फुकट वेळ असला की हे असं होतं...

मेघवेडा's picture
मेघवेडा in जनातलं, मनातलं
30 Apr 2010 - 2:36 am

किती दिवस झाले मुखपृष्ठावरचा डावीकडचा 'लेखन करा' टॅब खुणावत आहे! आज मात्र मी मनावर घेतलंय. आज मी काहीतरी लिहिणारच!
एखादा वैचारिक लेख लिहावा लिहावा असं कधीपासून मनात होतं. मीही विचारवंत होणार! मीही काहीतरी अर्थपूर्ण लिहिणार.. माझ्याही लेखावर प्रतिसादाच्या खिरापती वाटल्या जाणार!! केवळ विचारानंच बघा कसं गारगार वाटतं! मग एका क्षणात भावी विचारवंताच्या मनाला एक विचार हलकेच स्पर्श करून जातो.. कशाला इतका तो प्रपंच? वैचारिक लेख लिहिणं म्हणजे काय विचार करण्याइतकं सोप्पंय होय? शिंप्याने कपडे शिवावे- ते त्याचं काम, धोब्याने ते धुवावे.. ('ते' म्हणजे कपडे.. नसते 'अच्रत, बाव्लत' विचार करू नयेत!) तसंच 'लॉन्ड्र्या'ने इस्त्री करावी त्यांनी आपापले मार्ग सोडून नस्त्या फंदात पडू नये! थोडक्यात काय तर वैचारिक लिखाण म्हणजे आपल्या कपातील चहा नव्हे! (चायला इंग्रजी वाक्प्रचार/शब्दप्रयोग मराठीत जसेच्या तसे अनुवादित केल्यावर हे असं होतं!) ते विचारजंतच काय ते करू जाणोत! एकतर आमचे विचार आधी महान!! त्यात ते शब्दबद्ध करायचे म्हणजे अतिमहत्युत्तम शब्दज्ञान हवं!! शब्दसंपदेच्या बाबतीत आम्ही घन्सू भिकारीच!! आम्ही जायचो काहीतरी वैचारिक लिहायला आणि उगाच काहीतरी 'ना धड गाढव ना धड घोडा' अशी खैचारिक (शब्द चुकीचा आहे हे ठाऊक आहे मला.. वैचारिक-खैचारिक यमक जुळतंय म्हणून घुसवलाय! कुणाला आक्षेप असल्यास व्यनिने कळवावे! या शब्दावरून वाद नकोत!) आवृत्ती निर्माण व्हायची!! त्यापेक्षा "नकोच ते वैचारिक लिखाण" असं म्हणून हा पर्याय बाजूस सारला!
नंतर वाटलं आपण काव्य करूया! कविला जनमानसात किती मानाचे स्थान असते! 'जे न देखे रवी ते देखे कवी' असं म्हणतात! आता कर्मधर्मसंयोगाने आमचा जन्मच झाला पूर्वा नक्षत्रावर. रास: सिंह. राशीस्वामी: अर्थात 'रवि'. नामाक्षरे आली: मो, टा, टी, टू. घ्या, झाली ना पंचाईत आमच्या शंकरपार्वतीची!! (आमचा सर्वांना त्रास देण्यात जन्मापासूनच हातखंडा असल्याचा हा पुरावा!) 'टारझन' नाव ठेवणार होते माझं असं मला नंतर कळलं. कुणीतरी "नावच 'टारगट' ठेवा की, म्हणजे नंतर मग 'काय टारगट कार्टं जन्माला आलंय' असं अगदी हक्काने म्हणता येईल!" असा भलताच टारगट सल्ला दिला होता असेही ऐकिवात आहे! शेवटी राशीस्वामी 'रवी' असल्यानं त्याच नावाचा श्ट्याम्पं लागला आमच्या भाळावर! हां, तर सांगायचा मुद्दा असा की, कर्मधर्मसंयोगाने (याच शब्दाने वाक्य सुरू केलं होतं मघा.. पण बरंच अवांतर झालं.. असो.) आमचं अभिधानच 'रवी' आहे! आता 'जे न देखे रवी, ते देखे कवी' या उक्तिनुसार जे मला दिसत नाही ते कविला दिसते, म्हणजे कवि जे बघतो ते मला दिसत नाही. (अ=ब म्हणून ब=अ.. लॉजिक आहे की नाही?) मग काय आपल्याला घंटा कविता जमणार! काव्य रचणं काही सोपं नाही. उगाच ट्यॅ ला ह्यॅ जुळवून काव्य होतं काय? या विचाराने काव्याचाही नाद सोडून दिला!! आणि आम्ही काव्यरचना केल्या तर त्या नाद'लेस' ठरणार याची शंकावजा खात्री हे काव्याचा नाद सोडण्याचे दुसरे कारण! (आमचे विचार असेच महान असतात! वैचारिक लेख न लिहिण्याचा माझा निर्णय पटू लागला असेलच आतापर्यंत तुम्हाला! ) असो. 