बिथरलेले हिंदूत्व

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
3 Apr 2018 - 3:37 pm

स्वातंत्र्यपूर्व काळामधे त्या वेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधे डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला.

अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती.

यातूनच हिंदूत्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. सावरकरांनी भारतीय राजकारणामधे हिंदूत्वाचा ठळकपणे उच्चार केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा हेसुद्धा हिंदूत्वाचाच आधार घेत होते. संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनसंघाने सुद्धा हिंदूत्वाचे राजकारण केले. स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी पूर्वीच्या राज्यकर्त्यांचाच कित्ता गिरवला.

त्यामुळे स्वतंत्र भारतामधेही हिंदूंमधे डावलले गेल्याची भावना तशीच राहिली. त्यामुळे हिंदूत्वाच्या राजकारणाला बळकटी मिळत राहिली.

पुढे शाहबानो प्रकरण घडले. एका मुसलमान स्त्रीला कायद्याने दिलेला न्याय, कायदा बदलून नाकारण्यात आला. हे काही मुल्ला मौलवींची मर्जी राखण्यासाठी झाले.

यामुळे हिंदूत्वावर आधारित राजकारण करणाऱ्यांना आयते कोलीतच मिळाले आणि मग त्यांनी सरकारच्या विरोधात रान पेटवले.

"बघा बघा हिंदूंनो तुमची दखलसुद्धा घेतली जात नाही आणि मुल्ला मौलवींची मात्र मर्जी कशी राखली जाते पहा" असे हिंदूत्ववादी हिंदू जनतेला सांगत राहिले.

हिंदूंवरती सतत कसा अन्याय होतो आहे असे सांगणारे हिंदूत्ववादी हिंदूंच्या विरोधात बघा कसे संघटित षडयंत्राचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगताना लव्ह जिहाद सारखे मुद्दे पुढे आणू लागले. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या कथा रंगवून रंगवून सांगितल्या जायला लागल्या आणि यामधून हिंदूंना फक्त आम्हीच सोडवू शकतो असे म्हणून स्वतःचे महत्व वाढविण्याचा हिंदूत्ववादी प्रयत्न करू लागले.

ह्या देशांत हिंदू धर्म खतरे में असे म्हणायला हिंदूत्ववाद्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले.

यातूनच ज्या राजीव गांधींनी शाहबानोचा निर्णय फिरवला, त्याच राजीव गांधींना हिंदूंना खूष करण्यासाठी अयोध्येच्या मंदिराचे दरवाजे उघडावे लागले.

हिंदूत्वाचे राजकारण सुरूच राहिले. आपल्यावर अन्याय होतो आहे हे म्हणणे विरोधात असताना तसे सोपे असते. छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून जनतेमधे असंतोष उभा करता येतो.

सरकारने हज यात्रेला सबसिडी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हा हिंदूंना डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते.

या सगळ्या प्रयत्नातून अखेर हिंदूत्ववादी म्हणवणार्‍या पक्षांना भारतामधे सत्ता मिळाली. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर बसले.

पण आजवर हिंदूंवर सतत अन्याय होतो आहे, हिंदूंना सतत डावललं जात आहे अशा प्रकारच्या तक्रारी करण्याची सवय पडलेल्या कार्यकर्त्यांना आता मात्र कुठलाच उद्योग राहिला नाही. कारण तक्रार तरी कुणाच्या विरोधात करायची ? सरकार त्यांचेच होते.

पण हिंदूंवर अन्याय होतो आहे अशी रडारड करण्याची सवय मात्र गेली नाही. ती वेगळ्या स्वरूपात बाहेर यायला लागली.

आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका.

निसर्गाने आपल्याला दिलेले पाणी मर्यादित आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे.
असे कोणी सांगायला गेले की बिथरलेले हिंदूत्ववादी अंगावर यायला लागले. आम्हा हिंदूंनाच तुम्ही बंधने का घालता ? त्यांच्या बकरी ईदला ते इतके पाणी खर्च करतात मग आम्ही पाण्याची नासाडी का करू नये असे युक्तिवाद ऐकू यायला लागले.
दिल्लीतील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक हिंदूत्ववाद्यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले.

नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर हिंदूत्ववादी निस्तेज व्हायला लागले. पर्यावरणाच्या विनाशामधे हिंदूत्व शोधायला लागले.

सत्तेमधे बसलेले लोक आपापले काम करत होते पण सत्तेबाहेर राहणाऱ्या हिंदूत्ववादी गटांमधे मात्र तू जास्त भगवा की मी अशी अहमहमिका सुरु झाली. पूर्वी अहिंदूंचे कसे लाड होत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात लढणारे हिंदूत्ववादी आपापसात लढून स्वतःचे उपद्रवमूल्य वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. गो सेवकांच्या हिंसाचारामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना कानपिचक्याही दिल्या.

ज्या हिंदूत्वाने आयोध्येसारखे लढे उभारले, तेच हिंदूत्ववादी आता अगदी क्षुल्लक मुद्यांचे केविलवाणेपणाने राजकारण करताना दिसू लागले.

राजकारणातला आणखी एक सुप्त हेतू असतो. तो म्हणजे आपल्याला मते देणाऱ्यांना चुचकारणे आणि आपल्या विरोधात असणाऱ्यांना झोडपणे, धाक दाखवणे, बदनाम करणे. हिंदूत्ववाद्यांनी एक प्रकारे हिंदूंना चुचकारले आणि आपल्याला मते न देणाऱ्या अहिंदूंना इशारे दिले, धाक बसवला.

सुरुवातीला हिंदूत्ववादी अशी प्रतिमा असणाऱ्या नरेंद्र मोदींना केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचे सुद्धा समर्थन मिळू लागल्यानंतर मुस्लिमांना दुखावणे परवडणारे नव्हते. मुस्लिमांच्या विरोधात लव जिहाद वगैरे सारखे मुद्दे मांडणे सुद्धा आता अवघड झाले.
कारण आपल्याला मत न देणाऱ्याला सर्व प्रकारे कोंडीत पकडण्यासाठी निरनिराळे प्रचाराचे, अपप्रचाराचे मुद्दे वापरले जातात. ते मुद्दे तो आपला मतदार झाल्यानंतर पुन्हा बासनात गुंडाळून ठेवावे लागतात.

लव जिहादचे प्रकरण म्हणून सांगितलेली एक केस 2017 मधे न्यायालयाने फिरवली आणि त्या मुलीला पुन्हा आपल्या नवऱ्याबरोबर राहण्याची मुभा देण्यात आली. लव जिहादची हाकटी पिटणारे तोंडावर आपटले.

मुसलमान सुद्धा आपला मतदार झाल्यानंतर हिंदूत्ववादी राज्यकर्ते त्यांच्या अजानच्या वेळी आपली सभा थांबवून ठेवू लागले. अशा वेळी हिंदूत्ववाद्यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही.

पुढचा काही काळ तरी हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

3 Apr 2018 - 5:45 pm | आनन्दा

अच्छा...
असो.

अभ्या..'s picture

3 Apr 2018 - 6:07 pm | अभ्या..

एकच लंबर.
चला.......टीआरपीची सोय झाली.
.
जिओ मिपा.

गामा पैलवान's picture

3 Apr 2018 - 8:15 pm | गामा पैलवान

नगो,

दोन विधानं महत्त्वाची वाटली. त्यांवर भाष्य करेन म्हणतो.

१.

अशा वेळी हिंदूत्ववाद्यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही.

दातओठ कशाला खायचे? अजानचा आवाज मर्यादेत ठेवायची सर्वोच्च न्यायालयाची सूचना आहे.

