सध्या अंताक्षर्या (मिक्स/मराठी), शिणेमे (आवडते/नावडते) यांना उत आलाय. पब्लीक उत्साहाने भाग घेउन भरगोस प्रतिसाद बी द्येतय.. म्हनल आपुन बी हात धुन घावा ;)
इथे तुम्हाला आवडणारी मराठी/हिंदि गाणी नमुद करा.
पण लेको तुम्हाला खालच्या वर्गवारीतल सर्वात जास्त आवडणार एकच गाण द्यायचय बर. (इतक्या आवडणार्या गाण्यातुन एकच निवडाच म्हणजे कठीण आहे. पण करा प्रयत्न)
या माहितीचा मला माझ्या संकलना साठी उपयोग होइलच इतर गरजुं नाही होईल.
गाणी:
युगुल गीत :
प्रेम गीत :
विरह गीत / सॅड साँग:
गायकाच्या आवाजातल :
गायीकेच्या आवाजातल :
माझी चॉईस :
युगुल गीत : तुझ्या गळा माझ्या गळा.. / तेरे बिना जिंदगी से कोई, शिकवा तो नही..
प्रेम गीत : तोच चंद्र्मा नभात.. / छुकर मेरे म को किया तुने क्या ईशारा..
विरह गीत / सॅड साँग : भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी.. / कहीं दुर जब दिन ढल जाए..
गायकाच्या आवाजातल : ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी.. / मधुबन खुशबु देता है..
गायीकेच्या आवाजातल : फुलले रे क्षण माझे फुलले रे.. / ओ सजना बरखा बहार आई..
प्रतिक्रिया
17 Apr 2010 - 3:15 am | शुचि
हिन्दी गाणं - येह कैसी अजब दास्तां हो गयी है - http://www.youtube.com/watch?v=pBeNuDzOYlc
मराठी गाणं - ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी - http://www.youtube.com/watch?v=CKHuPscOLo4
इंग्लिश गाणं - १६ रिझन्स व्हाय आय लव्ह यु - http://www.youtube.com/watch?v=x_17QF9dgfY
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का
16 Apr 2010 - 6:18 pm | रेवती
अवघड आहे रे सांगणं!
काही दिवस एखादं गाणं खूप ऐकलं जातं त्यानुसार सध्या मी 'नाम गुम जायेगा' ऐकतीये आणि 'आजा आजा' हे स्लमडॉग मिलेनियरमधलं जास्त ऐकतीये. मराठीतलं 'मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार' हे आणि सुरेश वाडकरांनी गायलेलं 'तू सप्तसूर माझे' अशी दोन मागच्या अठवड्यात जास्त ऐकली. धागा चांगला आहे.
रेवती
16 Apr 2010 - 8:33 pm | प्रभो
आपली पण ...
गाणी:
युगुल गीत :हृदयी वंसत फुलताना..(बनवाबनवी) / आजा सनम मधूर चांदनी में हम (चोरी चोरी)
प्रेम गीत : पाहिले न मी तुला,तु मला न पाहिले ..(गुपचुप गुपचुप) / प्यार हुआ इकरार हुआ (श्री ४२०)
विरह गीत / सॅड साँग: हे भलते अवघड असते (संदीप खरे)/ और ईस दिल मैं क्या रख्खा है ...(ईनामदार)/जाने जिगर जाने मन (आशिकी)
गायकाच्या आवाजातल : मुझे रात दिन बस मुझे चाहती हो (संघर्ष) , सलामे इश्क (किशोर - अमिताभ)
गायीकेच्या आवाजातल : पिया तू अब तो आजा (आशाताई - कारवां)
भक्तीगीत : मोरया मोरया (उलाढाल - अजय-अतुल चं)
इंग्रजी : ओन्ली टाईम (स्वीट नोव्हेंबर)
16 Apr 2010 - 8:39 pm | तिमा
मदनमोहनचे लताच्या स्वरातले 'चॉंद मध्धम है आँसमा चुप है' ऐका.
अरुण दाते यांनी गायलेले 'बदनाम नांव झाले माझे तुझ्या जगांत' ऐका.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
16 Apr 2010 - 9:07 pm | विकास
कुठले गाणे आवडते हे बर्याचदा मूड वर अवलंबून असते. त्यामुळे एकच एक गाणे सांगितले तरी ते वास्तवाला धरून होणार नाही. तरी देखील, पटकन आठवणारी काही गाणी:
युगुल गीत : ते वेड मजला लागले,
प्रेम गीत : तूम बीन जाऊ कहाँ (रफी आणि किशोर दोघांचे), माझा होशील का?, शब्दावाचून कळले सारे, गर्द सभोती
विरह गीत / सॅड साँग: मी तर प्रेम दिवाणी (आशा आणि ललीता फडके दोघींचे), जिंदगी के सफरमे गुजर जाते है..., हे सुरांनो चंद्र व्हा (अर्चना कान्हेरेंनी म्हणलेले)
गायकाच्या आवाजातल :जितेंद्र अभिषेकी, कुमार गंधर्व, किशोर, रफी ची अनेक गीते, थोडे वेगळे: मदन मोहनने म्हणलेले दस्तक मधील "माई रे मै कासे कहूँ..." हे गाणे.
गायीकेच्या आवाजातल : लता-आशा (काही उषाची पण) अनेक. थोडे वेगळे सांगायचे असेल तर किशोरी अमोणकरांची काही गाणी - "रंगी रंगला श्रीरंग" , "माझे माहेर पंढरी" (वेगळीच चाल), "बोलावा विठ्ठल", "गजर", एमी ग्रँटची पण काही गाणी जाता येता ऐकायला आवडतात
--------------------
तोच चंद्रमा नभात हे प्रेम गीता पेक्षा, प्रेयसी जवळ असून विरह गीत वाटते:
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी
एकदा शांता शेळक्यांनी मुलाखतीत हे गाणे त्यांना कालीदासाच्या एका संस्कृत काव्यावरून कसे सुचले हे ते काव्य तोंडपाठ म्हणून दाखवलेले आत्ता आठवले...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
17 Apr 2010 - 6:19 am | सन्जोप राव
'गर्द सभोती रान साजणी' हे गाणे अनिल अवचटांच्या 'मुक्तांगण' या व्यसनमुक्ती केंद्रात नियमित वाजवले जाते, असे ऐकून आहे.
सन्जोप राव
इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे?
शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.
17 Apr 2010 - 8:46 am | शुचि
काय अजरामर गाणं सुचवलत सन्जोप राव वा!!! हा दुवा.
http://www.fbeats.com/vidfeeder_view.php?id=OQ45I_85t-I
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का
17 Apr 2010 - 9:39 am | विकास
हे मूळ आशालताचे गाणे जास्त आवडते... मात्र आत्ता आमच्याकडे आमच्या लेकीची (अमेरिकन) मैत्रिण आली आहे. तीने मी वरील दुव्यावरील गाण्याचे लावलेले, नुसते पहीले सूर / शब्द ऐकले आणि तात्काळ म्हणाली catchy music, I liked it !
त्याच पद्धतीने (अभिषेकींनी स्वरबद्ध केलेले): विकल मन आज झुरत असहाय्य, निर्गुणाचा छंद धरीला जो आवडी, ही अजून दोन गाणी आठवली.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
17 Apr 2010 - 8:01 pm | शुचि
आशालताचं शोधते विकास साहेब. अरे ते तुम्ही सुचवलं होतत गाणं माझी गल्लत झाली. अर्थात सन्जोप रावां नी दिलेली माहीती अमूल्य आहे. आणि त्यांनी ते गाणं हायलाइट केलं ते बरं झालं.
सापडलं - http://www.musicindiaonline.com/album/76-Marathi_Natya_Geete/19337-Sange...
पण मला शौनक अभिषेकींचं फार आवडलं .... विशेषतः "काय हरविले सांग शोधशी" नंतर "या जमुनेच्या तीरी" वरचा जो स्वर आहे ..... मला वेडापिसा करतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का
18 Apr 2010 - 5:16 am | सोम्यागोम्या
विकल मन राग सरस्वतीवर आधारित आहे. मूळ बंदिश
सजन बिन कैसे. ती पण ऐका.
