(मी माझ्या कविता इतरत्र कुठेही लिहिलेल्या नाहीत. या माहितीचा वाचकाला काही उपयोग नाही हे माहीत आहे. पण सोचा बताने मे क्या हर्ज है? या कवितेवरून मला खालील ओळी स्फुरल्या. ही कविता वाचून मला टायपिंग नीट येत नसेल असं वाटेल. पण नाही, तो विडंबनाचा भाग आहे. छंदात बसवण्यासाठी शब्द कसे ताणले जातात हे दाखवण्याचा प्रयत्न)
असा पाऊस पडावा
असा पाऊस पडावा
काडी यम्कांची तुटावी
गळ्क्या छंदछत्रीखाली
कवितेची तिर्पिट् व्हावी
असा पाऊस पडावा
जुनी रूपके सुचावी
अनुभव नाही तेव्हा
फक्त पुस्तकी वाचावी
असा पाऊस पडावा
मेघ, मोर, नंदी, भाकर्
यमनातीरी गोपीकृष्ण
अव्तरावे कंप्यूटर्वर्
असा पाऊस पडावा
व्हाव्या लोकल या लेट
पांढ्र्या शर्टावर्चिख्लाचे
थेंब उडावे हे थेट
असा पाऊस पडावा
मुंबा 'पुरी' झोडपावी
गुढ्गाभर पाण्यातून
अप्लि हपिसे गाठावी
असा पाऊस पडावा
घरी येता थकुन्भागुन
गच्चितील पाणीदुख्खे
आढ्या यावे थेंब दाटुन्
असा पाऊस पडावा
काव्य फुलीमध्ये जावे
टीव्हीवर्ची मॅच बघत्
आपण् कांदाभजी खावे
प्रतिक्रिया
22 Feb 2010 - 7:20 am | पक्या
>> टीव्हीवर्ची मॅच बघत्
>> आपण कांदाभजी खावे
हा हा ..मस्त
जय महाराष्ट्र , जय मराठी !
22 Feb 2010 - 7:47 am | अक्षय पुर्णपात्रे
आमची पायाखालची कळकळ पुढे देत आहे.
असा पाऊस पडावा
खिडकीशी जीव लागावा
पहावी सगळी फरपट
कोरडा बनियन कुरवाळत
22 Feb 2010 - 9:10 am | मुक्तसुनीत
असा पाऊस पडावा
काव्य फुलीमध्ये जावे
हे लय भारी....
xxxxxxx ;-)
22 Feb 2010 - 9:16 pm | धनंजय
गमतीदार :-)
घिशापिट्या कल्पनांबाबत सहमत.
जुने कवितेतले उच्चार (निभृत 'अ' पूर्ण मात्रा देऊन उच्चारणे) आणि नवीन उच्चार (सामान्य भाषेत जिथे 'अ'चा लोप होतो, तसा लोप करूनच कवितेत उच्चार करावा) यांची सरमिसळ आणि कुतरओढ होऊ नये. सहमत.
परंतु "गळ्क्या", "अव्तरावे" हे उच्चार मराठीत योग्य आहेत, आणि ठरवल्यास मात्रा अशा मोजण्यास काहीच हरकत नाही असे माझे मत आहे. ("यम्कांची" हा उच्चार माझ्या घरगुती बोलीत योग्य वाटत नाही. पण तसा उच्चार अन्य लोक करत असल्यास ठीकच.)
मर्ढेकरांची ओळ आठवा:
दण्.कट दंडस्नायू जैसे
लोखंडाचे वळले नाग
याबाबत मागे चर्चा झालीली होती (येथे बघावी).
23 Feb 2010 - 1:01 am | राजेश घासकडवी
गळक्या व अवतरावे हे शब्द त्या छंदात बसतात, पण विडंबनासाठी ते बदलून आले आहेत.
बळीराजा ही खेळेल
हिरव्या रंगाची पंचमी
ही ओळ हिर्व्या रंगाची पंचमी. अशीच उच्चारावी लागते.
किंवा
मेघ धरेस भेटता
त्यात मीही विरघळावे
त्यात मीही विर्घळावे अशी उच्चारावी लागते. त्या ओढाताणीची 'यम्का' मध्ये चेष्टा आहे.
जर कवितेत शक्तिवान प्रतिमा निर्माण करण्याची कुवत नसेल, आणि छंदबद्धतेची मर्यादा झुगारून देण्याची हिंमत नसेल तर निदान गेयता, नादमाधुर्य तरी असावं. (सध्याचं मराठी लोकप्रिय काव्य बघितलं तर 'कुणी दिग्दर्शक आणि अचानक्...' येऊन मूळ गाण्याला चाल लावून तिच्या हजारो काप्या खपवेलही... तोंडघशी पडणं सोपं असतं. विडंबन करण्यापेक्षाही :) )
मर्ढेकरांनी केलेली दण् कट अशी फोड कवितेच्या तालाल वजन वाढवण्यासाठी केली होती. त्यात दण् ध्वनिने इतर घणावर घाव घालण्याची प्रतिमाही तयार होते. कोळशेवाळ्याच्या वर्णनासाठी ती पूरक आहे.