२.

लव जिहादची हाकटी पिटणारे तोंडावर आपटले.

लव जिहाद खरा आहे हे केरळ उच्च न्यायालयाने मान्य केलं आहे.

असो.

त्याचं काय आहे की न्यायालयाचे निर्णय फिरवण्यासाठी संसदेचा वापर करता येत नाही हे खरं दुखणं आहे. बाकी, हिंदुत्वाचं भारतातलं मार्केट बिर्केट म्हणंत असाल तर लवकर जागे व्हा. हिंदुत्व जागतिक पातळीवर केंव्हाच पोहोचलं आहे.

आ.न.,
-गा.पै.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Apr 2018 - 12:08 am | अमरेंद्र बाहुबली

सहमत गामाजी.

नर्मदेतला गोटा's picture

26 Sep 2018 - 5:39 pm | नर्मदेतला गोटा

हिंदुत्वाचं भारतातलं मार्केट बिर्केट म्हणंत असाल तर लवकर जागे व्हा

ते कसे काय बुवा

गामा पैलवान's picture

27 Sep 2018 - 6:14 pm | गामा पैलवान

नगो,

वर लिहिलंय ना, की भारतातलं मार्केटबिर्केट विसरून जा. पूर्ण जग हे हिंदुत्वाचं मार्केट आहे.

आ.न.,
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Apr 2018 - 8:23 pm | प्रकाश घाटपांडे

आम्हाला कलहमुक्त भारत नको आहे.मुक्त ची भाशा नको.युक्तची भाशा हवी.

प्रसाद गोडबोले's picture

4 Apr 2018 - 2:13 am | प्रसाद गोडबोले

लोल

=))))

१. किती काळ सर्व गोष्टी साठी साहेबाला जबाबदार धरणार ? मुस्लिम आणि हिंदू लोकांत कधीही प्रेम नव्हते आणि ते असणे शक्य सुद्धा नाही. जगाच्या पाठीवर कुठेही धार्मिक मुस्लिम इतर लोकांबरोबर सलोख्याने राहू शकत नाहीत. अमेरिका असो वा इंग्लंड सगळीकडे तीच परिस्थिती आहे.

२. लव जिहाद १००% खरा आहे. लोणंद मध्ये सुद्धा ग्रूमिंग गँग्स द्वारे हे चालू आहे. (हिंदू मुलींच्या बलात्काराचे अनेक व्हिडीओ डार्क वेब वर विपुल प्रमाणात आहेत पण ते पाहण्याची आमच्या सारख्या लोकांची हिम्मत सुद्धा होणार नाही. त्यापेक्षा डोळे बंद करणे सोपे)

३. हिंदूंवर अन्याय होतोय हि गोष्ट १००% खरी आहे. भारतीय घटनेत हिंदू लोकांना इतर धर्मिया पेक्षा कमी अधिकार आहेत. शिक्षण संस्था चालविण्याचा अधिकार है एका विषयावर मी विपुल प्रमाणात लेखन केले आहे पण त्या शिवाय व्यवसायाचा अधिकार, आपले देऊळ चालविण्याचा अधिकार इत्यादी अनेक अधिकार हिंदू लोकांना नाहीत.

४. मोदी ह्यांची `हुनर हात` हि स्कीम पहा. फक्त मुस्लिम कारागिरांनाच ह्या स्कीम चा फायदा होतो. मला सांगा हिंदू गरीब कारागिरांनी काय घोडे मारले आहे हे त्यांना हि स्कीम मिळत नाही ?

manguu@mail.com's picture

3 Apr 2018 - 11:20 pm | manguu@mail.com

मुसलमान ख्रिस्चन येऊन २००० च वर्षे झाली आहेत. त्याआधी टोळीयुद्धे - महायुद्धे होत नव्हती का ?

http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=176436

हुनर हात खास minority ministry कडूनच सुरु आहे. त्यामुळे ती त्यानाच दिली जाणार.
इतरांसाठी make in India , stand up India वगैरे स्कीम आहेत ना ?

श्रीगुरुजी's picture

3 Apr 2018 - 11:32 pm | श्रीगुरुजी

>>> मुस्लिम आणि हिंदू लोकांत कधीही प्रेम नव्हते आणि ते असणे शक्य सुद्धा नाही. जगाच्या पाठीवर कुठेही धार्मिक मुस्लिम इतर लोकांबरोबर सलोख्याने राहू शकत नाहीत. अमेरिका असो वा इंग्लंड सगळीकडे तीच परिस्थिती आहे.

+ २० लाख

>>> लव जिहाद १००% खरा आहे. लोणंद मध्ये सुद्धा ग्रूमिंग गँग्स द्वारे हे चालू आहे. (हिंदू मुलींच्या बलात्काराचे अनेक व्हिडीओ डार्क वेब वर विपुल प्रमाणात आहेत पण ते पाहण्याची आमच्या सारख्या लोकांची हिम्मत सुद्धा होणार नाही. त्यापेक्षा डोळे बंद करणे सोपे)

+ २० लाख

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Apr 2018 - 12:04 am | अमरेंद्र बाहुबली

हिंदुत्व चौफेर उधळल्याने व भाजप एकामागे एक राज्य जिंकत असल्याने बिथरलेल्या एक नर्मदेतील (लाल) गोटा.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Apr 2018 - 12:07 am | अमरेंद्र बाहुबली

अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती.

हेच मी उलट वाचलेलं मुस्लिमांना डावलून हिंदूंना झुकतं माप इंग्रजांनी दिलं. त्यामुळे मुस्लिम लीगची स्थापना झाली.
आता कोण खरं बोलतय???☺️

सोमनाथ खांदवे's picture

4 Apr 2018 - 1:51 pm | सोमनाथ खांदवे

शेक्युलर दिस्ताय राव तुमी आणि असणारच कारण हिंदू धर्मातच शेक्युलर च लै पीक आलया . का नावा परमाने लेख लिवलाय ?कांग्रेस ने गेली 60 वर्ष हिंदू समाजा ला कोपऱ्यात उभं केलं व्हत झाडू सारख म्हणून कदाचित गेल्या चार वर्षात हिंदुत्व वाल्यांचा थोडा बटबटीत पना वाढलाय. पप्पू , सोनिया , मणिशंकर , लालू , ममता , शरद , आझम , येडा दिग्विजय यांची गेल्या सात आठ वर्षातली मुक्ताफळ आनी त्यांचं मुस्लिम प्रेम जर तुमाला लक्षात असत तर तुमी एकेरी लेख लिवलाच नस्ता .

विशुमित's picture

4 Apr 2018 - 2:31 pm | विशुमित

अरे वाह्ह छान..!!

बिटाकाका's picture

4 Apr 2018 - 2:00 pm | बिटाकाका

हिंदुत्ववाद याची मुळात व्याख्याच माहित नसल्याने स्वतःची व्याख्या गृहीत धरून पूर्वग्रहाने लिहिलेला लेख!

तुमच्या कडे हिंदुत्ववादाची व्याख्या असली तर कृपया सांगता का?
विषय समजून घ्यायला उपयोग होईल.

बिटाकाका's picture

4 Apr 2018 - 3:37 pm | बिटाकाका

माझी सांगतो जमेल तसं, आधी एकदा लेखकाला विचारा कि तुमच्या वरच्या चिखलफेकीत हिंदुत्ववादी म्हणजे नेमके कोण. हिंदुत्ववाद्यांना अमुक झालं, तमुक झालं, अमुक केलं, तमुक केलं वगैरेत हिंदुत्ववादी म्हणजे नेहमीच्या ठराविक पाठिंबा असलेल्या संघटना कि हिंदू हा विचार मानणारे, हिंदू हा धर्म मानणारे वगैरे सगळे हे फंडामेंटल स्पष्ट झालं तरी पुरेसं!

