बुधवारची कविता: (दु:ख)

llपुण्याचे पेशवेll's picture
llपुण्याचे पेशवेll in जे न देखे रवी...
5 Nov 2009 - 11:35 am

स्वतःचे प्रतिसाद उडू नयेत
म्हणून प्रयत्न करतात
सदस्य माजू नये म्हणून
कात्री लावतात
तरीही जमले ना की
त्यावर
बा*वला भां** करतात
संमालक माणसे

पण इथे कंपूं
सुख मिळू देत नाही
अथवा
उडलेल्या पोस्टमागे
त्याना होत नाही दु:ख
इथेच सगळी गोची आहे.

क्रिप्टीकने पछाडलेले सदस्य
चवचालपणा करणारी
तरुण पोरे
मिभोबळी,पाध्येबळी, डबलबॅरलबळी होणारे गटणे
विडंबकखाटकांसमोरची
कविताजनावरे

हे सगळे जेव्हा बोर्डावर येत
तेव्हा
संपादित झालेले असते
धुतलेले, बडवलेले,
फाट्यावर मारलेले असते
जळवणारे असते

कोण म्हणे-
कंपू वाईट नसतात, संपादकही चलाख असतात

भयानकहे ठिकाण

प्रतिक्रिया

नंदन's picture

5 Nov 2009 - 11:55 am | नंदन

क्या बात है!

विडंबकखाटकांसमोरची
कविताजनावरे

-- जिओ पुपेसेठ!

त्याना होत नाही दु:ख
इथेच सगळी गोची आहे.

-- हे वाक्य काळजाला भिडले. रिच बार्लोची आठवण आली!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

निखिल देशपांडे's picture

5 Nov 2009 - 12:01 pm | निखिल देशपांडे

पुपे परत एकदा कालचा बुधवार उपयोगी ठरला म्हणा तर...

विडंबकखाटकांसमोरची
कविताजनावरे

काय ओळी आहेत....

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Nov 2009 - 12:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नंदन-एच (जी नंतर एच येतं ना, आता या 'एच'चा अर्थ ज्याने त्याने यथामती लावावा.),

रिच बार्लो यांच्यासंदर्भात आपण एक कविता रचावी अशी विनंती, आज्ञा, सुपारी (का नारळ), इ. इ.

अदिती

नंदन's picture

5 Nov 2009 - 12:16 pm | नंदन

>>> अशी विनंती, आज्ञा, सुपारी (का नारळ), इ. इ.
--- भय इथले संपत नाही, गुणगुणती दु:ख कुणाचे, हे सरता संपत नाही अशा समर्पक ओळी असताना वेगळे लिहिण्यात काय हशील?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

टारझन's picture

5 Nov 2009 - 4:06 pm | टारझन

खालचे प्रतिसाद आणि कविता वाचून देवाज्ञा झाली =)) =))

- मंदन हॉवर्डकर

निमीत्त मात्र's picture

6 Nov 2009 - 5:55 am | निमीत्त मात्र

उद्धव आणि राज देई
बाटग्याची बांग
मिभोक्याला लागे
मेडिसीनल भांग

फॉर हीयर ऑर टू गो?
नवा प्रश्न बोर्डाला
उत्तर देताना मास्तर म्हणतो
माझाच नंबर पहिला

पावसाची परी
थंडीची दुलई
चहाची तल्लफ
आणि भाऊंची गादी

बुधवारच्या गल्लीत
पेशव्यांचा मान
आमचा मंदू म्हणजे
'समर्था'घरचे श्वान!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Nov 2009 - 8:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही बोर्डात इतिहासात पहिले आला होतात का?

अदिती

नंदन's picture

6 Nov 2009 - 9:33 am | नंदन

>>> तुम्ही बोर्डात इतिहासात पहिले आला होतात का?
-- दाट शक्यता वाटते. नागरिकशास्त्राबद्दल मात्र साशंक आहे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाटावरचे भट's picture

6 Nov 2009 - 9:39 am | घाटावरचे भट

इतिभूनाचे गुण वेगवेगळे धरत नसल्याने दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता असावी.