'काव्य' शब्दावरून दहावीला संस्कृतात अभ्यासलेले 'काव्यशास्त्रविनोद' आठवले! चायला, आमच्या आयुष्यात काव्यशास्त्राच्या नावाने जरी ठणठणगोपाळ असला तरी विनोद मुबलक आहे हो!! आमचं एखाद्या ठिकाणी नुसतं उपस्थित असणं हाही कधी कधी एक विनोद ठरतो असो.
मग म्हटलं आपण एक तयार काव्यरचना घेऊन त्याला फोडणी देता येते का पाहू! अर्थात विडंबन! पण मग ध्यानात आलं विडंबन करायचं म्हणजे शेवटी एक काव्यच ते! साचा जरी तयार मिळाला तरी मूर्तीकाराच्या हातात कौशल्य असल्याशिवाय सुंदर कलाकृती घडत नाहीतच ना! आम्हाला कॉपी करणंही कधी धड जमलं नाही! तीही पकडली जायची! या फसलेल्या कॉपीचा एक किस्सा सांगतो. एसवायबीएस्सीला असताना फिसिक्सच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षेत त्या प्रयोगाचा सर्किट डायग्राम मला काही केल्या आठवेचना! माझ्या मागल्या टेबलवर माझा जिगरी यार होता. आणि त्याच्याकडे सर्वच्या सर्व प्रयोगाच्या चीट्स असणार याची पूर्ण कल्पना असल्याने, सगळे प्रयत्न करून हरलेला मी शेवटी त्याला शरण गेलो. त्याला म्हणालो बाबारे सर्किट डायग्राम दे, पुढे संभाळून घेईन मी. साहेबांकडे प्रत्येक प्रयोगाचे सर्किट डायग्राम्स, ऑब्सर्व्हेशन टेबल्स तयार होते. आणि सगळं कसं व्यवस्थित.. सर्किट डायग्राम्सच्या वेगळ्या चीट्स, ऑब्सर्व्हेशन टेबल्सच्या वेगळ्या .. सर्व काही सुनियोजित!! तर त्याने मला माझ्या प्रयोगाचा सर्किट डायग्राम असलेली चीट दिली. मग काय.. आता डायग्राम मिळाला. तो काढून सरांना दाखवू. पुढचं डायग्रामवरून आठवेलंच म्हणून मी एकदम खुश झालो! सरळ तसाच्या तसा डायग्राम उतरवला!! आणि डायग्राम होताच एकदम जोरात ओरडलो, "सर.. डायग्राम झाला!!" अख्ख्या बॅचमध्ये सर्वात पहिला माझा डायग्राम खम्प्लीट झालेला!! माझ्या चीटमास्टर मित्राच्याही आधी!! आमचे पाटील सर आले. त्यांची सकाळची साखरझोप मोडली असावी असं त्यांच्या चेहर्‍यावरून वाटत होतं.. (हो .. सकाळी ७ वाजता ठेवली होती आमची प्रॅक्टिकल परीक्षा!! बव्लत!!) माझा डायग्राम पाहून झोपच उडाली त्यांची.. त्यांच्या चेहर्‍यावर असे काही भाव झळकले जणू कधी झोपलेच नव्हते ते!! एकदा जोरदार खाकरत मला म्हणाले,
"अरे काय रे तू.. तुला विचारलंय काय.. तू डायग्राम कुठला काढलायस? अरे कॉपी करता ती तरी धड करायला शिका. कुठाय कॉपी?? अरे ए जावरे, हे बघ पराक्रमी विद्यार्थी तुझे!!" पाटील सरांनी परमवीरचक्र बहाल केलं मला!!