विशुमित's picture

4 Apr 2018 - 3:44 pm | विशुमित

धागा लेखकाला लोक नर्मदेचा गोटा ठरवून मोकळे झाले आहेत. त्यामुळे त्यांना हे प्रश्न विचारून माझे समाधान होणार नाही. मला वाटले तुमच्या कडे व्याख्या लगेच रेडी असेल, अशी फेकून माराल पण तुम्ही वेळ मारून नेताय असे वाटते.
नसेल माहित परिपूर्ण व्याख्या तरी तसे सांगा, उगाच गोल गोल प्रश्न नका विचारत बसू.

बिटाकाका's picture

4 Apr 2018 - 4:13 pm | बिटाकाका

थोडक्यात काय लोकांनी ठरवले आणि तुम्ही मानले! व्वा! तुम्हाला पण तसेच मानायचे आहे का? नसेल मानायचे तर विचारायाला पाहिजे कि राव प्रश्न त्यांना.
==========================
मी तुम्हाला काय वाटले याला जबाबदार नसून मी काय म्हटले याला जबाबदार आहे. शिवाय मी प्रश्न कसे विचारायचे हे मी ठरवतो, तुम्ही काय करायचे ते तुम्ही ठरवा!
==========================
व्याख्या फेकून मारायची गरज पडते याचे आश्चर्य वाटते, एवढी उत्सुकता ताणली गेली होती तर नुसते गुगल मारले असते तरी उत्तर मिळाले असते. तरीपण तुम्ही विचारलेच आहे म्हणून माझे मत सांगतो. हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा अभ्यास आणि आचरण. असे आचरण करणारे सगळे हिंदुत्ववादी असे या शब्दाच्या जन्मदात्यानींच सांगितलं आहे. आता अगदी सामान्य हिंदू देखील वरील गोष्टींपैकी काहीतरी करत असल्याने हिंदुत्ववादी बनतो असे मला वाटते. म्हणून मी वर म्हणालो कि लेखात हिंदुत्ववादी चिखलफेक नेमकी कोणावर चालली आहे, हिंदूंवर कि हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनांवर?

विशुमित's picture

4 Apr 2018 - 4:41 pm | विशुमित

<<<शिवाय मी प्रश्न कसे विचारायचे हे मी ठरवतो, तुम्ही काय करायचे ते तुम्ही ठरवा!>>
==>> धागा लेखकाचे म्हणणे वाचले होतेच. पण तुम्हीच तर म्हणालात की धागा लेखकाला हिंदुत्वाद्याची व्याख्या समजलेली दिसत नाही, म्हणून तर तुम्हालाच थेट प्रश्न विचारला. त्यात एवढे आकांडतांडव करण्याचे कारण नव्हते. सरळ प्रश्न होता, सरळ उत्तर दिले असते तरी भागले असते. असो..
<<<व्याख्या फेकून मारायची गरज पडते याचे आश्चर्य वाटते, एवढी उत्सुकता ताणली गेली होती तर नुसते गुगल मारले असते तरी उत्तर मिळाले असते. >>>
==>> गुगलून उगाळून सगळी उत्तरे गोल गोल मिळतात. वाटले तुमच्याकडे काही ठोस माहिती/व्याख्या हाती लागली की काय ते पाहावे. तुम्हाला प्रश्न विचारलेला रुचले दिसत नाही. तसदी बदल क्षमस्व.
<<< हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा अभ्यास आणि आचरण.
==>> हे जरा विस्कटून सांगाल का ? (पुन्हा आगाऊ प्रश्नासाठी माफी)
<<< असे आचरण करणारे सगळे हिंदुत्ववादी असे या शब्दाच्या जन्मदात्यानींच सांगितलं आहे>>>
==>> शब्दाचे जन्मदाते गुगलून पाहिले पण उत्तर सापडले नाही. कोण होते ते ? आणखी थोडी तसदी देतो.
<<< म्हणून मी वर म्हणालो कि लेखात हिंदुत्ववादी चिखलफेक नेमकी कोणावर चालली आहे, हिंदूंवर कि हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनांवर?>>>
==>> हिंदू म्हणा, की हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनां म्हणा याने फरक काय पडतो ? हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा दाखला देऊनच तर हे सगळे प्रकार चालू आहेत ना. तेच तर समजून घायचे होते, नेमके कोणाची बाजू नैतिकतेची आहे.

पगला गजोधर's picture

4 Apr 2018 - 4:57 pm | पगला गजोधर

हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा अभ्यास आणि आचरण.

.
विशुमितजीं जाऊ द्या, सन्माननीय बीटाकाका, आधी झाडांवर बाण मारणार, नंतर जाऊन, स्वतःच त्या रोवलेल्या बाणाभोवती वर्तुळे गिरवणार..
काय बोलणार मग आपण ?
.
निदान ह्यां काकानी "हिंदू" शब्दाचा उद्गम जरी सांगितला तरी धन्य _/\_

विशुमित's picture

4 Apr 2018 - 5:13 pm | विशुमित

<<<विशुमितजीं जाऊ द्या...>>
मी कुठे त्यांना पकडून ठेवले आहे?
मी फक्त त्यांना अभिप्रेत असणारे लॉजिकल प्रश्न विचारले आहेत. ते पण भांडे वगैरे न लपवता.
तुम्ही काळजी करू नका त्यांच्या कडून लॉजिकल प्रतिउत्तर अवश्य मिळतील याची मला खात्री आहे.

बिटाकाका's picture

4 Apr 2018 - 5:18 pm | बिटाकाका

तुम्ही दोघेही कुठल्याही मुद्द्यावर बोलत नसून माझ्या वैयक्तिक मतांवर पिंका टाकायचे काम करत आहात असे माझे मत झाले आहे, त्यामुळे असोच.
===========================
हिंदुत्व या शब्दाचा उगम कुणाचा आहे हे गुगलून मिळाले नै होय, शुभेच्छा!
===========================
गजोधर साहेब, गृहीत धरा कि मला हिंदू (आणि लगेहाथ हिंदुत्व) शब्दाचा अर्थ ज्ञात नाही आणि माझ्या ज्ञानात वृद्धी करा. तुमच्या बाणांभोवती वर्तुळे मी मारतो तोपर्यंत, कसे?

पगला गजोधर's picture

4 Apr 2018 - 5:24 pm | पगला गजोधर

"हिंदुत्व म्हणजे काय", ते फक्त मलाच कळले आहे, असा दावा मी कधी केलाच नाही.

त्यामुळे एखादा लेख हिंदू/हिंदुत्व विरोधी आहे/नाही हे कसे ठरवावे ? याबाबत उहापोह चालला आहे, असा माझा कयास होता (आपली पहिली प्रतिक्रिया पाहून, असो)

बिटाकाका's picture

4 Apr 2018 - 5:31 pm | बिटाकाका

आपला कयास चुकीचा होता मालक! लेख हिंदुत्वविरोधी आहे कि नाही याचा उहापोह करण्याची आवश्यकता भासतेय यातच सर्व आले. माझा मुद्दा हिंदुत्ववाद्यांचे काही ठराविक संघटनांच्या कृतीतून सरसकटीकरण याच्याभोवती होता.
================
तुम्हाला हिंदुत्व कळले नाही तर मी आधी बाण मारून मग वर्तुळ मारतोय असा आपला शेरा का होता हेही सांगून टाका लगेहाथ. मी तर फक्त त्या शब्दाकर्त्याचे म्हणणे (तेही माझ्या वैयक्तिक माहितीनुसार) मांडले. तुम्हाला पटले नाही किंवा वेगळे काही सांगायचे असेल तर तसे स्पष्टपणे लिहिणे अपेक्षित आहे, माझ्यावर वैयक्तिक हल्ला करणे नाही.