निमीत्त मात्र's picture

6 Nov 2009 - 11:15 pm | निमीत्त मात्र

नाही...शाळेत माझा आवडता विषय खगोलशास्त्र होता!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Nov 2009 - 4:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तरीच! वाटलंच, खगोलशास्त्रावरील प्रेमापोटी तुम्ही इतिहासाचा बळी दिलात.

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Nov 2009 - 11:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वतःचे प्रतिसाद उडाले
म्हणून कांगावा करतात
निमित्त ठरू नये म्हणून
मात्रा घेतात
हे वाचून सर्व
त्यावर
फिदीफिदी हसतात
जुने मित्र

पण इथे स्वयंघोषित विद्वान
आनंद मिळू देत नाहीत
आणि
अतार्किक बोलल्यावर
शांत त्यांना बसवत नाही
इथेच सगळी मेख आहे

स्वयंगंडाने पछाडलेले सदस्य
त्यांना पिना मारणारे
डु. आय.डी.
डिलीट बळी, खरड बळी, विडंबनबळी होणारे फुटाणे
शब्दक्रीडकांसमोरची
गांधारीची प्रजा

हे सगळे जेव्हा बोर्डावर येते
तेव्हा
कानात शिसे पडलेले असते
धुतलेले, बडवलेले,
अगदी हलकट असते
जळवणारे असते

कोण म्हणे-
कंपू असतात, कंपूबाहेरही हुशार असतात

अदिती

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Nov 2009 - 11:59 am | llपुण्याचे पेशवेll

वाह! जियो अदिती.

डिस्क्लेमरः जियो हा शब्द आम्ही मालकांच्या जमादारखान्यातून उधारीवर आणला आहे.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

नंदन's picture

5 Nov 2009 - 12:20 pm | नंदन

शब्दक्रीडकांसमोरची
गांधारीची प्रजा

- शारदीय शब्दकळाबहर!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मिसळभोक्ता's picture

5 Nov 2009 - 1:05 pm | मिसळभोक्ता

शारदीय शब्दकळाबहर

असेच म्हणतो.

बहर दोघांनाही आलेला आहे.

पुपेंना दर बुधवारी असा बहर येतो. अ‍ॅग्रीड. कशामुळे तेही माहिती आहे.

पण अदितीतैंना त्याच सुमारास कसा बहर येतो, हे जोखायला हवे.

देवकाकांना बहराची इथ्थंभूत माहिती असते. (आजकाल अदितीतै खूप पियाला लागल्यात, असे ऐकीवात आले होते. खात्री करून घ्यायला हवी. तुम्हाला काय माहिती आहे देवकाका ?)

स्वयंगंडित...
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Nov 2009 - 1:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

(आजकाल अदितीतै खूप पियाला लागल्यात, असे ऐकीवात आले होते. खात्री करून घ्यायला हवी. तुम्हाला काय माहिती आहे देवकाका ?)

हाहाहाहा ... मिभोकाका, तुम्ही एफ.बी.आय.चे मित्र का मास्तर? चुकीची माहिती बिनदिक्कत पुरवता आहात म्हणून विचारलं.

असो. आजकाल या शब्दाचा तीव्र निषेध!

अदिती

मिसळभोक्ता's picture

5 Nov 2009 - 1:22 pm | मिसळभोक्ता

चुकीची माहिती बिनदिक्कत पुरवता आहात म्हणून विचारलं.

हॅ हॅ हॅ. असं असेल तर मला कशाला विचारताय ? ज्यांन चुकीची माहिती बिनदिक्कत पुरवण्याची ह्याबीट आहे त्यांना विचारा.

पण खरच ? तुम्ही द्राक्षासवाच्या अंमलात नसताना एवढी प्रतिभाशाली रचना प्रसवणे कसे जमले हो तुम्हाला ?

छ्या ! विश्वासच बसत नाही.

द्राक्षासवाच्या अंमलात नसताना, आम्ही दिवसाला फार फार तर दोन-चार चाली प्रसवतो, किंवा कांद्याची भाजी. ही कविताबिवितांची भानगड फक्त अंमलाखाली.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

छोटा डॉन's picture

5 Nov 2009 - 1:25 pm | छोटा डॉन

=)) =)) =))

रणदुंदभी वाजायला लागल्या रे, पोरासोरांनी पटापटा झाडावर चढुन बसा बरं !

