भटकंती हरीशचंद्र गडाची

jaypal's picture
jaypal in कलादालन
17 Nov 2009 - 1:08 am

नमस्कार मंडळी,
खुप दिवस झाले "एखादा ट्रेक हवा यार " असे म्हणत अनेक दिवसांत , अनेक कप चहा रिचवत अनेक अवांतर गप्पा झाल्या पण फुलों की घाटी नंतर ट्रेक असा झालाच नाही. एके रात्री (भरत परमारचा) १० वाजता फोन आला १२ व १३ सप्टेंबर ला हरिशचंद्रगड ट्रेक ठरला आहे, "तुझं काय ते लवकर कळव." अशी विचारणा झाली. शनिवार-रविवार असल्याने नकाराचा प्रश्नच नव्हता तात्काळ "होकार" कळवुन मोकळा झलो. हरिशचंद्रगडाची स्वप्नं बघता बघता १२ सप्टेंबरचा शनिवार एकदाचा उजाडला. सकाळी ६.३० वाजता टेंभिनाक्यावर (ठाणे) सर्वजण जमलो आणि क्वालीसने पुढचा प्रवास सुरु झाला.
एकुण सव्वा ७ जणांचा ग्रुप. वयोगट ६ (हो हो केवळ ६) ते ६० वर्षे. खरं नाही वाटत हे घ्या
मधोमध जी उभी आहे ती माझी छोटी हिरोइन "जिया परमार" संपुर्ण गड एकटीनेच अनवाणी (उचलुन घ्यावे लागले नाही) चढली. तिच्या डाव्या हाताला तीचे बाबा भरत परमार(हे पण गेली ८/९ वर्शे अनवाणीच फिरतात व्यवसाय= चार्टड आकौंटंट). ६० चे मयेकर काका देखिल उत्साहाला कुठेच कमी नव्हते. अधुन मधुन म्हणायचे "कॅमे-या मुळे जड आसेल ना, द्या द्या मी थोडावेळ घेतो".
हरिशचंद्रगडावर जाण्यासाठी माझ्या माहिती प्रमाणे दोन मार्ग १ला.खुबीफाटा - खिरेश्वर मार्गे. माळशेज घाट पार केल्यावर डाव्या बाजुस हा फाटा लागतो.पिंपळवाडी धरणाला लागुनच रस्ता आहे.२ रा - (अहमद्)नगर जिल्ह्यातील पाचणइ गावातुन. आम्ही खुबीफाटा - खिरेश्वर मार्गे जाणार होतो. गप्पांच्या नादात कल्याण पार पडल्याचे कळलेच नाही, आणि आता मुरबाड देखिल मागे पडले होते. हळुहळु गप्पा कमी होत गेल्या आणि सकाळच्या थंड हवेत मंडळींनी चालत्या गाडीतच ताणुन दिली. माळशेज घाटातील मारुतिच्या समोर नारळ फोडता फोडता सकाळचे ९.३० वाजले होते. चहा, बिस्कीटे व नंतर प्रसादाच्या खोब-याचा तोबरा भरुन प्रवास परत चालु झाला. घाटातील हे एक द्रुश्य खुबीफाट्यास येइपर्यंत १०.३० वाजले होते. गाडीतुन उतरुन सगळ्यांनी आपापल्या सामानांची मोजणी केली आणि ड्रायव्हरला पुढिल सुचना देउन परत ठाण्यास रवानगी केली. उन पावसाचा लंपडाव चालु असल्याने कॅमेरा बाहेर काढला नव्हता पण वातावरणच असं काही भरलेल अन भारावलेल होतं की शेवटी कॅमेरा काढलाच.
आमच्या स्वागतास हे फुल आणि पाखरु तयारच होते.

