मी कोण?

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
24 Nov 2009 - 1:26 pm

त्यांनी जेव्हा मला विचारलं
आपण कोण!
तेव्हा माझ्या मनी प्रथम उत्तर आलं
या अफाट विश्वातला एक छटाक माणुस मी!

पण मनातलं उत्तर ओठांवर येण्याआधीच
कानी आला ओरडा
देशद्रोही, भारत माता की जय, जयहिंद!
अन तेव्हा मी म्हणलं
मी एक भारतीय हेच बरोबर उत्तर असेल बहुतेक!

तेव्हढ्यात कुणीतरी चिरकलं
काफीर, दार-उल-हर्ब, गर्व से कहो हम हिंदु है!
तेव्हा मी विचार केला
मी हिंदु असंच सांगण योग्य!

पण तेव्हढ्यात कानी आला गलका
घाटी, भांडी घासा आमची, घास रे रामा, जय महाराष्ट्र!
मग मनी म्हणलं
आहेच मी मराठी तर गरजेन जय महाराष्ट्र!

तोवर कुजबुज सुरु झाली
सवर्ण, दलीत, बामण, ९६ कुळी!
मग मला आठवली
जातीकरता खावी माती ही उक्ती!

पण तेव्हढ्यात मला आठवली
आईच्या मांडीची उब अन भावंडांनी बोबड्या भाषेत मारलेल्या दादा, दादा हाका!
सुशिक्षित बेकार असताना
पाठीवर पडलेला वडिलांचा आश्वासक हात!

स्मरली लग्नाची पहिली रात्र
लाजुन सख्या म्हणुन घातलेली साद!
पोराला बोलायला आलं
तेव्हा त्यानं बाबा म्हणुन मारलेली हाक!

अन मग मी अभिमानानं सांगीतल
मी माझ्या मात्यापित्याचा मुलगा
भावा बहिणींचा भाऊ
बायकोचा राया अन मुलाचा बाप
मामा, मावशी, आत्याचा भाचा
अन काका, काकुचा पुतण्या
आजी, आजोबांचा नातु
अन यारांचा यार
अन असाच बर्‍याच कुणाचा कोण!

पण कोण रे तो आता कुजबुजतोय?
कुपमंडुक, क्षुद्र, संकुचित, फ्रॉग इन द वेल!

मुक्तकसमाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

गणपा's picture

24 Nov 2009 - 2:00 pm | गणपा

छान कविता आवडली.
-(क्षुद्र कुपमंडुक )गण्या.

धमाल मुलगा's picture

24 Nov 2009 - 2:25 pm | धमाल मुलगा

वरवर साधीसोपी वाटणारी गोष्ट, पण आतुन विचार करायला लावणारी!

खरंच कोण आहे मी? माझ्यासारख्या क्षुल्लक माणसाकडं तरी खरंच उत्तर नाही बॉ ह्या तुमच्या-माझ्या प्रश्नाचं!

-(?) ध.

श्रावण मोडक's picture

24 Nov 2009 - 2:27 pm | श्रावण मोडक

दमदार कल्पना.

अवलिया's picture

24 Nov 2009 - 2:27 pm | अवलिया

मस्त ! कविता आवडली !!

-(क्षुद्र कुपमंडुक )अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Nov 2009 - 2:32 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍याच !!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

24 Nov 2009 - 9:43 pm | टारझन

सुंदर काव्या श्री. पुणेरी ,

- टारझन

प्रभो's picture

24 Nov 2009 - 9:47 pm | प्रभो

>>सुंदर काव्या??

कुठाय काव्या???

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

sneharani's picture

24 Nov 2009 - 2:34 pm | sneharani

आवडली कविता..!

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Nov 2009 - 2:34 pm | बिपिन कार्यकर्ते

आवडली.

बिपिन कार्यकर्ते

निखिल देशपांडे's picture

24 Nov 2009 - 2:38 pm | निखिल देशपांडे

कोण मी...????
आवडली कविता...
(?)निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

घाटावरचे भट's picture

24 Nov 2009 - 2:42 pm | घाटावरचे भट

वा वा!! छान कविता...

विनायक प्रभू's picture

24 Nov 2009 - 2:50 pm | विनायक प्रभू

आवडली

सूहास's picture

24 Nov 2009 - 6:23 pm | सूहास (not verified)

काय लिहु ?

कान पिचक्या आणी शालजोडे मारलेत ..

मी कोण म्हणुन काय विचारता...मी जो आहे तो आहे...६००० वाचकांमध्ये केवळ दोन - एक आय. डी ज ला काय समजुन सांगायचे ...

असो ...अचानक कविता ?? कशी काय सुचली बॉ !!

सू हा स...

स्वाती२'s picture

24 Nov 2009 - 7:01 pm | स्वाती२

आवडले.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Nov 2009 - 7:28 pm | llपुण्याचे पेशवेll

कविता वगैरे नंतर. या पत्रकारानी एकही प्रांत आमच्यासाठी मोकळा ठेवला नाही. आमच्या कवितेच्या प्रांतात पुणेरी यानी केलेल्या घुसखोरीचा आम्ही तीव्र निषेध करतो.
बाकी तुम्ही कूपमंडूक, राडेबाज, कर न भरनारे लोक सुधारणार नाही कधी. आता यांच्या हातात असली माध्यमे द्या म्हणजे हे विचारवंताना झोडायला मोकळे. यावरुन वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यची आठवण झाली. असो.
कविता बरी आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

प्रभो's picture

24 Nov 2009 - 7:34 pm | प्रभो

दा, मस्त झालीय रे कविता...आवडली..अंतर्मुख करायला लावणारी

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

प्रदीप's picture

24 Nov 2009 - 8:36 pm | प्रदीप

आणि ह्याच विषयावरील मुसुंचा लेख आठवला.