17 Apr 2010 - 9:37 am | मदनबाण
युगुल गीत :--- http://www.youtube.com/watch?v=P6-xSSYBfQs
प्रेम गीत :--- http://www.youtube.com/watch?v=aFN_VFuLegY
गायीकेच्या आवाजातल :--- http://www.youtube.com/watch?v=qFIyYs2afPo
गायकाच्या आवाजातल :--- http://www.youtube.com/watch?v=oHgvg7O1tBU&feature=related
विरह गीत :--- http://www.youtube.com/watch?v=Pyn1qH5iG00&feature=related
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
17 Apr 2010 - 1:51 pm | पांथस्थ
युगुल गीत: मस्ती मे छेडके तराना कोई दिलका / इक हसीं शामको दिल मेरा खोगया
प्रेम गीत: आज मदहोश हुआ जायेरे / आपकीं मेहकी हुई झुल्फ को
विरह गीत / सॅड साँग: जिंदगी के सफर मे / याद पियाँकी आये / सुन्या सुन्या मैफलीत माझ्या
गायकाच्या आवाजातलं: जिन्हे नाझ है हिंद पर वो कहा है / ना किसी की आंख का नुर हू / मै शायर बदनाम
गायीकेच्या आवाजातलं: हम है मता-ए-कुचा ओ बाझार कि तराह / रुके रुकेसे कदम रुकके बार बार चले / भय इथले संपत नाहि / झिम झिम झरती श्रावणधारा
इथे द्यायची म्हणुन हि काहि निवडक गाणी. पुढच्या वेळी हिच गाणी मनात येतील याचा काहि भरोसा नाही. मनाला भिडतील असे शब्द, हृदयाचा ठाव घेणारे संगीत आणी भावनांना मुर्तीमंत बनवणारे स्वर ह्या निकषावर खरी उतरतील अशी गाणी शेकडोंनी आहेत. आपल्या मनःस्थितीनुसार कधी हे गाणे आवडते तर कधी ते. असो.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
17 Apr 2010 - 2:55 pm | अरुंधती
मूडवर आहे हो सगळं.... कधी गाण्याने मूड येतो, कधी मूडमुळे ते गाणे ऐकले जाते! :-)
पण तरीही ही माझी आवडत्या गाण्यांची एक यादी: [ छोटीशी]
युगुल गीत :
जीवन में पिया तेरा साथ रहे - लता व रफी : गूंज उठी शहनाई
<
तेरे सुर और मेरे गीत - ''---- ''---
मेरे मेहबूब - मेरे मेहबूब में क्या नही - लता व आशा
रंग दे रे : नवरंग : मन्ना डे, आशा.
http://ww.smashits.com/music/oldies/songs/8842/navrang.html
प्रेम गीत :
मेरे मेहबूब तुझे मेरे मुहब्बत की कसम... मेरे मेहबूब - रफी
लता :
<
नया दौर - मांग के साथ तुम्हारा - रफी व आशा
-''- उडे जब जब जुल्फे तेरी - ''--
विरह गीत / सॅड साँग:
आंधी : तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा.... लता, किशोर....
दो बदन : जब चली ठंडी हवा.... आशा...
चोरी चोरी : रसिक बलमां हाए दिल क्यू लगाया.... लता...
झनक झनक : मेरे ए दिल बता : लता, मन्ना डे
गायकाच्या आवाजातल :
अब्दुल्ला : मैने पूछा चांदसे के देखा है कहीं.... महम्मद रफी
चौदवीका चांद हो या आफ्ताब हो - महम्मद रफी
नैन सो नैन नाही मिलाओ - झनक झनक - हेमंतकुमार
गायीकेच्या आवाजातल :
बंदिनी : मोरा गोरा अंग : लता
किनारा : अब के ना सावन : लता
नमकीन : फिरसे आईयो बदरा बिदेसी : आशा
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
18 Apr 2010 - 12:27 am | मी-सौरभ
गाणी:
युगुल गीत:'सलाम ए ईश्क मेरी जान.....'
प्रेम गीत : किशोर 'मेरे सामनेवाली खिड्की में...'
विरह गीत / सॅड साँग: केके 'आवारापन बंजारापन....'
गायकाच्या आवाजातल : मो. रफी 'मधुबन में राधिका नाचे रे'
गायीकेच्या आवाजातल :आशा 'मेरा कुछ सामान...'
-----
सौरभ :)