पगला गजोधर's picture

4 Apr 2018 - 5:45 pm | पगला गजोधर

"हिंदुत्व म्हणजे काय", ते फक्त मलाच कळले आहे, असा दावा मी कधी केलाच नाही.

याचा अर्थ, "मला हिंदुत्व कळलेच नाही", असा आपण केला असेल असे मला वाटले नव्हते.

असो

आपला पहिला प्रतिसाद ,

"हिंदुत्ववाद याची मुळात व्याख्याच माहित नसल्याने स्वतःची व्याख्या गृहीत धरून पूर्वग्रहाने लिहिलेला लेख!"

त्यावर विशुमितप्रमाणे माझाही समज झाला, की आपण धागा लेखकाला, हिंदुत्ववाद याची व्याख्या माहीत नसल्याचे प्रतिक्रियेतून दर्शवत आहात, तर कदाचित आपल्यास प्रमाण-व्याख्या माहिती असू शकेल, (की त्या प्रमाण व्याख्येशी लेखकाने पूर्वग्रहाने प्रतारणा करून, आपलीच वैयक्तिक मते लादली आहे , अशी आपली भावना झाली अशी माझी भावना झाली)

तेव्हा हेही असो,

आपली पुढील प्रतिक्रिया
"हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा अभ्यास आणि आचरण. असे आचरण करणारे सगळे हिंदुत्ववादी असे या शब्दाच्या जन्मदात्यानींच सांगितलं आहे."

त्यावर आपल्याला "हिंदू" शब्दाची जन्मदाता/दात्री माहिती असेल असे मत झाले, परंतु काहीही ठोस माहिती पुढे न आल्याने , निराशेत भर पडली...

तेव्हा असोच....

परत वाचा, मी माझ्याबद्दल बोलत आहे. मी काय म्हणत आहे ते तुम्हाला कळले नाही, तर तो बाणाचा अकारण शेरा का असे मला म्हणायचे आहे.
------------------------------
मी मला माहित असलेली प्रमाण व्याख्या लिहिली आहे, ती वाचा, ती प्रमाण आहे की नाही तुम्ही ठरवा, नसेल प्रमाण वाटत तर तुमची सांगा. मग त्या प्रमाण व्याख्येत कोण कोण येतात ते सांगा, त्या त्या लोकांच्या संदर्भाने लेख पुन्हा वाचतो, कसे?
-----------------------------
तुम्हाला त्या शब्दाचा जन्मदाता कोण आहे हे जाणून घेण्यात रस नाहीच आहे अशी माझी ठाम समजूत झालेली आहे. रस असता तर तो मुद्दा स्वतःहून काढणे अवघड नाही. उलटपक्षी मी हिंदू या शब्दाचा देखील जन्म सांगू शकणार नाही अशी आपली खात्री दिसते, त्यामुळे खरंच....असो!!

विशुमित's picture

4 Apr 2018 - 5:49 pm | विशुमित

<<<माझा मुद्दा हिंदुत्ववाद्यांचे काही ठराविक संघटनांच्या कृतीतून सरसकटीकरण याच्याभोवती होता.>>
==>> पण ह्या संघटना हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा दाखल देऊन हे कृत्य करत आहेत. म्हणून हे नेमके काय गौडबंगाल आहे ते तुमच्याकडून चर्चेतून जाणून घेण्याचा प्रयत्न होता. १००% तुम्हाला सहमत होईलच असे समजण्याचे काही कारण नाही. फक्त विचाराच्या कक्षा रुंदावल्या गेल्या असत्या.

असे बघा, इस्लामच्या नावाखाली दहशतवाद करणाऱ्या संघटनांच्या कृतीवरून सगळे इस्लाम ला मानणारे तसेच आहेत असे म्हणण्याइतकंच बेसलेस हिंदुत्ववादी संघटनांच्या (त्याही सगळ्या नाही) कृतीवरून हिंदुत्ववादाला नावे ठेवणे आहे. माझा मुद्दा न समाजण्याइतका क्लिष्ट नाही, हिंदुत्ववादाची व्याख्या सोयीस्करपणे वापरून सगळ्या हिंदुत्ववाद्यांना सरसकटिकरणाने झोडपणे चुकीचे आहे. बघा पटलं तर नाहीतर सोडून देऊ मुद्दा

विशुमित's picture

5 Apr 2018 - 10:14 am | विशुमित

मी धागा पुन्हा एकदा वाचला. त्यात लेखकाने कुठे सरसकटीकरण केलेले दिसले नाही. असेल तर दाखवून द्या. त्यांनी फक्त काही उदाहरणे दिली आहेत. त्यांचा आशय दिसतोय की ठिणगीपासून उत्पन्न झालेला वाद भडक्यामध्ये रूपांतरित होऊ नये.

तुम्हाला माझा मुद्दा समजलेला नाहीये हे तुमच्या आधीच्या प्रतिसादातून दिसलेच होते, प्रतिसादाने नक्की झाले.
==============================
हिंदुत्ववादी असे करतात, तसे करतात, हिंदुत्ववाद्यांना असे होते, तसे होते, हिंदुत्ववादी असे बिथरले तसे बिथरले वगैरे वाक्यांमध्ये हिंदुत्ववादी कोणते अपेक्षित आहेत एवढा साधा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचलेला नसल्याकारणाने......तुम्ही लोड घेऊ नका, चिलॅक्स!!

विशुमित's picture

5 Apr 2018 - 10:42 am | विशुमित

<<<तुम्हाला माझा मुद्दा समजलेला नाहीये हे तुमच्या आधीच्या प्रतिसादातून दिसलेच होते, प्रतिसादाने नक्की झाले.>>>
==>> काय आहे, तुमच्या ह्या प्रतिसादावरून तुम्ही खायचे एक आणि दाखवायचे दुसरे अशी पद्धतीने मिपावर वावरत असता अशी माझी पक्की समजूत/धारणा झाली/होत आहे.

<<< हिंदुत्ववादी असे करतात, तसे करतात, हिंदुत्ववाद्यांना असे होते, तसे होते, हिंदुत्ववादी असे बिथरले तसे बिथरले वगैरे वाक्यांमध्ये हिंदुत्ववादी कोणते अपेक्षित आहेत एवढा साधा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचलेला नसल्याकारणाने>>>
==>> ते ठीक आहे ना. समजले की सगळेच हिंदुत्वादी असे नसतात पण जे स्वतःला कथित हिंदुत्वादी समजत आहेत ते त्यांचे दुष्कार्य करायला तुमच्या व्याख्येतील हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा आधार घेत असतात. त्यामुळे स्वधर्माची काळजी वाटते. त्याबद्दलच तर धागालेखक तळमळीने सांगत आहेत. मोदींचे देखील त्यांनी उदाहरणे दिली आहेतच.
<<<तुम्ही लोड घेऊ नका, चिलॅक्स!!
==>> हाहाहा, कोण कुणाला सांगताय लोड घेऊ नका म्हणून, लैच मज्जा!

बिटाकाका's picture

5 Apr 2018 - 11:53 am | बिटाकाका

काय आहे, तुमच्या ह्या प्रतिसादावरून तुम्ही खायचे एक आणि दाखवायचे दुसरे अशी पद्धतीने मिपावर वावरत असता अशी माझी पक्की समजूत/धारणा झाली/होत आहे.

