सोनसावळी स्वप्ने सगळी सुखेच लेवुन आली
सोनपावले कुणा परीची हळुच उमटली दारी
कुणी रेखिल्या त्या गालावर मोरपिसांच्या ओळी
गाल गोबरे, गोड गुलाबी राजकुमारी प्यारी
नाजुक काया प्राजक्तासम कुरळे कुंतल भाळी
अप्सरा कुणी, शापभ्रष्ट ती मदनशराची स्वारी
लेक असावी एक गोडशी नको धनाच्या राशी
कुशीत घेवुन तिज सांगावी रोज कहाणी न्यारी
हातात तिचे बोट कर्दळी जबाबदारी खाशी
कोण परी ही? वळता नजरा, सुख वाटावे भारी
तिने रुसावे, रुसुन बसावे, कासाविस मी व्हावे
डोळ्यात तिच्या मला दिसावी माझी सौख्ये सारी
वृत्त : लवंगलता ( मात्रा : 8 8 8 4 )
© विशाल कुलकर्णी
प्रतिक्रिया
11 Apr 2018 - 12:50 am | रातराणी
सुरेख!!
11 Apr 2018 - 10:24 am | वीणा३
तुमच्या परी सारखीच गोड कविता. असाच तिच्याबरोबरचा प्रत्येक क्षण एन्जॉय करा :)
11 Apr 2018 - 12:12 pm | श्वेता२४
खुपच सुरेथ गुंफलीय कविता
11 Apr 2018 - 8:52 pm | मदनबाण
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- धूप में निकला न करो रूप की रानी गोरा रंग काला ना पड़ जाए (२) मस्त मस्त आँखों से छलकाओ न मदिरा मधुशाला में ताला न पड़ जाए... :- गिरफ्तार
12 Apr 2018 - 10:45 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद :)
12 Apr 2018 - 2:27 pm | ज्ञानोबाचे पैजार
अरे ही गोडूली कविता वाचायची कशी काय राहिली?
पैजारबुवा,
12 Apr 2018 - 4:38 pm | नाखु
अनुभुती कन्येशिवाय अपूर्ण आहे
सुरेख
नाखु
12 Apr 2018 - 5:02 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी !
12 Apr 2018 - 8:02 pm | पैसा
सुंदर!