(दाढदिवस)

रेवती's picture
रेवती in जे न देखे रवी...
16 Dec 2009 - 9:33 am

प्रेरणा?... घरातूनच मिळाली हे सांगायलाच हवे का? म्हणतात ना ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या.....जाऊदे तुम्ही आपलं विडंबनच वाचा! ;)
(सूचना - वृत्त, मात्रा वगैरे कोल्हापुरी चपला घालून फिरायला गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही!... :D )

हे रोजचेच दुखणे, सहण्यात वेळ गेला
दाढेस भर पहाटे मळण्यात वेळ गेला

घासू किती किती मी, चोळू किती किती मी
ढवळ्या न दंतपंक्ती जपण्यात वेळ गेला

चोळून जाड ब्रश हा तोंडात कोंबताना
गळत्या चुकार फेसा धरण्यात वेळ गेला

अजमावुनी बदामा जोरात चावताना
तुटला असा कसा हा? कळण्यात वेळ गेला

वार्षीक दंतदिवशी क्राऊन बसवताना
दिसते खरी कशी मी बघण्यात वेळ गेला!!

रेवती

हास्यकवितागझलविडंबन

प्रतिक्रिया

टारझन's picture

16 Dec 2009 - 9:46 am | टारझन

=))
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=))

एक से एक !! ठॉ ठो ठॉ !! चला आता आम्ही सुखानं डोळे मिटू शकतो.
बाय दं वे, कधी असतो बरं आपला वार्षिक दंतदिन ?

- (सर्व मापी) तराजु

रेवती's picture

16 Dec 2009 - 8:37 pm | रेवती

बाय दं वे, कधी असतो बरं आपला वार्षिक दंतदिन ?
तसा दंतदिन किंवा दाढ दिवस हा दर सहा महिन्यांनी असतो त्याला आपण दंतस्वच्छताही म्हणतो. तरी वर्षातून एखाद्यावेळेस आमचे दंतवैद्य जी काही किरकोळ दंतदुरुस्ती करतात ती अनेक वर्षे आठवते.
गेल्या शनिवारी दंतस्वच्छता कार्यक्रमाच्यावेळेस एकदा क्ष-किरण भेटीसाठी जानेवारीतील भेटसमय ठरवून आले आहे.

रेवती

Nile's picture

16 Dec 2009 - 10:14 am | Nile

शिर्षक वाचुन एक मिनिट, काकांच्या 'वाढ'त्या गोच्यांचा बंदोबस्त करण्याकरता काकुंनी 'दाढे'ला हात घातला की काय असे वाटले! ;)

पदार्पण (हो ना?) मस्त झालंय. घरची स्पर्धा दर्जेदार खेळाडु निर्माण करते या न्यायाने एक-से-बढकर-एक विडंबनं वाचायला मिळतील अशी आशा करायला हरकत नाही. :)

सहज's picture

16 Dec 2009 - 9:55 am | सहज

एऽऽक एक से भले दोऽऽ!

टुकुल's picture

16 Dec 2009 - 10:12 am | टुकुल

एकापेक्षा एक...
मस्त जमल आहे.

प्रमोद देव's picture

16 Dec 2009 - 10:26 am | प्रमोद देव

काव्यात....असा एक विसुभाऊ बापटांचा कार्यक्रम आहे.
त्याच चालीवर रंगाशेठ आणि कुटुंबियांचा कार्यक्रम करायला हरकत नाही आता......
कुटुंब रंगलंय...विडंबनात. :D

पदार्पणालाच शतक! रेवतीताई,मस्त जमलंय विडंबन!
येऊ द्या असेच....भरभरून!

अवलिया's picture

16 Dec 2009 - 11:14 am | अवलिया

माननीय रेवतीजी,

आपले पदार्पणातील विडंबन वाचले. अतिशय छान केले आहे. मिपावर अनेक छुपे गुणी कलावंत आहेत याची आम्हास शंका होती, आज खात्री पटली. ज्याप्रमाणे श्री गणपा विविध पाककृती टाकुन लोकांची वाहवा मिळवत होते पण घोसाळे की दोडके या सामान्य प्रश्नामधे त्यांची उडालेली दांडी आमच्या एका गृहितकास (गृहितक - श्री गणपा आपल्या सौभाग्यवतींच्या कामाचे श्रेय घेत आहेत) पुष्टी देणारी ठरली. त्याचप्रमाणे आपले विडंबन वाचुन आम्हास श्री चतुरंग यांच्या पुर्वीच्या विडंबनांविषयी खात्री वाटत नाही. आमची शंका अशी आहे की ती विडंबने आपणच केलेली असुन श्री चतुरंग यांनी केवळ टाळ्या मिळवल्या आहेत. तरी आपण या गोष्टीचा खुलासा करावा ही विनंती.

