भाग १ : http://www.misalpav.com/node/12595
भाग २ : http://www.misalpav.com/node/12627
असं लोळण्यामधे काय सुख असतं ते सांगून नाही कळणार. आजूबाजूला गारवा, वर निळं आकाश, ओढ्याच्या पाण्याचा खळखळ आवाज आणि बाकी सगळं शांत...मला तर अश्या झोपेचं इंग्लिशमधे ज्याला ऑबसेशन म्हणतात ते आहे. काही वेळा फ़क्त अश्या झोपेसाठी मी ट्रेकला बाहेर पडलो आहे...असो. अजून अर्धा तास चालल्यावर शेवटी मुक्कामाची जागा आली.
पण तिथे आधीच इतर लोकांनी आपापली रहायची सोय करून घेतली होती. अजून सूर्यास्त व्ह्यायला तास दीड तास वेळ होता. तोपर्यंत आम्ही एका झाडाखाली मस्तपणे दिली ताणून.खरं तर रात्रीच्या मुक्कामाची जागा शोधायला हवी होती कारण मंदिरातल्या जागा तर गेल्या होत्याच पण गणेशगुहा आणि इतर ठिकाणी पण रहायला जागा नव्हती. मारो गोली...
सूर्यास्ताची वेळ जवळ आली, आम्ही लवकरच कोकणकड्याकडे निघालो.बरंच ऐकलं होतं आधी कोकणकड्याबद्दल. कल्पना करा, एखाद्या बाल्कनी मधे तुम्ही उभे आहात आणी खाली चार हजार फुटांवरचं द्रुश्य दिसतंय. हो..चार हजार फुटांचा ड्रॉप आहे तो.
त्यातले अंदाजे पहिले दोन हजार फूट तर स्ट्रेट ड्रॉप आहे. आणि असाच काही विचार करत करत आम्ही शेवटी एकदाचे कोकणकड्यापाशी आलो. असा भन्नाट प्रकार मी आयुष्यात कधी पाहिला नाही आणि नंतर कधी पहायला मिळेल असं वाटत नाही. यासम हाच...जणू एखादी मोठी पायरी आहे ती. पण ती पायरी उतरणे किंवा चढणे फ़क्त वामनालाच शक्य आहे. आपल्यासारख्या मर्त्य मानवांचं ते काम नाही. कोकणकड्याचं वर्णन करणं माझ्यासारख्या शब्ददरिद्री माणसाला शक्य नाही.
डावी - उजवीकडे उत्ताल कडे...
आणि मध्ये कड्याचा मुख्य भाग...नागाच्या फ़ण्यासारखा.( ओव्हरहॅंग)
त्यामुळे खाली बघायचा एकच मार्ग. सरळ पोटावर पालथं पडायचं आणि खाली तळात पहायचं.किती वेळ पहाल? डोळे फिरतात. ते प्रचंड आणि रूद्रभीषण द्रुश्य पाहताना मनाला आनंद सहन होत नाही आणि कसलीतरी अनामिक भिती देखील दाटून येते.
शेवटी आम्ही सूर्यास्त पाहून परत निघालो. रहायच्या सगळ्या जागा लोकांनी आधीच व्यापून टाकल्यामुळे आम्ही तुकारामच्या झोपडीबाहेरच झोपायचं ठरवलं. तुकाराम सीझन मध्ये गडावरच रहायला असतो. आमच्या सारख्या ट्रेकर्स लोकांना तो मोठाच आधार आहे. त्याच्याकडे मस्त मुगाची खिचडी खाल्ली आणि दिली ताणून.
दुसर्या दिवशी सकाळी केदारेश्वराच्या गुहेत शंकराच्या पिंडीला प्रदक्षिणा घालायला गेलो.
ती एक कसरतच आहे.कष्टाशिवाय देव दर्शन देत नाही म्हणजे काय ह्याचा हा चांगलाच अनुभव आहे. पाण्यात उतरल्यावर भिजलेला भाग एकदम बधीर होवून जातो. एक प्रदक्षिणा घालणं म्हणजे अवघड काम होवून बसतं. तरी आम्ही ११ प्रदक्षिणा घातल्या. अशी घोर सेवा पार पाडून आम्ही बाहेर आलो आणि जरा इकडे तिकडे भटकलो. नंतर तुकाराम कडे चहा पिला. नंतर खरं तर रोहिदास शिखरावर जायचं होतं. पण खरं तर आम्ही पूर्ण पेकाटलो होतो. त्यामुळे तो बेत रहित करावा लागला. अर्थात त्याचा दोष एकमेकांवर ढकलण्यात आम्ही अजिबात कसूर केली नाही.
एव्हाना दुपारची वेळ झाली होती त्यामुळे आम्ही निघायचा विचार केला. अर्थात लवकर निघाल्यामुळे आम्ही एकदम निवांत उतरायचा विचार केला.
नंतर सांगण्यासारखं काही खास नाही. रोहिदास शिखरावर न जाणं ही आम्ही घोडचूक केली हे नंतर लक्षात आलं कारण ते महाराष्ट्रा मधलं दुसर्या क्रमांकाचं शिखर आहे (चूक भूल देणे घेणे) हे नंतर कळालं.
