भ्रष्टाचाराच्या विरोधात हे एक चांगलं पाऊल ठरू शकेल असं वाटतं, लोकांनीच निर्भीडपणे आणि निर्भयपणे अँटी करप्शन ब्युरोला सहकार्य करणं महत्वाचं आहे.
-----------------
वरील लेखाचा विषय महत्वाचा असल्याने त्या दुव्यातील महत्वाचा भाग खाली सार्वजनीक माहीती म्हणून देत आहे.
- संपादक
सरकारी-निमसरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचे पीक कमी करण्यासाठी ऍंटी करप्शन ब्युरोने यापूर्वीही अनेक उपक्रम राबविले आहेत. तसेच गेल्या सहा महिन्यांत 60 हून अधिक सापळे यशस्वी करत लाचखोरांना अटक केली आहे. लाचखोर अधिकाऱ्यांच्या तक्रारी विनासायास करता याव्यात आणि लाचलुचपतीविरोधातील कारवाईला अधिक गती मिळावी , या दुहेरी हेतूने 9158242424 हा मोबाईल क्रमांक सुरू करण्यात आल्याची माहिती ' ऍंटी करप्शन ' चे अधीक्षक हरिष बैजल यांनी दिली.
कुठल्याही सरकारी खात्यातील भ्रष्टाचाराची माहिती देण्यासाठी तक्रारदारांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या कार्यालयीन वेळात या मोबाईलवर संपर्क साधता येईल. तसेच कुठल्याही वेळेत ' एसएमएमस ' पाठवता येईल. तक्रारदाराच्या नावाबाबत पूर्णत: गुप्तता ठेवली जाणार असल्याने , एसएमएस करताना तक्रारदाराने तक्रारीचे स्वरुप व त्याखाली स्वत:चे नाव टाकण्याचे आवाहन बैजल यांनी केले आहे. एसएमएस केल्यानंतर ऍंटी करप्शन ब्युरोतर्फे संबंधिताला संपर्क साधून अधिक माहिती घेतली जाईल.
प्रतिक्रिया
4 Jan 2010 - 10:25 am | माझी दुनिया
वा ! माहितीबद्दल धन्यवाद. नंबर नोंदला आहे.
____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
4 Jan 2010 - 10:30 am | विकास
माहीती खूपच महत्वाची आहे. धन्यवाद.
जर कोणी वापरली आणि काही अनुभव आला तर अवश्य येथे सांगा.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)