भाववाढीच्या विरोधात मनसे काय कार्यवाही करेल ?

माझी दुनिया's picture
माझी दुनिया in काथ्याकूट
3 Nov 2009 - 10:34 am
गाभा: 

भाववाढीच्या विरोधात मनसे काही करू शकेल का ? की मराठीच्या मुद्दयावरच भांडत बसणार ? मनसेच्या संकेतस्थळावर 'सूचना करा' या सदरात मी भाववाढीच्या विरोधात मला 'मनसे'कडून काय अपेक्षित आहे त्याची सूचना म्हणून ही सूचना पाठवली आहे. पाहूया मनसे काही हातपाय हलवते का ते जनतेसाठी.

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

3 Nov 2009 - 10:38 am | प्रकाश घाटपांडे

आपण पाठवलेली सुचना अनेकांच्या मनात असली तरी प्रत्यक्ष पाठवण्याचे काम आपण केल्याबद्दल धन्यवाद
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुहास's picture

5 Nov 2009 - 11:54 am | सुहास

उत्तम सूचना..! फक्त माल थेट शेतातून उचलावा लागेल आणि कदाचित स्टोरेज चा प्रॉब्लेम होऊ शकतो... कॄषी उत्पन्न बाजार समितीचा ट्याक्स ही द्यावा लागेल..! :)

पण मला नाही वाटत की मनसे किंवा कोणत्याही इतर पक्ष/सामाजिक संघटनेने हे केले तरी दरात फारसा फरक पडेल म्हणून.. कारण दरवाढ सगळीकडेच अति-प्रचंड आहे.. उदाहरणार्थ आमच्या गावी शेतकरी ४५ ते ५० रू किलो ने वांगी विकतायत (१५ रू पावकिलो) तर बागवान (दलाल) ५० ते ६० ने..! बाजारात भाज्यांची उपलब्धता नाही, त्यातच अवेळी पाऊस आणि कमी मनुष्यबळ ही याची कारणे आहेत असे आमच्या कडचे विक्रेते म्हणतात..

--सुहास

सहज's picture

3 Nov 2009 - 10:54 am | सहज

सूचना चांगली आहे. मनसेकडून उत्तर आले तर कळवा.

टारझन's picture

3 Nov 2009 - 10:56 am | टारझन

असेच म्हणतो

-(भाववाढ त्रस्त) मिर्ची धनिया

माझी दुनिया's picture

30 Dec 2009 - 3:44 pm | माझी दुनिया

मंडळी उशीरा का होईना, मनसेकडून आज उत्तर आले आहे.


____________
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा

चिरोटा's picture

3 Nov 2009 - 10:57 am | चिरोटा

चांगली सूचना आहे.शेतकर्‍यांपेक्षा मधले दलाल ह्या महागाईस कारणीभूत असतात. सरकारचा अर्थातच ह्या दलालांना आशीर्वाद असतो्. ह्या दलालांना वठणीवर आणणे महत्वाचे आहे.
भेंडी
P = NP

विजुभाऊ's picture

3 Nov 2009 - 1:44 pm | विजुभाऊ

हे मधले दलाल कशा पद्धतीने काम करतात हे कधितरी भल्या पहाटे गुलटेकडीला गेल्यावर कळते.
शेतकर्‍याच्या मालाची किंम्मत दलाल ठरवतो.
प्रॉडक्षन कॉस्ट चा या किमतीशी काहीही संबन्ध नसतो.
कधी कधी किम्मत मिळाली नाही की नेलेला माल परत नेण्यासाठी शेतकर्‍याकडे टेम्पो साठी पैसे नसतात . मेहेनत घेऊन पिकवलेला माल अक्षरशः रस्त्यावर फेकून द्यावा लागतो.
अर्थात दलाल नसतील तर माल विक्रीचा अन्य कोणताच निश्चीत पर्याय छोट्या शेतकर्‍याला उपलब्ध नसतो
दलालाना बाजूला सारण्यासाठी फेडरेशन/ कृषी उत्पन्न बाजारसमिती असे बरेच मार्ग आस्तित्वात आले पण ते देखील दलालीच करतात.
एकूण काय शेती करणे हा गुन्हा हेच शेतकर्‍याच्या मुलाना अनुभवाने शिकावयास मिळते.

विनायक प्रभू's picture

3 Nov 2009 - 5:11 pm | विनायक प्रभू

दलालांना वठणीवर आणणे निव्वळ स्वप्नरंजन.
शक्यच नाही, कुणालाही.
झाले तर फक्त तात्पुरते.

चिरोटा's picture

3 Nov 2009 - 6:47 pm | चिरोटा

१९८९ साली व्ही.पी.सिंग ह्यांनी सत्तेवर आल्यास १०० दिवसांत महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते.ईतर आश्वासनांचे होते तेच ह्याचे झाले.
मनसेने आंदोलन केले तर जनतेच पाठिंबा तरी निश्चितच मिळेल.
भेंडी
P = NP

sneharani's picture

3 Nov 2009 - 11:30 am | sneharani

चांगली सुचना आहे, उत्तर मिळाले तर कळवा.

प्रभो's picture

3 Nov 2009 - 11:34 am | प्रभो

चांगली सूचना आहे.
बघुया मनसे काय करते ते.....मनसेकडून उत्तर आले तर कळवा.

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

प्रमोद देव's picture

3 Nov 2009 - 11:41 am | प्रमोद देव

मादु माजं बी अनुमोदन हाय तुज्या सुचनेला.

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

मदनबाण's picture

3 Nov 2009 - 11:44 am | मदनबाण

असेच म्हणतो,,,त्यांचे उत्तर आले की जरुर कळवा. :)

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

अनामिका's picture

3 Nov 2009 - 11:59 am | अनामिका

नक्किच चांगली सुचना आहे..........
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Nov 2009 - 12:52 pm | llपुण्याचे पेशवेll

कृपया मिपावर गूगल डॉक्सच्या लिंका पेस्टवू नयेत. पूर्ण लेखच कॉपी पेस्ट करावा. आमच्या हापिसातून गूगलडॉक्स बॅनड् आहे .
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

माझी दुनिया's picture

3 Nov 2009 - 1:04 pm | माझी दुनिया

कृपया मिपावर गूगल डॉक्सच्या लिंका पेस्टवू नयेत. पूर्ण लेखच कॉपी पेस्ट करावा. आमच्या हापिसातून गूगलडॉक्स बॅनड् आहे .
पुण्याचे पेशवे

हे घ्या

माननीय राजसाहेब ठाकरे यांस,

सर्वप्रथम विधानसभेतील यशाबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन!

मी बोरिवली पश्चिम उपनगरात रहाणारी एक गृहिणी असून, ’मनसे’ची मतदार आहे. सध्या आम्हा गृहिणींच्या दृष्टीने भेडसावणारी समस्या म्हणजे अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे आवाक्याबाहेर गेलेले भाव. श्रीमंत माणूस पैसा टाकून विकत घेऊ शकतो, गरीब माणूस त्याशिवाय राहू शकतो. मधल्यामध्ये मध्यमवर्गाची कुचंबणा होते. आपण यातून काहीतरी मार्ग काढावा अशी आपल्याकडे विनंती आहे.

मागच्याच आठवड्यात देवीच्या दर्शनाला म्हणून नाशिकला सहकुटुंब गेलो असताना , रस्त्यात वाटेने टॅमॅटो फेकलेले दिसले. अधिक चौकशीअंती , उत्पादकांना योग्य भाव न मिळाल्यामुळे त्यांनी ते न विकता निषेध म्हणून रस्त्यावर फेकून दिले. तुला नाही, मला नाही घाल कुत्र्याला अशी गत झाली. दूधाबद्दल ही अशी बातमी नेहमीच वाचनात येते. एकीकडे उत्पादकांना योग्य भाव दिला जात नाही दुसरीकडे आमच्यासारख्या मध्यमवर्गाला मात्र भाववाढ करून नाडले जाते. विधानसभेच्या निवडूकांच्या ’शिवसेनेच्या जाहिरनाम्यात, ’आपलं सरकार येतयं, भाववाढ होऊ देणार नाही, असे वचन दिले होते. अर्थातच्‌ ते न आल्याने आता भाव स्थिर ठेवण्याकरता शिवसेना बांधील नाही आणि त्यात त्यांना रसही नाही. राष्ट्रवादीनेही त्यांच्या जाहीरनाम्यात भाव स्थिर ठेवू असे वचन दिले होते. पण गंमत अशी की, ज्यांचे सरकार मुळातच सत्तेत असतानाही गेले काही महिने तूरडाळ , साखर, इतर अन्नधान्य यांचे भाव स्थिर राहू शकले नव्हते ते पुन्हा निवडून आल्यानेही काही फरक पडणार नव्हताच. आणि तसेच झाले , दिवाळीच्या तोंडावर आलेल्या निवडणूकांमुळे स्थिर राहिलेले साखरेचे भाव निकालानंतर आठवड्याभरात रु.३४/-प्रति किलो वरून रु.४२/- प्रति किलोवर गेले. असो,त्या विरोधात आपण पाऊले उचलल्यास महाराष्ट्रातील आपली मतदार नसलेलीही जनता आपल्या बाजूने यायला वेळ लागणार नाही.

मुंबईत बहुतेक भाजीपाला नाशिकहून येतो. नाशिक मधून आपले तीन आमदार निवडून आल्याने आपल्याला त्या बाबतीत सगळे सहकार्य तिथून मिळू शकेल. प्रत्यक्ष उत्पादकाला; त्याला अपेक्षित असलेला दर देऊन त्यांच्याकडून विकत घेतलेले उत्पादन ’मनसे ने इतरत्र वाजवी दरात जनतेला उपलब्ध करून दिल्यास दोघांचाही फायदा होऊ शकेल. थेट उत्पादकाकडून उत्पादन विकत घेऊन घाऊक किमतीला विक्री करण्याच्या तत्वावर अनेक मल्टी लेव्हल कंपन्या आपली पोटं भरतात. तेच तत्व मनसेने वापरले तर ? मागे अश्या प्रकारच्या भाववाढीच्या विरोधात शिवसेनेने स्वत: भाजीवाल्यांचे स्टॉल्स उभे केले होते आणि वाजवी दरात भाजी मिळण्याची सोय केली होती. मनसेलाही अश्या प्रकारच्या मदतीची ही संधी आहे

____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया

स्वाती२'s picture

3 Nov 2009 - 5:35 pm | स्वाती२

गरीब माणूस त्याशिवाय राहू शकतो.
हे ठरवायचा अधिकार मध्यमवर्गाला कुणी दिला?
बाकी मनसेने स्टॉल टाकावेत ही सुचना आवडली.

प्रदीप's picture

3 Nov 2009 - 4:22 pm | प्रदीप

एका पोटतिडीकीच्या प्रश्नाविषयी तुमच्या जिव्हाळ्याच्या राजकीय पक्षाला तुम्ही ही सूचना केली आहे, त्यामागील भाव व अजिजी समजते. परंतु शेतकरी व दुकानदार ह्यांमधील अडत्याचे काम करणे एखाद्या राजकीय पक्षाचे काम आहे असे मला वाटत नाही. (खरोखरीच, जगाच्या पाठीवर कुठेही एखादा राजकीय पक्ष हे किंवा तत्सम कार्य करतांना ऐकलेले नाही, वाचलेले नाही). त्या बाजारपेठेवर आवश्यक ते व आवश्यक तेव्हढे* नियंत्रण ठेवणे हे सरकारचे काम असावे. तूर्तास मनसे विरोधांत बसून ह्यावर अभ्यास करून जे काही सरकार आता सत्तेवर येईल त्याला ह्याविषयी काही ठोस करण्यास भाग पाडू शकेल, व ते तसे करत रहाते की नाही ह्याविषयी जागरूक राहू शकेल.

* ते नियंत्रण कितपत व कसे असावे हाही एक चर्चेचा मुद्दा आहे.

सुनील's picture

3 Nov 2009 - 4:42 pm | सुनील

समहत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश's picture

3 Nov 2009 - 5:05 pm | ऋषिकेश

वरील पत्रात सुचवलेला उपाय तितकासा सोपा नसला तरी जर मनसेने असे चालु केले तर सरकारवर दबाव येऊन सरकारलायोग्य पावले उचलायला भाग पाडू शकते. व तसेही मनसेचा उद्देश वचक ठेवणे असल्याने त्यासाठी ह्या कोणत्याही कायद्याचा भंग न करता प्रत्यक्षात आणण्याजोगा उपाय स्तुत्य वाटला

-- ऋषिकेश
------------------

प्रदीप's picture

3 Nov 2009 - 6:11 pm | प्रदीप

एखादा राजकिय पक्ष हे कसे चालू करू शकेल व त्यात काय अडचणी येतील हे पाहू या:

१. पहिली तसे करण्यास इच्छाशक्ति हवी. कारण एकदम तुम्ही समाजाच्या एका थराशी काँपिटिशन करून त्याचे वैर पत्करणार आहात.

२. ती इच्छाशक्ति आहे, असे समजून पुढे चालू या. आता प्रश्न ह्यामागील लागणार्‍या भांडवलाचा आला. हा एक धंदाच आहे, त्याला भाग भांडवल लागेल, आणि मग खेळते भांडवलही. ते कुठून आणणार? बँका कर्ज देतील राजकिय पक्षाला? ह्या प्रश्नाची करॉलॉरी म्हणून एका राजकिय पक्षाने तसे करणे हे कायद्याच्या, निवडणूक आयोगाच्या इ. कक्षांत बसते का, ह्याचाही विचार करावा लागेल. (त्यासाठी वकिलांची कन्सल्टान्सीही पैसा देऊन घ्यावी लागेल, ते निराळेच).

३. ह्यावरही मात करून पुढे गेलो असे समजूया. आता प्रश्न येतो, खेळत्या भांडवलाचा. ते असण्यासाठी हा व्यापार नफ्याचा असणे जरूरी आहे. आता प्रश्न हा नफा नक्की किती हवा हे कुणी व कसे ठरवावयाचे? ('ना नफा, ना तोटा' तत्व राबवायचे म्हटले तरी काही कॉमन प्रश्न उरतातच-- कॉस्ट कशी 'कमी' ठेवावयाची? आणी हे 'कमी' म्हणजे नक्की किती कमी? त्याच मुद्द्यावरून एक दुसरे हॅलोविन सुरू व्हावयाचे!)

४. ह्या 'चालवण्या'च्या कामी अर्थातच काही मॅनेजमेंट अर्थातच लागेल. म्हणजे परत काही कॉस्ट आली.

हा सगळा अव्यापारेषु व्यापार राजकिय पक्ष करू लागला, तर त्याला तेच एक काम होऊन बसेल. लोकशाहीत चांगल्या राजकीय पक्षाचे कार्य जनतेच्या प्रश्नांचे त्यांना त्या लोकशाहीने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठांचा योग्य वापर करून सोडवण्याचे आहे. विरोधी पक्ष म्हणून जबाबदारीने सरकारकडून असे कार्य करून घेणे, त्याचा सतत पाठपुरावा करत रहाणे हे मला वाटते, पक्षाचे कार्य असावे. राजकिय पक्षाने, एकाद्या व्यवहारातील मधल्या दललांना बाजूस सारण्यासाठी स्वतःच त्यांचे काम अंगावर घेणे गोंडस वगैरे असले तरी हास्यास्पद वाटते.

ऋषिकेश's picture

4 Nov 2009 - 1:38 am | ऋषिकेश

ही काम करणे एखाद्या पक्षाचे काम नाहि याबाबत सहमत.
माझी काहिशी असहमती इतक्यासाठीच होती की मनसेने अश्या प्रकारची विक्री (आंदोलन) चालुच करू नये या मतावर.. हा कायमस्वरूपी व्यापार म्हणून नव्हे तर तात्पुरते वचक निर्माण करणारे अस्त्र (खरंतर काहिप्रमाणात गिमिक) म्हणून वापरता येईल. आणि एकदा का सरकारवर दबाव आला की ही मध्यस्ती बंद करण्यात शहाणपणा वाटतो.

यातून दोन फायदे असे की सरकारला भाग पाडता येईल व दूसरे असे की हा मार्ग विधायक असल्याने मनसे केवळ तोडफोड करते - गुंडगिरी करते म्हणणार्‍यांची तोंडे बंद होतील

ऋषिकेश
------------------

वि_जय's picture

3 Nov 2009 - 6:12 pm | वि_जय

'राज'कारणात सख्खा-चुलत (सख्खा-मावस सुध्द्दा हो )'भाव' वाढतांना पाहून सवतासुभा केला.

आयत्यावर कोयता मारुन निवडणूकीत ' भाव' वधारण्याचा प्रयन्त केला. (आघाडीला बहुमत मिळाले नसते तर अजुनच 'भाव' खाल्ल्ला असता.

आता 'भाव 'वाढ रोखायला काहीच हरकत नसावी.

'भाव'वाढ रोखण्याकरीता आमच्या मन:पुर्वक शुभेच्छा बर का!!

सूहास's picture

3 Nov 2009 - 7:16 pm | सूहास (not verified)

वि_जय

अजुन किती दिवस तु आणि सुधीरकाका मनसेच्या नावाने जळजळ करणार..आयला मी त्या पक्षात असुनही ईथे त्याच्या प्रचार करावा म्हणुन कधीही काही ही लिहीले नाही.हे संपादक सारे काय डोळे मिटुन बसतात काय ??? मला ही परवानगी हवी शि व सेनेची मारायची (खर तर एक सणसणीत शिवी हाणावीशी वाटतीय त्या वि_जय ला...पण सार्वजनीक ठिकाणी)

सू हा स...

वि_जय's picture

3 Nov 2009 - 10:47 pm | वि_जय

अजुन किती दिवस तु , सुधीरकाका आणी अनामिकाताई मनसेच्या नावाने जळजळ करणार..आयला मी त्या पक्षात असुनही ईथे त्याच्या प्रचार करावा म्हणुन कधीही काही ही लिहीले नाही.

बेटा सुहास,

सच हमेशा कडवा होता है रे..

मुख्य म्हणजे शिवसेनेला प्रचारासाठी कधिही हाय-टेक गरज लागली नाही, आणी आम्ही सेनेच्या प्रचारासाठी वेबसाईटचा उपयोग केला नाही, अतिशहाण्यानी शिवसेनेला बदनाम करण्याकरीता केलेल्या टवाळ्कीला ठाकरी संस्काराप्रमाणे सडेतोड उत्तर देण्याचा प्रयन्त नेहमीच केलेला आहे.

खर तर एक सणसणीत शिवी हाणावीशी वाटतीय त्या वि_जय ला...पण सार्वजनीक ठिकाणी

शिव्या आम्हा शिवसैनिकांच्या पाचवीलाच पुजल्या आहेत रे.. त्यात तू काय नविन करणार? बाळासाहेबांनी आम्हाला सार्वजनिक जीवनात वावरतांना शिव्या ह्या ओव्या समजायचे अशी शिकवण दिली आहे.

संपादक सारे काय डोळे मिटुन बसतात काय ???

घ्या तात्या.. तुम्हीच द्या उत्तर...

सार्वजनिक ठिकाण तू निवड.. तिथे यायची माझी तयारी आहे.

ताल भास्कर's picture

3 Nov 2009 - 11:26 pm | ताल भास्कर

>>>मुख्य म्हणजे शिवसेनेला प्रचारासाठी कधिही हाय-टेक गरज लागली नाही,

असे खरच म्हणता तुम्ही? मग हे सर्व काय आहे.....

प्रदीप's picture

4 Nov 2009 - 4:19 pm | प्रदीप

मुख्य म्हणजे शिवसेनेला प्रचारासाठी कधिही हाय-टेक गरज लागली नाही,

कुणी पक्षाने/ उमेदवाराने स्वतःच्या जबाबदारीवर स्वतःचा प्रचार हाय टेक वापरून करण्यात वाईट/ चुकिचे काय आहे?

किंबहुना असे विचारतो: लो- टेक प्रचार करणे हे स्वागतार्ह आणि हाय टेक साधने वापरणे हे तुच्छ/ वाईट/निषेधार्थ कधीपासून झाले. आणि का? (नक्की 'हाय-टेक' अथवा 'लो-टेक' कशाला म्हणायचे हा वेगळा प्रश्न उरतोच. पण तो तूर्तास बाजूस ठेऊ या).

बाकी तुमचे चालू द्या.

प्रभो's picture

4 Nov 2009 - 4:33 pm | प्रभो

>>लो- टेक प्रचार करणे हे स्वागतार्ह आणि हाय टेक साधने वापरणे हे तुच्छ/ वाईट/निषेधार्थ कधीपासून झाले.

बहुतेक तरी भाजपच्या शायनिंग इंडिया कँपेन च्या रीझल्ट पासून... :)

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

प्रदीप's picture

4 Nov 2009 - 6:12 pm | प्रदीप

पण हे म्हणजे ड्रायव्हर कसा होता/ होती हे अजिबात विचारात न घेता 'फेरारी खड्यात पडली म्हणून ती भिकार आहे', असे म्हणण्यासारखे झाले :)

अनामिका's picture

3 Nov 2009 - 11:19 pm | अनामिका

अनामिकाताई मनसेच्या नावाने जळजळ करणार" >:P
सुहास
माझ्या जळजळीचा साक्षात्कार तुंम्हास कधी आणि कसा झाला....?
मनसेच्या विरोधात मी आहे हा तुमचा समजच चुकीचा आहे.........
आणि काय आहे तुंम्ही नव्याने मनसेत सामिल असाल आधी सेनेत होतात का?पुर्वाश्रमीचे शिवसैनिक असण्याची शक्यता शुन्यच कारण जन्मदात्या आईवर हात उगारायचे संस्कार सेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना दिलेले नाहीत कधीच ........शिवसेनेची मारायची इतकी खुमखुमी तुंम्हास का? ते तुमचे तुंम्हास माहित......म्हणतात ना "नविन मुल्ला जोराने बांग देतो"
असो यापुढे सार्वजनिक ठिकाणी अर्थात मिपावर उगीच खातरजमा करुन न घेता माझा बादरायण संबंध जोडायचा प्रयत्न करु नये ही नम्र विनंती....माझ्या भावना तुंम्हास उमजत नसतील तर मी त्यास काही करु शकत नाही......
मी राज आणि उद्धव यांना वेगळे मानत नाही..........कारण महाराष्ट्राच्या इतिहासातुन काय घ्यायला हवे ते आंम्ही पुरेपुर जाणले आहे........या दुहीच्या राजकारणाने कदाचित क्षणिक आसुरी आंनद मिळेल पण याची परिणीती उद्या कशात होऊ शकते? हे जाणण्याइतपत आपण सुज्ञ आहातच.
आणि आमच्या निष्ठा आंम्ही कुणाच्या चरणी वहायच्या हे आमचे आम्हीच ठरवतो.......आंम्हाला निर्णय घेताना पवारांसारख्या दुतोंडी सल्लागारांची मदत घ्यावी लागत नाही ......मुळात असल्या माणसांना आंम्ही चार हात लांबच ठेवतो...

जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2009 - 11:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असण्याची शक्यता शुन्यच कारण जन्मदात्या आईवर हात उगारायचे संस्कार सेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना दिलेले नाहीत कधीच

भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, शिशीर शिंदे, बाळा नांदगावरकर हे शिवसैनिक होते असा माझा खोटाच समज होता तर ...

अदिती

टारझन's picture

3 Nov 2009 - 11:52 pm | टारझन

भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, शिशीर शिंदे, बाळा नांदगावरकर आणि सूहास
=)) =)) =))

मुलांनो .. जरा नरमाई ने घ्या रे .. कोणी कोणाला उगा डिवचू नका :)
शिवसेना + मनसे = काँग्रेसची सुट्टी .... हा फॉर्मुला जर आपल्याला कळतो तर त्यांना का कळू नये ?

(काँग्रेसद्वेष्टा) मनसेलाडू

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Nov 2009 - 3:47 pm | ब्रिटिश टिंग्या

शिवसेना + मनसे = काँग्रेसची सुट्टी .... हा फॉर्मुला पाहुन अंमळ मौज वाटली!

असो! चालु द्यात!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Nov 2009 - 3:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शुद्धीपत्रः माझ्या वरच्या प्रतिसादात "बाळा नांदगावरकर" हे नाव "बाळा नांदगावकर" असे वाचावे.
हा फॉर्म्युला आधी होताच ना, जेव्हा मनसे नव्हती! तेव्हा का नाही हा फॉर्म्युला चालला?

असो. महागाईसंदर्भात प्रदीप यांचा प्रतिसाद पटला.
पण आणखी तीन-चार महिने महागाई कमी होणार नाही - कृषिमंत्री.

अदिती
आपली रेघ आखूड म्हणूनच दुसर्‍याची रेघ लांब होते.

सूहास's picture

4 Nov 2009 - 4:10 pm | सूहास (not verified)

हा फॉर्म्युला आधी होताच ना, जेव्हा मनसे नव्हती! तेव्हा का नाही हा फॉर्म्युला चालला?
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

उत्तर आहे ? पण देउ का ?

उध्दव ठाकरे +मिलींद नार्वेकर + बाळासाहेबांचे पक्षकामात न बोलणे= नालायक विरोधी पक्ष

सू हा स...
नुसता चहा-पानावर बहिष्कार टाकण्याशिवाय काहीही न केलेला पुर्वाश्रमीचा शिवसैनीक(सध्या तर म्हणवुन घ्यायलादेखील लाज वाटते)

टारझन's picture

4 Nov 2009 - 6:41 pm | टारझन

हा फॉर्म्युला आधी होताच ना, जेव्हा मनसे नव्हती! तेव्हा का नाही हा फॉर्म्युला चालला?

बहुदा सत्तेची गणितं चेंज होतात दर निवडणूकीला !! जर मनसे+भाजप्+शिवसेना ह्यांच्या मतांची सख्या गृहित धरून कमेंटवलं होतं ...
पण हल्ली लोकं चड्डी आवरंत एका नाकाने शेंबूड ओढत अंमळ मौज करतात ;)
शिवाय "विरोधासाठी विरोध" हा नवा वाक्प्रचारही अस्तित्वात आहे :)
असो !! देव काका सर्वांना काद्याची भाजी देवो !!

-- तिळाच्या चिक्क्या

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Nov 2009 - 10:22 am | ब्रिटिश टिंग्या

मनसे+भाजप्+शिवसेना = काँग्रेसची सुट्टी :)

३ तुल्यबळ(?) पक्ष एकत्र आल्यावर काँग्रेसची सुट्टी होणं अपरिहार्यच आहे म्हणा!

असो, राष्टावादीशी चुल मांडल्यामुळे गेल्या ३ निवडणुकांमध्ये सत्तेची गणिते न बदलल्याने काँग्रेसला या त्रिकुटाची अंमळ चिंता नसेलच :)

असो!

- (चड्डी आवरंत एका नाकाने शेंबूड ओढत हास्यास्पद गृहितकांची खिल्ली उडवत अंमळ मौज बघणारा) टिंग्या

अनामिका's picture

4 Nov 2009 - 1:23 pm | अनामिका

काहि विद्वान माणसांना विनाकारण प्रत्येक गोष्टित नाक खुपसायची गरज असतेच्.जित्याची खोड.काय करणार?
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

प्रदीप's picture

4 Nov 2009 - 4:05 pm | प्रदीप

येथील कुठल्याही धाग्यावर कुठलाही सभासद आपले मत व्यक्त करू शकतो/ शकते. तेव्हा 'नाक खुपसणे' वगैरे म्हणणे चुकिचे वाटते.

अनामिका's picture

4 Nov 2009 - 7:23 pm | अनामिका

प्रदिपजी !
प्रतिसाद देण्याला मी विरोध करण्याचा प्रश्नच नाही..........पण ठराविक सदस्यांच्याच प्रतिसादाला एका दोघांनी ठरवुन प्रतिसाद देणे हे खटकते म्हणून म्हंटले........मिपावर कुणी काय टंकायचे ते टंकावे पण कंपुबाजी करत एखाद्याच्या नावाने उगा दुगाण्या झाडणे गैरच नाही का?आणि माझा हा अनुभव आजचा नाही .
"तेंव्हा जाने दो"
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Nov 2009 - 10:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जाऊ द्या हो प्रदीप! लोकं मला फार महत्त्व देत आहेत तर जरा भाव खाऊन घेऊ देत ... नाहीतर गल्लीतलं काळं कुत्रंसुद्धा विचारत नाही मला! ;-)

अदिती

पाषाणभेद's picture

4 Nov 2009 - 1:47 am | पाषाणभेद

"मी राज आणि उद्धव यांना वेगळे मानत नाही.........."

सर्वात विनोदी वाक्य, विनोदाचे नोबेल घेवून जाण्यासाठी मला कॉन्टॅक करा.
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

अनामिका's picture

4 Nov 2009 - 7:36 pm | अनामिका

पाषाणभेद!
माझ्या विधानाच्या मागची भावना लक्षात आली नसेल तर यावर मी काय बोलु?.........प्रत्येक वेळेस शब्दांचा किस पाड्ला आणि विधानाला फाटे फोडले म्हणजे झाले का?
इथे एका आईच्या उदरी जन्म घेणारी दोन भावंडे सारखी असत नाहीत तर राज आणि उद्धव तरी त्या नियमाला कसे अपवाद ठरतील्......पण शेवटि रक्त ठाकरीच वाहतय ना दोघांच्या धमन्यांमधुन कि ते देखिल नाकारणार ?
जाऊ दे उगीच या विषयावर चर्चा करुन उपयोग नाही......कारण इतरांप्रमाणे हया विषयावर आंम्ही डो़क्यानेच विचार करतो असे नाही "मन" हा अदृष्य अवयव देखिल वापरतो..........
मनसेने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोड्ण्याचा विडा उचलला आहे त्यांच्या त्या प्रयत्नात ईश्वर त्यांना यश देवो! आणि भविष्यात मनसेच्या विधायक कार्याला आमचा देखिल पाठींबाच असेल .......याला कारण राजला निदान मी वेगळ मानत नाही हेच आहे.
तेंव्हा "शुभस्ते पंथानु"
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

सूहास's picture

4 Nov 2009 - 7:39 pm | सूहास (not verified)

मनसेने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोड्ण्याचा विडा उचलला आहे त्यांच्या त्या प्रयत्नात ईश्वर त्यांना यश देवो! >>>

धन्यवाद .अनामिकाताई..माझ्याकडुन मागे जळजळीबद्दल लिहिल्याबद्दल क्षमा मागतो..भाग संपादित करत आहे

सू हा स...

