लादेन म्हणतो चेपेन चेपेन..

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
20 Apr 2010 - 7:32 pm

(संदिप-सलिल आणि त्यांच्या तमाम चाहत्यांची माफी मागून)

लादेन म्हणतो चेपेन चेपेन, दाऊद म्हणतो चेपेन चेपेन.
न्याय खोटा, कोर्टं खोटी, कायदाच म्हणतो चेपेन चेपेन..!

हल्ला होतो अतिरेक्यांचा मंत्री बदलत बसतो सूट.
दिल्लीवरुनी येता कोणी उचलत बसतो त्याचे बूट.
बूट म्हणाले मंत्र्याला आणिक त्याच्या संत्र्याला,
सुटला नाही 'बुश'सुद्धा डावा, उजवा फेकेन फेकेन..!

'कमळा' नाही सुगंध उरला, 'पंजा' देतो नुसतीच थाप
'इंजिन' पळते मारित शिट्ट्या, घोळामध्ये 'घड्याळ' - 'चाप'
महाराष्ट्राची धरती रे
परप्रांताची भरती रे
अबू चालवे सायकल सायकल, लालू धरतो लालटेन लालटेन..!

मी बापूंना मारुन डोळा, भरतो माझा पेला रे
जो प्याला तो मेला, जो ना प्याला तोहि मेला रे
महागाईने फुटता घाम,
जेवण सोडा, घ्यावा जाम.
गव्हापासून दारू दारू, ज्वारीपासून शँपेन शँपेन..!

नुसते सोसत राहण्याची या जगण्यालाही हॅबिट रे,
एसेमेसवर जिंकते कासव, जाणून चुकले रॅबिट रे,
थकलो मी जरी दमलो मी,
शर्यतीत या रमलो मी.
मेंदू म्हणतो थांबा थांबा, मन म्हणतं धावेन धावेन..!

मूळ कविता - साहेब म्हणतो चेपेन चेपेन
कवी - संदीप खरे

हास्यविनोदविडंबन

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

20 Apr 2010 - 7:34 pm | इनोबा म्हणे

मस्त जमलेय विडंबन. आवडेश. :)

श्रीराजे's picture

20 Apr 2010 - 7:42 pm | श्रीराजे

झकास रे....!

निखिल देशपांडे's picture

20 Apr 2010 - 7:44 pm | निखिल देशपांडे

विडंबन सही आहे...
आधी कुठे तरी वाचल्या सारखे वाटत आहे

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

भारद्वाज's picture

20 Apr 2010 - 8:29 pm | भारद्वाज

मस्त मस्त मस्त मस्त

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

धमाल मुलगा's picture

20 Apr 2010 - 8:33 pm | धमाल मुलगा

कवितेचं व्याकरण आपल्याला कळत नाही त्यामुळे आपण त्यावर बोलु शकत नाही, पण जबरदस्त जमलंय.

कोरडे एकदम जोरदार ओढलेयत.

प्राजु's picture

20 Apr 2010 - 8:34 pm | प्राजु

अ फा ट!!!!!
मस्तच!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

अनिल हटेला's picture

20 Apr 2010 - 9:23 pm | अनिल हटेला

मस्त जमलये विडंबन.....:)

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D

टारझन's picture

20 Apr 2010 - 9:46 pm | टारझन

जबरी रे उपटसुंभा :)

बाकी मला "लादेन म्हणतो पादेन पादेन" म्हणुन एक-दोन काव्यकडवी सुचली होती .. :) पण म्हंटलं चला द्या सोडुन :)

- लाल्टेन गॅसपेटवी

इनोबा म्हणे's picture

20 Apr 2010 - 10:08 pm | इनोबा म्हणे

लादेन म्हणतो पादेन पादेन
=))

पण म्हंटलं चला द्या सोडुन
सोडलं का मग? :)

-ग्यासोबा

राजेश घासकडवी's picture

20 Apr 2010 - 10:04 pm | राजेश घासकडवी

विशेष आवडलं म्हणजे मूळ कविताच असावी इतकी सुंदर लय आहे. प्रत्येक कडवं, प्रत्येक ओळ अर्थवाही झालेली आहे. मी मूळ कविता वाचलेली नाही, पण मला ती या कवितेइतकी चांगली असेल का अशी शंका आहे.

आणखीन येऊ द्यात.

चतुरंग's picture

21 Apr 2010 - 1:24 am | चतुरंग

चतुरंग

चिन्मना's picture

20 Apr 2010 - 11:03 pm | चिन्मना

कडक विडंबन जमलंय !! खरोखरंच अफाट !!! :)
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

निरन्जन वहालेकर's picture

21 Apr 2010 - 7:38 am | निरन्जन वहालेकर

लय म्हन्जे लैच बेस ! ! !
खरे सांहेबांना धोक्याची जाणीव झालेली दिसत नाही

इंटरनेटस्नेही's picture

10 May 2010 - 1:39 am | इंटरनेटस्नेही

विडंबन उत्तम आहे.
-
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

भडकमकर मास्तर's picture

10 May 2010 - 1:45 am | भडकमकर मास्तर

मस्त आहे
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

मृगनयनी's picture

10 May 2010 - 1:25 pm | मृगनयनी

सन्दीप खरे नि सलील कुलकर्णी' च्या काव्यात्मक प्रतिभेचे वास्तववादी विडंबन!

छान आहे!

अजून येऊ देत!

:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मदनबाण's picture

10 May 2010 - 7:48 am | मदनबाण

विडंबन लयं आवडले... :)

मदनबाण.....

"When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams."
Dr Seuss

वाहीदा's picture

10 May 2010 - 1:42 pm | वाहीदा

संदीप खरे ला द्या पाठवून हे विडंबन
तो ही म्हणेल (आमच्याच) सारखे अप्रतिम !!
~ वाहीदा

अरुंधती's picture

10 May 2010 - 8:09 pm | अरुंधती

भावना पोचल्या! मस्त विडंबन...

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/