तुमचे दाखवायचे आणि खायचे दात एकाच असले तरी मला त्याचे काही सोयरसुतक असण्याचे कारण नाही. वैयक्तिक टिप्पण्या टाळणे लै अवघड नसते. म्हणून, वरील वैयक्तिक टिपण्णीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!!

पण जे स्वतःला कथित हिंदुत्वादी समजत आहेत ते त्यांचे दुष्कार्य करायला

याबद्दल वर माझं मत वर सांगितलं आहेच, बाकी तुमचा अट्टाहास चालू ठेवायला माझी काहीच हरकत नाही.

विशुमित's picture

5 Apr 2018 - 12:12 pm | विशुमित

<<<वैयक्तिक टिप्पण्या टाळणे लै अवघड नसते. म्हणून, वरील वैयक्तिक टिपण्णीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!!>>>
==>> साहेब, मी पिंका टाकतो ही वैयक्तिक टिपणी नव्हती का ?
http://www.misalpav.com/comment/989214#comment-989214
मला वाटते आपल्या दोघांची तू तू मैं मैं खरडवहीत झाली तर बरे होईल. इतर सदस्यांना आपला त्रास नको.
...
<<<बाकी तुमचा अट्टाहास चालू ठेवायला माझी काहीच हरकत नाही.>>>
==>> तुमच्या कडून काही उत्तर मिळावे यासाठी मी कुठेही अट्टाहास केलेला नाही.
फक्त जाता जाता हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याबद्दल सविस्तर लिहले असते तर हिंदुत्वाची व्याख्या व्यापक दृष्टीने समजली असती.

बिटाकाका's picture

5 Apr 2018 - 12:58 pm | बिटाकाका

साहेब, मी पिंका टाकतो ही वैयक्तिक टिपणी नव्हती का ?

तुम्ही पिंका "टाकता" असे मी म्हणालो नसून तुम्ही वरील संदर्भात पिंका "टाकत आहात" असे मी म्हणालो आहे. हा तुमचा नेहमीचा उद्योग आहे असे मी म्हणालो नाही. इथे तुम्ही पिंक टाकत आहात याचा अर्थ विषयाशी धरून बोलत नाही आहात असा आहे. यात वैयक्तिक टिप्पणी काय आहे ते कळले नाही, त्यामुळे परत असो.

हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याबद्दल सविस्तर लिहले असते

मी लिहिलेले तुमच्यापर्यंत (आणि अनेकांपर्यंत, लेखनदोष समजा हवं तर) पोहोचत नाही असा माझा अनुभव आहे आणि तसेच मतही बनले असल्यामुळे मी लिहून काही उपयोग नाही हे उघड आहे. या विषयावरील काही चांगले लिखाण (इतरांचे) सुचवू शकतो वेळ मिळेल तसं, जमलं तर वाचून मत बनवा.

बरं ठीक आहे. तुमच्या वेळेचे गणित सांभाळून तुम्ही इतरांचे चांगले लिखाण सुचवू शकता.

विशुमित's picture

5 Apr 2018 - 10:28 am | विशुमित

इथे डांबिस जी नि त्यांच्या वैयत्तिक मतानुसार त्यांची हिंदूची व्याख्या सांगितली. कदाचित त्यांचे अनुभव बरोबर ही असतील. पण अशी व्याख्या तुम्हाला मान्य आहे का? का स्वमर्जीचे कारण देऊन त्यांना तुम्ही प्रश्न विचारणार नाही आहात ?

http://www.misalpav.com/comment/989238#comment-989238

बिटाकाका's picture

5 Apr 2018 - 10:33 am | बिटाकाका

मी माझी व्याख्या दिलेली असताना सुद्धा अमुक कोणाची व्याख्या तुम्हाला मान्य आहे का वगैरे विचारणे हास्यास्पद आहे. मी तुम्ही म्हणता त्यांना प्रश्न विचारला का हे विचारण्याच्या आधी मी तुम्हाला लेखकाला विचारा अशी विनंती केली होती तिकडे थोडे लक्ष दिले तर बरे होईल. कि तिथे स्वमर्जी?

ह्या लेख प्रपंचाला सुरवात कशी झाली बघा तुम्ही जसे म्हणालात की " हिंदुत्ववाद याची मुळात व्याख्याच माहित नसल्याने स्वतःची व्याख्या गृहीत धरून पूर्वग्रहाने लिहिलेला लेख!""
धागालेखाची हिंदुत्वादाची व्याख्या/विचार आल्रेडी मी धाग्यात वाचली होती. एक बाजू मला समजली होती. दुसरी देखील समजून घायची होती. त्यात तुम्ही म्हणाला धागालेखकाला परिपूर्ण व्याख्या माहित नसावी असे म्हणालात म्हणून तुम्हालाच मी थेट प्रश्न विचारला. यात माझी स्वमर्जी काही नव्हती.
तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही धागालेखाकडे बोट करून मोकळा झालात. डांबिस यांना तुम्ही प्रश्न विचारावा हा माझा हेतू मुळात नव्हताच.

डँबिस००७'s picture

4 Apr 2018 - 7:52 pm | डँबिस००७

"हिंदुत्व म्हणजे काय", ते फक्त मलाच कळले आहे, असा दावा मी कधी केलाच नाही.

हिंदुत्व तर सोडाच "हिंदु म्हणजे काय" ते सुद्धा ईथे कोणाला कळले आहे, अस मला वाटत नाही.

हिंदु मनुष्याची व्याख्या काय , हे कळण्यासाठी मुसलमान बहुल भागात जाऊन "हिंदुस्तान झिंदाबाद " तर राहु दे
" पाकिस्तान मुर्दाबाद " अस तरी ओरडा , जर जिंवत परत आलात तर तुमच नशीब !! पण जर परत ला ना हीत तर तुम्ही हिंदुच !!

पगला गजोधर's picture

4 Apr 2018 - 8:15 pm | पगला गजोधर

हिंदु मनुष्याची व्याख्या काय , हे कळण्यासाठी मुसलमान बहुल भागात जाऊन "हिंदुस्तान झिंदाबाद " तर राहु दे
" पाकिस्तान मुर्दाबाद " अस तरी ओरडा , जर जिंवत परत आलात तर तुमच नशीब !! पण जर परत ला ना हीत तर तुम्ही हिंदुच !!

.
वॉव...
.
हशा, टाळ्या, आणि शिट्ट्यासुध्दा...
.
नै जोकच तसा होता ना !

manguu@mail.com's picture

4 Apr 2018 - 10:27 pm | manguu@mail.com

ह्यान्ना कसे माहिती ? हे गेले होते का ओरडायला कधी ?

सोमनाथ खांदवे's picture

4 Apr 2018 - 10:41 pm | सोमनाथ खांदवे

येकदम बरुबर , ल्येखका चा तळागळा तील मुस्लिम शी कदी संबंध आलेला नसणार म्हणून त्यांची गाडी हिंदुत्वाच्या मुद्या वर जरा डाव्या बाजूने कलली आहे . लेखकाने पुण्यातील लुल्लानगर , कोंढवा भागात फक्त यकच महिना राहून अनुभव घेतला तर आयुष्यात परत कदी शेक्युलर चा कोट घालायची ईच्छा नाय व्हणार .

