बघ ओततो कसा? "शॉट"ने घेत माप... सख्या ऑन द रॉक्स, आज ओत ओल्डमंक !

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
21 May 2018 - 6:41 am

प्रेर्ना : अर्थातच गायछाप

बघ ओततो कसा? "शॉट"ने घेत माप...
सख्या ऑन द रॉक्स, आज ओत ओल्डमंक !

सात वर्ष हि जुनी, मोहन मिकीनची रमा...
हळूच ओत ग्लासात, एक शॉट ओल्डमंक !

नकोच व्हिस्की वा ब्रँडी, नसे कोणी या सम...
उद्या पिऊ विलायती, आज ओत ओल्डमंक !

मंद व्हॅनिला हा गंध, "रम"तो सवे तुझ्या प्रिये...
मम ओठी पहा कशी, मज प्रियरमा ओल्डमंक !

लार्ज पेग हा पतियाळा, कॉकटेल वा नीट...
हलकीशी किक सुखद, सख्या ओत ओल्डमंक !

तन मन रोमांचित, पिसा समान वाटते...
हळूच घे घोट घोट, एज्ड डार्क ओल्डमंक !

जय हो बुड्ढे बाबाकी, आम्ही तयाचे बंदे...
गजर चिअर्स उंचावुनी, प्राशितो सखी ओल्डमंक !

फ्री स्टाइलवाङ्मयकविताविडंबन

प्रतिक्रिया

भामटा's picture

21 May 2018 - 9:06 am | भामटा

सुन्दर

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 May 2018 - 9:17 am | ज्ञानोबाचे पैजार

"ओल्डमाँक " ही कॉलेजच्या काळापासूनची सखी आहे. नुसते नाव जरी ऐकले तरी काळजात लक्कन हलते.
इकडे तर तिच्यावर कविताच,
हाय दिल ओल्डमाँक ओल्डमाँक हो गया.
पैजारबुवा,

माझ्याकडे फ्रीजमध्ये अर्धी क्वाटर ओल्ड मंक पडून आहे. दारू पीत नसल्याने काय करावे सुचत नाहीये. ही रम असते ना? रम तडका चिकन वगैरे बनवता येईल का? जाणकारांनी पाककृती द्यावी ही विनंती. की झाडांना घालावी? झाडे तरारतील की झिंगतील? ;-)

बाकी कविता म्हणजे झकासच.

टवाळ कार्टा's picture

22 May 2018 - 12:45 pm | टवाळ कार्टा

कॉल्लिंग गॉगल्याभौ

फ्रीजमध्ये अर्धी क्वाटर ओल्ड मंक पडून आहे.

आगागागा.

माझ्याकडेही पाच मटार फ्रीजमध्ये पडून आहेत. पॅटिस वगैर बनवता येतील का?

काय हो हे?

प्रचेतस's picture

22 May 2018 - 1:28 pm | प्रचेतस

=))

टवाळ कार्टा's picture

22 May 2018 - 4:28 pm | टवाळ कार्टा

कित्ती उधळपट्टी...5 दिवस मटार उसळ खाईल एखादा पुणेकर

न पिणाऱ्यांना अर्धी क्वाटर काय आणि आख्खा बॅरल काय! दोन्ही मुठेच्या पाण्यासमान! :-) रच्याकने, चिकन किंवा प्रॉन्स फ्राय वगैरे बनवायचे आणि भाजी वाढायच्या डावात रम ओतून ती पेटवून वरून ओतायची, असं कुठेतरी टिव्हीत पाहिल्यागत वाटतंय. तुमच्यासारख्या खवय्यांनी मार्गदर्शन करावे ही (च) अपेक्षा.

पाच मटार दाण्यांंचं असं करता येईल: घरात पाच माणसं असतील तर प्रत्येकाच्या ताटात एकेक दाणा वाढायचा. खाली ताज्या कोथिंंबिरीची दोन पाने, त्यावर एक मटारदाणा, वरून एक लहान तुकडा शेडर चीज किसून, किंवा मोसरेला पण चालेल, आणि त्यावर मीठ-मिरपूड भुरभुरावी. दुसरा ऑप्शन: किसान केचप. त्यावर कोथिंबिरीची दोन पाने, वर मटारदाणा. बघा, क्रिएटिव्हिटी कशी ओल्ड मंकच्या गलासात ओतलेल्या थम्सअप सारखी ऊतू चाललीये! ;-) सारांश: काहीही वाया घालवायचं नाही.

टवाळ कार्टा's picture

22 May 2018 - 9:28 pm | टवाळ कार्टा

त्यापेक्षा 5 मटारांचे लोणचे केले तर जास्त वेळ पुरेल

वामन देशमुख's picture

24 May 2018 - 8:13 pm | वामन देशमुख

माझ्याकडे फ्रीजमध्ये अर्धी क्वाटर ओल्ड मंक पडून आहे.

वाइनेतर मद्ये फ्रिजमध्ये ठेवतात का?

आता मला काय माहीत दारू कुठे ठेवायची असते ते? मी कुठे पितो? मला वाटलं खराब-बिराब होईल म्हणून ठेवली आपली फ्रीजमध्ये. कृपया समस्त बेवडेमंडळींनी आमच्यासारख्या पापी निर्व्यसनी पामरांसाठी 'दारू' या विषयावर एक धागा काढून त्यावर आपापले अमूल्य विचार न पिता मांडावेत ही विनंती.

""" अधिक मासात दूर जाऊनही कायम जवळ असणारी

आत हृदयात मानाचे स्थान निर्माण करणारी

तिन्ही लोकी दैदिप्यमान यश संपादन करणारी

कित्येक संसार युद्धाविना नष्ट करणारी """

दारूबाई पधार रही है

सिद्धेश्वर विलास पाटणकर

हा हन्त हन्त ... ओल्डमंकच्या धाग्यावर पुणेरी वाटाणा उसळीची चर्चा ??

हेचि फल काय मम् काव्य प्रतिभेला....

एक्का सर,

ओल्डमंक नकाहो वापरू फ्लम्बे साठी. त्या मोहनचा आत्मा तळमळेल हो स्वर्गात !

त्यापेक्षा एखाद्या योग्य मित्राला सत्पेला किंवा सत्चषकी दान द्या. पुण्य लाभेल.

ती बिचारी ओल्डमंक विचार करीत असेल कोणीतरी फ्रीजचा दरवाजा उघडेल, माझे झाकण काढेल, मला मद्य चषकात ओतेल आणि मी कोणाच्यातरी ओठी लागेल. तिला तुम्ही जाळणार?

हा हन्त हन्त ... फ्लम्बे मज नशिबाला ??

गवि सर,

कशाला उसळीचा फंदात पडता?

मस्तपैकी ओल्डमंकचा एक पतियाळा पेग भरा आणि त्यावर एक वाटाणा छानपैकी गार्निश करा - नकोच ते ऑलीव्ह आणि लेमन रिंड.

चिअर्स