दमलेले ढग

फ्रॅक्चर बंड्या's picture
फ्रॅक्चर बंड्या in जे न देखे रवी...
23 Apr 2010 - 9:43 am

परवा माझ्या दारावर आला एक तहानलेला ढग
उन्हामुळे रापलेला
तहानेने व्याकुळलेला
कापसाचा गोळा म्हणावे असे तर त्याच्याकडे काहीच नाही
अन पाउस ह्याच्याकडेच लपला असावा असे तर मुळीच नाही

मी त्याला पाणी दिले अन विचारले
इतका का धावतो आहेस ?
असे काय लपवतो आहेस ?

तो बोलला विमान मागे लागले आहे ..
पाउस शोधणारे ...
पाउस मागणारे ...

मी ठरवणार, मी कुठे बरसायचे ?
कुणाला तरसवायचे !!!
म्हणून धावतोय ..
ज्यांनी निसर्गावर प्रेम केले,
धरती अन आकाशावर प्रेम केले
त्यांच्यासाठी ...

http://binarybandya.blogspot.com/

कविता

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

23 Apr 2010 - 9:48 am | प्रमोद देव

:)

विसोबा खेचर's picture

23 Apr 2010 - 10:52 am | विसोबा खेचर

वा! क्या बात है..

भूंगा's picture

23 Apr 2010 - 1:32 pm | भूंगा

भट्टी छान जमली आहे.
या कवितेमुळे मला श्री. यशवंत देव यांच्या " आतां पुढच्या वर्षी गणपती येणार नाहीत" या विडंबन काव्याची आठवण झाली.
भुंगा

फ्रॅक्चर बंड्या's picture

23 Apr 2010 - 4:24 pm | फ्रॅक्चर बंड्या

प्रमोदजी , तात्या आणि भुंगा धन्यवाद...

binarybandya™

शुचि's picture

23 Apr 2010 - 4:45 pm | शुचि

गोड
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.

मदनबाण's picture

23 Apr 2010 - 5:14 pm | मदनबाण

छान... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

चेतन's picture

23 Apr 2010 - 6:46 pm | चेतन

मस्त रे भाउ

sur_nair's picture

23 Apr 2010 - 9:57 pm | sur_nair

एकदम वेगळ्या विषयावर, खूप छान. . Earth Day साजरा केलेला दिसतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Apr 2010 - 10:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.....!

-दिलीप बिरुटे

अरुंधती's picture

24 Apr 2010 - 2:21 am | अरुंधती

:-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/