महदाश्चर्यम्!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
11 Mar 2010 - 10:41 am

महदाश्चर्यम्!

मी या व इतर फोरम्सवर नेहमीच लिहीत आलोय् कीं लोकशाहीमध्ये आपण श्रेष्ठींना त्यांच्या धोरणांबद्दल व निर्णयांबद्दल आपला संतोष, राग-संताप त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे व मी हे काम करत असतो, अगदी मनमोहन सिंग-जी, प्रतिभाताई, बराकसाहेब यांच्यापर्यंत! (मी मनमोहन सिंग-जीं व प्रतिभाताईंना 'अरुणाचल'बद्दल लिहिलेले निरोप मी श्री विकास यांच्या "अरुणाचल" या धाग्याखाली लिहिले होते.) हा निरोप लिहिताना त्यांच्या वेबवर असलेल्या ५०० 'characters'च्या मर्यादेमुळे अडचण आली म्हणून मी काल PM साहेबांच्या ऑफीसला (PMO) लिहिले होते कीं "५०० 'characters' च्या मर्यादेमुळे कांहींच meaningful लिहिता येत नाहीं, तरी ही मर्यादा वाढवून ५०० शब्द करावी!"

महदाश्चर्यम्! मला PMO कडून कांहीं तासांतच खालील उत्तर आले.....

From:
"Web PMO"

To:
kbkale@yahoo.com

Dear Mr. Kale,
The mail ID is pmosb@pmo.nic.in
regards
Communications Incharge

म्हणजे आपली पत्रे (कधी-कधी तरी) वाचली जातात असे म्हणायला हरकत नाही! एका क्षणात माझा आपल्या लोकशाहीबद्दलचा आदर द्विगुणित झाला!
आपणा सर्वांना ही विनंती कीं आपली लोकशाही गुंडांच्या हातून सुशिक्षितांच्या हातात जावी असे ज्यांना-ज्यांना वाटत असेल तर अशा सर्वांनी आपापले मतप्रदर्शन करण्यात आढेवेढे घेऊ नयेत व 'बिनधास' लिहीत जावे!
(मूळ 'अरुणाचल'वरील मतप्रदर्शनाला अद्याप उत्तर आलेले नाहीं!)
सुधीर काळे

धोरणसमाजराजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

शाहरुख's picture

11 Mar 2010 - 11:03 am | शाहरुख

वाचून बरे वाटले..

सुधीर काळे's picture

11 Mar 2010 - 11:23 am | सुधीर काळे

प्रामाणिकपणे सांगतो कीं मलाही खूप बरे वाटले व आनंदही झाला. मी अनेक वर्षें न कंटाळता लिहीत जरी असलो तरी एकाद्या नेत्याच्या कार्यालयातून येणारा हा पहिलाच प्रतिसाद होता.
------------------------
सुधीर काळे
राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in ई-मेल पत्त्यावर)

Pain's picture

11 Mar 2010 - 11:46 am | Pain

कार्यवाहीच काय ?

ती होणार नाही याची guarantee मी देतो. उगाच नाही लोक शिव्या देत X(

आनंद घारे's picture

11 Mar 2010 - 1:24 pm | आनंद घारे

सर्वप्रथम सुधीरचे कौतुक आणि अभिनंदन.
ती होणार नाही याची guarantee मी देतो.
हरकत नाही, सूचनाच केली नाही तरी कारवाई होणार नाहीच, मग फरक काय पडला? पण समजा कोणाला कारवाई करायची इच्छा झाली तर ती करण्यासाठी त्याचे हात बळकट होतील आणि झाली तर त्याचे श्रेय तुम्हाला घेता ये ईल.
उगाच नाही लोक शिव्या देत
लोकांचे कांही सांगता येत नाही. बहुतेक वेळा ते उगाचच शिव्या देत असतात.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

प्रमोद देव's picture

11 Mar 2010 - 1:30 pm | प्रमोद देव

तुमच्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम!

वाहीदा's picture

11 Mar 2010 - 1:36 pm | वाहीदा

काका,
जेव्हा ५०० 'characters' च्या मर्यादी ची दखल घेतली म्हणजे सर्व ईमेल्स कुणीतरी वाचत जरून असणार ..
तुमचा आनंद, संतोष - असंतोष, राग-संताप त्यांच्यापर्यंत (लोकशाही श्रेष्ठी) नक्कीच पोहचेल अन योग्य ती दखल ही घेतली जाईल
हा धागा तर खरेच प्रेरणादाई आहे, ईतर ही तुमच्या पावलांवर पाऊल टाकतील अशी अपेक्षा
No matter, How dark the night is ,it has to end and is followed by a bright morning sunlight.
Every dark cloud has a silver lining. Wherever you find difficulties and sadness, you can still find goodness there too , if you look hard enough.
~ वाहीदा

मदनबाण's picture

11 Mar 2010 - 4:50 pm | मदनबाण

अभिनंदन काळे काका. :)
खरचं आश्चर्यच वाटले,तुमच्या इ-पत्राला प्रतिसाद दिला गेला हे ही नसे थोडके. :)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

प्रकाश घाटपांडे's picture

11 Mar 2010 - 5:58 pm | प्रकाश घाटपांडे

आम्हाला एक शंका येते. अशा मेल्स ना उत्तरे जी येतात ती स्वयंसिद्ध असतात. त्याचा रेडी प्रोग्राम त्यांच्याकडे असतो. त्यात गाळलेल्या जागा मधे तुमचे नांव येते. तुम्हाला उत्तर मिळाल्याने बरे वाटते. प्रत्यक्षात ती मेल वाचली असेलच असे नाही
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शुचि's picture

11 Mar 2010 - 9:24 pm | शुचि

नाही पण काळे यांना इतर पत्रांना उत्तर आलं नाही. या पत्रालाच आलं. त्यावरून ते स्वयंचलीत नसावं.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

सुधीर काळे's picture

11 Mar 2010 - 9:48 pm | सुधीर काळे

घाटपांडे-जी म्हणताहेत ती शंका मलाही आली होती. पण हा निरोप एक 'पोंच' (acknowledgement) नव्हता तर एका विशिष्ट प्रश्नाला उत्तर होते. त्यात "आम्ही आपले अभिप्राय 'कित्ती' गंभीरपणे हाताळतो" असा दंभही नव्ह्ता (अशा पत्रांना "Dear-John" पत्रे म्हणतात). म्हणून हे उत्तर automated response नसावे हे शुचीताईंचे मत बरोबर वाटते.
------------------------
सुधीर काळे
राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in ई-मेल पत्त्यावर)

चित्रा's picture

11 Mar 2010 - 9:46 pm | चित्रा

खरेच वाचून बरे वाटले.