गणपती बाप्पा मोरया

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
19 May 2010 - 1:10 am

गणपती बाप्पा मोरया

मंडळी आपला नेहमीचाच हिरो आन हिरवीन आहे. या हिरोच्या गल्लीत सार्वजनीक गणपती बसतो आहे. हिरो (चांगल्या स्वभावाचा) भाई आहे अन टपोरी पोरे घेवून फिरतो. मोठ्या पटांगणात तयारी केली आहे अन गल्लीतली सगळी पोरे घेवून हिरो नाचत आहे.
(या सिन नंतर लगेचच एक फायटिंग चा सिन असल्याने साईड हिरो पण या गाण्यात आहे.)
चाल: नेहमीचीच

(भक्तिरसपुर्ण गाण्यास अशा फालतू सिन मध्ये टाकल्याने गणपती बाप्पा मला माफ कर.)

हिरो नं १ :
चला रे चला नाचू या गावू या
बोला रे बोला गणपती बाप्पा मोरया ||धृ||

हिरो नं १ :
ढोल ताशे हे असे जोरात वाजती
रंगात येवूनी पोरे ही नाचती
पुढे होवूनी सारे एका ओळीत या रे
मखरात ठेवायला मुर्ती उचला रे
आरास केली अन आता मंडप सजवू या ||१||

कोरस:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया

साईड हिरो:
आरती आता करूया अन देवाला आळवू या
प्रसाद खावू या अन सार्‍या गल्लीमध्ये वाटूया
नाचात दंग आता सारे झाले बेधुंद
गुलाल उधळू अंगावर घेवू या रंग
श्रींचे पुजन करून भक्तिरसात सारे न्हावूया ||२||

कोरस:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया

हिरवीन:
गणपती असे ही विद्येची देवता
भजता मनोभावे पावे तो सर्वथा
आनंदी जग झाले गणपती येता
कल्याण होई तो आशिर्वाद देता
पुढल्या वर्षी बाप्पा लवकर आणूया ||३||

कोरस:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया

कोरस:
चला रे चला नाचू या गावू या
बोला रे बोला गणपती बाप्पा मोरया

नाशिक ढोल:
धडदंग...धडदंग...धडदंग...दंग

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१९/०५/२०१०

शांतरसनृत्यकविताचित्रपट

प्रतिक्रिया

पक्या's picture

19 May 2010 - 11:10 am | पक्या

मराठी सिनेमात शोभेलसं गाणं झालं आहे.
हिरवीनचं कडवं जास्त आवडलं.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

फटू's picture

19 May 2010 - 11:20 am | फटू

वर पक्या म्हणतोय तसं हिरवीणीचं कडवं छानच झालंय.

चित्रपटात गणपतीचं किंवा गोविंदाचं गाणं असणं हा जणू काही प्रोटोकॉलच झाला आहे. दर्दसम्राट अल्ताफ राजा यांच्या "पेहले तो कभी कभी गम था" या गीताच्या चित्रफीतीची सुरुवात चक्क गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीने होते.

ईथून पुढे होणार्‍या गणेशाच्या एक वर्षभराच्या विरहाच्या "गमाचा" संबंध त्या "गमाशी " जोडला आहे... आहा...

- फटू

पाषाणभेद's picture

19 May 2010 - 1:38 pm | पाषाणभेद

म्हूनच आमी ह्ये गानं लिवलय. आन हिरवीन बी काय म्हंते पाहिलं का?
"पुढल्या वर्षी बाप्पा लवकर आणूया"

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

मदनबाण's picture

19 May 2010 - 11:34 am | मदनबाण

गणपती बाप्पा मोरया !!! :)
छान कविता...

मदनबाण.....

“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger