(फसलेला लेख)

चेतन's picture
चेतन in जे न देखे रवी...
23 Apr 2010 - 7:30 pm

फ्रॅक्चर बंड्याची सुंदर कविता दमलेले ढग वाचली आणि मिपावर चाललेल्या मनोरंजक चर्चा वाचल्या अन असच सुचलं
हं. घ्या ;)

परवा अंतरजालावर आला एक तहानलेला लेख
मसाला भरलेला
खट्याळपणा केलेला
वाचनिय म्हणावे असे तर त्यामध्ये फार काही नाही
अन फार डो़क चालवायला लागाव असे तर मुळीच नाही

काहींनी तिरकस प्रतिसाद दिले तर काहिंनी विचारले
इतका का लढतो आहेस ?
असे काय दाखवतो आहेस ?

तो बोलला कंपु मागे लागला आहे ..
उणिवा शोधणारे...
बदल मागणारे...

मी ठरवणार, मी काय चिकटवायचे ?
कुणाबरोबर खादडायचे !!!
म्हणून लावतोय ..
ज्यांनी सौंदर्यावर प्रेम केले,
खादडी अन पटाक्याला फ्रेम केले
त्या चाहत्यांसाठी ...

http://fictitiousfande.blogspot.com/

हास्यविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

23 Apr 2010 - 7:44 pm | विसोबा खेचर

मी ठरवणार, मी काय चिकटवायचे ?
कुणाबरोबर खादडायचे !!!
म्हणून लावतोय ..
ज्यांनी सौंदर्यावर प्रेम केले,
खादडी अन पटाक्याला फ्रेम केले
त्या चाहत्यांसाठी ...

क्लास रे चेतनशेठ,

जियो.. ! :)

तात्या.

चित्रगुप्त's picture

23 Apr 2010 - 11:22 pm | चित्रगुप्त

ज्यांनी सौंदर्यावर प्रेम केले, त्या चाहत्यांसाठी ...

धमाल मुलगा's picture

23 Apr 2010 - 7:46 pm | धमाल मुलगा

चेत्या...
च्यायला... रुध्द प्रतिभा चतुरस्त्र वाहते आहे =)) =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Apr 2010 - 7:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी...! :)

-दिलीप बिरुटे
[मिपा सदस्य खाते क्रमांक २८ ]

टारझन's picture

23 Apr 2010 - 9:16 pm | टारझन

हाहाहा ... चेतनराव .... टप्पू टाकलाय निबार !!! आजुन येऊन द्या =))

- वेतन

II विकास II's picture

23 Apr 2010 - 9:37 pm | II विकास II

तो बोलला कंपु मागे लागला आहे ..
उणिवा शोधणारे...
== चेतनराव, अगदी अचुक टोला.

गेल्या काही दिवसात बर्‍याच जणांच्या शेपटीवर पाय पडला आहे. आज, मला एक जण खरडवहीत येउन दम देऊन गेला. काय गम्मंत आहे, आता कुठे लोकशाही येईल असे वाटले, कि लोकांनी दम द्यायला सुरवात केली. लोकशाहीची सुरवातच आम्हाला दम मिळुन झाली असो.
खुप घाबरलो आहे मी. ;)
आज काही लिहीत नाही.
कमीत कमी आज तरी त्याला मला घाबरवल्याचे समाधान मिळु देत. :D

---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

पक्या's picture

23 Apr 2010 - 9:43 pm | पक्या

हा हा हा...मस्त जमलय काव्य.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

राजेश घासकडवी's picture

23 Apr 2010 - 9:51 pm | राजेश घासकडवी

विडंबन छान जमलंय...

मदनबाण's picture

23 Apr 2010 - 10:04 pm | मदनबाण

हा.हा.हा...चेतनराव विडंबन भारी सुचलयं. ;)

प्रमाणाच्या बाहेर अवांतर :--- दोन दिवस झाले बरीच गम्मत-जम्मत पहायला मिळाली...( कुठे काय... त्या धाग्यावर ;) )लोकांचे विचार,मत मांडण्याची पद्धत पाहतोय...
बहुधा या सर्व मंडळींनी मालकांची वैयक्तिक माहिती वाचली (प्रोफाईल मधे डोकवा जरा त्यांच्या )नसावी...तिथे त्यांनी त्यांच्या बद्धल स्पष्ट लिहले आहे की... बाई आणि बाटली हे आमचे विशेष चिंतनाचे विषय असून "इष्कबाजी" या विषयात आम्ही डॊक्टरेट करत आहोत! मग खादाडी बरोबर आजची बायडी दिसली तर त्यात नवल ते काय !!! ;)
बाकी नव्या नव्या अभिनेत्रींची नावे मात्र कळली हे इथे मात्र नमुद करावेसे वाटते... ;)
बाकी चालु द्या... ;)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

विसोबा खेचर's picture

24 Apr 2010 - 12:10 pm | विसोबा खेचर

बाकी नव्या नव्या अभिनेत्रींची नावे मात्र कळली हे इथे मात्र नमुद करावेसे वाटते...

थँक्स.. :)

आपला,
(टीना ताहिलियानी प्रेमी) तात्या :)

पिंगू's picture

23 Apr 2010 - 10:08 pm | पिंगू

च्यामारी चांगलच टार्गेट मारलं की चेतनराव

चेतन's picture

24 Apr 2010 - 12:02 pm | चेतन

ह. घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद

बाणा इतक स्पेसिफिक नाही र लिहायचं ;)

चेतन