स्टार माझावर पाहा ’ब्लॉग माझा’चा पारितोषिक वितरण समारंभ !

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
31 Jan 2010 - 10:50 am

हरभर्‍याच्या झाडावर चढून एक घोषणा:

आत्ताच आलेल्या दूरध्वनी आणि विपत्रावरून असे समजले की आज (३१ जाने. २०१०) रात्री ९:३० वाजता स्टार माझावर ह्या पारितोषिक वितरणाचा एपिसोड दाखवण्यात येणार आहे.

पहायला विसरू नका. :)

जीवनमानप्रकटनबातमीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

31 Jan 2010 - 10:54 am | प्रमोद देव

आम्ही दूरचित्रवाणीच्या पडद्यावर कसे दिसतो...जरूर पाहा.
मलाही उत्सुकता आहेच की! :D

*****************
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jan 2010 - 12:48 pm | बिपिन कार्यकर्ते

कोणी या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून ठेवेल का? सध्या कार्यक्रम बघायला मिळणार नाही.

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

31 Jan 2010 - 1:45 pm | सहज

हेच म्हणतो. कोणी तरी रेकार्ड करुन तूनळी इ दुवा द्या इथे.

मीनल's picture

31 Jan 2010 - 10:00 pm | मीनल

कुणीतरी यु ट्युबवर टाका. जमेल का?
आम्हाला पहायला मिळेल.
मीनल.

देवदत्त's picture

1 Feb 2010 - 12:06 am | देवदत्त

भाग १
http://www.youtube.com/watch?v=onq-Kw5q99E

भाग २
http://www.youtube.com/watch?v=MlOzr3HxdWE

भाग ३
http://www.youtube.com/watch?v=vxEKMAiznEA

MPG चे FLV केले होते. दर्जा आणखी चांगला पाहिजे असेल तर नंतर MPG अपलोड करतो. :)

प्रमोद देव's picture

1 Feb 2010 - 8:37 am | प्रमोद देव

धन्यवाद देवदत्त!
ध्वनीचित्रमुद्रणही छान झालंय.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

सहज's picture

1 Feb 2010 - 9:10 am | सहज

हेच म्हणतो. धन्यवाद देवदत्त.

झकासराव's picture

1 Feb 2010 - 12:21 pm | झकासराव

मी काल पाहिला कार्यक्रम.
जरा लयीच फॅष्टात उरकवलाय.
देवकाका अम्मळ लंगडत चालले असा भास झाला.
डान्याने बहुतेक केस कापले होते. मी अजुन मोठे केस असतील असा विचार करत होतो.
निखिलला ओझरताच पाहिला.
आणि तिकडे किती अ‍ॅड असतील याचा अंदाज नसल्याने बाकीच्याना बक्षीस घेताना पहायला मिळाल नाही.
असो. आता वरच्या लिन्क वर बघेनच.

छोटा डॉन's picture

1 Feb 2010 - 9:36 pm | छोटा डॉन

असो.

सिक्स्थ सेन्स का काय हवे ते म्हणा प्ण उगाच आम्ही लहर म्हणुन त्याच्या आधीच्या आठवड्यातच केस कापुन घेतले होते.
नंतर त्याचा आनंद झाला, उगाच भैय्या म्हणुन मुंबईकरांनी हाणला असता तर केवढ्यात पडले असते.

------
छोटा डॉन
सध्या उपास चालु आहे, अगदी सगळ्यांचाच. लेखन, वाचन, चर्चा वगैरे वगैरेचा!

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Feb 2010 - 9:42 pm | बिपिन कार्यकर्ते

केवढ्यात पडले असते.

आणि केवढे पडले असते? ते पण आहेच. ;)

बिपिन कार्यकर्ते

मीनल's picture

1 Feb 2010 - 8:39 pm | मीनल

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन .
हा कार्यक्रम पहायला मिळाला ते बर झाल. एक तर हे विजेते कोण हे पाहता आल. त्यांच्या लेखानामागील विचार कळले.
स्पर्धेत विजेते होण्याजोग त्यांच्या ब्लॉग मधे काय विशेष होत ते कळल. यापुढे काय अपेक्षित आहे ते ही समजल.

एक माहिती हवी ती म्हणजे विशेष इनपुट्स कोणते? वेळ, इतर लिक्स, व्हिजिटर्स वगैरे का?
मीनल.

छोटा डॉन's picture

1 Feb 2010 - 9:50 pm | छोटा डॉन

>>सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन .
+१, असेच म्हणतो.