वर आमच्या उजव्या बाजुस दिसते आहे ते पिंपळ्वाडी धरण. डाव्या हातास असलेल्या माणसांच्या व वाहनांच्या गर्दीची चौकशी केल्यावर कळले की २ महीने झाले तीथे " रावण" या चित्रपटाचे शुटींग चालु आहे. आम्हि तिकडे दुर्लक्ष करुन प्रवास चालु ठेवला.खिरेश्वर गावातिल एका घर वजा हाटेलात चहा पोहे हादडुन साधारण १२.३० वाजता नव्या दमाने चढाइस आरंभ केला.


शान कि सवारी. असा एकदा ट्पावर बसुन प्रवास करायचा आहे

हिरवे हिरवे गार गालीचे ....हरीत त्रुणांच्या मखमालींचे

नभ उतरुं आल......अंग जिम्माड झालं

हाच तो"सरडा" केवळ याच्या वरतीच रंग बदलणारा म्हणुन शीक्का बसला आहे. माणसाची धाव कुंपणा पर्यंतच

दिल है छोटासा छोटिसी आशा. चांद तारोंको छुने की आशा

सुरवातिचा तोलारखिंडिचा दमछाक टप्पा पार पडला आणि हे पहा....

मोठ्ठ व्हायच असेल तर मुळं घट्ट पाहीजेत. (मलाच कळेना जगण्याची ही जिद्द कुठ्ली)

आता कड्याचा अवघड टप्पा सुरु झाला होता. पाठीवर सॅकच ओझं, कोरडा घसा, निसरडी वाट आणि "इकडे दरी तिकडे कडा" अशी अवस्था. पाय ठेवण्यास फक्त काही निसरड्या खोबणी, व सोबतीला सोसाट्याचा वारा आणि पावसाची रीपरीप. खर सांगतो खुप दडपण आल होतं(सभ्य भाषेत "फाटली" असं म्हणतात. आज अनुभव घेत होतो.) माझ आणि माझ्या छोट्या हिरोइनच. ती मात्र हावरेपणानी सगळ्यांच्या पुढे फुलपा़खरासारखी तुड्तुड्त होती. तीच्या बाबांनी तीला ३ वर्शांची असल्यापासुन भिमाशंकर ट्रेक ची सवय लावली आसली तरी माझ्या मनात उगाचच अपघताची शक्य शंका आणि धस्स होत होतं. (लाहनपणी आइ उशीरा घरी आली की, एकटा घरी असताना असं व्हायचं, आता मुलगा उशीरा आला की अस्स होतं.) ज्यांनी "हा " ट्रेक "या" मार्गाने केला आहे त्यांना माझ्या बोलण्याची कल्पना येइल. तुम्ही फोटो पाहुन करा....

थोडीशी जरी चुक झाल्यास "फोटोला हार" हा टप्पा पार करुन क्षणभर पठारावर निवात विसवलो. त्यातील काहि क्षण तुमच्या साठी.....(चोरलेले क्षण म्हणता येइल का हो?)

सध्याकाळी ४.३० /५ च्या सुमारास गुहेशी पोहचलो. राहण्याचा व जेवणाचा बंदोबस्त केला. शनिवार व रविवारी पाचणइ गावातिल काही लोक गडावरती जेवण, न्याहारी व चहाची सोय करतात.(रात्रीच जेवण सकाळचा नाष्टा व चहा सर्व अनलिमीटेड ७.२५ जणांसाठी केवळ रु.१०००) लिरील इष्टाइल आंघोळ करुन भटकंती सुरु केली. अर्थातच कॅमेरा होताच सोबतीला हा घ्या पुरावा...

रात्री पिठलं भाकरी, कांदा बटाटा रस्सा , भात आमटी सर्व चुलीवरचं भौ. शिजताना काय घमघमाट सुटला होता म्हणुन सांगु .जेवणावर उभा आडवा हात मारुन मंडळी ९ च्या आत ढाराढुर. गुहेतुन फक्त घोरण्याचाच आवाज येत होता. (वेगवेगळ्या गुहेत वेगवेगळे ग्रुप होते साधारण ४०/४५ जण असतील)
सकाळी सर्व विधि आटपुन चहा पोह्यांचा नाष्टा हाद्डला आणि निघालो कोकण कडा पाहायला.
आमच्या साठी निसर्गाने पायघड्या घातल्या होत्या.

