क्रान्ति यांची ही कविता आकारबंधासाठी प्रेरणा ठरली. पण खरा दोष आहे इतर अनेक कवितांचा ज्यांनी व्यसनमुक्तीच्या मार्गावरून पदच्युत केलं...
पुन्हा काव्य आले; असेही, तसेही
नको तेच झाले; असेही, तसेही
जरा सोडतो मी; विडंबन नशेला
पुन्हा ग्लास आले; असेही, तसेही
किती जाऊ द्यावे? हे फुल्टॉस सारे
अन् हाफ व्हॉली; असेही, तसेही
मुके राहणे हे प्रलोभामध्येही
अशक्यच ठरावे; असेही, तसेही
फुका बोलबाला कवीतक धड्यांचा
कुणी नाही शिकले; असेही, तसेही
कशाला जपू मी कवीभावनांना?
मुर्दाड सारे; असेही, तसेही
जया वाचताना कळेना कुणाला
हसावे रडावे; असेही, तसेही
अशा काव्यपंक्तींचे खंबे नी चपट्या
खुणावती मनाला; असेही, तसेही
फुलीमध्ये जावो डब्लू ए* चे वादे
ढोसतो मी प्याले; असेही, तसेही
(* विडंबक्स अॅनॉनिमस)
प्रतिक्रिया
12 Jun 2010 - 8:02 pm | दत्ता काळे
जरा सोडतो मी; विडंबन नशेला
पुन्हा ग्लास आले; असेही, तसेही ..
हा...हा..., मस्तंच.
12 Jun 2010 - 8:06 pm | jaypal
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
12 Jun 2010 - 8:14 pm | प्रमोद देव
म्हटलं की ग्लास यायलाच हवेत का? :?
12 Jun 2010 - 8:18 pm | टारझन
नेहमी प्रमाणे सुमार लेखण :) तिन कडवी वाचे पर्यंतंच झोप लागली ... आर्जेंटिणा वाल्याला फ्रि हिट मिळाला .. न जोराचा आवाज आला ... तेंव्हा उठलो =))
- टारेश सुमारकवी
12 Jun 2010 - 9:38 pm | अभिज्ञ
विडंबन आवडले.
अभिज्ञ.
13 Jun 2010 - 10:46 am | तिमा
पुन्हा घास आले असेही तसेही
नको तेच झाले असेही तसेही
नशिबी रवंथ अमुच्या असाही तसाही
तो कडबा सुटेना असाही तसाही ||
-तिरशिंगराव बैलघाणे
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
13 Jun 2010 - 10:50 am | टारझन
आगायायाया
=)) =)) =)) एकदम चाबुक्क !!!
- एकशिंगराव गेंडाघाणे
हर सहिका मजाक उडाके देख लिया
करेंगे हम विडंबण ये दिलमें ठाणे है|
13 Jun 2010 - 10:57 am | पंगा
(सेमि)कोलायटिस - अर्थात (सेमि)कोलनचे इन्फ्लमेशन - कुठ्ठाय?
- (रेफरी) पंडित गागाभट्ट.
13 Jun 2010 - 11:05 am | टारझन
(सेमि)कोलनचे विडंबण होऊन ते (ब्लँक)स्पेस मधे परावर्तित झालेले दिसते.
-(जज) पिडित डावापक्ष
13 Jun 2010 - 1:30 pm | भडकमकर मास्तर
फुका बोलबाला कवीतक धड्यांचा
कुणी नाही शिकले; असेही, तसेही
असं काही नाही हं...
आम्ही शिकत आहोत...
अजून कवितक धडे यायला हवेत....
विडंबक्स अनॉनिमससुद्धा आवडले
13 Jun 2010 - 1:44 pm | सहज
छान!
बहुतेक पब्लीक रजेवर/विकांतात आहे नाहीतर ह्या मुळ कवितेची किमान पाच विडंबने एव्हाना यायला पाहीजे होती.
घासुगुर्जी अजुन एक दोन आरामात करु शकतील. :-)
13 Jun 2010 - 2:02 pm | प्रकाश घाटपांडे
विशेष आवडले.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.