>>हा कार्यक्रम पहायला मिळाला ते बर झाल. एक तर हे विजेते कोण हे पाहता आल. त्यांच्या लेखानामागील विचार कळले.
प्रादेशिक अस्मितेच्या असमतोलाच्या कृपेने आणि काही त्याच्याच काही अनाठायी संकल्पनेच्या गोंधळात आम्हाला हा कार्यक्रम पाहता नाही आला. आमच्याकडे हे चॅनल दिसत नाही., म्हणुन मग आम्ही आमच्या ऑपरेटरची भेट घेऊन त्याला आस्मादिक टिव्हीवर दिसणार आहोत असे सांगुन १ तासापुरते फीड देण्याची विनंती केली तेव्हा त्याने 'स्थानिक प्रादेशिक अस्मिता व राजकारण' असे पटण्यासारखे कारण देऊन सदर चॅनेल दाखवण्यास नकार दिला.
असो, आश्चर्य वाटले नाही. :)
बाकी सहमत ...

>>स्पर्धेत विजेते होण्याजोग त्यांच्या ब्लॉग मधे काय विशेष होत ते कळल. यापुढे काय अपेक्षित आहे ते ही समजल.
खरं सांगु का, असं काही नसतं हो.
काही खास विशेष प्रयत्न करुन ब्लॉग बक्षिसपात्र बनवता येईल असे मला वाटत नाही किंवा काहे खास इनपुट्सने तसे साध्य करता येईल असेही मला वाटत नाही.
माझं वैयक्तिकच सांगतो,
ब्लॉगचे डिसाईन म्हणाल तर एकदम भयंकर अंगावर येईल असे आहे, एकदम टपोरी आणि राऊडी स्टाईल, मुखपृष्ठावरची भाषाही आमच्या नावास साजेशीच, कुणाला ती आवडेल ह्याची अजिबात शक्यता नाही.
कंटेन्टचे म्हणाल तर आमचे बहुसंख्य विषय, लेख, टिप्पण्या चक्क 'वादग्रस्त' ह्या प्रकारात मोडतात, अर्थात 'वादग्रस्त' हा यशस्वी लेखनाचा प्रकार नाही हे आवर्जुन नमुद करतो.
प्रतिक्रिय्या आणि हिट्स म्हणाल तर मुळात आम्ही आमचे लेख पहिल्यांदा मिसळपाव.कॉम ( किंवा गेल्या १-२ वेळेस मीमराठी.नेट) इथेच टाकल्याने जे काही घडले ते इथेच घडले. आम्ही उगाच बॅक-अप म्हणुन ते ब्लॉगवर डकवायचो. त्यामुळे तिकडे आवर्जुन आमचा लेख वाचायला जाणारे आणि त्यावर प्रतिसाद लिहणारे तसे फारच नगण्य.
त्यामुळे पॉप्युलॅरिटी आणि प्रतिसाद हा मुद्दा आमच्यापुरता तरी बाद ;)

>>एक माहिती हवी ती म्हणजे विशेष इनपुट्स कोणते? वेळ, इतर लिक्स, व्हिजिटर्स वगैरे का?
वर बरेच काही लिहले आहे.
प्रामाणिकपणे सांगायचे तर इथे स्पर्धा ही 'प्रेझेंटेशन' ची असल्याने डिसाईन, लेआऊट, थीम वगैरे गोष्टी महत्वाच्या ठराव्यात, अगदी आपल्या 'इंडियन आयडल' टाईप, म्हणजे नुसते टॅलेंट पुरेसे नाहे तर शो पण हवा ( कॄपया दुसरा अर्थ घेऊ नये ).
पण माझे वैयक्तिक मत आहे की उपरोक्त बाबींची तशी आवश्यकता नाही. व्हिझीटर्स विजेट, फॉलोअर्स विजेट वगैरे ठिक आहे पण उगाच भरमसाट लिंक्सचा मारा करुन ब्लॉगला फाफलवण्यात काही अर्थ नाही असे उगाच वाटते.
सिंपल बट स्टेडी विल डेफिनेटली मेक इम्पॅक्ट ...

असो.
बाकी ह्यावर आम्ही सविस्तर लवकरच खरडू थोडा वेळ मिळाला की .

------
छोटा डॉन
सध्या उपास करत आहोत, खास सांगण्यासारखे काही नाही !

II विकास II's picture

1 Feb 2010 - 10:32 pm | II विकास II

>>असो.

तिथे काही असो म्हणला नाहीस.
तुझा निषेध.