मेमांडू--एक अनुभव.

स्वप्ना हसमनीस's picture
स्वप्ना हसमनीस in जनातलं, मनातलं
8 Dec 2009 - 4:03 pm

येथे मलेशियात 'मेमांडू' म्हणजे ड्रायव्हिंग,मोटारचालकत्व.भारतात असताना आपण गाडी चालवावी,त्याचा निदान परवाना तरी आपल्याकडे असावा असे मला मनापासून कधीच वाटले नव्हते.उलट नवर्‍याने गाडी चालवावी आणि आपण शेजारच्या सीटवर बसून खुशाल त्याच्या ड्रायव्हिंगवर ताशेरे ओढावेत्,जमल्यास एखादी डुलकी काढावी एवढाच काय तो प्रवासात माझा सहभाग असे.पण इथे मलेशियात आल्यावर मात्र माझी पंचाईतच झाली.पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्रास नसल्यामुळे सारखेच गाडीसाठी दुसर्‍यावर अवलंबून राहावे लागे आणि दुसरे म्हणजे माझ्याहून वयाने लहान स्त्रिया मोठ्मोठ्या गाड्या सहजपणे चालवितात हे पाहून मला एक प्रकारचा न्यूनगंड येऊ लागला.आता आपणही कांहीतरी केलेच पाहिजे म्हणून मी घरापासून ५-६कि.मी.अंतरावरील एका मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये माझे नाव दाखल केले.सुदैवाची गोष्ट एवढीच की माझी प्रशिक्षिका (विमाला)दरवेळेस मला आणायला व पोचवायला गाडीने येत असे.

नांव दाखल केल्यावर पहिली गोष्ट जाणवली की इथे मेमांडू लायसेन (लायसन्स)फारच अवघड आहे.आपल्यासारखी एजंट पध्दत इथे नाही.धडाधड नापास करतात्.पहिल्या दिवशीच रविवारी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत थिअरी होती.व्याख्यानसत्र हे फक्त 'मलायी'(बहासा)भाषेत होते.आमचा भाषेच्या बाबतीत बोजवारा !एक शब्द कळेल तर शप्पथ.केवळ स्लाइडस्वरून अर्थ लावायचा.डोके दुखेपर्यंत मलायी व्याख्याने ऐकून ऐकून आपल्याला हे जमणार नाही अशी खात्री पटून स्वारी घरी !लवकर निघून येणे वगैरे शक्य नाही कारण आपला पासपोर्ट प्रत्येक वेळी त्यांचेकडे ठेवणे आवश्यक आणि शेवटी सही झाल्यावरच पासपोर्ट हातात्.लगेच दुसर्‍या आठवड्यात शिकवलेल्या भागाची संगणकीय परीक्षा.कसेबसे इंग्रजी अनुवादाच्या प्रतीचा अभ्यास करून परीक्षा दिली आणि ब्रेव्हो! ५० पैकी ४३ गुण मिळवून अस्मादिक पासं !मलाही थोडा आत्मविश्वास वाटू लागला.आता रविवारी पुन्हा सहा तास लेक्चर ,तीच मलायी भाषेतील बडबड आणि तोच कंटाळवाणेपणा .शेवटच्या दोन तासात गाडीची माहिती सांगून थोडी चालवायला दिली.आता लेक्चरबाजी संपून प्रात्यक्षिकाला सुरुवात झाली म्हणून थोडा आनंद वाटत होता पण गाडी प्रत्यक्ष चालवायची य विचाराने दडपणही आले होते. ह्या १४ तासांच्या थिअरी,परीक्षा इ.चक्रातून बाहेर पडल्याशिवाय लर्निंग लायसन्स इथे मिळत नाही आणिते मिळाल्याशिवाय तुम्ही गाडी रस्त्यावर काढू शकत नाही.आता मला एल्.लावलेली फक्त त्यांचीच गाडी प्रशिक्षकाबरोबर आणण्याची मुभा होती.पुढचे प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण केवळ ८ तासांचे दिले जाते.त्यात रिव्हर्स पार्किंग्,बुकीट (डोंगर्),थ्री पॉईंटर इ.प्रशिक्षण आमच्यासारख्या नवशिक्यांना आत्मसात करणे अवघडच जाते.त्यात आमच्याच प्रशिक्षकांतर्फे एक परीक्षाही घेतली जाते.कशी काय कोणास ठाऊक मी त्यातही उत्तीर्ण झाले.

आता आठवडाभरात जे.पी.जे.(आर्.टी.ओ)तर्फे परीक्षा होणार होती.आपल्याकडे कमीतकमी एक महिनाभरतरी गाडी रस्त्यावर चालवावी अशी अपेक्षा असते. इथे मात्र फक्त आठ तासात आणि एका जरी भागात गाडी नीट चालविता आली नाही तरी सर्व परीक्षा पुन्हा द्याव्या लागणार ! परीक्षेच्यादिवशी माझ्यादेखत परीक्षक एकापाठोपाठ एक अश्या कित्येकांना नापास करीत होते.माझ्यावरही तीच वेळ येणार याची खात्री ! आधीच 'सीदन्ति मम गात्राणि'अशी अवस्था झाली होती.पण माझ्या आणि परीक्षकांच्या सुदैवाने मला गाडी बंद न पडता परीक्षकांच्या आदेशानुसार सर्व कांही करता आले आणि मी 'मेमांडू'ची परीक्षा पास झाले.आता मी पी .लावून कोठेही ड्रायव्हींग करू शकते.
परदेशात येऊन गाडी शिकणे हेच माझ्या नशिबात होते हेच खरे !

जीवनमानराहणीलेखअनुभव

प्रतिक्रिया

jaypal's picture

8 Dec 2009 - 4:53 pm | jaypal

करुन दाखवलच .मनात आणल तर सर्व शक्य आहे. गरज ही जननी आहे.

प्रमोद देव's picture

8 Dec 2009 - 6:12 pm | प्रमोद देव

केल्याने होत आहे रे! आधी केलेचि पाहिजे!
छान लिहिलाय अनुभव.

स्वप्ना हसमनीस's picture

9 Dec 2009 - 6:11 am | स्वप्ना हसमनीस

अर्थात धन्यवाद! बहासामध्ये (मलेशियाच्या राष्ट्र्भाषेत) आभार व्यक्त करण्यासाठी तरिमा कासे असे म्हणतात.

मस्तानी's picture

8 Dec 2009 - 11:35 pm | मस्तानी

मी पण अशीच परदेशी येऊन मगच, जेव्हा मुलाला शाळेत जायचं तर गाडी चालवता आलीच पाहिजे अशी परिस्थिती आली तेव्हाच शिकले. परीक्षेच्या दिवशी फ्री-वे वर गाडी चालवली त्या नंतर आजतागायत त्या भानगडीत पडले नाहीये :)
तुमचा अनुभव वाचून माझ्या road test च्या आठवणी जाग्या झाल्या ... इथे प्रथम गाडी पार्क करण्याची परीक्षा होती आणि ती नीट पार पडली तरच पुढे कशी चालवता ते बघणार. नीट पार्क केली नाही तर तिथेच नापास :( Parallel Parking करताना परीक्षकाने ठेवलेले अडथळे पाडायचे नाहीत याची काळजी घेण अपेक्षित असताना मी मात्र चक्क त्या अडथल्याना पार गाडीखाली चिरडून टाकले होते. ती परीक्षिका त्या दिवशी चांगल्या मूड मध्ये असावी :) पुढे सर्व व्यवस्थित होऊन लायसन्स मिळाल आणि जीव भांड्यात पडला.

रेवती's picture

8 Dec 2009 - 11:56 pm | रेवती

मेमांडू लायसेन्स मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन!
आमच्या अमेरिकन मेमांडूच्या तीन तीन फेर्‍या झाल्या!
इतरवेळी नीट ड्रायव्हिंग, पण तो सहाफुटापेक्षा उंच असलेला जाडजूड बुवा शेजारी बसल्यानंतर टेस्ट सुरु झाली की शक्य त्या सगळ्या चुका करून दाखवल्या होत्या! काही चुका तर त्याने पहिल्यांदाच (त्याच्या आयुष्यात) पाहिल्या असतील!;) तिसर्‍यांदा झाले बुवा पास!:)

रेवती

टुकुल's picture

9 Dec 2009 - 2:00 am | टुकुल

हॅ हॅ हॅ..