धन्यवाद.

--अवलिया

अक्षय पुर्णपात्रे's picture

16 Dec 2009 - 11:20 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री अवलियांसारखेच म्हणतो.

अवांतर: प्रस्तुत बिडंबन 'केव्हातरी पहाटे'च्या चालीवर वाचता (कनिष्ठ पण ज्येष्ठ संपादकांकरता चालीवर गाता) येते.

रेवती's picture

16 Dec 2009 - 8:29 pm | रेवती

माननीय नाना,
आपल्या प्रतिसादाने प्रथम मूक (सभ्य भाषेत: गपगार) झाल्यामुळे खुलासा करण्यास उशीर झाला आहे. आपण मोठ्या मनाने क्षमा करालच (नाही केलीत तर दुसरे विडंबन टाकीन). सांगावयाचा मुख्य मुद्दा असा की आपण अतिषय हुषार आहात. 'त' वरून जसा ताकभात ओळखता तसेच 'वि' वरून विडंबन कोणाचे असू शकेल? ही प्रतिभा कोणाची? हेही ओळखता. आमच्यासारख्या अबलांचा आधार बनून मिपावर आल्याबद्दल मी देवाचे (आकाशातल्या) आभार मानते. आजकाल आपले प्रतिसाद वाचून आम्हास गलबलून येते हे सांगणे न लगे.

रेवती

अवलिया's picture

17 Dec 2009 - 10:40 am | अवलिया

माननीय रेवतीजी,

आपला खुलासा समजला.

धन्यवाद!

--अवलिया

विनायक प्रभू's picture

16 Dec 2009 - 12:07 pm | विनायक प्रभू

कधी कधी अगदी खरे लिहितो अवलिया.
असो.
आता 'गाढ्'दिवसाच्या प्रतिक्षेत.

श्रावण मोडक's picture

16 Dec 2009 - 1:22 pm | श्रावण मोडक

यावे, यावे... स्वागत!!!

केशवसुमार's picture

16 Dec 2009 - 4:03 pm | केशवसुमार

तुम्ही सुद्धा..
चालू दे..ढवळ्या पवळ्याची जोडी..
(दात दुखीला घाबरून कवळी लावलेला) केशवसुमार
स्वगतः हा रंगा घरची कामा सोडून विडंबने पाडतो की काय.. म्हणून वैतागून रंगीने त्याच्याच अस्त्राने त्याचेच दात पाडायचे ठरवलेले दिसते)

श्रावण मोडक's picture

16 Dec 2009 - 4:17 pm | श्रावण मोडक

स्वगत: असेच काहीसे मलाही वाटले होते! :)

चित्रा's picture

16 Dec 2009 - 8:33 pm | चित्रा

:)

रंगरावांना घरातून प्रतिस्पर्धी तयार होतो आहे असे दिसते आहे.

सुधा's picture

16 Dec 2009 - 4:27 pm | सुधा

चाल........काटा रुते

स्वाती२'s picture

16 Dec 2009 - 4:48 pm | स्वाती२

रेवती, मस्त जमलय ग!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Dec 2009 - 7:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Dec 2009 - 7:12 pm | बिपिन कार्यकर्ते

म्याडम, एकदम झबर्डस्ट!!! मला तर शीर्षक वाचून क्षणभर रंगोपंताची काळजी वाटली. पण असो. आणि ढवळ्या शेजारी पवळ्या बांधलाय तर त्याचे रिझल्ट्स असे उत्तम आले आहेत.... बेष्ट!!!

बिपिन कार्यकर्ते

अनामिक's picture

16 Dec 2009 - 7:19 pm | अनामिक

मस्तंच!

-अनामिक

प्राजु's picture

16 Dec 2009 - 10:11 pm | प्राजु

हाहाहा
सह्ही!! रेवतीताई.. यू टू!!
वाण नाही गुण लागलाच. ;)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

भानस's picture

17 Dec 2009 - 1:54 am | भानस

रेवती सहीच गं..... हाहाहा......