------
( मिभोकाकांना " विरजण घालताना अंमल असावा की नको" हा गहन प्रश्न विचारण्याचा विचारातला ) छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

मिसळभोक्ता's picture

5 Nov 2009 - 1:31 pm | मिसळभोक्ता

डॉन्या,

उतर रे. अंमळ काहीही किडूकमिडूक झालं की झाडावर चढून बसण्याची सवय बरी नाही हो !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

छोटा डॉन's picture

5 Nov 2009 - 1:38 pm | छोटा डॉन

मी "पोरासोरांनी पटापटा झाडावर चढुन बसा बरं !" असे म्हणालो.
मी झाढावर चढणार नाही आता.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Nov 2009 - 1:34 pm | llपुण्याचे पेशवेll

डान्या,
झाडावर चढलाच आहेस तर, मला नवीन लेख पाडण्यासाठी १०-१२ माकडे हवी आहेत ती बघ मिळतात का? मी पण प्रवासवर्णन लिहीन म्हणतो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

मिसळभोक्ता's picture

5 Nov 2009 - 1:41 pm | मिसळभोक्ता

प्रवासवर्णन २-३ दिवसात लिहून हवे असेल, तर २०-२५ माकडे लागतील.

१०-१२ माकडांत फक्त "बालपणीचा काळ सुखाचा" होईल.

(आता पळतो, नाहीतर एखाद्या अस्त्राने माझा वध नक्की.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Nov 2009 - 1:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका, काय हे ... तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तुमच्या वाक्यातल्या फक्त 'आजकाल' या शब्दाचा निषेध केला आहे ... का तुम्ही आपलं पद्धत म्हणून 'आजकाल' हा शब्द वापरला होतात.

अदिती

नंदन's picture

5 Nov 2009 - 1:46 pm | नंदन

अंमळ एक्झिट चुकलात हो मिभोकाका (बे ब्रिज बंदच का अजून?). शारदी(नि)य शब्दकळाबहर असेही अपेक्षित होते इथे ;). असो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मिसळभोक्ता's picture

5 Nov 2009 - 1:53 pm | मिसळभोक्ता

शारदी(नि)य शब्दकळाबहर असेही अपेक्षित होते इथे

ओ हो !

असे असेल, तर मग मात्र ठीक आहे. कारण शारदीनीय शब्दबहर आणण्यासाठी अंमळ अधिकच अंमल आणण्याचा प्रयत्न केला, तरी ते जमत नाही. उगाच आपला हिरमोड होतो.

(बाय द वे, बे ब्रिज सोमवारीच उघडला, असे कळले. तुला रे मेल्या का एवढी काळजी ?)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

नंदन's picture

5 Nov 2009 - 1:56 pm | नंदन

>>> तुला रे मेल्या का एवढी काळजी ?
--- अहो, पूर्वेला आणि पश्चिमेला जोडणारा एकतरी सेतू राहू द्या की खुला ;)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Nov 2009 - 1:58 pm | llपुण्याचे पेशवेll

पूर्वेला आणि पश्चिमेला जोडणारा एकतरी सेतू राहू द्या की खुला
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
नंद्या अरे असे अनेक ब्रीज आहेत. एकदा समर्थ मधे ये. तुला समजावतो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Nov 2009 - 1:59 pm | llपुण्याचे पेशवेll

प्रकाटाआ.

मिसळभोक्ता's picture

5 Nov 2009 - 2:00 pm | मिसळभोक्ता

अहो, पूर्वेला आणि पश्चिमेला जोडणारा एकतरी सेतू राहू द्या की खुला

नंद्या, लेका तुला झोपेची अत्यंत गरज आहे. झोप आता.

तीन चार संकेतस्थळे, त्यावरचे दहा पंधरा लेख, असे सगळे संदर्भ गोळा करून तुझा प्रतिसाद कळण्याची थोडीफार शक्यता वाटते आहे.

(लाखो माकडे, हजारो वर्षे).

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

श्रावण मोडक's picture

5 Nov 2009 - 11:58 am | श्रावण मोडक

जोरात चालू द्या...
अर्थात असं म्हणण्याला काहीही अर्थ नाही. कारण तसेही ते चालूच राहणार आहे म्हणा.

