अंतर्मुख!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
4 May 2018 - 9:40 am

अंधेरी स्टेशनच्या तीन नंबर फलाटावर तीस सेकंद थांबून गाडी पुढे सरकली, आणि दरवाजाशी उभ्या असलेल्या त्या दोघांच्या नजरा सरसावल्या. पलीकडच्या, चार नंबर फलाटावरचं काहीतरी शोधू लागल्या.
गाडी जोगेश्वरीच्या दिशेने निघाली. समोरचा फलाट संपला आणि दोघांचे डोळे चमकले. त्यांनी एकमेकांकडे पाहून खुशी व्यक्त केली.
म्हणून माझेही लक्ष त्या फलाटाकडे, त्या जागेवर खिळले.
फलाटावर टोकाला असलेल्या एका बांधकामाच्या भिंतीवर एक चित्र होते...
अगदी साधे.
बंदूक हातात धरलेल्या युद्धसज्ज जवानाचे!
त्यावर एक वाक्य होते-
‘एक जिम्मेवार नागरिक बनो ताकि हम आपके लिये गर्वसे लड सकें!’
... मी त्या दोघांकडे पाहिलं.
त्यांची दाद त्या चित्राला नव्हे, त्या वाक्याला होती हे लगेच लक्षात आलं!
थोडंसं आश्वस्तही वाटलं!!

समाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

प्रिया१'s picture

4 May 2018 - 10:31 am | प्रिया१

नक्कीच ... .विचार करायला लावणारं वाक्य आहे .. देशाचे जवान सीमेवर आपल्यासाठी आणि देशासाठी लढतात आणि आपण एक नागरिक म्हणून बेसिक गोष्टी सुद्धा पाळत नाही ... भ्रष्टाचारी भ्रष्टाचार करण्यात गुंतले आहेत ... सामान्य नागरिक आपल्या नोकरी व्यवसायात दंग आहेत ... आपण, आपला परिवार इथपर्यंतच आपण विचार करतो ... त्या पलीकडे जाऊन आपण कधी विचारच करत नाही ... जवानांनी आपल्यासाठी त्यांच्या प्राणांची बाजी लावावी असं आपण काहीतरी करतो का? उलट एखाद्या जवानाने देशासाठी आपले प्राण त्यागल्यावर त्याच्या परिवारालाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते... We treat our cricketors and film stars like god who actually live only for themselves (except few like Aamir Khan who knows social responsibility), who treat common people like nothing (there are exceptions for this too and I am not talking about them) ....पण ज्यांच्यामुळे आज आपण आपलं आयुष्य कोणत्याही भीतीशिवाय घालवू शकतो त्या जवानांची आठवण लोकांना १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच येते ... हे कुठेतरी बदलण्याची गरज आहे ...

अभ्या..'s picture

4 May 2018 - 12:18 pm | अभ्या..

मला असे प्रतिसाद फार्फार आवडतात.
किस्साही आवडला.

शाली's picture

4 May 2018 - 11:12 am | शाली

मस्तच!

पद्मावति's picture

4 May 2018 - 12:07 pm | पद्मावति

सुंदर!

अनन्त्_यात्री's picture

4 May 2018 - 9:58 pm | अनन्त्_यात्री

आवडले.

मराठी_माणूस's picture

5 May 2018 - 11:55 am | मराठी_माणूस

"एका माहीती अधिकार" कार्यकर्त्याचे बलीदान. अशा कार्यकर्त्यांचे कार्य सुध्दा उल्लेखनिय.
http://epaper.loksatta.com/1624353/loksatta-mumbai/19-04-2018#page/2/2

manguu@mail.com's picture

6 May 2018 - 7:12 pm | manguu@mail.com

छान

नाखु's picture

7 May 2018 - 10:26 am | नाखु

स्फुट, आटोपशीर आणि आशयघन

नितवाचक नाखु