खुबी फाट्याला परत पोचेपर्यन्त पायाची लाकडं झाली होती. एस. टी. ची साधारण अर्धा तास वाट पाहिल्यावर आम्ही पुण्याच्या मार्गाला लागलो. गाडीत बसल्यावर सुद्धा कितीतरी वेळा मी मागे वळून वळून गडाकडे पहात होतो.....
प्रतिक्रिया
11 Jun 2010 - 12:03 am | भडकमकर मास्तर
कोकणकड्याचे फोटो मस्त.. आणि शेवटचा फोटो आवडला
11 Jun 2010 - 12:10 am | भारद्वाज
सगळे फोटो एकदम जबरररररररा
-
जय हरिश्चंद्रगड
11 Jun 2010 - 10:02 am | युयुत्सु
आचरटासारखे वॉटरमार्क टाकून चांगल्या प्रतिमांचा विचका न केल्याबद्द्ल अभिनंदन!
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
11 Jun 2010 - 10:06 am | यशोधरा
वा, वा मस्त! कडे आणि शेवटचा फोटो भारी.
11 Jun 2010 - 10:07 am | योगेश२४
सगळेच फोटो अगदी भन्नाट!!!!!
11 Jun 2010 - 10:21 am | वेताळ
मंदिरात फक्त पावसाळ्यात पाणी असते का कायम ते असेच असते?
वेताळ
11 Jun 2010 - 11:16 am | येडाखुळा
सर्वांचे धन्यवाद!
वेताळ,
गुहेमधे नेहमीच पाणी असतं, आणी ते पण अतीशय थंडगार!!!
अगदी freezing cold :)
11 Jun 2010 - 11:29 am | महेश हतोळकर
फोटो, वर्णन, सफर सगळच मस्त! आजून येऊदे.
11 Jun 2010 - 2:26 pm | स्वतन्त्र
अहो येडाखुळा तुम्हाला रोहिदास नव्हे तर तारामती शिखरावर जायचे असेल...तिसऱ्या आणि चोवथ्या छायाचित्रात दिसते ते रोहिदास शिखर आहे...! आणि आपल्या "ओवरहंग" च्या चित्रात वर दिसत आहे ते तारामती....(जे महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचे शिखर आहे) !जेथे आपणास जाणे शक्य आहे ! बाकी फोटो मस्त आणि लेखन हि अप्रतिम
11 Jun 2010 - 2:45 pm | मदनबाण
सर्वच फोटो सुंदर आहेत्...पण शेवटचा मात्र अ प्र ति म... आहे. :)
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
11 Jun 2010 - 4:02 pm | jaypal
कोकण कडा खरोखरीच वेडा लावतो जिवाला. तिनही भाग आणि फोटो आवडले.
या निमीत्ताने आमचा ट्रेक आठवला
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
12 Jun 2010 - 1:28 am | येडाखुळा
स्वतन्त्र ,
माफी असावी...म्हणूनच चूक भूल देणे- घेणे म्हणालो होतो. :S
माहिती बद्दल आभारी आहे..
बाकी सर्वांचे ही आभार..
12 Jun 2010 - 6:27 am | शुचि
सुंदर वर्णन आणि छायाचित्रं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
12 Jun 2010 - 10:20 am | प्रचेतस
१) कळसुबाई
२)साल्हेर किल्ल्यावरील सर्वोच्च परशुराम टोक (खरे तर दुसरे शिखर कळसुबाई शेजारीलच साकिर्डा शिखर आहे. पण अतीशय निकट्च्या अश्या कळसुबाईच्या सानिध्यामुळे तो कळसुबाईचाच एक भाग मानतात.)
३)घनचक्कर रांगेतील मुडा शिखर
४)तारामती शिखर
५)आजोबा चे सर्वोच्च टोक
चुभूदेघे
---------
वल्ली
12 Jun 2010 - 12:31 pm | mamuvinod
फोटो छान आहेत
धन्यवाद
6 Jul 2010 - 11:40 pm | simplyatin
१) कळसुबाई
२)साल्हेर किल्ल्यावरील सर्वोच्च परशुराम टोक (खरे तर दुसरे शिखर कळसुबाई शेजारीलच साकिर्डा शिखर आहे. पण अतीशय निकट्च्या अश्या कळसुबाईच्या सानिध्यामुळे तो कळसुबाईचाच एक भाग मानतात.)
३)घनचक्कर रांगेतील मुडा शिखर
४)तारामती शिखर
५)आजोबा चे सर्वोच्च टोक
taaknarach hoto tevdhyat...tumchi pratikriya pahili.... :)
Taramati height 4800 ft. *approx*
yatin.
7 Jul 2010 - 12:08 am | हर्षद आनंदी
तिथुन पुढे डाव्या हाताला, जमिनित खडक खोदुन तयार केलेल्या काही खोल्या, दालन काहीही म्हणा पन आहेत. संख्या ५-६.
ईथुन गडावर, मंदीरापाशी भुयार जाते. अजुनही शाबुत आहे. कुठे-कुठे पाणी साचले आहे. दुरुस्त केल्यास क्रमांक १ चे आकर्षण ठरेल.
पुरावा म्हणजे, संपुर्ण गडाच्या परीघात फिरून या, या दोन ठिकाणी सापडणारी विशेष निळ्या फुलांची झुडुपे .. फक्त त्या भुयाराच्या सुरवातीला सापडतात.
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||