मॅरेथॉन शर्यत- शहरांचा शरीर आणि मानसिक आरोग्य आरसा

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
13 Feb 2010 - 1:04 am

मुंबई मॅरेथॉन मधे माझ्या सहकाऱ्यांपैकी ३ जण - २ अर्ध व १ पूर्ण मॅरेथॉन धावले, शर्यत पुर्ण केली. त्यांच्या उत्साहाकडे आणि अनुभवाकडे पाहून मॅरेथॉन एका वेगळ्या नजरेने पाहिल्याची जाणीव झाली. त्यांची वये ३० शीच्या आसपास. त्यांचे अनुभव दुसऱ्या दिवशी ऐकून हे जाणवले की, हे शहरी लोक नुसता हौशी उत्साह न दाखवता शर्यत पुर्ण करु शकले हा काही योगायोग नव्हे.

शहरातील आजचे जगणे पाहता - त्यात रोज बाहेरील खाणे आले, कामाचा व इतर सगळा ताण आला, रोजचा प्रवास, ह्याची गोळाबेरीज केली तर शहरी लोकांची शारीरीक क्षमता कशी टिकून राहील असा प्रश्न पडेल. अशा जीवनशैलीतून वर्षानुवर्षे वाटचाल करतांना जे होते ते आपल्या रोजच कानावर येत असते. जर कोणी एखाद्या शहरातील लोकांचे आरोग्य कसे मोजायचे (इंडेक्स) असा प्रश्न विचारला तर त्याला मॅरेथॉनकडे बोट दाखवता येईल का असा वाटून गेले. त्या शहरातील किती लोक भाग घेताहेत, किती किलोमीटर पळून दाखवताहेत हे निश्चीतच एक परिमाण म्हणून बघता येईल असे वाटले. म्हणूनच मी मॅरेथॉनला शहराचा आरोग्य आरसा म्हणालो. पुढील प्रसंग चित्रणात तो आरसा मनाचे आरोग्यही कसे दाखवतो हे ही मांडले आहे.

ही मंडळी फार आधीपासून पळण्याची तयारी करत नव्हती; त्यांनी भाग घेण्याचे ठरवले व शर्यत पुर्णही केली. त्यांनी सांगितलेले अनुभवच मला येथे मांडायचे आहेत.
त्यांच्यातील संयम शर्मानी त्याचा अनुभव खाली दिला आहे.

मी मॅरेथॉनबद्दल ऐकल्यापासुनच मला त्यात भाग घ्यावासा वाटू लागला. ही माझी पहिलीच वेळ होती. माझी मनीषा ऐकून माझा कॉलेजमधील मित्र जो नेहमी मॅरेथॉनमधे भाग घेत आला आहे त्याने सांगितले की, तू आधी पासून सराव करावयास हवा होता पण, काळजी करु नकोस, आता राहिलेल्या काळात पळण्याची तयारी कर. मॅरेथॉनच्या आधीच्या दिवशी मात्र आराम कर. वेदना सहन करण्याची मानसिक तयारी हवी आणि त्यावर मात करण्यासाठी एकच योजना ठरव- मॅरेथॉन पूर्ण करणे. त्याच्या सल्ल्यानुसार मी रोज पळण्याचा सराव करु लागलो.

मॅरेथॉनच्या दिवशी मी प्रारंभरेषेजवळ ५ मिनिटं आधी पोहोचलो आणि मला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता इतक्या संखेने आणि प्रचंड उत्साहाने लोक आलेले होते. शर्यतीला सुरुवात झाली. मी मनात ठरवले की, आधी ५ किमी धावावे मग पाहू. हे पहिले ५ किमी सहज पार झाले आणि माझा माझ्यावरचा विश्वास वाढला.

