खरेसाहेब…माफ़ करा : ३ : दिवस असे की …

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
7 Jan 2010 - 6:16 pm

ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही ...!

सावकारांच्या कर्जाखाली बुडतो...
आयुष्याला तारण ठेवूनी देतो,
या जगण्याचे कारण उमगत नाही..,
या जगणे म्हणवत नाही...

व्याजाचे हे एकसंधसे तुकडे...
मम छाताडावर नाचे त्याचे घोडे,
या घोड्याला लगाम शोधत आहे,
परि मजला गवसत नाही...

ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही ...!

मी गरीब की मी दुर्दैवी कमनशिबी...
कर्ज चुकवण्या शोधतो शेकडो सबबी,
दुर्दैवाला हजार टाळू बघतो...
परि ते पिच्छा सोडत नाही...

येतो म्हणताना ओठ कापती थोडे...
तू मिटून घे पिल्लांचे माझ्या डोळे,
देहाचे अन मम, पदराला तुझीया
हे ओझे पेलवत नाही ... !

ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही ...!

त्या दुर्दैवी जिवांसाठी काहीही करु न शकणारा एक असहाय सामान्य माणुस !

ईशल्या देणेकरी

करुणविडंबन

प्रतिक्रिया

फ्रॅक्चर बंड्या's picture

7 Jan 2010 - 7:11 pm | फ्रॅक्चर बंड्या

चांगले विडंबण आहे...
binarybandya™

विशाल कुलकर्णी's picture

8 Jan 2010 - 10:14 am | विशाल कुलकर्णी

धंकु बंडोपंत ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विजुभाऊ's picture

8 Jan 2010 - 11:55 am | विजुभाऊ

तुमच्या प्रत्येक कवितेचे नाव खरेसाहेब माफ करा असेच का असते हो?

विशाल कुलकर्णी's picture

8 Jan 2010 - 1:43 pm | विशाल कुलकर्णी

कवितेचे नाही... सद्ध्या चालवलेल्या विडंबनसत्राचे. कारण सद्ध्या टार्गेट संदीप खरे आहे.

तुम्हाला आवडले नसेल तर " यापुढे इजुभौ माफ करा..." असे नाव देइन.. कस्सं? ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

केदी's picture

8 Jan 2010 - 9:57 pm | केदी

:)
***
A falling leaf
looks at the tree...
perhaps, minus me

बट्ट्याबोळ's picture

9 Jan 2010 - 9:47 am | बट्ट्याबोळ

A falling leaf
looks at the tree...
perhaps, minus me

म्हन्जे काय हो ??