साय वरची आत दुधाचा साठा
चोरटे आयुष्य देतो मालकास धोका
बंद जरी असली घराची खिडक्या दारे
एक तरी असतोच ना उघडा झरोका
चोरणे हा वारसा की धर्म माझा?
सोडेन कैसा मी एकतरी मोका
सोबती जरी काळोखगर्भाचा उबारा
सापडतो अचुक मज फडताळातील चक्का
ध्यास असतो मग हळूच पळून जाण्याचा
बसतो नाहीतर जळक्या लाकडाचा दणका
हाणतोय जर रंगा चौक्यावर चौका
तो कैसा कवी शाहरुख जो ना मारेल छक्का !!
-कवी शाहरुख
प्रतिक्रिया
9 Feb 2010 - 2:56 am | शुचि
आई शप्पत!! सही SSS
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
9 Feb 2010 - 2:59 am | पाषाणभेद
शारूकभाय रिंगणात आले वाटतं!
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
माझ्या तुमच्या जुळता तारा, मधुर सुरांच्या बरसती धारा
9 Feb 2010 - 3:01 am | मेघवेडा
एकदम जहबहराहा!!!
-- मेघवेडा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
9 Feb 2010 - 3:36 am | उपाशी बोका
जबरदस्त!!
उपाशी बोका
9 Feb 2010 - 4:36 am | टुकुल
हि हि हि हि !!.
जबरदस्त कविता आणी कवटी आहे तुमची.
शेवटच कडव तर लै भारी.
--टुकुल
9 Feb 2010 - 7:17 am | चतुरंग
आपला छक्का आवडला! ;)
चतुरंग
9 Feb 2010 - 8:15 am | विसोबा खेचर
जबरा! :)
9 Feb 2010 - 12:17 pm | चिऊ
फारच भारी......:-)
ध्यास असतो मग हळूच पळून जाण्याचा
बसतो नाहीतर जळक्या लाकडाचा दणका
डोळ्यासमोर लबाड बोका आला....
9 Feb 2010 - 12:37 pm | JAGOMOHANPYARE
कधी माऊ ,कधी मनी , मला कुणीही चालते
चालता पळता कौलावरच कार्य माझे साधते....
:) ( तुम्ही हे महत्वाचंच विसरलात लिहायला... )
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
9 Feb 2010 - 12:44 pm | बिपिन कार्यकर्ते
हाहाहाहा!!!! अरे या बोक्याला कोणीतरी ठोका रे..... =))
बिपिन कार्यकर्ते
9 Feb 2010 - 8:40 pm | क्रान्ति
चालू द्या बोकोबा!!!! आवडलं हो विडंबन! :)
क्रान्ति
अग्निसखा
10 Feb 2010 - 4:45 pm | जयवी
सही !!