एकाकी वाट
वाट चालतो चालतो दूर पळते क्षितीज
चांदण्या विझलेल्या, नेत्री थबकली नीज
बोचे अचानक खोल तुझ्या मायेचा पाखर
पिसाटले पळतांना लागे तीच ती ठोकर
भुक उफ़ाळून शोधे तुझी झुणका भाकर
पण सारतो पोटात दाम मोजून जहर
कुठे वाटेत गळाली एका उदराची नाती
चेचून तोडली भिंती विटांच्या आघाती
झुले बाजुला पारंब्या, आपापले गीत गाती
पालेमुळे गुंतलेली, येई कुणीही ना हाती
त्यांच्या झावळी मिटल्या माझे बोडके आकाश
फ़ुका बागेत सावली, शोधे जीव कासावीस
वाट निष्पर्ण एकाकी त्रयत्स्थांची गर्दी दाटे
दूर खुणावती फ़ुले, इथे धूळ आणि काटे
जन्मोजन्मीचा हात, सोबती जोवरी साथ
अडवुन नेत्रीची नीज, अथक चालतो वाट
******************************
प्रतिक्रिया
20 Dec 2009 - 5:51 am | प्राजु
वाट निष्पर्ण एकाकी त्रयत्स्थांची गर्दी दाटे
दूर खुणावती फ़ुले, इथे धूळ आणि काटे
छान आहे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
20 Dec 2009 - 8:50 am | मदनबाण
जन्मोजन्मीचा हात, सोबती जोवरी साथ
अडवुन नेत्रीची नीज, अथक चालतो वाट
सुंदर...
(यात्री)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
20 Dec 2009 - 11:20 am | jaypal
"भुक उफ़ाळून शोधे तुझी झुणका भाकर
पण सारतो पोटात दाम मोजून जहर "...............मला आवडल.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
20 Dec 2009 - 12:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता
-दिलीप बिरुटे
20 Dec 2009 - 3:01 pm | नंदू
सुंदर .
कविता आवडली.
नंदू
20 Dec 2009 - 8:32 pm | चन्द्रशेखर गोखले
उशिरा वाचली , खूप खूप आवडली.
21 Dec 2009 - 3:28 pm | फ्रॅक्चर बंड्या
छान कविता...
binarybandya™
22 Dec 2009 - 9:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता तशी जुनी कल्पना; पण कवितेची मांडणी आणि शब्दांची निवड आवडली.
अदिती
22 Dec 2009 - 9:23 am | पाषाणभेद
उत्तम काव्य.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
22 Dec 2009 - 11:58 am | sneharani
मस्त झालीये कविता!