<खड्ड्या तुझ्या मिठीत रे....... >

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
19 Nov 2009 - 9:48 am

आमची प्रेरणा : सखये तुझ्या मिठीत.....

तुज पाहिल्या क्षणी मी , विरलो जरा तिथेच
रस्त्यात होतास एकटा, माणसांच्या या दाटीत रे!
कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतास तू गढूळलेला
ओलांडता कोलमडलो , चिखलाच्या मिठीत रे!
अन्दाज सखोलीचा आला मला न केंव्हा
सगळे तुझ्यात झाले , आडवे किती पटीत रे !
स्कूटर मोटार सायकल ; ऐसा भेदभाव कधी न झाला
सारेच आडवे झाले ; खड्ड्या तुझ्या मिठीत रे
गांगरलो असा मी , दणका तुझा देण्याला
भिक्कार भीजलेला , कुठल्या चिखलवटीत रे?
खणले तुला न कोणी ; शान तू या रस्त्याला
तूज मुजवले कोणी नाही ; खलित्यांच्या रेटारेटीत रे
हार मानिली सार्‍यानी ; तू तसाच राहिला
खड्ड्या सारेच रे पडले , माझे तुझ्या मिठीत रे;
स्कूटर चा कणा पोलादी ; ऐसा मधेच मोडला
चश्मा फुटला दात तुटला ; चूर्ण जबड्याच्या फटीत रे
डोके फुटले ,रक्त सांडले ; रस्ता लाल जाहला
मान ही कधीच मोडली , उसण भरली पाठीत रे
येवढे झाले आहेच आता ; जीव नकोसा झाला
.....मरणे सहजच जमेल रे, खड्ड्या तुझ्या मिठीत रे

भयानकहास्यकरुणशांतरसनृत्य

प्रतिक्रिया

उदय सप्रे's picture

19 Nov 2009 - 9:54 am | उदय सप्रे

लगे रहो विजू भौ.....

टारझन's picture

19 Nov 2009 - 10:17 am | टारझन

डोके फुटले ,रक्त सांडले ; रस्ता लाल जाहला

बा प रे !!! =)) =)) =))

- व्हिनायक गब्रु

jaypal's picture

19 Nov 2009 - 3:09 pm | jaypal


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रभो's picture

19 Nov 2009 - 8:36 pm | प्रभो

चालू द्या

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!