जसा मी ५ किमीचा टप्पा पार केला, मला वरळी सेतू समोर दिसू लागला. हा पुढचा टप्पा मला पार करता आलाच आणि मी जर खूप थकलो तर मी चालत-चालत पुढील अंतर पार करावे असे ठरवून मी धावणे सुरु ठेवले- जसजसे मी ७, ९, ११, आणि १२ किमी पार करत गेलो, त्याप्रत्येक वेळी मी मला हेच समजावत होतो. हाजीअली पार करेपर्यंत १२.७५ किमी पुर्ण झालेले होते आणि माझ्या गुढग्यात वेदना जाणवू लागल्या. असे वाटू लागले की, आता एखादा किमी चालावे मग जरा धाप ओसरली की, पुन्हा पळावे. असे म्हणून मी चालायला सुरुवात केली. मी फक्त १०० मीटरच चाललो असेन, रस्त्याच्या बाजूने उभे असलेले प्रेक्षक माझा नंबर वाचून ओरडायला लागले, "भाग दोस्त भाग", "मिस्टर १२७३९ रन"- ह्याने माझा उत्साह परत आला व मी पुन्हा धावू लागलो.

मॅरेथॉन पहायला आलेले लोक, मुलं स्पर्धकांना (!) पाणी, बिस्कीटं, केळी देत होते, चीयर करत होते तर काही जणांनी वेदनाशामक स्प्रे आणले होते ते ज्यांना हवे त्यांना देत होते. ह्या स्फुर्तीदात्यांमुळे मॅरेथॉनला एक वेगळीच शान आली आहे असे वाटू लागले. मी पुढे धावत राहिलो व १४ किमी पुर्णही केले. आता मात्र पुन्हा माझे गुढगे दुखू लागले व ह्यावेळेस जरा जास्तच जाणवत होते. नशीबाने जवळच एक वैद्यकीय केंद्र होते, तेथे मी जरासा थांबून त्यांच्याकडून गुढग्यांवर स्प्रे मारुन घेतला.

इथे मी एक योजना केली- १ किमी चालणे व २ किमी धावणे; १४ किमी पुर्ण केलेलेच होते व अजुन ७ किमी बाकी होते. मी चालायला सुरुवात केली; थोडासाच पुढे गेलो असेन, मला एक वयस्कर स्त्री- ५०शीची - धावतांना दिसली. मला माझ्या तन-दुरुस्तीची लाज वाटली. मी माझी योजना गुंडाळून ठेवली व पुन्हा नव्या जोमाने धावायला सुरुवात केली. पण हे सहज शक्य नव्हते- मला गुढगा त्रास देत होताच पण अशा सर्वत्र दिसणाऱ्या उत्साहाला पाहून मन सतत मला सांगत होतं की, मी धावत राहावं. मी मरीन ड्राइव्हला पोहोचलो; येथे आयोजकांनी ठसकेबाज संगीत लावले होते, पाणी, फळं ह्यांचं वाटप केले जात होते आणि खूप चीयरींग केले जात होते. हे खरंचं आवश्यक होते. ह्याने सगळ्याचा थकवा कमी होत होता व पुन्हा उत्साहाचे वारे संचारत होते. खरंच खूप छान अनुभव होता.

त्यानंतर मला एक मन अत्यंत हेलावून टाकणारे दृश्य दिसले. एक वृद्ध व्यक्ति साधारण ५०शीत असलेले, ज्यांना फक्त एकच पाय होता, ते कुबड्या घेऊन पळत होते. आणि एक अपंग सरदार मुलगा त्याच्या संपूर्ण कुटूंबाच्या मदतीने "चालत" होता. त्याचे वडील व भावू त्याला हाताला आधार देत चालायला मदत करत होते व त्याची आई त्याची चाक-खूर्ची पुढे-पुढे घेत येत होती व त्याला अधून मधून बसायला मदत करत होती. हे दृष्य माझी आतापर्यंतची सगळ्यात मोठी प्रेरणा होती.

आता शेवटचे १००-२०० मीटरचे अंतर बाकी होते आणि त्यावेळेस मला प्रचंड गलका, लोकांचे उत्साहाचे चित्कार ऐकू आले. मी शर्यत पूर्ण केली! चक्क २१ किमी!

