राम राम मिपकरहो,
मिपासंबंधी कुणाची काही तक्रार असल्यास, कुणा सभासदाचे सभासदत्व गोठवले/रद्द करण्यात आले असल्यास त्या संदर्भात काही विचारणा असल्यास कृपया मला व्यक्तिगत निरोप पाठवावा. मी सवडीनुसार उत्तर द्यायचा अवश्य प्रयत्न करीन.
या संदर्भात येथे जाहीर विचारणा करण्यास/लिहिण्यास मनाई आहे. तरी असे धागे अप्रकाशित केले जातील याची कृपया नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, ही विनंती..
आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.
प्रतिक्रिया
10 Feb 2010 - 11:45 am | टुकुल
मालक, बर झाल तुम्ही यात लक्ष देत आहात, तुम्हा लोकांच (कुणी वैयक्तिक घेवु नये) जे काही वादविवाद असतील तर ते क्रुपया आपआपसात सोडवावेत, उगाच धाग्यास्वरुपात चव्ह्याटावर आणु नयेत हि विनंती.
नवीन लोंकाचे उगाच काही गैरसमज होवु नयेत म्हणुन हा प्रतिसाद.
आपलाच,
टुकुल.
10 Feb 2010 - 12:16 pm | सुधीर काळे
राम राम तात्यासाहेब!
या खुलाशाबद्दल आभारी आहे.
------------------------
सुधीर काळे
कृपया वाचा: http://www.thejakartapost.com/news/2009/10/10/letter-mystery-khan039s-le...