येवु द्या कि मग एक खुशखुशीत लेख.
(लिहायचा कंटाळा येत असेल तर लावा नवर्‍याला कामाला : ) )

--टुकुल

स्वप्ना हसमनीस's picture

9 Dec 2009 - 7:15 am | स्वप्ना हसमनीस

शुभच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्याशी सहमत आहे.
प्रॅक्टिस सेशनमध्ये आत्मविश्वासाने गाडी चालवता येते. पण आपल्या शेजारी परिक्षक बसलाय आणि आपल्या प्रत्येक हालचालीकडे त्याचे बारीक लक्ष आहे ह्या भीतीनेच आणखी चुका घडण्याची शक्यता असते.

स्वाती२'s picture

9 Dec 2009 - 12:49 am | स्वाती२

फक्त आठ तासच प्रॅक्टिस? मी नक्कीच नापास झाले असते. देशात दोन वार्‍या करायला लागल्या होत्या. इथे परीक्षेला गेले तर पावसाची रिपरिप सुरु झाली. मग तो ऑफिसर म्हणाला एक चक्कर मारुन येऊ १० मिनिटात आणि दिलं लायसन्स.

टुकुल's picture

9 Dec 2009 - 2:01 am | टुकुल

अभिनंदन !!

--टुकुल

स्वप्ना हसमनीस's picture

9 Dec 2009 - 7:05 am | स्वप्ना हसमनीस

शुभेच्छा दिल्याबद्दल आभार.

शाहरुख's picture

9 Dec 2009 - 2:08 am | शाहरुख

महिला वर्ग "महिलांना गाडी तितकीशी चांगली चालवता येत नाही" हे कबूल करतोय की काय ? :-D

प्रभो's picture

9 Dec 2009 - 2:16 am | प्रभो

अरे बाबा, कायको गडे मुर्दे उखाडता है...
लै मोठा काकू झालाय या विषयावर आधीच...

बाकी काथ्याकूट परत होणार असे वाटून टार्‍याचे डोळे पाणावले.. :)

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

स्वप्ना हसमनीस's picture

9 Dec 2009 - 6:28 am | स्वप्ना हसमनीस

माफ करा.महिला वर्ग हे कबूल करत आहे कि परराष्ट्रात गाडी शिकणे आणि ड्रायव्हींग टेस्टला सामोरे जाणे हा एक कधीही न विसरण्यासारखा अनुभव आहे.
तुमच्या माहितीकरिता सांगते इक मलेशियात केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे कि महिला अतिशय व्यवस्थितपणे व सुरक्षितरित्या गाडी चालवतात. त्याउलट पुरुष हे स्पिडिंग व नियम न पाळण्यात सराईत आहेत.
मुद्दा एवढाच आहे --आम्हाला आलेल्या अनुभवांचा आस्वाद मिपाच्या वाचकांना घेता यावा हाच प्रयत्न!

अहो प्रतिसाद वाचून जराशी गंमत केली..लगेच सर्वेक्षणाचे निकाल कशाला !!
तुमचा अनुभव आवडला..हॅव अ सेफ राईड.

स्वप्ना हसमनीस's picture

9 Dec 2009 - 12:24 pm | स्वप्ना हसमनीस

अहो.मी सुध्दा मला आताच मिळालेले ज्ञान पाजळले एवढेच.
तुमचे मनापासून धन्यवाद.

अमृतांजन's picture

9 Dec 2009 - 8:51 am | अमृतांजन

मलेशियात केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे कि महिला अतिशय व्यवस्थितपणे व सुरक्षितरित्या गाडी चालवतात

त्यांच्यासाठीच नियम असतात. (करावे लागले).

त्याउलट पुरुष हे स्पिडिंग व नियम न पाळण्यात सराईत आहेत.

नियम पुरुषांना लागू पडत नाहीत; ते नियम तयार करतात. ते जसे गाडी चालवतात ते पाहून नियम तयार केले जातात.

