ज्ञानेश यांची अप्रतीम गजल 'कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा' वाचली आणि सगळे भास खरे वाटायला लागले! ;)
कुठे भास होतो मला 'कोंकणा'चा, 'रिया' रोज स्वप्नी बुलावे कुठे...
हजारो दिशांनी मला हाक येते, कलत्रास सोडून जावे कुठे?
'पमी'ची, 'निशे'ची, 'नितू'ची, कधीची जरी लाख आलीत आमंत्रणे..
रमेनेच ज्याला असे वात अणला, अशा दादल्याने पहावे कुठे?
तसे झाकले खूप काही परंतु, तरी राहिले खूप झाकायचे
मिळाले तिला फोन माझे अरेरे, कळेना अता मी लपावे कुठे?
लपावे जरासे अशी रूम नाही.. करी तात वेडा पहारा खडा
असे बंधुही ज्या मुलीचा घिसाडी.. अशाने गुटुर्गू करावे कुठे?
तुटे पाठ माझी सुजे तोंड भलते व्रणाच्या मिषाने उरी राहिले
तरी का असे नेहमी होत जाते... दिसावी कुणी, पाघळावे कुठे !
घराच्या तिच्या चोरट्या पायवाटा बुजू लागल्या रोज रात्रीमधे..
अशा काळरात्री पहार्यात 'वासू', तुझ्या डाळिने त्या शिजावे कुठे?
मला आकळेना हिला प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे मिळाले कुठे?
(गुन्हे जे कधीचेच केले तयाचे हिने शोधले हे पुरावे कुठे?)
नवा माल असली दिसे आजच्याला अनिर्बंध आनंद 'रंग्यास' दे
उडावे कवीने? उडावे कशाला? उडावे किती अन् उडावे कुठे...
-चतुरंग
प्रतिक्रिया
20 Jan 2010 - 11:28 pm | केशवसुमार
ज ह ब ह र्या हा..
रंगाशेठ,
एकदम कडक बोले तो येकदम बेश्ट्ट्ट्ट् इडंबन..चालू दे..
केशवसुमार..
21 Jan 2010 - 12:43 pm | श्रावण मोडक
+१
रेवतीताई, कुठे आहेस सध्या?
22 Jan 2010 - 10:43 am | रेवती
जरा महत्वाच्या कामासाठी भारतात आलीये.
रेवती
21 Jan 2010 - 6:58 am | सुनील
शीर्षक वाचून अंमळ गैरसमज झाला होता!
यावा कोंकणा आपलीच असा!!
(कोंकणातील) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Jan 2010 - 9:30 am | भडकमकर मास्तर
अहाहा..मजा आली...
21 Jan 2010 - 9:44 am | बिपिन कार्यकर्ते
:O X( ~X(
रंगाभावजी, चार दिवस मोकळं सोडलं तुम्हाला तर असले प्रकार चालू झाले? अरेरे... योग्य ठिकाणी कळवण्याची व्यवस्था केली आहे.
खुद के साथ बातां: फक्त रंगाभावजींनाच बरी मिळते अशी मोकळिक मधून मधून. नाही तर आमच्या कडे... :(
बिपिन कार्यकर्ते
21 Jan 2010 - 10:14 am | टारझन
प्रत्येक वेळी विरजण टाकलंच पाहिजे का ? (मालकांच्या चालीवरच वाचल्या जावे)
=)) तुम्हाला तर फक्त मधुन मधुन मोकळीक नसते म्हणे =)) बाकी आपले उनाड उंटासारखे वाळवंटात भटकता
- (उनाड हत्ती) विर्जनटाक्ता
21 Jan 2010 - 10:27 am | बिपिन कार्यकर्ते
श्री. टारझन, तुमचीही व्यवस्था करायची आहे का? ते पण करू आम्ही. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच.