मी मूळचा लेख एकदा चाळला होता -पुन्हा एकदा नीट वाचेन.
22 Feb 2010 - 9:21 pm | बिपिन कार्यकर्ते
जबरी.... लै आवडलं हे.
बिपिन कार्यकर्ते
22 Feb 2010 - 10:08 pm | विकास
विडंबन आवडले! :-)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
22 Feb 2010 - 10:10 pm | नितिन थत्ते
आवडली कल्पना.
'असेल्का विचारुन्शहार्लो मनात्मी' ची आठवण झाली
धनंजयनी हल्केच घेणे.
नितिन थत्ते
22 Feb 2010 - 10:24 pm | धनंजय
हल्केच् घेत्लेय् :-)
त्या चर्चेचा दुवा माझ्या वरील प्रतिसादात दिलेलाच आहे.
23 Feb 2010 - 3:18 am | मुक्तसुनीत
इरेस पडलो जर्बच्चम्जी
कविता ऐशी लिहीन मीही
उडेल तुम्ची दाणा"दण्"
"पढो पार्वती शिरि भगवन !"
;-)
23 Feb 2010 - 5:13 am | राजेश घासकडवी
वा: एकदम तरल वगैरे म्हणतात तसलं.
ल्याहाच. बऱ्याच दिवसात तुमचं काही ललित वाचलेलं नाही.
23 Feb 2010 - 9:15 am | मुक्तसुनीत
अरे तुझी साईट
तुझी साईट गेली खड्ड्यात
काय डेंजर वारा सुटलाय
स्क्रीनवर कचरा
धूळ धूळ डोक्यात
संपादकाची विंडो फुटली
गादीवर काचा काचा
आपोआप गुंडाळतोय
तात्याचा गालिचा
****बाईंच्या स्मायली
सैरावैरा उडताएत
मुक्तस्त्रीच्या दांडीवरली
म्हागडी नायलॉन साडी
चालली वार्यावरती हवाई झाज
नवव्या मजल्यावरच्या
जिजुत्सुचा लेंगा लगेच
लागला तिच्यापाठी
खेचरांना फेफरं भरलं
फडफड करताएत पाखरांसारखी
कार्यकर्त्यांच्या भिंतीवरल्या
ठिकर्या खोबर्या फरशीवरती
घास्क्या घास्क्या तुझा चष्मा
सटकला की फोटोमधनं
मैदानावर जिकडेतिकडे
(मी) मराठीचे पेपर
हाटेलमधल्या माणसांवरती
कडकडकडाट झाड पडलं
रावसाहेब तुमची
प्रतिभा गेली उडत
पळ रे पर्या
र्हाऊ दे नेट्कॅफेचं डबडं
झ्यायरातपत्रा खडखड करतोय
मालकानीच काढलेली पंचवीस फुटी अनुष्का
तुमच्या बोकांडी बसणाराय
ढेंगात मानगूट पकडणाराय
मास्तर मास्तर बघा कसा
हिसडे मारतोय भिंतीवरती
खिंडीचा नकाशा
गेला उडत खिडकीबाहेर
पोरीसकट पालकांसकट परीक्षांसकट
गेला सरळ आकाशात
काय डेंजर कविता झालीय ! ;-)
23 Feb 2010 - 11:36 am | चेतन
अखेर बोळा निघाला ;)
23 Feb 2010 - 11:43 am | नितिन थत्ते
लय भारी.
घास्क्यानं चायलेंज केल्याकेल्या लगेच कविता? आन तीबी जोडेमारू?
नितिन थत्ते
23 Feb 2010 - 12:01 pm | चतुरंग
'सुनीत' 'मुक्त' झाले! ;)
(बद्ध)चतुरंग
23 Feb 2010 - 5:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =))
ऑबॉबॉबॉ ... अरे बाप रे, हे काय आणि कोणी लिहीलं आहे!
"मर्ढेकर ते मढेपाडकर : एक तौलनिक अभ्यास" लिहा रे कोणी जाणकार (नंदन, श्रामो) लोकांनी!
अदिती
23 Feb 2010 - 6:45 pm | चतुरंग
शरदिनीतैंना कांपिटीशन? ;)
चतुरंग
23 Feb 2010 - 8:37 pm | बिपिन कार्यकर्ते
मिष्टर मुक्तसुनीत, बघा.. आम्ही सांगत नाही नेहमी तुम्हाला? एक धागा टाकाल तर पन्नास प्रतिसाद असे यूं काढाल... अरे आहे काय अन् नाही काय... काय? तेव्हा आता लिहित जा बरं नेहमी...