विशुमित's picture

5 Apr 2018 - 10:05 am | विशुमित

मी पण सदाशिव पेठेत असेच ३ महिने काढले होते. परत तलफच नाही झाली कुठल्या गोष्टीची.
तसेच फुरसुंगी, वाघोली, मांजरी, उरुळी, भेकराई, तिकडे बाणेर, रावेत, सुस, देहू रोड एरिया मध्ये सुद्धा गुंठा मंत्रांच्या हौदासात लोक कसे काय फ्लॅट घेऊन राहतात याचे आश्चर्य वाटते. असो...

३-३.५ वर्ष राहतोय, असा काही अनुभव नाही. सरसकट आरोप चुकीचा आहे.
अर्थात सल्ला exclusively लेखकाला असेल तर पास.
धन्यवाद.

विशुमित's picture

4 Apr 2018 - 5:41 pm | विशुमित

<<<तुम्ही दोघेही कुठल्याही मुद्द्यावर बोलत नसून माझ्या वैयक्तिक मतांवर पिंका टाकायचे काम करत आहात असे माझे मत झाले आहे, त्यामुळे असोच.>>>
==>> मी किती सरळ सोपा कोणते ही आढेवेढे न घेता तुम्हाला प्रश्न विचारला होता. यात मी कुठे पिंका टाकल्या ते सांगा?
http://www.misalpav.com/comment/989186#comment-989186
...
तुमच्या वैयत्तिक मतांचा आदर मला आहेच पण फक्त ते जरा विस्तृत जाणून घायचे होते कारण अगदी सारखेच प्रश्न मला देखील पडले होते.
....
<<हिंदुत्व या शब्दाचा उगम कुणाचा आहे हे गुगलून मिळाले नै होय, शुभेच्छा!>>
==>> अहो खरेच मला नाही सापडले. शुभेच्छा देण्यापेक्षा लिंक चिटकून दिली असती तर पुरेसे होते.

बिटाकाका's picture

4 Apr 2018 - 7:32 pm | बिटाकाका

परत विनंती, गूगल.कॉम वर जायचं, ओरिजिन ऑफ हिंदुत्व किंवा त्याच्याशी संलग्न आपला प्रश्न टाकायचा, पहिल्या पाचात एकतरी लिंक कामाची येईलच, खासकरून विकिपीडियाची.
=============
तुम्हाला गुगलवर शोधून हिंदुत्व या शब्दाचा उगम सापडला नाही हे मनाला पटत नाही, त्यामुळे तुम्ही कायतर प्रतिवाद करायचा म्हणून करत आहात असा समज होणे स्वाभाविक आहे. ठराविक हिंदू संघटनांच्या पलीकडे हिंदुत्व नावाची गोष्ट नाही हि समजूत कायम ठेवायची असल्यास, शुभेच्छा!

विशुमित's picture

5 Apr 2018 - 9:57 am | विशुमित

जाऊ द्या जास्त लोड घेऊ नका. माझे मी बघून घेतो व्याख्या, कर्ता-करविता वगैरे वगैरे... चिल्लाक्स..!

बिटाकाका's picture

5 Apr 2018 - 10:24 am | बिटाकाका

हाहाहा, कोण कुणाला सांगताय लोड घेऊ नका म्हणून, लैच मज्जा!

विशुमित's picture

5 Apr 2018 - 10:30 am | विशुमित

चान चान चान ...!!

नर्मदेतला गोटा's picture

6 Apr 2018 - 11:16 am | नर्मदेतला गोटा

विशुमित,
हेच म्हणायचे होते मला

लोक लवकर मुद्द्यावर येत नाहीत आणि लेखामधे आपल्या स्वतःवर टीका केलेली आहे असे मानतात.

नर्मदेतला गोटा's picture

5 Apr 2018 - 6:13 pm | नर्मदेतला गोटा

बिटाकाका
सामान्य हिंदू वेगळा आणि हिंदूत्त्वाचे राजकारण करणारा वेगळा

बिटाकाका's picture

5 Apr 2018 - 7:22 pm | बिटाकाका

बर्राबर वलीकलाव! हेच सांगण्याचा प्रयत्न चाललाय! सगळ्या हिंदुत्ववाद्यांना राजकारण करणारे हिंदू म्हणता येत नाही.

पगला गजोधर's picture

5 Apr 2018 - 8:07 pm | पगला गजोधर

सगळ्या हिंदुत्ववाद्यांना राजकारण करणारे हिंदू म्हणता येत नाही.

एक शंका _
जैनांना (अमित शहा) तुम्ही हिंदू मानता का ? बिटेकर काका ..

विशुमित's picture

5 Apr 2018 - 8:17 pm | विशुमित

अर्रारा...

बिटाकाका's picture

5 Apr 2018 - 10:49 pm | बिटाकाका

काय वाह्यात प्रश्न कम शंका आहे, मी मानायचा न मानायचा प्रश्न येतोच कुठे? ते स्वतःला काय मानतात हे त्यांना विचारा.

पगला गजोधर's picture

5 Apr 2018 - 10:59 pm | पगला गजोधर

सगळ्या हिंदुत्ववाद्यांना राजकारण करणारे हिंदू म्हणता येत नाही.

तुमच्या या वरील प्रतिक्रियेचा व "अमीत शहांनी स्वतः ला हिंदू मानण्या/न-मानण्याचा", काय संबंध आहे ? ते लक्षात आले नाही.

ठीक आहे, तुमच्या वरील प्रतिक्रियेवरून, मी परत माझ्या शंका विचारू शकतो का तुम्हाला ?

१. अमित शहा तुम्हाला हिंदुत्ववादी वाटतात का ?
२. अमित शहा तुम्हाला राजकारणी वाटतात का ?
३. २ चे उत्तर होकारार्थी असेल, तर अमित शहांच्या राजकारणाची बैठक तुम्हाला हिंदुत्ववादी-राजकारण करणारी वाटते का ?

बिटाकाका's picture

5 Apr 2018 - 11:55 pm | बिटाकाका

मालक बररोबर उलटा मुद्दा चर्चित आहात आपण. माझा मुद्दा भारतात अनेक हिंदुत्ववादी (अगदी सामान्य लोकं सुद्धा) आहेत आणि ते अजिबात राजकारण करत नाहीत हा आहे. ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून काय उपयोग?
-----------------------------
अमित शहा किंवा कुठलेही राजकारणी हे काही हिंदुत्ववादयांचे प्रमाण नाही. तुम्ही फक्त एकच मुद्दा पुढे रेटत आहात, सगळे हिंदुत्वमाफी हे राजकारणी आहेत हा. आपल्या मतांमध्ये जमीन अस्मानाचा फरक दिसतोय त्यामुळे ही माझी लेखनसीमा समजा. मूळ मुद्दा कळल्यास, पुढे चर्चा संभवु शकते, तोपर्यंत शुभेच्छा!!

"तुम्हाला मूळ मुद्दा समजलाच नाहीये" हे तर मिपावरील वादाचे भरतवाक्य आहे.
सो....

पगला गजोधर's picture

6 Apr 2018 - 8:05 am | पगला गजोधर

बरं बीटाकाका, माझ्यावर असे काऊ नका.
मला आपला अँगल कळायला वेळ लागतोय हे मानूनसुद्धा.
.

माझा मुद्दा भारतात अनेक हिंदुत्ववादी (अगदी सामान्य लोकं सुद्धा) आहेत आणि ते अजिबात राजकारण करत नाहीत हा आहे.

.
काका, आपल्या मान्यतेनुसार, "राजकारण अजिबात न करणाऱ्या हिंदुत्ववादी अनेक लोकांपैकी", आपल्याच मतानुसार
टॉप 5 नावं देता येतील का प्लिज ?