धनंजय's picture

24 Nov 2009 - 9:01 pm | धनंजय

छान कल्पना, विचार, कविता

आपुलकीची नाती आणि विशाल समाजासाठी ममत्व या दोन गोष्टी एकमेकांच्या विरोधी नाहीत. आपणा सर्वांमध्ये दोन्ही आहेत.

मात्र कुठले मोठे संकट आले, की आपण एकमेकांना एका किंवा दुसर्‍या टोकाचे म्हणून कलह करतो. (म्हणजे नेमस्त मातृद्रोही विरुद्ध स्वार्थी देशद्रोही असे एकमेकांना चितारणारे भांडण होते.) हातघाईच्या परिस्थितीत असे होणारच. म्हणून हातघाईचे प्रसंग कमीतकमी व्हावेत, अशी योजना करणे बरे.

(त्यामुळे शालजोडीतला मारला असेल तरी शालजोडीच जाणवली. कविता छानच आहे.)

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Nov 2009 - 9:13 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री पुनेरी, चांगला प्रयत्न. मानवी अस्तित्त्वाच्या क्षुद्रतेचा शोध आणखी घेतला असता तर आशय अधिकच गडद झाला असता. नात्यांमध्येच का अडकलात?

मदनबाण's picture

24 Nov 2009 - 9:17 pm | मदनबाण

छान कविता.

मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

मुक्तसुनीत's picture

24 Nov 2009 - 10:04 pm | मुक्तसुनीत

कविता म्हणून नव्हे , परंतु आपल्या अस्तित्त्वाला वेगवेगळ्या संदर्भात तपासून पाहायच्या चिंतनामुळे हे लिखाण आवडले. कवितेवर कसलीच बंधने नाहीत हे खरे पण प्रस्तुत लिखाण सरळसरळ गद्यच आहे.

आपण कोण, आपली ओळख काय हे प्रश्न कुणालाच चुकलेले नाहीत. परस्परविरोधी वाटतील अशा संदर्भांमुळे , आपल्या स्वतःच्या ओळखीबद्दल आपण खुद्द गोंधळलेले असतो. अटीतटीच्या प्रसंगी आपल्या ओळखीची परीक्षा होते असेही कधीकधी दिसते. अशा वेळी कसोटीस न उतरण्याच्या भीतीतून किंवा , सत्त्वपरीक्षेस उत्तीर्ण होऊनही, कदाचित आपल्या हितसंबंधांना धक्का लागेल म्हणून परीक्षेस न बसणे हा सोपा पर्याय काही लोक निवडताना दिसतात.

ज्याला आयुष्याच्या बहुआयामी प्रकृतीची पुरेशी कल्पना असेल त्याला निवड ही अटळ आहे. उदाहरणार्थ, मुंबईमधे रहाणार्‍याला एखाद्याला मराठी भाषेबद्दल आंच असेल ; परंतु त्याचे अन्यभाषिक , अन्यप्रादेशिक मित्र असतील. मग अशावेळी त्याने काय करायचे ? अशा वेळी "उचल दगड , फोड बस" हा पर्याय त्याला बाद वाटू शकतो.(हे एक निव्वळ उदाहरण झाले.)

थोडक्यात , ज्याला निरनिराळे पैलू जाणवले आहेत त्याची निवडप्रक्रिया ही जास्त गुंतागुंतीची ठरू शकते. ज्यांनी आपल्या आयुष्यात सांधेपालट केली आहे त्यांचे या संदर्भातले लिखाण मननीय ठरले आहे . उदा. "डार्कनेस अ‍ॅट नून" , "एका कारसेवकाची डायरी" , "अस्वस्थ दशकाची डायरी".

jaypal's picture

25 Nov 2009 - 12:21 pm | jaypal

वर वर शब्दांच आवरण आसल तरी हा एक आंतरीक गुढ प्रवास आहे.
प्रवास चालु ठेवा. खुप कमी लोकं या प्रवासाच्या वाट्यला आणि या वळणा पर्यंत पोचतात. पुढील प्रवासास खुप शुभेच्छा. इप्सीत लवकर साध्य होवो.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अविनाशकुलकर्णी's picture

24 Nov 2009 - 10:44 pm | अविनाशकुलकर्णी

मी कोण्?? कोहम ........मानवाला पडलेला प्र्श्ण...
कविता एकदम आवडली

भानस's picture

24 Nov 2009 - 11:36 pm | भानस

पडणारा एक प्रश्न....अनुत्तरीतच राहणारा..:(
कविता आवडली. प्रत्येक रूपात आपण दिसतो व समोरची सगळी आपलीच हे जाणवते तेव्हां तर हा एक छळणारा प्रश्न बनतो.

पाषाणभेद's picture

25 Nov 2009 - 2:08 am | पाषाणभेद

तेच म्हणतो.
अतिशय छान प्रकटन. आजकालचा संदर्भ नाही लावला तरी सर्व कालीन कविता.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी

टुकुल's picture

25 Nov 2009 - 3:13 am | टुकुल

आवडली....

--टुकुल

प्राजु's picture

25 Nov 2009 - 3:25 am | प्राजु

चांगली उतरली आहे. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

नंदन's picture

25 Nov 2009 - 4:24 am | नंदन
विसोबा खेचर's picture

25 Nov 2009 - 8:57 am | विसोबा खेचर

पण तेव्हढ्यात मला आठवली
आईच्या मांडीची उब अन भावंडांनी बोबड्या भाषेत मारलेल्या दादा, दादा हाका!
सुशिक्षित बेकार असताना
पाठीवर पडलेला वडिलांचा आश्वासक हात!

सुरेख कविता..!

तात्या.