सुधीर काळे's picture

17 Dec 2009 - 2:17 am | सुधीर काळे

मी साधारणपणे कवितांच्या वाटेस जात नाहीं, पण या वेळी गेलो आणि खूप छान कविता वाचायला मिळल्या. "ढदिवस" या चार शब्दांत कांहीं तरी जादू असावी.
मुख्य म्हणजे चतुरंग-जी व रेवतीताईंच्या कवितेत "वृत्त"शिस्त, ज्यामुळे कवितेला एक तर्‍हेचे 'सौष्ठव' मिळते, ती काटेकोरपणे पाळली गेली आहे. मुक्तछंदातल्या कविता 'पोट सुटलेल्या' व्यक्तीसारख्या वाटतात.
मस्त!
------------------------
सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम

लवंगी's picture

17 Dec 2009 - 2:24 am | लवंगी

हि बेस्ट कि ती बेस्ट??

हिच बेस्ट.. :)

मिसळभोक्ता's picture

17 Dec 2009 - 4:18 am | मिसळभोक्ता

रंग्यासे रंगी सवाई !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पाषाणभेद's picture

17 Dec 2009 - 5:01 am | पाषाणभेद

मस्तये.
आधी मला वाटले की दाढदुखीच लागली का पाठी.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

रेवती's picture

17 Dec 2009 - 9:30 pm | रेवती

धन्यवाद मंडळी!
पहिलाच प्रयत्न गोड मानून घेतलात.:)

रेवती

वाह वाह !! (मुद्दामून धागा वर काढत आहे हेवेसांनल.)

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jul 2012 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा

सुडकेश्वर.... मस्त उकल काढलीत :-)

रेवतीतै...दंत-कथा ऊर्फ काव्य अवडले :-)

मदनबाण's picture

25 Jul 2012 - 9:38 am | मदनबाण

अजमावुनी बदामा जोरात चावताना
तुटला असा कसा हा? कळण्यात वेळ गेला
अच्छा... तर बदाम कारणीभूत ठरला तर ! ;)

बॅटमॅन's picture

25 Jul 2012 - 6:36 pm | बॅटमॅन

हाहा: हाहौ हाहा:!!!!!!!

जेपी's picture

30 Apr 2015 - 8:51 pm | जेपी

अच्छा हे पण आहे काय =))

जौ द्या ना राव! तुम्हीपण........लहान होते मी तेंव्हा! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2015 - 6:38 am | अत्रुप्त आत्मा

:-D .. :-D .. :-D
पुन्हा व्हा! :-D

श्रीरंग_जोशी's picture

1 May 2015 - 7:31 am | श्रीरंग_जोशी

रम्य ते लहानपण ;-)

क लिवलय क लिवलय.

रेवाक्का!!येतेस का परत अजमावायला?
तू ये तुला फुकट देईन=))=)) (दात काढुन हातात)

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2015 - 11:46 am | अत्रुप्त आत्मा

=))))))

सस्नेह's picture

1 May 2015 - 3:59 pm | सस्नेह

दात नाही, दाढ, दाढ !
चुकून चखोट दात काढशीला ओ डागदरीणबै !
बाकी रेवाक्का राॅक्स !

अजया's picture

1 May 2015 - 4:08 pm | अजया

=))

तुमसे दुष्मनी मोल लेना मेरेकू परवडेगा नै बै!

रेवती's picture

1 May 2015 - 4:26 pm | रेवती

काय चावट झालेत सगळेजण! ;)
प्रतिसादाबद्दल आभार.

स्पंदना's picture

1 May 2015 - 4:56 pm | स्पंदना

:D

एस's picture

2 May 2015 - 2:51 pm | एस

ए चावू नका रे. :-)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 May 2015 - 10:31 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

दंतवैद्य ह्या प्रकाराबद्दल लैचं भिती वाटते...दुधाचे सगळे दात नं पडता पक्के दात यायला लागल्यानी सगळे दुधाचे दात उपटायला लागलेले होते...दंतवैद्य ह्या प्रकरणानी तेव्हापासुन लैचं हादरवलेलं आहे..

आतिवास's picture

3 May 2015 - 2:18 pm | आतिवास

आवडले.

विडंबन सुरेखच. उत्खनन कर्त्याचे आभार!

या विडंबनाच्या दोनेक महिने आधीचा चतुरंगरावांचा हा धागा आठवला...

अच्छा, म्हणजे तुम्हीही सामील होता तर!

बहुगुणी's picture

4 May 2015 - 11:07 pm | बहुगुणी

अंमळ गंमत ;-), पण तुमचं विडंबन खरंच पहायचं राहून गेलं होतं, ते जेपींमुळे वरती आलं म्हणून आवडल्याची पोच-पावती दिली, इतकंच... :-)