बिपिन कार्यकर्ते
21 Jan 2010 - 10:10 am | टारझन
हॅहॅहॅ ... कुणास ठाव ... केसुंची पहिलीच कमेंट आली असेल असं धागा उघडण्यापुर्वीच वाटलं होतं :)
विडंबण के बारे मे क्या बोलने .. आहाहा :)
होम्मिनिष्टर गेल्या भारता ... काम करी कोंकणा
=))
- (कोंकणा प्रेमी) टारोबा सेन
21 Jan 2010 - 10:31 am | बिपिन कार्यकर्ते
श्री. टारझनजी, आज प्रथमच आपली सही चुकली. 'टारोबा इन्सेन' अशी सही पाहिजे होती. असो बदला.
बिपिन कार्यकर्ते
21 Jan 2010 - 11:08 am | सागरलहरी
मूळ गझल ४ दिवसा पुर्वी वाचली होती. तेव्हा त्यातल्या काव्याने आत हललो होतो ..
आणि आता "हे" वाचुन आत बाहेर उडालो..
मनात एक चित्र तयार झाले.. कवी ऑपरेशन टेबल वर कविते सह भूल देउन पडला आहे आणी चतुरंग प्रभृती सर्जन निर्दय पणे चाकु सु-या कात्री घेउन कवितेचे आणि कविचेही विच्छेदन करतायेत ..
एकदम सही विडंबन..
21 Jan 2010 - 9:45 pm | प्राजु
आई शपथ्थ!!
तबियत खुश गझल.
ओरिजनलही अप्रतिम आहे.
विडंबनाने मजा आली.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
21 Jan 2010 - 10:11 pm | jaypal
ए१ आयटम
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
21 Jan 2010 - 10:20 pm | प्रभो
रंगाशेठ, मजा आली ..मस्त :)
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
21 Jan 2010 - 11:15 pm | संदीप चित्रे
दोन धन्स !
एक अशासाठी की ह्या धाग्याच्या निमित्ताने मूळ गझल वाचली.
ती खूपच छान रचना आहे.
दुसरा धन्स तुझ्या विडंबनासाठी !
कलत्र हा शब्द खूप दिवसांनी वाचला. ठ्या हसलोय एकदम :)
काय रेवती माहेरी वगैरे गेलीय की क्काय ?
22 Jan 2010 - 10:42 am | रेवती
अरे, काय चाललय तरी काय?
जरा चार आठ दिवस मी घरी नाहीये तोच असली विडंबने चालू!
रेवती
22 Jan 2010 - 3:31 pm | प्रमोद देव
रंगाशेठ,मस्त विडंबन.
पण गृहमंत्री परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. बचके रहना रे बाबा! ;)
म्हणतात ना.... घार हिंडते आकाशी,परी...
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
22 Jan 2010 - 2:13 pm | ज्ञानेश...
व्वा ! झकास !!
जियो रंगाशेट..!
(अशी दाद देणे म्हणजे किती तोंड दाबून बुक्क्याचा मार असतो, ते आमचे आम्हाला ठाऊक.. :( )
खुद के साथ बातां- च्यायला, मिपावर विडंबन होवू नये म्हणून कुठे लपवावे कवितेला?
22 Jan 2010 - 3:43 pm | llपुण्याचे पेशवेll
चलो इस बात पे एक गझल हो जाय! :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
22 Jan 2010 - 3:13 pm | गणपा
हा हा हा रंगाशेठ जियो..
अंमळ उशिराच वाचल हे वि़डंबनकाव्य. तबियत खुष.
22 Jan 2010 - 3:43 pm | मेघवेडा
जरा उशीरच झाला वाचायला.. पण मजा आली एकदम!
शीर्षक वाचून गैरसमज झाला होता, पण सकाळी सकाळी हे असलं 'असली' विडंबन वाचून आजच्या दिवसाची सुरूवात तर मस्त झालीये एकदम!
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे?
23 Jan 2010 - 12:17 am | चित्रा
नवा माल असली दिसे आजच्याला अनिर्बंध आनंद 'रंग्यास' दे
उडावे कवीने? उडावे कशाला? उडावे किती अन् उडावे कुठे...
रेवती, कधी परत येणार तू?
बाकी विडंबन छानच.