चतुरंग's picture

9 Dec 2009 - 6:51 am | चतुरंग

ड्रायविंग टेस्ट चांगलीच कठिण दिसते आहे.
इथे मॅसाच्यूसेट्समध्ये लेखी परीक्षा असते त्यात २१ प्रश्न विचारतात कमितकमी १४ बरोबर यायला लागतात. त्यात पास झाले तर ड्रायविंग टेस्ट. थ्री पॉइंट टर्न, पॅरलल पार्किंग (हे जास्त लोकवस्तीच्या टाऊनमध्ये हमखास विचारतात), रिवर्स, यील्ड, स्टॉप, फ्रीवे ड्रायविंग, रोटरी भोवती चक्कर, अशा सगळ्या कसरती करताना शेजारी कठोर चेहेर्‍याचा स्टेट ट्रूपर बसलेला असतो आणि तो त्याच्या नोटपॅडवर नोंदी घेत असतो. पास झालो की नापास हे 'रजिस्ट्री ऑफ मोटरवेईकल' (इथले आरटीओ) च्या आवारात आपण गाडी परत आणून पार्क केली की सांगतो. साधारण आठवड्यात (चिरीमिरी न देता किंवा विनाकारण हेलपाटे न घालायला लावता! ;) ) लायसन घरपोच येतं

(फर्स्ट अटेंप्ट क्लिअर)चतुरंग

स्वप्ना हसमनीस's picture

9 Dec 2009 - 7:27 am | स्वप्ना हसमनीस

इथे तर त्यांची चेकलिस्ट ही बहासामध्ये असते.ते एकानंतर एक असे त्यात खुणा करत जातात.ठराविक टेस्ट संपुष्टात आली कि ती चेकलिस्ट दुसर्‍या व्यक्तिकडे सुपूर्त करावी लागते आणि मग एका अशि़क्षितासारखे विचारावे लागते "पास" कि "फेल".
नंतर ती चेकलिस्ट निरखून पाहिल्यावर बहासा भाषेतले दोन नविन शब्द समजले.गगल(म्हणजे "फेल" ) आणि लुलुस (म्हणजे "पास")
मा़झ्या चेकलिस्ट मध्ये सगळे " लुलुस" होते.ते पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला.

सहज's picture

9 Dec 2009 - 6:57 am | सहज

स्वप्नातैंचे अभिनंदन

ओन्ली हियर द गुड स्ट्फ [कृ. ह. घे.]

स्वप्ना हसमनीस's picture

9 Dec 2009 - 7:07 am | स्वप्ना हसमनीस

आभारी आहे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

9 Dec 2009 - 8:34 am | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त लिहलाय अनुभव.

स्वप्ना हसमनीस's picture

9 Dec 2009 - 12:13 pm | स्वप्ना हसमनीस

तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद.

भानस's picture

9 Dec 2009 - 8:44 am | भानस

स्वप्ना तुझे अभिनंदन! बाकी मायदेशात नवर्‍याच्या शेजारी बसून त्याच्या उत्तम ड्रायव्हींगवर टीका करणे व ए तू गाडी नीट चालव बरं का रे. मी जरा डुलकी काढतेय असे सांगून आयमीन थोडे दमात घेऊनच झोपून टाकणे. इथे आल्यावर मात्र पर्याय राहीलाच नाही.
अनुभव मस्त लिहलाय. :)

स्वप्ना हसमनीस's picture

9 Dec 2009 - 11:34 am | स्वप्ना हसमनीस

तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

मदनबाण's picture

9 Dec 2009 - 8:59 am | मदनबाण

अनुभव कथन आवडले. :)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

स्वप्ना हसमनीस's picture

9 Dec 2009 - 11:43 am | स्वप्ना हसमनीस

अभारी आहे.

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2009 - 11:01 am | पर्नल नेने मराठे

ह्म्म... माझ्या नवर्याला आलेला अनुभव...
परिक्शक एक लोकल(अरबी)
१. तो हाताने लेफ्ट दाखवुन तोन्डाने राईट म्हणाला 8| आम्चे हे बावरले :S . नापास
२. तो म्हणाला, सिगारेट घेतो, थाम्ब, ह्याने घाइघाइने दुकानासमोर
थांबवली ...नो पार्कीग झोन्...हे परत नापास.
असे असन्ख्य अनुभव......