मोत्यांची उधळण केली होती महराजा! किती वर्णु त्याची श्रिमंती? काय वर्णु त्याचा खजीना?

भरपुर ढग असल्याने कड्यावरुन खालचे काहीच दिसत नव्हते उंचीचा अंदाज देखिल येत नव्हता. (म्हणुन डिसेंबर आखेर पुन्हा जाण्याचा विचार आहे) सुमारे २५००/२६०० फुट खोल आहे असे म्हणतात.


तिला तिचा फोटो आवडला म्हणुन लगेच इनाम सुध्दा

कोकण कडा पाहुन परत आलो आणि देवळं बघायला सुरवात केली.

फोटो काढताना कुणी मधे आल की, तिच्याआयला, पण इथे ......... सौदर्यात भरच पडली राव

अचानक पाउस आल्याने कॅमेरा आवरता घ्यावा लागला व ब-याच देवळांचे (सप्ततीर्थ, विष्णु, केदारश्वर इत्यादी) फोटो टिपता न आल्याचे दु:ख घेउन परतीचा प्रवास चालु केला. माझा पाय मुरगळुन सुजल्याने आल्या मार्गाने न परतता दुस-या टोळी बरोबर ओळ्खकरुन घेतली आणि पाचणइ मार्गे उतरायला सुरवात केली.

खाली पाचणइ गाव आहे.

काय उडी मारायचा विचार दिसतोय काय?

हा देखिल सोबतीला होता बर का?

तारमती व रोहिदास शिखरं चढायची राहुन गेली. या गडाचा विविध पुराणात(मत्स्यपुराण, अग्निपुराण, स्कंद पुराण) उल्लेख आढळतो. या गाडाची निर्मीती ६ व्या शतकातील मानली जाते. १४व्या शतकात संत चांगदेवांनी येथे उपासना केल्याची देखिल कहाणी आहे.

गडाबद्द्ल थोडसं तांत्रिक विवेचन
जिल्हा = (अहमद) नगर
समुद्र सपाटी पासुन उंची = ४५१० फुट

लेखन प्रेरणा= श्री.विमुक्त यांच्या कढुन

छायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रभो's picture

17 Nov 2009 - 1:18 am | प्रभो

जय, मस्त रे...
भटकंती ही मस्त आणी फोटो तर अप्रतीम......मी आलो परत की जाउया आपण ट्रेक ला कुठे तरी....लक्षात ठेव..

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अक्षय पुर्णपात्रे's picture

17 Nov 2009 - 1:31 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री जयपाल, सुरेख वर्णन आणि चित्रे. चिमुरड्या जियाचे विशेष कौतुक.

jaypal's picture

17 Nov 2009 - 1:34 am | jaypal


"मी आलो परत की जाउया आपण ट्रेक ला कुठे तरी....लक्षात ठेव.."
तुम्हे याद रखुंगा प्रभो
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पाषाणभेद's picture

17 Nov 2009 - 2:17 am | पाषाणभेद

मस्त फोटो आहेत.

--------------------
काय? घरात वॉल टू वॉल कारपेट टाकायचे नाही? मग घरात स्लीपर वापरा.

पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

अनिल हटेला's picture

17 Nov 2009 - 2:26 am | अनिल हटेला

सही फोटोज आणी वर्णन...
जीयाचे विशेष अभिनंदन.....:-)

(कोकणकडाप्रेमी)
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

अनामिक's picture

17 Nov 2009 - 2:28 am | अनामिक

मस्तं आहेत सगळेच फोटू.... कॅमेरा कुठला?

