम गटणेचं भाग्य भल्यभल्यांनाही लाभत नाही हे पाहुन जीवाला अंमळ कष्ट पोहोचले. असो!

शुचि,
खरंच, ही चिल्लीपिल्ली बोलताना ऐकलं की वाटतं, ह्या वयात एव्हढी बुध्दी आली कुठुन!

छान प्रसंग सांगितलास. धन्यवाद.

आनंदयात्री's picture

21 Jun 2010 - 10:45 pm | आनंदयात्री

>>कुणाचे कसले तर कुणाचे कसले..एकुण काय, तुंबलेले बोळे निघत नाहीत आणि पाणी वाहतं होत नाही. सखाराम गटणेचं भाग्य भल्यभल्यांनाही लाभत नाही हे पाहुन जीवाला अंमळ कष्ट पोहोचले. असो!

अगायायायाया !!
हुच्च हुच्च हुच्च षटकार .. साहित्यिक आंतरजालिय व्यक्तिमत्वाचं मोजमाप !! सखाराम गटणे .. हा हा हा =)) =)) =))

Pain's picture

21 Jun 2010 - 10:29 pm | Pain

तुमच्या लेखातून पहिल्यांदा काहीतरी नवीन, उपयुक्त माहिती कळली आणि लेख का वाचला असे वाटले नाही. धन्यवाद. असेच लिहा.

शुचि's picture

21 Jun 2010 - 10:33 pm | शुचि

खरय. माझ्या मुलीबरोबर घालवलेले क्षण मलादेखील सर्वाधिक अर्थपूर्ण वाटतात. The more I spend them the more i will have nice things to talk with the world. :)

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शिल्पा ब's picture

22 Jun 2010 - 12:32 am | शिल्पा ब

भयंकर उद्बोधक चर्चा चालू आहे...चालू द्या..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

सहज's picture

22 Jun 2010 - 6:17 am | सहज

जिजझ लिझर्ड. इतके प्रतिसाद वाचून येणार्‍यांना काहीतरी नवनवीन दिसावे म्हणुन..

शिल्पा ब's picture

22 Jun 2010 - 6:30 am | शिल्पा ब

मस्त व्हीडीओ.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jun 2010 - 10:54 am | परिकथेतील राजकुमार

साला एखादा धागा कसा हायजॅक करायचा ते आमच्या सहजरावांना विचारा.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य