भाईंचा आज दहावा स्मृतीदिन.. त्या 'पुल'कीत करणार्‍या दीपस्तंभास लक्ष प्रणाम

अर्धवट's picture
अर्धवट in काथ्याकूट
12 Jun 2010 - 10:50 am
गाभा: 

आज भाईंचा दहावा स्मृतीदिन.. मला कळायला लागले तेव्हापासुन मी त्यांचे लेखन वाचतोय.. प्रत्येकवेळेला अवर्णनीय आनंद तर मिळालाच पण त्याहुनही एक मौल्यवान ठेवा मिळाला, तो म्हणजे.. आयुष्याकडे बघण्याचा एक उमदा, जागृत, संवेदनशील तरीही सजग दृष्टिकोन..
दहा वर्ष झाली.. पण खरच भाई गेलेत का? ' माझ्यापुरते भाई आहेतच, ते अजुनही एखाद्या निर्णायक 'अर्जुन'क्षणी आतून साद घालतात.... जाब चिचारतात....

प्रतिक्रिया

शेवटच्या चार ओळी मला आठवतात.
आजही तेच घड्याळ मी वापरतो...........आतलं तोल सांभाळणारं चक्र व्यवस्थीत असलं म्हणजे झालं .

नम्स्कार अणि विनम्र आदरांजली
"आजही तेच घड्याळ मी वापरतो...........आतलं तोल सांभाळणारं चक्र व्यवस्थीत असलं म्हणजे झालं ".........रामदासजी आठवण करुन दिल्या बद्दल आप्णास देखिल.
sdfsd
माझी सर्वात आवडती कथा ईथे ऐका
http://www.esnips.com/doc/b63ecc54-8529-4fd1-97ea-a07da80b7d3d/Rao-Saheb...
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रमोद देव's picture

12 Jun 2010 - 11:03 am | प्रमोद देव

पुलंनी जीवनाचा आनंद कसा लुटावा हे त्यांच्या साहित्यातून शिकवलं.
माझ्या प्रत्येक नैराश्याच्या क्षणी मला पुलंनी हसवलंय.
आजही त्यांची अनेक वाक्यं प्रसंगी चपखल बसतात.
पुलंना माझीही आदरांजली.

इन्द्र्राज पवार's picture

12 Jun 2010 - 11:59 am | इन्द्र्राज पवार

"पु.ल.देशपांडे" या नावाने चेहरे किती प्रसन्न होतात हे जर पाहायचे असेल तर आपल्या शहरात जर एखादा "वृध्दाश्रम" असेल तर तेथील आजा/आजोबांना कोणतेही त्यांचे एक पुस्तक भेट म्हणून घेवून जावा. मलाही अशाच एका प्रसंगी एकाने ही सूचना केली होती. १ जानेवारी २०१० रोजी "नूतन वर्षाच्या शुभेच्छा" देण्यानिमित्त आम्ही तीनचार मित्र पु.लं.ची पाच पुस्तके घेऊन येथील वृध्दाश्रमात गेलो व तेथील व्यवस्थापनाकडे "भेटी" ची रितसर नोंद केल्यानंतर त्यांच्याच अनुमतीने तेथे बाहेरच हिरवळीत सकाळचे उन अंगावर घेत असलेल्या वृध्दांच्या एका गटाकडे गेलो व त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर तो पुलं संच त्यांच्या हातात दिला. "व्वा, व्वा, पु.ल.देशपांडे घेऊन आलात, फार आनंद झाला, बरं का !" त्यांचे चेहरे प्रसन्न झाले आणि ही प्रसन्न्ता आणि तो आनंद पुस्तकांपेक्षा "पु.ल." या नावामुळे होता यात संदेह नाही.

'पु.ल.देशपांडे' हे नाव अमर आहे !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

दिपक's picture

12 Jun 2010 - 12:11 pm | दिपक

__/\__

(पु.ल.प्रेमी) दिपक

टारझन's picture

12 Jun 2010 - 12:20 pm | टारझन

पुलंचे ऑडियो जेंव्हा जेंव्हा ऐकले त्यांनी केवळ मनमुराद आनंद दिलाय .. त्याला मोल नाही !! पुलं अजुनही जिवंत आहेत, राहतील :)

- (अनमोल) टारझन

गणपा's picture

12 Jun 2010 - 12:29 pm | गणपा

पुलंना जाउन आज १० वर्ष झालीत हे खरच वाटत नाही.
आजही ते त्यांच्या अजरामर व्यतीचित्रांतुन त्यांच्या कथाकथनातुन नेहमीच साथ देतायत.
असा अष्टपैलु साहित्यिक पुन्हा होणे नाही.
_/\_

प्रभो's picture

12 Jun 2010 - 10:24 pm | प्रभो

गणपाभौशी सहमत.

मदनबाण's picture

12 Jun 2010 - 12:37 pm | मदनबाण

__/\__

मदनबाण.....

