(धोका)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
8 Feb 2010 - 9:52 pm

क्रांतीताईंच्या सुंदर गजलेत असं काही वाचलं की पुन्हा एकदा जुन्या दिवसांशी 'धोका' झाल्याची जाणीव प्रबळ होते आणि मग....

पृष्ठ वरचे, 'खास मेनू' अन सलोखा
बायडी आभास नुसता, रोज धोका!

बंद केली 'डायराने' सर्व दारे
आयडी आला कसा, नसता झरोका?

बारश्याला मीच 'मामा', कर्म माझे?
सोडला हातातला प्रत्येक मोका!

सोबती संपादकत्त्वाचा उबारा,
आणि शिल्लक मेंबरांचा मंद ठोका

बास आता सोंग हे वैचारिकांचे
कंड 'चतुरंगास' सुटला हा अनोखा!

-चतुरंग

हास्यकवितागझलविडंबन

प्रतिक्रिया

अमृतांजन's picture

8 Feb 2010 - 10:12 pm | अमृतांजन

मस्त! चाबूक!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Feb 2010 - 10:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बास आता सोंग हे वैचारिकांचे
कंड 'चतुरंगास' सुटला हा अनोखा!

हा हा हा ! लैच भारी. :)

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

8 Feb 2010 - 10:47 pm | टारझन

=)) =)) =)) आवरा !!! =)) =)) =))

प्राजु's picture

8 Feb 2010 - 10:59 pm | प्राजु

बास आता सोंग हे वैचारिकांचे
कंड 'चतुरंगास' सुटला हा अनोखा!

=)) =))
सह्ह्हीये!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

शेखर's picture

8 Feb 2010 - 11:12 pm | शेखर

मस्तच रंगाशेठ...

पृष्ठ वरचे, 'खास मेनू' अन सलोखा

अगदीच राहवले नाही म्हणुन: चुकुन पृ ऐवजी पु वाचले :)

टारझन's picture

8 Feb 2010 - 11:31 pm | टारझन

=)) =)) =)) च्यायचं हलकट

विसोबा खेचर's picture

8 Feb 2010 - 11:37 pm | विसोबा खेचर

बंद केली 'डायराने' सर्व दारे
आयडी आला कसा, नसता झरोका?

जबरा रे रंगा.. :)

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Feb 2010 - 2:16 am | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!! जबरी... लै भारी व्यक्त केली आहे भावना...

(कंडित) बिपिन कार्यकर्ते

क्रान्ति's picture

9 Feb 2010 - 8:23 pm | क्रान्ति

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
जबरदस्त! सही विडंबन!

क्रान्ति
अग्निसखा