बिपिन कार्यकर्ते
23 Feb 2010 - 5:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>'सुनीत' 'मुक्त' झाले! :)
-दिलीप बिरुटे
23 Feb 2010 - 5:11 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
लेका, लेका... मर्ढेकरच झालास की रे... कं लिवलंय... कं लिवलंय... झ का स... ! ! !
(भिंतीवरचा) बिपिन कार्यकर्ते
23 Feb 2010 - 5:36 pm | मुक्तसुनीत
माझ्या वरच्या कवितेचे चिरगुट म्हणजे मुळातल्या अरुण कोलटकरांच्या एका भन्नाट कवितेचे विडंबन आहे. (और ये ना बताने मे जरूर हर्ज है ! :) )
23 Feb 2010 - 6:04 pm | मुक्तसुनीत
अरे तुझी टोपी
तुझी टोपी गेली खड्ड्यात
कपाळ पहिलं सांभाळ
काय डेंजर वारा सुटलाय
डोसक्यात कचरा
धूळ धूळ डोक्यात
साहेबाची खिडकी फुटली
गादीवर काचा काचा
आपोआप गुंडाळतोय
पंजाब्याचा गालिचा
पार्शिणीचा फ्लावरपाट
गडाबडा लोळतोय
सिंधीणीच्या दांडीवरली
म्हागडी नायलॉन साडी
चालली वार्यावर हवाई झाज
नवव्या मजल्यावरल्या
बंगाल्याचा लेंगा लगेच
लागला तिच्या पाठी
खापरांना फेफरं भरलं
फडफड करतायत पाखरांसारखी
कुलकर्ण्याच्या भिंतीवरल्या
डिगर्या ठिकर्या फरशीवरती
नार्या नार्या तुझा बाप
सटकला की फोटोमधनं
मैदानावर जिकडंतिकडं
एसेस्सीचे पेपर
धावत्या मर्जीडीझवर
कडकडकडाट झाड पडलं
प्रोफेसरसाहेब तुमची
कविता गेली उडत
पळा पेंटर
र्हाऊदे रंगाचं डबडं
झ्यायरातपत्रा खडखड करतोय
तुम्हीच रंगविलेली पंचवीस फुटी हेलन
तुमच्या बोकांडी बसणाराय
ढेंगात मानगूट पकडणाराय
मास्तर मास्तर बघा कसा
हिसडे मारतोय भिंतीवरती
भारताचा नकाशा
गेला उडत खिडकीबाहेर
डोंगरांसकट नद्यांसकट खुंटीसकट
गेला सरळ आकाशात
23 Feb 2010 - 6:06 pm | II विकास II
नतमस्तक, सुनितराव तुमच्यापुढे.
--
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
23 Feb 2010 - 6:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मूळ कविता काहीही कळ्ळी नाही, पण विडंबन बहुदा समजलं! असो. चालायचंच ... आमचीच जाण, समज अंमळ कमी, नाही का?
अदिती
23 Feb 2010 - 8:11 pm | धनंजय
क्लास कविता. एकाच वेळी पाचोळ्यासारखी हलकीफुलकी आणि वादळासारखी घनघोर...
नैमित्तिक-प्रसंगिक विडंबनही मस्त!
(वेगळा धागा काढायला हवा होता - अजूनही धागा वेगळा करता येईल का?)
23 Feb 2010 - 11:37 pm | Nile
प्रथम विडंबन वाचले, समजले पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. आता मर्ढेकरांची कविता वाचल्यावर डोक्यात प्रकाश पडला. लै भारी!
वेगळा धागा काढला नाही तरी याप्रमाणेच यापुढेही तुम्ही, राजेश आणि अक्षय यांच्या विडंबन-जुगलबंदीची वाट पहात आहे.
23 Feb 2010 - 7:15 pm | सन्जोप राव
मूळ कविता भारी, विडंबन दीड भारी!
तसे बघायला गेले तर मूळ कविता हे एक विडंबनच आहे, आणि विडंबन हीसुद्धा एक मूळ कविताच आहे....
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
23 Feb 2010 - 7:16 pm | चित्रा
यमके वगैरे कळत नाही, पण अनुभव एकदम परिचयाचा!
23 Feb 2010 - 8:51 pm | अक्षय पुर्णपात्रे
राजेशने विडंबन केले. श्री सुनीत यांनी त्यात चांगलीच भर घातली. मूळ कवितेचे विडंबन असले तरी राजेशनी मूळ कवितेचा सांगितलेला अर्थ मराठी जालविश्वाबाबत विडंबनात सटकत नाही. सगळे चांगलेच जमलेले.