-अनामिक

गणपा's picture

17 Nov 2009 - 2:36 am | गणपा

मस्तच रे जयपाल.
सुरेख फोटो आणि त्या बरोबरच धावत समालोचन.
९४ त ९८ या काळात ५ वर्ष दर पहिल्या श्रावणी सोमवारी भिमाशंकरला जायचो त्याची आठवण झाली.
(गेले ते दिन गेले :( )

संदीप चित्रे's picture

17 Nov 2009 - 3:25 am | संदीप चित्रे

>> फोटो काढताना कुणी मधे आल की, तिच्याआयला, पण इथे ......... सौदर्यात भरच पडली राव

हा फोटो खूपच आवडला.
हा ट्रेक पूर्ण केल्याबद्दल चिमुरडी जिया आणि मयेकरकाकांचे विशेष अभिनंदन सांगा.

भोचक's picture

19 Nov 2009 - 1:03 pm | भोचक

संपूर्ण सहमत. सर्वच फोटो क्लास. पण शेवटचा विशेषच.

अवांतर- हे फोटो पाहिले की महाराष्ट्र भूमीच्या आठवणीने अंमळ हळवं व्हायला होतं.....

(भोचक)
इंदूरला आलात नि सराफ्यात नाही गेलात? आयुष्य फुकट गेलं यार तुमचं!
हा आहे आमचा स्वभाव

स्वाती२'s picture

17 Nov 2009 - 3:49 am | स्वाती२

मस्त फोटो आणि वर्णन! छोट्या जियाचे कौतुक करायला तर शब्दच अपुरे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

17 Nov 2009 - 12:42 pm | भाग्यश्री कुलकर्णी

स्वातीसारखेच म्हणते.

चतुरंग's picture

17 Nov 2009 - 4:01 am | चतुरंग

सुंदर फोटू आणि खुसखुशीत वर्णन!

वरती संदीप म्हणतोय तसा -
>> फोटो काढताना कुणी मधे आल की, तिच्याआयला, पण इथे ......... सौदर्यात भरच पडली राव
हा फोटो फारच सुंदर. चिमुरडीच्या चेहेर्‍यावरचे भाव एकदम नैसर्गिक आलेत!
फुलपाखराचा आणि कॅमलिऑनचाही विलक्षण स्वच्छ आलाय. अप्रतिम फोकसिंग.
जियाचे आणि मयेकरकाकांचे पेश्शल अभिनंदन! :)

(एक सावधगिरीची सूचना -लहान मुलांना भरपूर उत्साह असतो पण जिया सारख्या लहान मुलीला अशा ठिकाणी कृपया अनवाणी चालू देऊ नका. तिच्या वडिलांना हे सांगा. एकतर खडकांच्या धारदार कपारी असतात त्याने पायांना अतिशय गंभीर जखमा होऊ शकतात. शिवाय जळवा, खेकडे आणि तत्सम कीटक आणि प्राण्यांनी पायांना इजा होऊ शकते. धाडस वेडं नसावं!)

(अनुभवी)चतुरंग

मदनबाण's picture

17 Nov 2009 - 7:32 am | मदनबाण

मस्त भटकंती झालेली दिसते...फोटो मस्त.

मदनबाण.....

The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.

एकलव्य's picture

17 Nov 2009 - 8:15 am | एकलव्य

फुलांचे, दगडांचे, दर्‍यांचे आणि माणसांचे --- सगळेच फोटो जबरदस्त! अगदी नजर खिळून राहतील असे.

हा आनंद आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल मनापासून धन्यवाद!

एकलव्य's picture

17 Nov 2009 - 8:24 am | एकलव्य

आणि हो... तुमची कॅप्शन्सही जबरा!!

सहज's picture

17 Nov 2009 - 9:03 am | सहज

हेच म्हणतो.

विसोबा खेचर's picture

17 Nov 2009 - 8:54 am | विसोबा खेचर

वा!

टारझन's picture

17 Nov 2009 - 10:41 am | टारझन

व्वा !!

घाटावरचे भट's picture

17 Nov 2009 - 10:50 am | घाटावरचे भट

व्व्वा!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Nov 2009 - 11:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

व्वाव्वा!!!

दशानन's picture

17 Nov 2009 - 6:15 pm | दशानन

वा वा वा !

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

आशिष सुर्वे's picture

17 Nov 2009 - 9:53 am | आशिष सुर्वे

सुंदर भटकंती!!
छायाचित्रण भन्नाट झाले आहे..