मॅरेथॉन नंतर मी खूप थकलो होतो; मला एखादी बसण्यासाठी जागा हवी होती. पण मला धास्ती वाटत होती की, जर मी बसलो तर मला उठताच येणार नाही. मी तसाच एका मदत केंद्राकडे गेलो, तेथे मी पाणी पीलो काही खाल्ले व घरी गेलो. घरी आल्यावर पहिल्यांदा ऊन पाण्याने गुढगे शेकले व नंतर छानपैकी ताणून दिली. दुसऱ्या दिवशी मी ऑफीसमधे जाऊ शकलो.

मॅरेथॉन शर्यत मला एक उत्साहवर्धक, चित्तवेधक आणि एक पुर्ण सांघिक घटना वाटली. त्यात मला जी दृष्ये दिसली, ती मी कधीच विसरु शकणार नाही व मला नेहमीच प्रेरणा देत राहतील. मी पुन्हा मॅरेथॉनमधे भाग घेईन.

ज्यांना शर्यतीत भाग घ्यायचा आहे त्यांना मी इतकेच सांगेन की, पहिल्यांदा अर्ध-मॅरेथॉनचे ध्येय ठेवावे. त्यादिवसा आधी ४ आठवडे तरी सराव केला पाहिजे. मी साधारणतः रोज ५ किमी धावण्याचा सराव केला व वेळेवर लक्ष ठेवले. मॅरेथॉनचे आयोजक आपण काय खाल्ले पाहिजे ह्याची माहिती देतात; त्या सुचना पाळल्याच पाहिजेत. शर्यतीच्या आदल्या दिवशी काय-काय आणि किती खाल्ले पाहिजे ते त्याप्रमाणे पालन करणे हे ही अत्यंत महत्वाचे असते.

मी पुढेच्या मॅरेथॉन मधे पुर्ण शर्यतीत भाग घेऊन २ तासांच्या आत शर्यत पुर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. माझा संपर्क sanyyam@yahoo.com ला होऊ शकेल व मला तुमच्या प्रश्नांना प्रतिसाद देणे आवडेल.

ह्या तिनही सहकाऱ्यांकडे त्यांच्या कामाची गुणवत्ता पाहीली तर मला नेहमीच ती खूपच वरच्या पातळीची दिसते. ते नेहमी कामात, बोलतांना, उत्साही असतात. असे वाटले की, जो स्वतःच्या आरोग्याकडे काळजीने पाहू शकतो तो इतरही कामे काळजीपुर्वक करतो हे आश्चर्य नव्हे.

संस्कृतीजीवनमानराहणीक्रीडाप्रकटन

प्रतिक्रिया

चित्रा's picture

13 Feb 2010 - 1:54 am | चित्रा

छान अनुभव. इथे मुद्दाम टंकल्याबद्दल आभार. आळस करणार्‍या माझ्यासारख्या लोकांसाठी हे फारच स्फूर्तिदायक आहे.

विसोबा खेचर's picture

13 Feb 2010 - 10:08 am | विसोबा खेचर

हम्म! मॅरेथॉन हा एक उत्साहवर्धक प्रकार आहे खरा!

(स्वप्नातही न धावणारा) तात्या.

पिवळा डांबिस's picture

13 Feb 2010 - 10:17 am | पिवळा डांबिस

आणि आजकालच्या टॅक्सी आणि रिक्षाच्या जमान्यात मॅरेथॉन धावणं म्हणजे जरा विशेषच!!
कौतुक आहे त्या लोकांचं!!
(धावायला माणसं ठेवलेला) डांबिस.

विसोबा खेचर's picture

13 Feb 2010 - 10:47 am | विसोबा खेचर

कौतुक आहे त्या लोकांचं!!

कौतुक कसलं रे पिडां? मेल्यानो खुळ्यासारखे धावता कसले? बसा की घरी शांतपणे! :) मध्यंतरी 'मै मेरे देश के लिये दौडुंगा, आप भी दौड रहे है ना?' अशी एक टूम निघाली होती. अरे तिकडे अतिरेकी फोडायचे तिथे बिनधास्त बाँब वगैरे फोडतात आणि तुम्ही मेल्यांनो धावता कसले? :) काय शाटमारी दहशतवाद रोखू शकणार आहोत आपण धावून?