सहज's picture

5 Nov 2009 - 12:00 pm | सहज

बुधवारची कविता आहे म्हणजे दाहक सत्य वगैरे वगैरे आपसूक आले आहे!!

जियो! दोन्ही कविता भारी!

छोटा डॉन's picture

5 Nov 2009 - 1:16 pm | छोटा डॉन

सहजकाकांशी सहमत ...

बुधवाराचे महत्व आंतरजालीय इतिहासात फार मह्त्वाचे, आता खुद्द पेशवे इथे आपले योगदान देत आहेत.
आम्ही पेशव्यांना "बुधभुषण" असा पुरस्कार जाहीर करत आहोत.
पुरस्कारवितरण समारंभानंतर पेशव्याला आमच्याकडुन समर्थ मध्ये जेवण लागु ...

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

परिकथेतील राजकुमार's picture

5 Nov 2009 - 2:12 pm | परिकथेतील राजकुमार

आम्ही पेशव्यांना "बुधभुषण" असा पुरस्कार जाहीर करत आहोत.

हा पुरस्कार बुधपेठेतच शामीयाना वगैरे उभारुन दिला जावा अशी मी विनंती करतो. तसाही आपला तिथे घरोबा आहेच त्यामुळे अडचण नसावी.

©º°¨¨°º© छोटा पॉर्न ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

5 Nov 2009 - 11:51 pm | टारझन

आणि त्या शामियान्यात काय करणार ? पालथे धंदे की वांझोटे धंदे ???
=))

-- पॉर्नल

प्रभो's picture

5 Nov 2009 - 12:02 pm | प्रभो

पण त्या तिथेही लोक
सुख मिळू देत नाहीत
अथवा
उडलेल्या पोस्टमागे बजबजपुरी जाताना
त्याना होत नाही दु:ख
इथेच सगळी गोची आहे.

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अवलिया's picture

5 Nov 2009 - 12:09 pm | अवलिया

ह्म्म. चालु द्या !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Nov 2009 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार

वाह वाह पुपे दिवस सार्थकी लावलास हो !

जा, आजपासुन हा काव्यविभाग तुला देउन टाकला !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

चेतन's picture

5 Nov 2009 - 12:48 pm | चेतन

पुपे अदिती विडंबनं सही जमलेत

चेतन

गणपा's picture

5 Nov 2009 - 1:14 pm | गणपा

विडंबकखाटकांसमोरची
कविताजनावरे

ठ्याँ
जबरा पुपे.
अदितिचे विडंबन्/काव्य ही खास.

सूहास's picture

5 Nov 2009 - 3:16 pm | सूहास (not verified)

धन्या आणी अदिती ..कहर ..

सू हा स...

धमाल मुलगा's picture

5 Nov 2009 - 4:16 pm | धमाल मुलगा

पुपेश्री,
मध्यंतरी एक गुरुवार 'बुधवारच्या कवितेशिवाय' गेला तर चुकचुकल्यासारखं वाटायला लागलं होतं!

जोरात चाल्लंय की सगळ्यांचं :)
साक्षात मिभोकाका पोरासोरांच्यात येऊन दंगा घालुन गेले? अरेरे...धागा पहाण्याचा बेश्ट टाईम हुकला म्हणायचा आमचा!

बाकी पेशव्यांच्या बुधवारकाव्यप्रसूतिकळांना मिड-वीक क्रायसिस म्हणावे काय?

चित्रा's picture

6 Nov 2009 - 8:53 am | चित्रा

>>पेशव्यांच्या बुधवारकाव्यप्रसूतिकळांना मिड-वीक क्रायसिस म्हणावे काय?

:-)

दोन्ही कविता लय भारी.
(सगळ्या कंपूंना ओळखून असणारी, चलाख) चित्रा

विनायक प्रभू's picture

5 Nov 2009 - 6:18 pm | विनायक प्रभू

शुक्राचा उंचवटा?

अजय भागवत's picture

6 Nov 2009 - 6:05 am | अजय भागवत

कविता झकास! आणि प्रतिसादातील खेळकर - खोडकरपणाने मजा आली.

घाटावरचे भट's picture

6 Nov 2009 - 8:15 am | घाटावरचे भट

अमंळ लेट झाला म्हणायचा आम्हाला धागा उघडायला. बाकी कविता उत्तमच!!