फोटो काढताना कुणी मधे आल की, तिच्याआयला, पण इथे ......... सौदर्यात भरच पडली राव..

हे छायाचित्र केवळ अप्रतिम!!
-
कोकणी फणस

विमुक्त's picture

17 Nov 2009 - 10:04 am | विमुक्त

सुंदर... एकदम भारी... मजा आली...

हरिशचंद्रगडावर नाळीच्या वाटेने (कोकण कड्यावरुन काली कोकणात बघताना उजव्या टोकाला ही नाळ आहे...) पण जात येतं... पण खूप अनुभव हवा त्यासाठी... मी चढलोय नाळीच्या वाटेने... सहीच आहे...

पर्नल नेने मराठे's picture

17 Nov 2009 - 10:18 am | पर्नल नेने मराठे

मस्तच्!!! कॅमेरा कुठला?

चुचु

मॅन्ड्रेक's picture

17 Nov 2009 - 10:55 am | मॅन्ड्रेक

शब्द संपले ................................................................
at and post : Xanadu.

सुमीत भातखंडे's picture

17 Nov 2009 - 11:20 am | सुमीत भातखंडे

झक्कास आल्येत फोटो.
वर्णन आणि कॅप्शन्स पण मस्त.

झकासराव's picture

17 Nov 2009 - 11:53 am | झकासराव

गारेगार वाटल.
मस्त आहेत सगळे फोटो. :)
अनवाणी का जातात??

jaypal's picture

17 Nov 2009 - 12:19 pm | jaypal

भरतचं अनवाणी जाणं जैन धर्माशी निगडीत आहे. (किंवा रामाला पादुका दिल्या म्हणुनही असेल )
जियाच म्हाणाल तर बाबा करतात म्हणुन (माय डॅडी स्ट्रांगेस्ट)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

sneharani's picture

17 Nov 2009 - 1:27 pm | sneharani

वर्णन आणि फोटो एक्दम मस्तच...
:)

श्रावण मोडक's picture

17 Nov 2009 - 2:04 pm | श्रावण मोडक

सारेच देखणे!

फ्रॅक्चर बंड्या's picture

17 Nov 2009 - 2:07 pm | फ्रॅक्चर बंड्या

मस्तच...

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Nov 2009 - 12:04 am | बिपिन कार्यकर्ते

झ्याक !!!

आणिक काय बोलणे? साधारण वीस-बावीस वर्षांपूर्वी गेलो होतो. तमाम आठवणी जाग्या झाल्या. प्रत्येक हायकर / ट्रॅकरला खुणावणारा कोकण कडा !!!!

बिपिन कार्यकर्ते

निमीत्त मात्र's picture

18 Nov 2009 - 3:01 am | निमीत्त मात्र

सुंदर फोटो जयपाल! मस्त रिफ्रेश केलेत.

पक्या's picture

18 Nov 2009 - 3:24 am | पक्या

वा वा वा मस्तच.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

विचित्र विर's picture

18 Nov 2009 - 3:29 pm | विचित्र विर

पेरु फोटो तर झक्कास आलेतच पण प्रवास वर्णनहि सूरे़ख केलयस
लय भारि राव

एक माहिति : त्या देवळात देव नसुन द्रोपदि चा ताट आहे आणि अशि अख्यायिका आहे कि देवलावर हिरे लावले होते जे इंग्रजांनि ते लुटुन नेले

सूहास's picture

18 Nov 2009 - 4:33 pm | सूहास (not verified)

+१

जिया परमार जिंदाबाद !!

सू हा स...

किट्टु's picture

18 Nov 2009 - 5:42 pm | किट्टु

खुपच सुंदर फोटोस....

