'खरेसाहेब माफ करा : २ : एवढंच ना?

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
6 Jan 2010 - 11:33 am

एवढंच ना? विडंबन करू... एवढंच ना?
आमचं हसं, आमचंच हस्सं... X( , घेऊन कागद एकटेच लिहू,
एवढंच ना?

मत्त्याला कोण? मतल्याला कोण? गझलेला अवघ्या वाचतय कोण?
शब्दाला शब्द, प्राचीला गच्ची, यमकाला यमक जुळवत लिहू,
एवढंच ना?

कवितेला मिटर होतंच कधी? काव्याला व्याकरण होतंच कधी?
शब्दांचे सोस, यमकाचे कोश, तिरकस प्रतिसाद अनुभवत लिहू,
एवढंच ना?

वाचलंत तर द्याल, तुमचीच 'राय' , टाळलंत तर टाळाल, आम्हाला काय?
स्वत:च कवि, स्वत:च वाचक, स्वत:च समिक्षक होवून लिहू,
एवढंच ना?

काव्याच्या छंदा, लिहिण्याचा धंदा, लिहीत राहू कुणी वंदा वा निंदा,
काव्याच्या छंदा, कवितेचा धंदा, विडंबन करून जगतोय बंदा,
विडंबन खरे, विडंबन बरे...., सगळ्यांच्या खोड्या काढीत लिहू,
एवढंच ना?

नवईडंबनकार ईरसाल 'खोटे'

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

मी_ओंकार's picture

6 Jan 2010 - 11:45 am | मी_ओंकार

मस्त विडंबन. आणखी येऊ देत.

- ओंकार.

टारझन's picture

6 Jan 2010 - 3:08 pm | टारझन

मस्तंच लिहीतात संदीप साहेब... चाल लावून वाचले :)

आणि संदिप खरेही एक बरा कवी आहे. पण तो पेटी बडव्या सलील कुलकर्णी लै डोक्यात जातो.

असो ! आपण कवितेचं एक कडवं इकडे लिहून बाकी पुर्ण कविता आपल्या ब्लॉग वर लिहीत जा .. आणि त्याची लिंक इकडे देत जा :) बरं पडतं ते हल्ली :)

- टारकंती अनलिमीटेड

गिरिजा's picture

7 Jan 2010 - 3:13 pm | गिरिजा

स्वत:च कवि, स्वत:च वाचक, स्वत:च समिक्षक होवून लिहू,
एवढंच ना?

झकास!

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

सुप्रिया's picture

7 Jan 2010 - 4:46 pm | सुप्रिया

झकास विडंबन!

मी असाकसा वेगळा वेगळा's picture

7 Jan 2010 - 5:27 pm | मी असाकसा वेगळा...

मस्त...

विशाल कुलकर्णी's picture

7 Jan 2010 - 6:06 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jan 2010 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून येऊ द्या. :)

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

7 Jan 2010 - 8:45 pm | प्रकाश घाटपांडे

ईडंबनाला काही तरी प्रेरना लागतेच ना! ती खरे साहेबच हायेत का अन्य कोनी? ईडंबन बाकी झकास पाडलय ब्वॉ!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्राजु's picture

8 Jan 2010 - 1:29 am | प्राजु

हाहाहा..
सह्हिये.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Jan 2010 - 10:20 am | बिपिन कार्यकर्ते

छान!!!

बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ's picture

8 Jan 2010 - 10:40 am | विजुभाऊ

तुम्ही नेहमी "खरेसाहेब माफ करा"
या शीर्षकानेच लिहिता? उगाच क्रमशः लिहिल्यासारखे वाटते

विशाल कुलकर्णी's picture

8 Jan 2010 - 1:44 pm | विशाल कुलकर्णी

कवितेचे नाही... सद्ध्या चालवलेल्या विडंबनसत्राचे. कारण सद्ध्या टार्गेट संदीप खरे आहे.

तुम्हाला आवडले नसेल तर " यापुढे इजुभौ माफ करा..." असे नाव देइन.. कस्सं? ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"