चुचु

स्वप्ना हसमनीस's picture

9 Dec 2009 - 11:42 am | स्वप्ना हसमनीस

बाप रे. हे म्हणजे कठीणच झाले. अशा परिक्षकांमुळे शिकाऊ ड्रायव्हर गोंधळून नक्कीच आणखी चुका करेल आणि लायसन्स मिळायचा तो कधी?
कुतूहल म्हणून विचारते ...... तुमचे पति नंतर परिक्षा पास कधी झाले?

मालिक के आदमी चारो तरफ फैले हुए है/ हा, हा

गणपा's picture

9 Dec 2009 - 11:45 am | गणपा

हॅ हॅ हॅ, हे त्या हलकटांचे पैसे कमवायचे धंदे आहेत ग.
एकदा नापस झाल कि परत ५ते ७ दिवस क्लास घ्यावा लागतो.
भरा पैसे परत.
(दुबै ला पहिल्या फटल्यात परवाना मिळालेला) -गण्या.

-माझी खादाडी.

स्वप्ना हसमनीस's picture

11 Dec 2009 - 8:25 am | स्वप्ना हसमनीस

माझ्याबरोबर ८० जणांची ड्रायव्हींग टेस्ट झाली.त्यातील ४०% परिक्षार्थी एका न दुसर्‍या टेस्टमध्ये अनुत्तीर्ण. नापास झालेल्यांना १ तासाची प्रॅक्टीस देवून सात दिवसांनी ६५ रिंगेट्स भरुन पुन्हा तीच परिक्षा.
(मलशियात 1st attemptमध्ये लेसन मिळवणारी मी स्वप्ना)

स्वप्नाताई,
तुमचा अनुभव वाचून मला मलेशियातला लायसेन्स मिळविण्याचा माझा अनुभव आठवला. ते "सातूरिबू सातू, सातूरिबू दुवा, सातूरिबू तिगा व सातूरिबू एंपात" सुद्धा आठवलं. (कुणी पाळत नाहींत, पण एक कायदा असा आहे की पुढच्या गाडीपासून आपली गाडी चार सेकंदापेक्षा जास्त अंतरावर असली पाहिजे व आमचा इन्स्ट्रक्टर चार सेकंद कसे मोजायचे ते सांगत होता.)
मजा आली वाचायला! एक तर्‍हेचा पुनःप्रत्ययाचा आनंद उपभोगला!
बाकीचे 'व्यनि'वर.
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

स्वप्ना हसमनीस's picture

11 Dec 2009 - 8:16 am | स्वप्ना हसमनीस

इथले काही नियम आत्मसात करणे तसे कठीण आहे आणि तुम्ही जे लिहिले आहे त्याच्याशी मी सहमत आहे. ४ seconds rule आणि १२ seconds rule हे दोन्ही चमत्कारिक नियम आहेत. वास्त्विक पाहता ते theoricallyच अस्तित्वात आहेत.
तुमचाही अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद.

भडकमकर मास्तर's picture

10 Dec 2009 - 1:04 am | भडकमकर मास्तर

लुलुस..
लुलुस..
लुलुस..
लुलुस..
लुलुस..
लुलुस..
लुलुस..
लुलुस..
लुलुस..
लुलुस..
लुलुस..

सर्व परीक्षेत लुलुसल्याबद्दल अभिनंदन

स्वप्ना हसमनीस's picture

11 Dec 2009 - 7:57 am | स्वप्ना हसमनीस

तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

भडकमकर-जी,
अरेच्चा! तुम्हालाही ही भाषा येते तर! कारण लुलूस म्हणजे पाssssस!
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

अमृतांजन's picture

12 Dec 2009 - 10:11 am | अमृतांजन

Saya boleh bercakap Bahasa Melayu

वेताळ's picture

12 Dec 2009 - 10:04 am | वेताळ

बाकी ३६ पैकी १८ प्रतिसाद तुमचे एकट्याचेच आहेत. त्यामुळे धागा आपला सतत वरच राहतो आहे. त्याबद्दल ही तुमचे अभिनंदन.

वेताळ