मस्त ट्रिप घडवुन आणलीत..... 8>

बबनराव's picture

18 Nov 2009 - 6:46 pm | बबनराव

फारच सुंदर फोटू .काय राव किती जणांनी विचरला की कॅमेरा कोणता
पण तुम्ही काय सांगत नाय राव.

jaypal's picture

18 Nov 2009 - 6:53 pm | jaypal

कॅमेरा = निकोन डि९०
लेन्स = निकोन १८-५५ डिएक्स
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

बबनराव's picture

19 Nov 2009 - 1:09 pm | बबनराव

अप्रतिम फोटो आणि कॅमेरा पण क्लास आहे.क्लॅरिटी पण जबरदस्त्.एकदम झक्कास.................
कॅमेरा बद्दल महिती दिलीत धन्यवाद.

विचित्र विर's picture

18 Nov 2009 - 8:15 pm | विचित्र विर

>:)

पेरुचि फोड फारच गोड

यशोधरा's picture

18 Nov 2009 - 8:44 pm | यशोधरा

अरे व्वा! सह्ही आहे! आज पाहिले :)
ती छोटी तर कसली सह्ही आहे! तिचे खूप कौतुक :) आणि तिचा खांबामागचा की नंदीमागचा फोटो खूप मस्त आलाय :) बाकीचे फोटोही मस्त.

संदीप शल्हाळकर's picture

19 Nov 2009 - 1:34 pm | संदीप शल्हाळकर

नक्की प्रयोजन करत आहे जाण्याचा .....

संदीप शल्हाळकर's picture

19 Nov 2009 - 1:35 pm | संदीप शल्हाळकर

नक्की प्रयोजन करत आहे जाण्याचा .....

संदीप शल्हाळकर's picture

19 Nov 2009 - 1:35 pm | संदीप शल्हाळकर

नक्की प्रयोजन करत आहे जाण्याचा .....

jaypal's picture

20 Nov 2009 - 9:23 pm | jaypal

प्रतीसादात्मक भटकंतीत सामिल सर्व भटक्यांचे मनापासुन आभार
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मुक्त विहारि's picture

5 Jan 2015 - 11:44 pm | मुक्त विहारि

मिपाच्या खाणीत काय काय दडले आहे, कुणास ठावूक...

स्पार्टाकस's picture

6 Jan 2015 - 4:58 am | स्पार्टाकस

गेल्या १८ वर्षांत किमान चाळीस ते पन्नास वेळा तरी हरिश्चंद्रगडावर जाणं झालं असेल! आता इथे आल्यापासून फक्त सुटीत भारतात आल्यावरच भेट होते (न चुकता हं!)

या गडावर जाण्यासाठी एकूण ९ वाटा आहेत!

१. खिरेश्वर - तोलारखिंड मार्गे जाणारी वाट
२. खिरेश्वर - राजदरवाज्यामार्गे येणारी वाट
३. खिरेशवरच्या विरुद्ध बाजूने कोथळे गावातून तोलारखिंडीत येणारी वाट!
४. गणेश धारेची वाट. कोथळे गावच्या मागून येणारी खडतर वाट.
५. विठ्ठल धारेची वाट.
६. पाचनई वरुन येणारी वाट. ही वाट सर्वात सोपी.
७. सादडे / साधले घाटाची वाट. ही वाट कलाडकडे जाताना एका घळीतून वर येते.
८. नळीची वाट.
९. कोकणकडा चढून येणारी अत्यंत कठीण तांत्रिक चढाईची वाट!

यापैकी ९ वी वाट सोडून उरलेल्या ८ वाटांनी मी हरिश्चंद्रगडा चढलो-उतरलो आहे.

वेल्लाभट's picture

6 Jan 2015 - 3:21 pm | वेल्लाभट

यासाठी # रिस्पेक्ट !
आणि बिग थंब्स अप !

स्वच्छंदी_मनोज's picture

6 Jan 2015 - 3:52 pm | स्वच्छंदी_मनोज

+ १

मुक्त विहारि's picture

6 Jan 2015 - 3:56 pm | मुक्त विहारि

+२

विशाल कुलकर्णी's picture

6 Jan 2015 - 3:59 pm | विशाल कुलकर्णी

सगळेच फोटो मस्त. विशेषतः मॅक्रोज अल्टीमेट :)