"सर, कॉपी ना..नाही के..के..केलीये मी...!!" चीट हातात मिळताच माउंट एव्हरेस्टवर पोचलेला माझा आत्मविश्वास धाडकन मरिआना ट्रेंच मध्ये पोचला होता!!
"हो का.. कुठला प्रयोग विचारलाय तुला.. अरे गाढवा.. टेबलवर बर्नर दिसतोय का अ‍पॅरेटस मध्ये? तुझ्या डायग्राम मध्ये कुठून आला....?" असं म्हणत पाटील सरांनी लाल पेनाने एक मस्त काट मारली माझ्या डायग्रामवर.. आणि म्हणाले, "बरोबर डायग्राम काढ आधी. ए रघू.. बघ रे जरा याच्याकडे" असं म्हणत त्या भल्या माणसाने शिपायाला पाठवलं माझ्या मदतीला म्हणून मी वाचलो!
तर तेव्हा चीटवर बघितलं तर दोन्ही बाजूस एक एक सर्किट डायग्राम होते. आणि मुख्य म्हणजे दोहोंवर व्यवस्थित प्रयोगांची नावं लिहिलेली होती. माझ्या प्रयोगाचा डायग्राम राहिला मागल्या बाजूला. मला चीट मिळताच इतका आनंद झाला होता की सरळ चीट उघडून मी समोरचा डायग्राम पेप्रावर खरडायला सुरूवात केली. मित्रावर पूर्ण भरवसा ठेवला होता की तो बरोब्बर मला हवा तोच डायग्राम देणार! त्यानं दिलाही.. पण भाड्यानं सांगितलं नाही दोन डायग्राम्स आहेत त्या चीटवर म्हणून!!
तर सांगायचा मुद्दा असा की धड कॉपी करायलाही जमली नाही कधी. विडंबन करायचं म्हणजे काय कॉपी नाही करायची. त्याच साच्यात नवी कलाकृती घडवायची!! जाऊदे .. आपणास जमायचे नाही म्हणून तोही धडा ऑप्शनला टाकला मी!
मग म्हटलं आपण एखादं काथ्याकूट टाकूया. निदान आपल्या नावावर एक धागा तरी लागेल!! आपण धागा काढून पसार होऊ.. नाही नाही.. त्या विक्षिप्त पोरी/बायका/पुरूष आणि कोण कोण बसतात तसं झाडावर जाऊन बसू.. करू देत लोकांना चर्चा.. आपण फक्त मजा घेऊ!! सध्या हॉट विषय बरेचसे आहेत!! त्यात सारेगामा चालू झालंय. सारेगामा म्हणजे काथ्याकूटासाठी एक नंबर विषय हे माझ्या मनत्सु ने ताडलेलं आहे!! त्यात एखादा बॅकवर्ड क्लासचा स्पर्धक असला म्हणजे सोन्याहून पिवळं.. लोकांना चर्चेला आयताच विषय मिळणार.. पुन्हा ठाकरे सध्या फॉर्मात आहेत!! तेव्हा म्हटलं यापैकी एक विषय घेऊन एक काथ्याकूट काढूयाच.. गेलाबाजार शंभर प्रतिसाद तर सहज मिळतील. असं म्हणत धागा काढायला क्लिकणार इतक्यात माझं लक्ष एका धाग्याकडे गेलं, "राणी चन्नम्मादेवीवर इतका सुंदर धागा होता तो. छान माहिती होती. पण प्रतिसाद वेगळ्याच दिशेला जात होते! आणि वातावरण तापत होतं.. तेव्हा म्हटलं नको ब्वॉ.. सध्या काही दिवसांकरता काकुचा नाद सोडावा. (काही 'अच्रत' विचार करू नयेत. काकु म्हणजे काथ्याकुट म्हणायचंय मला!! ) काकुचाच काय लिखाणाचाच नाद सोडावा म्हटलं. विचार केला, सध्या आपला आंतरजालाचा अभ्यास बराच कमी पडतोय. जरा इकडे तिकडे खवह्यांमध्ये किंवा आणि कुठे कुठे भटकत मिळेल तिथून ज्ञान उचलत राहू.. ज्ञानार्जनाची साधने आणि मार्ग काही कमी नाही आहेत! आपलं ज्ञान जरा अद्ययावत करून घेऊ. म्हणजे मग कुणी म्हणायला नको.. "मेवे.. अभ्यास कमी पडतोय तुमचा!"
चला अभ्यासाला लागतो!! :)