बिटाकाका's picture

6 Apr 2018 - 9:30 am | बिटाकाका

१. मला योग्य वाटत असलेली व्याख्या मी वर दिली. २. त्या व्याख्येनुसार हिंदू सभ्यता, धार्मिकता किंवा सामाजिकता याचं आचरण आणि अभ्यास करणारे सर्व सामान्य, असामान्य जन हे हिंदुत्ववादी ठरतातअसे मत वर मी मांडले. ३. हिंदुत्ववाद हा फक्त राजकारणाशी निगडित विषय आहे हे मला पटत नाही.
======================
आता वरील मतांनुसार टॉप ५ राजकारण न करणारे हिंदुत्ववादी वगैरे काही लिस्ट करण्याची गोष्ट आहे असे मला अजिबात वाटत नाही. आजूबाजूचे हिंदू हे तितकेच महत्वाचे हिंदुत्ववादी आहेत.
======================
राजकारण न करणारे हिंदुत्ववादी बहुसंख्य असूनही काही ठराविक संघटनांच्या ठराविक विषयावरील हिंदुत्ववादावर आधारित राजकारणाला केस बाय केस पाठिंबा दर्शवतात तसेच केस बाय केस विरोध दर्शवतात, पण तो पूर्णतः वेगळा विषय आहे असे मला वाटते.

बिटाकाका's picture

6 Apr 2018 - 5:05 pm | बिटाकाका

ते कोणतर कुणालातरी म्हणलं होतं मागे, सगळं समजयलाच पाहिजे असं नाही.

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2018 - 5:22 pm | श्रीगुरुजी

>>> एक शंका _
जैनांना (अमित शहा) तुम्ही हिंदू मानता का ? बिटेकर काका ..

बिटाकाकांना माहिती नसावे, म्हणून मीच खुलासा करतो. अमित शहा जैन नसून हिंदू आहेत.

बाकी तुमचं चालू द्या.

पुष्यमित्र शुंग महाराज की जय!

पगला गजोधर's picture

6 Apr 2018 - 6:25 pm | पगला गजोधर

ब्वार गुर्जी , तुम्ही म्हणता तर तसं समाजा
.
as

पगला गजोधर's picture

6 Apr 2018 - 6:39 pm | पगला गजोधर

अमित शहा (जैन) ????
.
asj

श्रीगुरुजी, मला माहिती नव्हते असे नाही, शिवाय त्यांनाही माहीत नसेल असे नाही. पण ते अजो म्हणतात तसं सिनिसिझम केला नाही तर मग काय मज्जा ;);)
=====================
मुळात ते जैन असते तरी त्याचा या विषयाशी काय संबंध??

श्रीगुरुजी's picture

6 Apr 2018 - 10:35 pm | श्रीगुरुजी

मुळात ते जैन असते तरी त्याचा या विषयाशी काय संबंध??

आहे ना. बादरायण संबंध जोडून जातीयवादी मळमळ ओकणे हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. उदाहरणार्थ श्रीरामायण आणि पुष्यमित्र शुंग. तसेच उगाच जैन, हिंदू असले काहीतरी उकरायचे. मग त्याचा विषयाशी अजिबात संबंध नसला तरी हरकत नाही.

बिटाकाका's picture

7 Apr 2018 - 1:04 am | बिटाकाका

जसा तुम्ही त्यांचा जैन असण्याचा बादरायण संबंध उकरून काढला, तसे. हम्म, आले लक्षात.

नर्मदेतला गोटा's picture

5 Apr 2018 - 9:36 pm | नर्मदेतला गोटा

बिटाकाका

आता कळलं तुम्हाला, थँक्स

बिटाकाका's picture

5 Apr 2018 - 10:47 pm | बिटाकाका

कपाळावर हात मारून घ्यायची स्मायली!!!

ज्या भारतीय नागरिकांना एका पेक्षा जास्त बायकांशी लग्न करता येत नाही ते हिंदू आहेत

प्रसाद गोडबोले's picture

6 Apr 2018 - 9:27 pm | प्रसाद गोडबोले

ही खतरनाक व्याख्या अहे =))))

नर्मदेतला गोटा's picture

5 Apr 2018 - 12:32 am | नर्मदेतला गोटा

कृपया लेखामधे वर्णिलेल्या उदाहरणांबद्दल बोला

त्या उदाहरणांमध्ये काहीच वावगं वाटत नसेल तर स्वच्छपणे तसं सांगा

प्रियाभि..'s picture

5 Apr 2018 - 1:51 am | प्रियाभि..

असा एकांगी लेख नर्मदेच्या गोट्याचाच असू शकतो..

sagarpdy's picture

5 Apr 2018 - 10:57 am | sagarpdy

पुढचा काही काळ तरी हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.

कायपण ! आमच्या पाठीशी शिवभक्त, मंदिर प्रेमी युवराज आहेत.
https://www.huffingtonpost.in/uday-balakrishnan-/the-congress-is-indias-...

अर्थात हिंदुत्वाची व्याख्या काय ती सेटल करून घ्या.

विशुमित's picture

5 Apr 2018 - 11:04 am | विशुमित

सही बात..

जब तक "सुरज" "चांद" रहेगा... हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणारच.
...
<<अर्थात हिंदुत्वाची व्याख्या काय ती सेटल करून घ्या.
==>> अजून हिंदू धर्म आहे की जीवन पद्धती हेच जर नीट ठरले नाही तर व्याख्या कुठून सेटल करणार?

मुसलमान सुद्धा आपला मतदार झाल्यानंतर हिंदूत्ववादी राज्यकर्ते त्यांच्या अजानच्या वेळी आपली सभा थांबवून ठेवू लागले.

त्येचं कसं हाय, पुरोगामी लोक मोदीची भाषणं आत्ता ऐकू लागलेत म्हणून त्यांना अजानच्या वेळेस भाषण आत्ता आत्ता थांबू लागलंय असं वाटतंय. पर तसं काय नाय. ते भाषणं अगोदर बी थांबायचे आन (बिथरलेल्या) हिंदू लोकायले ते थांबणं अगोदरपासूनच माहिताय.
=============================================
पुरोगाम्यांची माहिती जशी जशी वाढलालीय तसा तसा त्यांचा कॉग्निटिव डिसोनान्स (शब्दसौजन्य : युयुत्सु) लैच वाढत चाल्लाय.

विशुमित's picture

5 Apr 2018 - 11:18 am | विशुमित

<<ते भाषणं अगोदर बी थांबायचे आन (बिथरलेल्या) हिंदू लोकायले ते थांबणं अगोदरपासूनच माहिताय>>>
==>> अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी पूर्वीसुद्धा होयच्या पण २०१४ नंतर काही लोकांना त्याचा साक्षात्कार होऊ लागला. तो भाग गौण आहे.

<<< पुरोगाम्यांची माहिती जशी जशी वाढलालीय तसा तसा त्यांचा कॉग्निटिव डिसोनान्स (शब्दसौजन्य : युयुत्सु) लैच वाढत चाल्लाय.>>>
==>> हीच तर धोक्याची चाहूल वाटत आहे.

arunjoshi123's picture

5 Apr 2018 - 11:48 am | arunjoshi123

एका बाईवर बलात्कार झाला.
पोलिसांनी डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला. बलात्कार्‍यांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे तिच्यामधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती. यातून सूडाची सुरुवात झाली. तिच्या घरच्यांनी तोच कित्ता गिरवला. कोर्टातही तिला डावलले गेल्याची भावना तशीच राहिली. पुढे तिचे घर जाळले गेले. हे काही बलात्कार्‍यांची मर्जी राखण्यासाठी झाले. यामुळे तिच्या घरच्यांना आयते कोलीतच मिळाले आणि मग त्यांनी सरकारच्या विरोधात रान पेटवले. "बघ गं बाई, तुझी दखलसुद्धा घेतली जात नाही आणि बलात्कार्‍यांची मात्र मर्जी कशी राखली जाते पहा" असे घरचे शेजार्‍यांना सांगत राहिले. अबलेवर सतत कसा अन्याय होतो आहे असे सांगणारे छेडछाडिसारखे सारखे मुद्दे पुढे आणू लागले. या कथा रंगवून रंगवून सांगितल्या जायला लागल्या.

