फिल्म डिव्हीजन च्या फिल्म्स कोठे गेल्या?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
10 Nov 2009 - 9:47 am

फिल्म डिव्हीजन च्या फिल्म्स कोठे गेल्या?

साधारणता: १९८० च्या दशकात ज्यावेळी दुरदर्शनवर वाहिन्यांचा सुळसूळाट चालू झालेला नव्हता त्या काळी दिल्ली दुरदर्शनवर वरचेवर भारतीय फिल्म डिव्हीजन ने तयार केलेल्या काही कार्टून फिल्म दाखवल्या जायच्या. सदर फिल्म्स ह्या देशभक्तिपुर्ण, अर्थपुर्ण, संगीतमय व काहीतरी उद्दात हेतू असणार्‍या होत्या. त्यातल्या माझ्या लक्षात राहिलेल्या काही म्हणजे
१) अन्न का हर दाना बचाईये
२) एक चिडीया (अनेकता में एकता) (डायरेक्शन: विजय मुळे, संगीतकार:वसंत देसाई, अ‍ॅनिमेशन: भीमसेन, 'हिंद देश के निवासी' : पंडित विनय चंद्र)

सगळी फिल्म संपली की मग 'फिल्म्स डिव्हीजन कीं भेंट' अशी पाटी यायची. वरचेवर या फिल्म्स लागत असल्याने (त्या काळी कार्यक्रमही मर्यादितच होते.) या फिल्मस मधील गाणे तोंडपाठ होत असत. घरातले छोटे, मोठे लोक या फिल्म्स आवडीने बघत असत. असल्याच फिल्म्स, काही सामाजीक जाहिराती (उदा. रेल्वे क्रॉसींग, रक्तदान, एडस् आदी.) फिल्म डिव्हीजन कडून दाखवल्या जायच्या. ह्या फिल्म्स मी थेटरातही चित्रपट सुरू होण्याच्या आधी बघितल्याचे स्मरते. काळाच्या ओघात ह्या असल्या सामाजीक जाहीराती दुरदर्शन वर येणे कमी झाले. एकतर फिल्म चा वेळ जास्त, देशभक्तिची /अधिकार्‍यांची उदासीनता, जाहीरातींचा मलीदा मिळवण्याची हाव ही कारणे या असल्या फिल्म च्या अघोगतीस कारणीभूत ठरत असतील.

असो. एक आनंदाच्या ठेव्याला या फिल्म्स/ जाहिराती न बघणारे मुकले आहेत.

या लिंकवर हा खजिना आपल्याला मिळू शकतो.

(हा धागा वाचून परत काही जण 'जुन्यातून बाहेर या, कधी मोठे होणार?' आदी आरोप करतील. त्यांना माझे एकच सांगणे आहे, मी लहान असतांना या फिल्म्सनी मला आनंद दिला जो आनंद तुम्हाला आताचे शिंग चॅन, पॉवर रेंजर, बेन टेन पाहतांना होतोय. मी सुद्धा या आताच्या फिल्म्स एंजॉय करतो. आगामी काळात या आताच्या फिल्म्स काळाच्या पडद्याआड गेल्या तर आपणासही असला धागा काढूशी वाटेल.)

कलासंगीतजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

राधा१'s picture

10 Nov 2009 - 10:30 am | राधा१

ही पण मस्त होती अ‍ॅड...कोणाकडे असेल तर आवडेल ऐकाला..!!!

राधा१'s picture

10 Nov 2009 - 10:30 am | राधा१

ही पण मस्त होती अ‍ॅड...कोणाकडे असेल तर आवडेल ऐकाला..!!!

मदनबाण's picture

10 Nov 2009 - 10:34 am | मदनबाण

मला पण अ‍ॅड आवडायची...गाणं तर फारच सुंदर...

http://www.youtube.com/watch?v=Va_ml6k7_Fk

आणि या सुद्धा...
http://www.youtube.com/watch?v=P68WBjaqSbI&feature=related

http://www.youtube.com/watch?v=gstRrEmTcBc&feature=related

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

राधा१'s picture

10 Nov 2009 - 11:18 am | राधा१

धन्यवाद..मदन काका/भाउ..नक्की काय म्हणु ते कळत नाही आहे... :-)

JAGOMOHANPYARE's picture

10 Nov 2009 - 11:42 am | JAGOMOHANPYARE

यू ट्युब क्लिप ओर्कुटवर घालून ठेवा........ मजेत बघा.... :)

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

गणपा's picture

10 Nov 2009 - 1:21 pm | गणपा

अगदी ४ दिवसांपुर्वीच लेकीला एक चिडीया ही फिल्म दाखवली. एकदम मग्न होउन पाहात होती.
सध्याच्या टॉम अँड जेरीच्या रतिबापुढे तिला हे जास्त आवडलं. अजुन पन तुमच्या वेळची कार्टुंन्स दाखवाना ना बाबा म्हणाली. बरीच शोधली पण मिळाली नाहीत.
एक आठवते, त्यात एक माणुस रस्त्याने जात असतो आणि मग घरा घरातुन लोक कचरा रस्त्यावर टाकतात, रस्ता कचर्‍याने भरुन जातो, चालता पण येत नाही.
मग कॉमन मॅन लाथा मारुन कचरा परत प्रत्येकाच्या घरात टाकतो.
अफलातुन कार्टुन होतं. योग्यतो संदेशही पोहोचवला जायचा.
कुणाकडे लिंक आहे का याची?

पाषाणभेद's picture

10 Nov 2009 - 2:55 pm | पाषाणभेद

आरं गनपा रं म्या वर लिंक देयेल हाय. त्या लिंक मधी आसले कार्टून हायेत. पन त्ये घ्येयाला पैकं पडत्यात रं.

काय म्हना, पन तुमी तुमच्या ल्येकीला एक चिडीया ह्ये कार्‍टून दाखवून लय चांगल काम क्येलं पगा.

जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट