<<बाटली होती घरामध्ये >>

दशानन's picture
दशानन in जे न देखे रवी...
10 Mar 2009 - 3:50 pm

बाटली होती घरामध्ये
मनामध्ये चलबिच होती
ती माहेरी गेली अन
सुखी झाला हा नशेडी

बाटली चकाकते
वाटते काढावी पावशेर आधी
मग तयार करावा चकना भारी
मग बघू पार्टी कशी रंगत नाही

कडवी लागते नाय
जनु नेटच घेतली ट्राय
दोन झटके गळ्यामध्ये
तारे दिसती नयनी

पॅग जबरा मोठा
जीव गुंते बर्फापाशी
सारा चकना
ठेवीला हाताशी

बाटली उतरली पोटात
सुख समजले मनास
काय भाग्य त्या लेकाचे
जो पब मध्ये करतो चाकरी

*****
प्रेरणा

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

10 Mar 2009 - 3:57 pm | प्रकाश घाटपांडे

म्हनुन म्हंतो बाटली घरात ठेवनं धोक्याच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

निखिल देशपांडे's picture

10 Mar 2009 - 4:02 pm | निखिल देशपांडे

काय भाग्य त्या लेकाचे
जो पब मध्ये करतो चाकरी

वा राजे विडंबक.......

अवलिया's picture

10 Mar 2009 - 4:04 pm | अवलिया

विडंबक पंथात स्वागत असो...
आता आम्ही मरायला मोकळे.

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

10 Mar 2009 - 4:05 pm | परिकथेतील राजकुमार

बाटली चकाकते
वाटते काढावी पावशेर आधी
मग तयार करावा चकना भारी
मग बघू पार्टी कशी रंगत नाही
जियो राजे ! पावशेर मारली की पार्टिच काय, सगळीकडे रंग भरायला लागतो ;)

रंगीला
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

दशानन's picture

10 Mar 2009 - 4:21 pm | दशानन

>>पावशेर मारली की पार्टिच काय, सगळीकडे रंग भरायला लागतो

१००% सहमत.

जरा जास्त झाली की युफओ पण दिसतात राव ;)