माझी दुनिया's picture

5 Nov 2009 - 11:28 am | माझी दुनिया

अरे काय हे ! विषय कोणता आहे आणि सगळे जण कशावर चर्चा करत आहेत !
सुहासराव तुम्ही मनसेचे म्हणवून घेता तर पोचवा की ही सूचना थेट साहेबांपर्यंत.लोखंड तापलेले आहे तोवरच घाव घालता येईल. नाहितर इथल्या एखाद्या शिवसैनिकाने शिवसेनेला ही सूचना केली तर सगळे श्रेय नाहक शिवसेनेला द्यावे लागेल. अर्थात काम केल्यास ते द्यायलाही हरकत नाही.
हे वाचा
________________________________________________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया

पाषाणभेद's picture

5 Nov 2009 - 8:19 am | पाषाणभेद

तै, विनोदी वाक्य म्हणण्याचे कारण की जर मनसे व शिवसेनेचाच सिरीअस विषय चालू असेल तर "राज आणि उद्धव " एकच कसे काय ठरू शकतात?
मनाचा विचार करायचाच ठरवले व चर्चेत इतर पक्ष, मराठीचे धोरण असे असेल तर मात्र राज व शिवसेना मी पण एकच आहे असे मानतो. त्यात उद्धव पण आलेत.

बाकी आपण जशा शिवसेनेच्या कडव्या विचाराच्या आहात तसेच आम्ही पण मनसे विचाराचे आहोत.

जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

सख्खा चुलत भाऊ उसाचे दांडक्याने सत्ताधिशाना मारायला गेला होता ,त्याच दांडक्याचा वापर जनतेने वेगळाच केल्याने पंचाईत त्याची झाली आहे.ते आता जनतेलाच शिव्या देत आहेत.बाकी महागाई आटोक्यात येण्यासाठी मनसे सरकार वर नक्कीच दबाव ठेवेल.पण अजुन महाराष्ट्रात नवे सरकारच अस्तित्वात नसलेले दबाव तरी ते कोणावर टाकणार?,प्रथम सरकार अस्तित्वात येवु तरी द्या.
वेताळ

पाषाणभेद's picture

3 Nov 2009 - 7:38 pm | पाषाणभेद

मनसेच्या वेबसाईटवरून पाठवलेल्या मेल्स ला निरोप मिळत नाही हा स्वानूभव आहे.

डायरेक राज साहेबांना भेटलो होतो मी ती मेल प्रिंट करून. काम झाले.
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

अक्षय पुर्णपात्रे's picture

3 Nov 2009 - 11:45 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री दुनिया, भाववाढीचा राजकारणाशी संबंध आहे पण भाववाढीची कारणे समजून घेतल्यास एका छोट्या प्रादेशिक पक्षाकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे चूक आहे, हे लक्षात येईल. अर्थव्यवस्था जोमाने वाढत असल्याने मागणीत वाढ होत आहे. दुसर्‍या बाजूला पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची सापेक्ष कमतरता आहे. तुमचे पत्र वाचून तुम्हाला अन्नधान्याच्या भाववाढीविषयी तक्रार आहे. यावेळी पावसाने वक्रदृष्टी दाखवल्याने शेतकरी शेतमालासाठी वाढवून भाव मागणे स्वाभाविक आहे. त्यातही वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकर्‍यांचा जलसिंचनाचा खर्च वाढत आहे.

मनसे यावर काय करू शकणार आहे? एखाद्या स्थानिक ठिकाणी शेतीमालाच्या भावावर करार करता येऊ शकेल पण असे केल्यास शेतकरी माल सरकारला विकणार नाहीत एवढेच. महाराष्ट्र सरकार कापुस एकाधिकार योजनेंतर्गत जेव्हा जेव्हा कापसाला कमी भाव देते, तेव्हा तेव्हा शेतकरी गुजरात आणि मध्यप्रदेशात नेऊन कापूस विकतात.

जागतिक मंदीमुळे चलनवाढीचा दर (व्याजदर कमी करून) वाढवण्यात आला. व्याजदर वाढवल्यास भाव थोडेफार नियंत्रीत करता येतील पण त्याचा परिणाम बेरोजगारीच्या दरावर होण्याची शक्यता आहे. सरकारने निर्यातीवर नियंत्रण आणल्यास व आयात वाढवल्यास परिस्थितीत थोडाफार बदल घडू शकेल पण दरवाढीचा आलेख नजिकच्या भविष्यात चढाच राहील असे वाटते.

(काही मुद्दे श्री कर्क यांच्याकडून साभार)

पाषाणभेद's picture

4 Nov 2009 - 3:57 am | पाषाणभेद

अतिशय संयमीत उत्तर.

मनसे कडून अवाजवी माग्ण्या आपण मागू नये.

अहो, आपल्या पवार काकांनी काय केले ते सांगा ना? अन्नधान्याची गोदामात किती नासाडी केली ते? आँ?

त्यांचे सगळेच गोलगोल. गप्पा गोल, इतिहास गोल, भुगोल गोल. आँ?

की नवीन सुन आली म्हणजे तिला कायकाय सैपाक येतो तेच पहाता? आँ?

जुन्या धेंडांनी किती मलीदा खाल्ला ते कोण गणते? काय काम केले ते गणता का कधी? आँ?
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

लबाड लांडगा's picture

4 Nov 2009 - 3:14 pm | लबाड लांडगा

आधी त्या शेतीमंत्र्याला घेराव घालून फटके दिले पाहिजेत.
विनम्र लांडगा

सूहास's picture

4 Nov 2009 - 3:44 pm | सूहास (not verified)

अरे ,,फक्स्त वि_जय आणी अनामिकाताईंचा प्रतिसाद...,

काळे काकानी अजुन वाचले नाही वाटत ...असो...