प्रिती झिंटा धावणार आहे, अनील अंबानी धावणार आहे, सल्लूबाबा धावणार आहे, नाना चुडासामा धावणार आहे, प्रिया दत्त धावणार आहे.....अमकातमकाढमका सेलेब्रिटी धावणार आहे..!

म्हणून तुम्हीही धावा! अरे हा काय अडाणचोट प्रकार आहे? :)

सेलिब्रिटींना काय हो, त्यांना धावून काय अन् हागून काय, प्रसिद्धी मिळाल्याशी कारण! अरे पण तुम्ही का उगाच छाती फोडून घेताय?! :)

तुला खरं सांगू का पिंडा, मी आपलं आजय भागवतला बरं वाटावं म्हणून जरा तो उत्साहवर्धक वगैरे प्रतिसाद लिहिला आहे! ;)

तात्या.

पिवळा डांबिस's picture

13 Feb 2010 - 10:54 am | पिवळा डांबिस

तुला खरं सांगू का पिंडा, मी आपलं आजय भागवतला बरं वाटावं म्हणून जरा तो उत्साहवर्धक वगैरे प्रतिसाद लिहिला आहे!
मीही!!!! तिच्यायला आपण जर धावणार नाय तर धावणार्‍यांचं जर कौतुक तरी करावं!!!!
:)
अरे ती वक्रोक्ती होती!!! मला वाटलं कि सहीवरून लोकांच्या ध्यानात येईल!!:)

बाकी प्रिटी झिंटा धावणार आहे?
जरा जमलं तर विडियो फिल्म काढून ठेव ना!!!
मी तिथे आल्यावर स्कॉचबरोबर चखणा म्हणून उपयोगी येईल!!!!!!!
:)

लवंगी's picture

13 Feb 2010 - 11:23 am | लवंगी

=)) =))

तो बिचारा अजय भागवत तुमचे प्रतिसाद वाचुन कपाळावर हात मारत असेल.. 8|

अजय भागवत's picture

13 Feb 2010 - 11:34 am | अजय भागवत

नाही. फक्त क्षणभर आश्चर्य वाटले. :-)

पिवळा डांबिस's picture

14 Feb 2010 - 2:37 am | पिवळा डांबिस

रागवू नका हो, अजयराव!
थोडी थट्टा केली इतकंच!!!:)
मॅरेथॉन धावण म्हणजे स्वतःच स्वतःचं लिमिट पुश करणं, आपल्या आत्मविश्वासाचं क्षितिज आणखीन मोठं करणं याची आम्हाला जाणीव आहे! मॅरेथॉनच का पण असे अनेक उपक्रम असतात...
तुम्ही खुशाल धावा! फक्त क्रेझी ट्राफिक संभाळून सुखरूप धावा म्हणजे झालं. आमच्या शुभेच्छा!!

विसोबा खेचर's picture

13 Feb 2010 - 10:44 pm | विसोबा खेचर

हम्म! धावा अजून!

पुण्यात कोरेगाव पार्कात बॉम्बस्फोट..!

आज सकाळीच आम्ही याबद्दल लिहिले होते.. की अतिरेकी बिनधास्त बाँब वगैरे फोडून मोकळे होतात आणि आम्ही आपले 'देश के लिये' धावतोच आहोत..

धावा अजून!

तात्या.

उगं आपलं वड्याचं तेल वांग्यावर? अहो सर्वसामान्य लोकं धावून आरोग्याची काळजी घेत असली तर काय गैर आहे?
हां बड्या लोकांची फुक्कटची शोबाजी बिनधास्त फाट्यावर मारा!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

13 Feb 2010 - 10:47 pm | विसोबा खेचर

हम्म! धावा अजून!

पुण्यात कोरेगाव पार्कात बॉम्बस्फोट..!

आज सकाळीच याबद्दल लिहिले होते.. की अतिरेकी बिनधास्त बाँब वगैरे फोडून मोकळे होतात आणि आम्ही आपले 'देश के लिये' चुत्त्यासारखे धावतोच आहोत..

धावा अजून!

तात्या.