आज सकाळी ऒफ़ीसला येताना, मध्येच एका ठिकाणी सिग्नल लागल्याने थांबावे लागले. बाईकचे इंजीन बंद केले आणि आपली पाळी येण्याची , सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहात थांबून राहीलो. शेजारी एक रंग ओळखू न येणारी डबडा मारुती ८०० येवुन उभी राहीली. मी एकदा तिच्या एकंदर बाह्यरुपाकडे बघितलं आणि नाक मुरडलं. एकदर रंग करडा किंवा तत्सम कुठलासा होता. आणि मालकाने बहुदा तीला गेल्या महिन्या-दोन महिन्यात साफ़ करण्याची तसदी घेतली नव्हती. मी तोंड वाकडे करत खिडकीतून आत डोकावलो. एक साठीच्या घरातले काका गाडी चालवत होते. त्याच्याकडे पाहताना माझ्या लक्षात आले की गाडीत अगदी हळु आवाजात कुठलंसं जुनं गाणं लागलय. मी जरा लक्ष देवून ऐकायचा प्रयत्न केला आणि बोल कळाले...
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले
हम आज अपनी मौत का सामान ले चले
मौत का सामान ले चले
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले
तेवढ्यात हिरवा सिग्नल लागला आणि काकांनी गाडी भरकन पुढे काढली. मीही निघालो. पण त्या गाण्याच्या ओळी कानात गुंजत होत्या. त्या गाण्यासाठी म्हणून मी काकांचा गाडी साफ़ न करण्याचा गुन्हा सहज माफ़ करून टाकला होता.
५० च्या दशकात आलेला ’आन’ , दिलीपकुमार, नादीरा, प्रेमनाथ, निम्मी असे सगळेच आवडते कलाकार. माझ्या पेक्षा जवळजवळ २२ वर्षांनी मोठा असलेला हा बोलपट मला खुप आवडला होता. पुढे १९४० मध्ये औरत आणि १९५७ ला एक दंतकथा बनुन गेलेला ’मदर एंडिया’ दिलेल्या मेहबुब खान यांनी १९५२ मध्ये आपल्या या चित्रपटातून नादीराला पहिल्यांदाच ब्रेक दिला होता.
"आन"चे रंगीत पोस्टर
विशेष म्हणजे ’आन’ हा मेहबुबखानचा पहिलाच रंगीत चित्रपट होता. या चित्रपटाचे पहीले रिलीज त्याने लंडनमध्ये केले होते. एक सामान्य राजनिष्ठ माणुस आणि एक निष्ठूर, क्रूर राजकुमार यांच्यातली जुगलबंदी या चित्रपटात रंगवली होती. असो...
या चित्रपटाचे मुख्य आकर्षण होते ’नौशाद’चे कर्णमधुर संगीत.
असे म्हणतात की या चित्रपटाच्या संगीतासाठी नौशादने १०० जणांचा ओर्केस्ट्रा वापरला होता, जी त्याकाळी फ़ार नवलाईची गोष्ट होती. स्व. मोहम्मद रफ़ी आणि लतादीदी तसेच शमशाद बेगम यांचे दैवी स्वर वापरून नौशादने यात एकुण दहा गाणी दिली होती.
आग लगी तन-मन में, दिल को पड़ा थामना : शमशाद बेगम
आज मेरे मन में सखी बाँसुरी बजाए कोई : लतादीदी
गाओ तराने मन के जी, आशा आई दुलहन बन के जी : मो.रफ़ी, लतादीदी, शमशाद आणि शाम
चुपचाप सो रहे हैं वो आनबान वाले, आख़िर गिरे ज़मीं पर ऊँची उड़ान वाले : लतादीदी, मो. रफ़ी
मान मेरा अहसान अरे नादान के मैने तुझसे किया है प्यार : मो. रफ़ी
मुहब्बत चूमे जिनके हाथ जवानी पाओं पड़े दिन रात : मो. रफ़ी आणि शमशाद
सितमगर दिल में तेरे आग उलफ़त की लगा दूँगा, क़सम तेरी तुझे मैं प्यार करना भी सिखा दूँगा : मो. रफ़ी
दिल को हुआ तुम से प्यार, अब है तुम्हें इख़्तियार, चाहे बना दो, चाहे मिटा दो : मो. रफ़ी
खेलो रंग हमारे संग : शमशाद बेगम आणि लतादीदी
तुझे खो दिया हमने पाने के बाद : लतादीदी
आणि शमशाद बेगमनेच गायलेलं "मै रानी हूं राजेकी.....!"
सगळीच गाणी शकील बदायुनी यांच्याकडून लिहुन घेण्यात आलेली होती.
(ज्या गाण्यांच्या लिंक्स मी इथे देवू शकलो नाही, त्या कुणाकडे असल्यास कृपया इथे देणे ह विनंती.)
याच कर्णमधूर मैफ़ीलीतलं हे एक सदाबहार गीत...
दुडक्या चालीने चालणारी घोड्याची बग्गी, मागे नाक फ़ुगवून (अक्षरश: नाक फ़ुगवुन) बसलेली नादीरा ...आणि चढवलेल्या खोट्या दाढीमिशा भिरकावुन देवुन " दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले, हम आज अपनी मौत का सामान ले चले " म्हणत मिश्किलपणे नादीराला छेडणारा देखणा "जय" उर्फ़ दिलीपकुमार ! नौशादसाहेबांनी अशी कित्येक सुंदर गाणी देवून आपल्याला अक्षरश: उपकृत करुन ठेवले आहे.
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले, हम आज अपनी मौत का सामान ले चले...!
गीतकार : शकील बदायुनी
संगीतकार : नौशाद
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले
हम आज अपनी मौत का सामान ले चले
मौत का सामान ले चले
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले
मिटता है कौन देखिये उलफ़त की राह में
उलफ़त की राह में
मिटता है कौन देखिये उलफ़त की राह में
वो ले चले हैं आन तो हम जान ले चले
मौत का सामान ले चले
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले
मन्ज़िल पे होगा फ़ैसला क़िसमत के खेल का
क़िसमत के खेल का
मन्ज़िल पे होगा फ़ैसला क़िसमत के खेल का
कर दे जो दिल का ख़ून वो मेहमान ले चले
मौत का सामान ले चले
दिल में छुपा के प्यार का तूफ़ान ले चले
त्या सगळ्या जुन्या सुगंधी आणि मधुर आठवणी छेडणारी ती डबडा मारुती ८०० आणि ते म्हातारे काका यांचे आभार मानण्यासाठी त्यांना आता कुठे शोधू?
विशाल.
प्रतिक्रिया
14 May 2010 - 5:32 pm | शुचि
लेख खूप आवडला.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
14 May 2010 - 6:44 pm | विकास
छान लेख...
त्या चित्रपटातील गाण्यांप्रमाणेच दिलीप कुमारच्याच दिदार आणि अंदाज मधली गाणी पण एकदम मस्त आहेत.
(बाकी शिर्षक वाचून मला एकदम ह्या प्रतिसादासंदर्भातील वाटले होते. पण "सुदैवाने" भ्रमनिरास झाला ;) )
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
14 May 2010 - 8:19 pm | स्वाती२
लेख आवडला. लहानपणी विविधभारतीच्या भूले बिसरे गीत मधे ऐकायला मिळायची ही गाणी.