सध्या तरी शि व सेने विषयी काहीही लिहायची शि व सेनेची लायकी नाही...जे मला सांगताय ते जाउन उध्दव नावाच्या (केवळ)ठाकरेला सांगा...कदाचित शि व सेना वाचेल..नाहीतर आम्ही आहोतच खात्मा करायला...आता मुंबई महापालिकेत शि व सेनेला दणका दिल्यानंतर उत्तर देईन...

सू हा स...
(च्या मारी ,कुठुन मिसळपाववर मनसे विषयी लिहीतो...कामे बघा आधी...सध्या तरी "जोडे मारा " आंदोलनात व्यस्त...)

वि_जय's picture

4 Nov 2009 - 4:59 pm | वि_जय

अनामिकाजी..

दे माय धरणी ठाय स्टाईल उत्तर दिलेत..
खर आहे तुमच म्हणण..
बाटग्याचीच बांग मोठी असते..

आज राज ठाकरेंची बाजू घेतायत.. उद्या भविष्यात त्यांच्या पक्षाला राजकारणात ओहोटी लागतेय असे दिसायला लागले कि गेले तिसर्‍याबरोबरच हो...
'सरशी तेथे पारशी'.
.

अगदी ताजे उदाहरण ..आज म्हणे हजयात्रेसाठी महाराष्ट्रातल्या मुसलमानाना कोटा वाढवून देण्याच्या मागणीसाठी मनसेची सकाळी ११.०० वाजता हज हाऊस समोर निदर्शने होती .

अमरनाथ यात्रेकरीता मराठी माणुस आठवला नाही का? कि झाली सुरुवात अल्पसंख्यांकाच्या दाढ्या कुरवाळायची.. सेनेने हे धंदे तर कधी केले नाहीत ना....

प्रदीप's picture

4 Nov 2009 - 6:22 pm | प्रदीप

गडबडा! ये 'मराठी', 'अल्पसंख्याक', 'मराठी', 'अल्पसंख्याक', ... क्या है जी? या तो 'मराठी'पे रहो, या 'अल्पसंख्याक' पे.

अब गाओ...

[आणि मराठी अल्पसंख्यकांचे काय?]

आणि आता हे चाललेच आहे तेव्हा विचारतो. संजय दत्तला बर्‍याच रामायणानंतर सेनेने एकदम घूम- जाव करून माफी देऊन टाकली, त्याबद्दल येथील सेना-समर्थकांचे विचार वाचावयास आवडतील.

वेताळ's picture

4 Nov 2009 - 6:40 pm | वेताळ

महाराष्ट्रातल्या मुसलमानाना कोटा वाढवून

मनसे पक्षाची स्थापना मराठी लोकांच्या हितासाठी झाली आहे. त्या मराठी लोकात मुसलमान ,दलित व इतर सर्व जाती धर्माचे लोक येतात.मनसेने आंदोलन महाराष्ट्रातील मुसलमानाना म्हणजे मराठी लोकांना वाढीव कोटा मिळावा म्हणुन केले आहे.त्यात नाराज कशाला होता राव? बाकी मशीद पाडल्यापासुन तुमचा आलेख वर जातोय का खाली ते जरा तपासा.अजुनही कॉग्रेसला नालायक असुन देखिल मुसलमान व दलितांची एक गठ्ठा मतदान मिळते. म्हणुन तो पक्ष गेली १० वर्षे सत्तेत आहे व अजुन ५ वर्षे सत्तेत राहणार आहे.

हायटेक प्रचार सेना करत नाही मग सेना भवनात कॉलसेंटर कशासाठी काढले आहे? त्यात म्हणे हायटेक मुली काम करत आहेत्.त्याबद्दल आपले मत काय?

वेताळ

सुनील's picture

5 Nov 2009 - 12:06 pm | सुनील

मराठी भाषकांत हिंदू धर्मियांचे प्रमाण सुमारे ८७ % आहे. उर्वरीत १३ टक्के मराठी भाषक अन्य धर्मिय आहेत.

शिवसेनेचा प्रभाव फक्त हिंदू मराठीं वरच होता, म्हणूनच बौद्ध, ख्रिस्ती वा मुस्लिम मराठी लोक सेनेकडे फारसे आकृष्ट झाले नाहीत (काही अपवाद वगळता). मनसेला ते टॅप करायचे आहेत, असे दिसते. यात जर ते यशस्वी झाले, तर त्याचा थोडाफार फटका काँग्रेस, रिपाब्लिकन पक्षांना बसू शकतो. सेनेला फारसा नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

निमीत्त मात्र's picture

5 Nov 2009 - 3:10 am | निमीत्त मात्र

बाटग्याचीच बांग मोठी असते..

मुसलमान लोकांच्यात चांगले लोक अपवादाने असतात.

.

असली भडकावू विधाने करणार्‍या अनामिका ह्यांचे प्रतिसाद तसेच ठेवले जातात आणि माझे का उडवले जातात हे संपादक मंडळ इच्छा असल्यास सांगू शकेल का?

लबाड लांडगा's picture

5 Nov 2009 - 12:15 pm | लबाड लांडगा

सहमत. संपादक मंडळाने अनामिकाताईंच्या लेखनावर ह्यापुढे करडी नजर ठेवावी हीच नम्र विनंती.
विनम्र लांडगा