मौजमजाप्रकटनविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

30 Apr 2010 - 3:09 am | प्राजु

छान छान!!
म्हणजे नमनाला घडाभर तेल ओतलत म्हणा आज!
असो.. तुमच्या आवडीच्या विषयावरील लेखनाची वाट पहाते आहे.

नमनाचा हा लेखही आवडला हे वेगळे सांगायला नको.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

अस्मी's picture

30 Apr 2010 - 11:30 am | अस्मी

मस्त :)

नमनाचा हा लेखही आवडला हे वेगळे सांगायला नको.

सहमत

लवकरच एक (क्रिकेट्वरचा) छानसा लेख येऊदे :)
- अस्मिता

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
ओळखेल कुणीतरी मला माझ्यापेक्षा जास्त..
स्वतः सूर्याला तरी कुठे दिसतो सूर्यास्त

प्रमोद देव's picture

30 Apr 2010 - 11:50 am | प्रमोद देव

हे जे काही लिहिलंय तेही आवडलं...बिनधास्त लिहा तुम्ही....बुवा. जमतंय तुम्हाला...अगदी झ्याक जमतंय. :)

शानबा५१२'s picture

30 Apr 2010 - 11:52 am | शानबा५१२

काय बकवास लेख लिहलाय
नाही वाचला नाही लेख......पण तुझ्यावर विश्वास आहे ना यार!! :D

टारझन's picture

30 Apr 2010 - 12:04 pm | टारझन

(काही 'अच्रत' विचार करू नयेत. काकु म्हणजे काथ्याकुट म्हणायचंय मला!! )

=)) =)) =)) =)) काकुचा नाद कधी-कधी न झेपणारा ..
बाकी मेघवेड्याचे आम्ही फार पुर्वीपासुन फॅण आहोत .. त्याच्यातला टॅलेण्ट आम्हाला पुर्वीच दिसला :)

Pain's picture

30 Apr 2010 - 12:41 pm | Pain

काहीही !

महेश हतोळकर's picture

30 Apr 2010 - 5:43 pm | महेश हतोळकर

असाच फुकट वेळ तुम्हाला नेहमी लाभो!

भडकमकर मास्तर's picture

30 Apr 2010 - 5:46 pm | भडकमकर मास्तर

मिपावर पूर्वी काही सर्किट डायग्राम्स पाहिल्याचे स्मरते ;)

धमाल मुलगा's picture

30 Apr 2010 - 6:35 pm | धमाल मुलगा

नाही नाही म्हणत बरा पानभर लेख लिहिलायस की बे मेघ्या :)

भारी जमतंय लेका, का हात आखडता घेतोयस? येऊदे आणखी :)

अनिल हटेला's picture

30 Apr 2010 - 6:53 pm | अनिल हटेला

णमणाचा लेख आवडला...:)
अजुन येउ देत असेच हलके फुलके लिखाण...

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

मेघवेडा's picture

30 Apr 2010 - 7:39 pm | मेघवेडा

>> बाकी मेघवेड्याचे आम्ही फार पुर्वीपासुन फॅण आहोत
अरे बापरे!! आज ढण्य ढण्य जालो!! :) टार्‍या ल्येका एका वाक्यात तुला कोदा दिसले नाहीत हे पाहुन मलाच आश्चर्य वाटलं.. णंदणभौने बरोब्बर ओळखलंन.. तुझ्याकडून अपेक्षा होती मला!! :) असो.

>> का हात आखडता घेतोयस? येऊदे आणखी
जरूर मालक! सध्या वेळच वेळ्ये!! :)

आणि बाकी सर्वांना.. हा 'लेख' वगैरे नाहीये हो.. खरडाखरडी म्हणा हवं तर.. आणि शानबॉचा प्रतिसाद लईच भारी!! ;) धन्यु!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मुशाफिर's picture

1 May 2010 - 12:36 am | मुशाफिर

लेख चांगला जमलाय! पु. ले. शु.

मुशाफिर.

इंटरनेटस्नेही's picture

3 May 2010 - 3:25 am | इंटरनेटस्नेही

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

पिंगू's picture

1 May 2010 - 3:53 pm | पिंगू

आमचाबी वेळ फुकट गेला की ह्ये वाचून....... ;)

मी-सौरभ's picture

2 May 2010 - 1:25 am | मी-सौरभ

जरा खेळावर बी टंका!!!

-----
सौरभ :)

राघव's picture

2 May 2010 - 1:08 pm | राघव

धागा खूप उशीरा बघीतलान्..
असो. मस्त लिहितोयेस रे.. आवडलं आपल्याला हे घडाभर तेल ;)
येऊ देत एखादा फर्मास लेख!

राघव

नाना चेंगट's picture

8 Jun 2012 - 6:44 pm | नाना चेंगट

>>>चला अभ्यासाला लागतो!!

अभ्यास झाला असेल ना एव्हाना ! ;)

सूड's picture

8 Jun 2012 - 6:57 pm | सूड

हेच म्हणतो.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jun 2012 - 7:54 am | अत्रुप्त आत्मा

जबरी ल्हिलं हाय! बहुत मज्जा आया वाच के.

म्हन्जे तुमचि न माझि अवस्था एक्दम सेम टु सेम.

मन१'s picture

11 Jul 2012 - 2:10 pm | मन१

ह्याच धर्तीवर जालावर http://aisiakshare.com/node/547 हेही सापडलं.