ह्या गावात बायका खतरे में असे म्हणायला घरच्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले. यातूनच ज्या सरपंचांनी साक्ष फिरवली, त्याच पंचांना घरच्यांना खूष करण्यासाठी त्यांच्याच स्वतःच्या घरात जाऊ द्यावे लागले. आपल्यावर बलात्कार झाला आहे हे म्हणणे झाला असल्यावर तसे सोपे असते. छोट्या छोट्या गोष्टींचे (बलात्कार शेवटी एक संभोगच, त्यात काय एवढं? तो आनंदाने का नाही करू द्यायचा, इ इ) भांडवल करून मनामधे असंतोष उभा करता येतो.

सरकारने बलात्कार्‍यांच्या वकीलाची फी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हाला डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते.

या सगळ्या प्रयत्नातून अखेर सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला.

पण आजवर आमच्यावर सतत अन्याय होतो आहे, सतत डावललं जात आहे अशा प्रकारच्या तक्रारी करण्याची सवय पडलेल्या बाईला आता मात्र कुठलाच उद्योग राहिला नाही. कारण तक्रार तरी कुणाच्या विरोधात करायची ? निकाल तिच्याच बाजूचा.

पण अन्याय होतो आहे अशी रडारड करण्याची सवय मात्र गेली नाही. ती वेगळ्या स्वरूपात बाहेर यायला लागली.

आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका. निसर्गाने आपल्याला दिलेले पाणी मर्यादित आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे. असे कोणी सांगायला गेले की बिथरलेली बाई अंगावर यायला लागली. आम्हालाच तुम्ही बंधने का घालता ? त्यांच्या क्रिकेट लॉनला ते इतके पाणी खर्च करतात मग आम्ही पाण्याची नासाडी का करू नये असे युक्तिवाद ऐकू यायला लागले.
गावातील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक शेजार्‍यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले.

निकाल आल्यानंतर घरचे निस्तेज व्हायला लागले. पर्यावरणाच्या विनाशामधे न्याय शोधायला लागले.

केसवर काम करणारे लोक आपापले काम करत होते पण पाठींबा देणार्‍या गटांमधे मात्र अहमहमिका सुरु झाली. पूर्वी बलात्कार्‍यांचे कसे लाड होत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात लढणारे घरचे आपापसात लढून स्वतःचे उपद्रवमूल्य वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. बाबांनी तापलेल्या भावाला कानपिचक्याही दिल्या.

ज्या लोकांनी एवढी मोठी केस जिंकली, तेच आता अगदी क्षुल्लक मुद्यांचे केविलवाणेपणाने भांडण करताना दिसू लागले.

न्यायप्राप्तीतला आणखी एक सुप्त हेतू असतो. तो म्हणजे आपल्याला मते देणाऱ्यांना चुचकारणे आणि आपल्या विरोधात असणाऱ्यांना झोडपणे, धाक दाखवणे, बदनाम करणे. घरच्यांनी एक प्रकारे शेजार्‍यांना चुचकारले आणि आपल्याला मते न देणाऱ्या बलात्कार्‍यांच्या समर्थकांना इशारे दिले, धाक बसवला.

सुरुवातीला न्यायासाठी केस लढणारे अशी प्रतिमा असणाऱ्या गृहप्रमुखांना केवळ शेजार्‍यांचीच नव्हे तर अन्यायकर्त्यांच्या शेजार्‍यांचे सुद्धा समर्थन मिळू लागल्यानंतर बलात्कार्‍यांना दुखावणे परवडणारे नव्हते. त्यांच्या विरोधात छेडछाड वगैरे सारखे मुद्दे मांडणे सुद्धा आता अवघड झाले.
कारण आपल्याला समर्थन न देणाऱ्याला सर्व प्रकारे कोंडीत पकडण्यासाठी निरनिराळे प्रचाराचे, अपप्रचाराचे मुद्दे वापरले जातात. ते मुद्दे तो आपला समर्थक झाल्यानंतर पुन्हा बासनात गुंडाळून ठेवावे लागतात.

छेडण्याचे प्रकरण म्हणून सांगितलेली एक केस 2017 मधे न्यायालयाने फिरवली आणि त्या मुलाला सोडून दिले. अशी हाकटी पिटणारे तोंडावर आपटले.

अन्यायकर्ते सुद्धा आपले समर्थक झाल्यानंतर गृहकर्ते त्यांच्या पूजेच्या वेळी आपली व्यत्यय आणणारी कामे थांबवून ठेवू लागले. अशा वेळी शेजार्‍यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही.

पुढचा काही काळ तरी बलात्काराला न्याय देण्यासाठी गावामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.
======================================================================================
बलात्कारकर्ते म्हणजे काँग्रेस, मुसलमान नव्हे.

विशुमित's picture

5 Apr 2018 - 12:00 pm | विशुमित

<<बलात्कारकर्ते म्हणजे काँग्रेस, मुसलमान नव्हे.>>
==>> छान.. तुम्ही पण भाजप प्रवक्ते झालात का ?
दंडवत घ्या ..._/\_

पगला गजोधर's picture

5 Apr 2018 - 12:11 pm | पगला गजोधर

नै हो, जोशी प्रवक्ते नव्हे तर, तर ते या कल्पित कथेतील सर्वोच्च-न्यायालया च्या भूमिकेत,
आहात कुठे ?

थँक्यू, थँक्यू. मस्त वाटलं.

असे मी अजो ना लगेच नाही म्हणू शकणार कारण त्यांचे बरेच लिखाण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा वेगळा अँगल देऊन जातो. बऱ्याच वेळा ते मजेशीर पद्धतीने आपले म्हणणे मांडतात. फक्त ते नक्की कोणाची बाजू घेऊन बोलतात हे अजून तरी ठामपणे समजले नाही. असो...

फक्त ते नक्की कोणाची बाजू घेऊन बोलतात हे अजून तरी ठामपणे समजले नाही.

लोकांची वा पक्षांची स्वतःचीच बाजू फार ठाम नसते. मग मी कसा काय कोणाची ठाम बाजू घेऊ शकेन.
---------------------
ज्या कुणाचं ज्या कोणत्या विषयात जे काही मत आहे "किमान मांडायच्या वेळी" ते सुसंगत, संपूर्ण आणि सुस्पष्ट असावं अशी माझी अपेक्षा असते. ते मत माझ्या मताशी मॅच न होणं गौण असतं.

हे तुमच्या बाबत तंतोतंत मान्य आहे आणि मला हे पटते देखील.

मी सध्याला तरी भाजप प्रवक्ता* आहे. भाजप सध्याला देशासाठी बेस्ट चॉइस आहे. लेट्स नॉट मिन्स वर्ड्स.
=========================
हा प्रतिसाद लेखाच्या लॉजिकच्या शोधार्थ आहे. भाषा प्रचंड विचित्र आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. उगाच मंडळींना हिंदू वि मुस्लिम संदेश जाऊ नये म्हणून काँग्रेस वि भाजप असं म्हणायचं आहे.
===================
*आत्मघोषित