A truly strong person does not need the approval of others any more than a lion needs the approval of sheep.
Vernon Howard

JAGOMOHANPYARE's picture

12 Jun 2010 - 1:26 pm | JAGOMOHANPYARE

लोक पुलं वाचण्यात्/ऐकण्यात इतके गुंतलेत की इथे प्रतिसाद द्यायलाही त्याना वेळ नाही !
यातच सारे काही आले...
एक स्मायली पुलं के नाम.. :)

अर्धवट's picture

12 Jun 2010 - 1:30 pm | अर्धवट

आज सकाळी उठल्यापासुन.. केवळ पुलच चाललेयत माझ्याकडे..
आत्ताच 'नंदा प्रधान' ऐकला.. पुन्हा डोळे पाणावले

निखळ आनंद देणारे पु ल जाऊन १० वर्षे झाली हे अजून ही खरे वाटत नाही कारण त्यांची पुस्तके / साहीत्य अजून ही ताजे-तवाने आहे अगदी त्यांच्या सुंदर हास्या सारखे O:)
विनम्र आदरांजली
~ वाहीदा

आशिष सुर्वे's picture

12 Jun 2010 - 7:08 pm | आशिष सुर्वे

१० वर्षे झाली पु.लं. ना जाऊन?? छे!!.. मुळीच नाही.. ते इथेच आहेत.. आपल्या सर्वांच्या ह्रुदयात..

आजही जेव्हा एकटेपणा वाटतो, तेव्हा पु.लं. चे एखादे कथाकथन ऐकू लागतो..
क्षणार्धात पु.लं.नी त्यांच्या लेखणीतून अक्षरश: जिवंत केलेली पात्रे सभोवताली वावरू लागतात.. मग काय!! धम्माल!!
कधी पु.लं. अगदी हात धरुन बटाटाच्या चाळीत घेऊन जातात.. तर कधी म्हशीच्या अपघातातून उमलणार्‍या गमती-जमती पाहण्यासाठी 'एश.टी.'मध्ये पण बसवतात..
कधी त्यांच्या शत्रूपक्षातील 'जालीम शत्रूं'कडून होणारी त्यांची 'पिळवणूक' ऐकताना हसून हसून पुरेवाट होते..
तर कधी, ''कशाला आला होता रे बेळगावात्त''.. ही रावसाहेबांची आर्त हाक ऐकून डोळे पाणावून जातात..

आपल्या सर्वांना 'हसू' शिकवणार्‍या पु.लं. ना.. विनम्र श्रध्दांजली..

======================
हसत रहा..

लवंगी's picture

12 Jun 2010 - 7:16 pm | लवंगी

अजून अपुर्वाई-पुर्वररंग, बटाट्याची चाळ, पु ल एक साठवण कधीही काढून वाचायला घ्याव... निखळ आनंद..

स्मिता_१३'s picture

14 Jun 2010 - 8:42 am | स्मिता_१३

मन प्रसन्न करणारी कधीही न संपणारी संपत्ती आहे पु. ल. यान्चे साहित्य.

अशा या पुरुषोत्तमास लक्ष लक्ष प्रणाम !

स्मिता

तिमा's picture

12 Jun 2010 - 8:19 pm | तिमा

अनेक जण प्रतिपुलं व्हायला प्रयत्न करतात. पण असा माणूस पुन्हा होणे शक्य नाही!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

त्यांना जाऊन दहा वर्ष झाली हे खरं वाटत नाहीये.

मला अजूनही त्यांचा तो पाठीवर फिरलेला हात आठवतो आणि गलबलून येतं!

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jun 2010 - 1:59 am | बिपिन कार्यकर्ते

केवळ मराठी सारस्वतातीलच नव्हे तर एकंदरीत मराठी भावविश्वामधील एक मानाचं आणि महत्वाचं व्यक्तिमत्व. ते लाडकं वगैरे तर होतंच. त्यांचे समग्र लेखन वाचल्यावर आणि त्यांच्याबद्दल लिहिलं गेलेलं वाचल्यावर मोठेपणाची कल्पना येते... विनोदी, विडंबनं, वैचारिक, नाटकं, प्रवासवर्णनं, चित्रपट, संगीत, एकपात्री प्रयोग, दूरदर्शन असा कलेच्या प्रांतातील अथ पासून इति पर्यंतचा पूर्ण वर्णपट त्यांनी पादाक्रांत केला होता. त्यांचे काही लेखन एका विशिष्ट वर्गाला भावणारे असले तरी सगळेच लेखन तसे नव्हते. त्यांच्या वैचारिक लेखनाचे महत्वही खूपच आहे. त्याशिवाय, मराठी साहित्यातील नवनवीन प्रयोग, प्रवाह यांच्याबद्दल सखोल जाण आणि पाठिंबा हे त्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

बिपिन कार्यकर्ते

पंगा's picture

13 Jun 2010 - 9:27 am | पंगा

या निमित्ताने (आणि लेखाच्या शीर्षकातील 'दीपस्तंभा'वरून) पु.लं.नी मराठी भाषेस बहाल केलेल्या 'सारमेय-दीपस्तंभ न्याय'* या अतिशय कल्पक शब्दप्रयोगाचे स्मरण झाले. हा शब्दप्रयोग जोवर (माझ्या) स्मरणात आहे, तोवर पु.लं.ची स्मृती (निदान माझ्या तरी) स्मरणपटलावरून पुसली जाण्याची भीती नाही.

