२१ मार्च - जागतिक कवी दिनानिमित्त - महाराष्ट्र टाईम्सच्या "शब्दांचीच रत्ने" या अग्रलेखामधून संपादित.

Manish Mohile's picture
Manish Mohile in जनातलं, मनातलं
23 Mar 2010 - 9:46 pm

अहमदाबादला आल्यापासून म्हणजे गेली जवळ जवळ १४ वर्षे मराठी वर्तमानपत्राशी संपर्क नाहीच म्हटले तरी चालेल. अधून मधून जेव्हा डोम्बिवलीला आई वडिलांकडे जातो तेव्हा महाराष्ट्र टाईम्स वाचतो तेवढाच.

आई मात्र जर काही वाचण्यासारखं असेल तर हमखास कात्रण ठेवते किंवा नोंद करून आणते. तसच या वेळेस तिने आणली नोंद "शब्दांचीच रत्ने" या महाराष्ट्र टाईम्स च्या अग्रलेखाच्या संपादित भागाची. तोच संपादित भाग खाली देत आहे.

जगभरच्या लाखो प्रसिद्ध व अप्रसिद्ध कवींसाठी 'युनेस्को' ने २१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय कविता दिन म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला. ह्याची सुरूवात १९९९ पासून झाली.

एकोणिसाव्या शतकातील फ्रेन्च कलावंत जोसेफ राँऊ ह्यानी म्हटले आहे की Science is for them who learn, Poetry is for those who know. हे खरच आहे की बुद्धीची कसोटी लावून विज्ञान शिकता येते पण पद्य मनाला भावणे गरजेचे असते.

सुप्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठे ह्यांनी कवितेच्या उगमाची प्रक्रियाच ह्या कवितेतून समोर आणली आहे. कविता तिच्या नाजूक नखरेलपणामुळे आणि भावतरलतेमुळे स्त्रीलिंगी मानली जाते. स्त्रियांच्या नकारात अनेकदा होकार दडलेला असतो असं मानलं जातं. म्हणूनच आपल्या कवितेत त्या म्हणतात -

कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी
नजरेपुढती ठुमकत येती रूपवती कामिनी
त्यांच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी

William Wordsworth ह्यांनी म्हटल्याप्रमाणे Poetry is the spontaneous overflow of powerful feeings. शब्दांच्या माध्यमातून होणारा रसरशीत भावनांचा उस्फुर्त उद्रेक म्हणजे कविता.

अशी ही कविता कवींच्या मनात आशावादही जागवते. नागासकीच्या बाँबस्फोटानंतर "पहिल्या त्रुणपात्याचा आज असे सत्कार" म्हणणारे कवी मंगेश पाडगावकर आणि "आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने" म्हणणारे तुकोबा हे सारेच धन्य.

ह्या सगळ्यांना आणि सर्व कवींना जागतिक कविता दिनी सलाम.

वाङ्मयलेखमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

शुचि's picture

22 Jul 2010 - 10:53 pm | शुचि

कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी
नजरेपुढती ठुमकत येती रूपवती कामिनी
त्यांच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी

वाह!! क्या बात है!