(*संदर्भ: नक्की आठवत नाही. पण बहुधा 'पूर्वरंग'. पुन्हा वाचून खात्री करून घ्यावी लागेल.)

- पंडित गागाभट्ट.

मिसळभोक्ता's picture

14 Jun 2010 - 9:13 am | मिसळभोक्ता

हा पंगा नको त्या ठिकाणी सूसू करतो.

असो, पण

त्यानिमित्ताने आदरणीय भाईकाकांच्या आधी येथील बरेचसे लोगां सुतकी चेहरे करून बसले होते, हे ऐकून अंमळ आनंद झाला.

माझ्यापुरते म्हणायचे तर, आम्ही भाईकाकांच्या आधीही हसत होतो, आणि आताही हसतच आहोत. त्यांनी आम्हाला हसायला शिकवले नाही. त्यांच्या सोकॉल्ड अनुयायांनी हसायची भरपूर संधी दिली, मात्र.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

नंदन's picture

14 Jun 2010 - 9:41 am | नंदन

'शेवटी सगळे गँगबा-तुकाराम' हे वाक्य आठवलं 'दाद'मधलं. असो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मिसळभोक्ता's picture

14 Jun 2010 - 9:47 am | मिसळभोक्ता

नंद्या, अरे लिंक कुठाय ?

इथे सगळे "ग्यांग नही" म्हणून वर "आमचीच ग्यांग" हे एकाच पतिसादात (मिभो५१२) टाकतायत.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

नंदन's picture

14 Jun 2010 - 9:53 am | नंदन
मिसळभोक्ता's picture

14 Jun 2010 - 9:56 am | मिसळभोक्ता

नंद्या, साल्या, कुठे जायला लावतोस ?

एकवेळ भिकार्‍याच्या बाया परवडल्या, पण श्रीमंतांची पुरुष अंगवस्त्रे नकोत.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अप्पा जोगळेकर's picture

13 Jun 2010 - 6:01 pm | अप्पा जोगळेकर

असा माणूस होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली.

अनिवासि's picture

14 Jun 2010 - 4:46 am | अनिवासि

४०/५० वर्षापुर्वी भारत सोडलेल्या लोकाना पु ल म्हणजेच मराठी वागन्मय होते. ५८/५९ च्य सुमारास मी colege म्ध्ये असताना सन्ध्याकाळी पैसे मिळवण्यासाठी एका pub मध्ये नोकरी करत असे. पु.ल त्या वेळी T.V. च्या शीक्षणासाठी येथे आले होते. अनेक सन्ध्याकाळी ते शेजारच्या स्टेशनवर उतरुन माझ्या pub मध्ये येत. pub मध्ये त्या काळी दोन भाग असत - एक काम करु लोकान्चा - public bar आणि एक वरच्या वर्गाचा - saloon bar. मी pub मध्ये काम करत असे. पु ल तेथे येउन बसत आणि माझ्यासारख्याशि गप्पा मारत. हा सुखद अनुभव मला ३/४ महिने मिळाला. ते आमच्या समोरच्या घरातच रहात होते त्यामुळे जाणे-येणे पण होते. बटाट्याच्या चाळीचि काहि प्रकरणे त्यान्च्या तोन्डुन तेथेच ऐकावयास मिळाली होती.नन्तर एका खाजगी कार्यक्रमात- ६०-७० मराठी लोकान्च्यत- ते म्हणाले- आज येथे श्री ------- आहेत. त्याना पुण्याचा अभिमान आहे म्हणुन खास त्यान्च्यासाठी-- असे म्हणुन त्यानी "सारे कसे शान्त शान्त" वाचले.
वयाच्या १८ व्या वर्ष्यापासुन बाहेर देशि राहिलेल्या मला त्यान्चा मोठेपणा फार नन्तर कळ ला. पण माझे सुद्देव कि त्यानन्तरच्या अनेक भारतभेटीत व येथिल भेटीत त्यानी ओळख ठेवली आणि खुपच आनन्द दीला.
त्यान्चा प्रथम स्म्रतिदीन मी येथे arrangeकेला होता - २-२५० लोक आले होते/ माझ्या क्रतज्ञतेचि थोडिशि परतफेड.
माझ्यासारखा भाग्यवान मीच!

अर्धवट's picture

14 Jun 2010 - 8:07 am | अर्धवट

च्यायला.. मागच्या जन्मी नक्की काय पुण्य केल की अस भाग्य मिळत असेल..

शिल्पा ब's picture

16 Jun 2010 - 11:34 am | शिल्पा ब

पु.ल. गेले? शक्यच नाही...आमच्या मनात ते कायम असणारच...दैवत आहे ते ...प्रत्येक मराठी माणसाचं....अशी वल्ली परत होणे नाही.

(पुलकीत) शिल्पा
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/