बिथरलेले हिंदूत्व

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
3 Apr 2018 - 3:37 pm

स्वातंत्र्यपूर्व काळामधे त्या वेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधे डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला.

अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती.

यातूनच हिंदूत्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. सावरकरांनी भारतीय राजकारणामधे हिंदूत्वाचा ठळकपणे उच्चार केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा हेसुद्धा हिंदूत्वाचाच आधार घेत होते. संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनसंघाने सुद्धा हिंदूत्वाचे राजकारण केले. स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी पूर्वीच्या राज्यकर्त्यांचाच कित्ता गिरवला.

त्यामुळे स्वतंत्र भारतामधेही हिंदूंमधे डावलले गेल्याची भावना तशीच राहिली. त्यामुळे हिंदूत्वाच्या राजकारणाला बळकटी मिळत राहिली.

पुढे शाहबानो प्रकरण घडले. एका मुसलमान स्त्रीला कायद्याने दिलेला न्याय, कायदा बदलून नाकारण्यात आला. हे काही मुल्ला मौलवींची मर्जी राखण्यासाठी झाले.

यामुळे हिंदूत्वावर आधारित राजकारण करणाऱ्यांना आयते कोलीतच मिळाले आणि मग त्यांनी सरकारच्या विरोधात रान पेटवले.

"बघा बघा हिंदूंनो तुमची दखलसुद्धा घेतली जात नाही आणि मुल्ला मौलवींची मात्र मर्जी कशी राखली जाते पहा" असे हिंदूत्ववादी हिंदू जनतेला सांगत राहिले.

हिंदूंवरती सतत कसा अन्याय होतो आहे असे सांगणारे हिंदूत्ववादी हिंदूंच्या विरोधात बघा कसे संघटित षडयंत्राचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगताना लव्ह जिहाद सारखे मुद्दे पुढे आणू लागले. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या कथा रंगवून रंगवून सांगितल्या जायला लागल्या आणि यामधून हिंदूंना फक्त आम्हीच सोडवू शकतो असे म्हणून स्वतःचे महत्व वाढविण्याचा हिंदूत्ववादी प्रयत्न करू लागले.

ह्या देशांत हिंदू धर्म खतरे में असे म्हणायला हिंदूत्ववाद्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले.

यातूनच ज्या राजीव गांधींनी शाहबानोचा निर्णय फिरवला, त्याच राजीव गांधींना हिंदूंना खूष करण्यासाठी अयोध्येच्या मंदिराचे दरवाजे उघडावे लागले.

हिंदूत्वाचे राजकारण सुरूच राहिले. आपल्यावर अन्याय होतो आहे हे म्हणणे विरोधात असताना तसे सोपे असते. छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून जनतेमधे असंतोष उभा करता येतो.

सरकारने हज यात्रेला सबसिडी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हा हिंदूंना डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते.

या सगळ्या प्रयत्नातून अखेर हिंदूत्ववादी म्हणवणार्‍या पक्षांना भारतामधे सत्ता मिळाली. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर बसले.

पण आजवर हिंदूंवर सतत अन्याय होतो आहे, हिंदूंना सतत डावललं जात आहे अशा प्रकारच्या तक्रारी करण्याची सवय पडलेल्या कार्यकर्त्यांना आता मात्र कुठलाच उद्योग राहिला नाही. कारण तक्रार तरी कुणाच्या विरोधात करायची ? सरकार त्यांचेच होते.

पण हिंदूंवर अन्याय होतो आहे अशी रडारड करण्याची सवय मात्र गेली नाही. ती वेगळ्या स्वरूपात बाहेर यायला लागली.

आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका.

निसर्गाने आपल्याला दिलेले पाणी मर्यादित आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे.
असे कोणी सांगायला गेले की बिथरलेले हिंदूत्ववादी अंगावर यायला लागले. आम्हा हिंदूंनाच तुम्ही बंधने का घालता ? त्यांच्या बकरी ईदला ते इतके पाणी खर्च करतात मग आम्ही पाण्याची नासाडी का करू नये असे युक्तिवाद ऐकू यायला लागले.
दिल्लीतील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक हिंदूत्ववाद्यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले.

नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर हिंदूत्ववादी निस्तेज व्हायला लागले. पर्यावरणाच्या विनाशामधे हिंदूत्व शोधायला लागले.

सत्तेमधे बसलेले लोक आपापले काम करत होते पण सत्तेबाहेर राहणाऱ्या हिंदूत्ववादी गटांमधे मात्र तू जास्त भगवा की मी अशी अहमहमिका सुरु झाली. पूर्वी अहिंदूंचे कसे लाड होत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात लढणारे हिंदूत्ववादी आपापसात लढून स्वतःचे उपद्रवमूल्य वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. गो सेवकांच्या हिंसाचारामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना कानपिचक्याही दिल्या.

ज्या हिंदूत्वाने आयोध्येसारखे लढे उभारले, तेच हिंदूत्ववादी आता अगदी क्षुल्लक मुद्यांचे केविलवाणेपणाने राजकारण करताना दिसू लागले.

राजकारणातला आणखी एक सुप्त हेतू असतो. तो म्हणजे आपल्याला मते देणाऱ्यांना चुचकारणे आणि आपल्या विरोधात असणाऱ्यांना झोडपणे, धाक दाखवणे, बदनाम करणे. हिंदूत्ववाद्यांनी एक प्रकारे हिंदूंना चुचकारले आणि आपल्याला मते न देणाऱ्या अहिंदूंना इशारे दिले, धाक बसवला.

सुरुवातीला हिंदूत्ववादी अशी प्रतिमा असणाऱ्या नरेंद्र मोदींना केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचे सुद्धा समर्थन मिळू लागल्यानंतर मुस्लिमांना दुखावणे परवडणारे नव्हते. मुस्लिमांच्या विरोधात लव जिहाद वगैरे सारखे मुद्दे मांडणे सुद्धा आता अवघड झाले.
कारण आपल्याला मत न देणाऱ्याला सर्व प्रकारे कोंडीत पकडण्यासाठी निरनिराळे प्रचाराचे, अपप्रचाराचे मुद्दे वापरले जातात. ते मुद्दे तो आपला मतदार झाल्यानंतर पुन्हा बासनात गुंडाळून ठेवावे लागतात.

लव जिहादचे प्रकरण म्हणून सांगितलेली एक केस 2017 मधे न्यायालयाने फिरवली आणि त्या मुलीला पुन्हा आपल्या नवऱ्याबरोबर राहण्याची मुभा देण्यात आली. लव जिहादची हाकटी पिटणारे तोंडावर आपटले.

मुसलमान सुद्धा आपला मतदार झाल्यानंतर हिंदूत्ववादी राज्यकर्ते त्यांच्या अजानच्या वेळी आपली सभा थांबवून ठेवू लागले. अशा वेळी हिंदूत्ववाद्यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही.

पुढचा काही काळ तरी हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

बिटाकाका's picture

11 Apr 2018 - 11:23 am | बिटाकाका

तेव्हा समजावं आपल्याला पुरोगामित्वाचा रोग जडलाय.

क्या बात बोल्या हो, जियो!!

नाखु's picture

11 Apr 2018 - 10:50 pm | नाखु

दिवसांनी मिसळीत झणझणीत रस्सा लाभला !!!

छोटू दोन पाव आणखी दे आणि कांदा-लिंबू आणि.

मिसळपाव गिर्हाइक नाखु रोखीवाला

आमचे इथे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन मिळेल अश्या दु"कानांवर"पासून सावध रहा,मिपाहितार्थ जारी

डँबिस००७'s picture

11 Apr 2018 - 12:48 pm | डँबिस००७

ट्रेड मार्क ,

जीयो !

नर्मदेतला गोटा's picture

11 Apr 2018 - 2:04 pm | नर्मदेतला गोटा

फटाके तुम्ही कुणाच्या वस्तीत जाऊन उडवता का ?

पाणी तुम्ही इतरांच्या घरातले नसता का ?

अफझल खानाचे पोट फाडणे आणि स्वतःचे पोट फाडून घेणे यामधला फरक लक्षात येत असेल तुमच्या.

यश राज's picture

11 Apr 2018 - 3:02 pm | यश राज

फटाके तुम्ही कुणाच्या वस्तीत जाऊन उडवता का ?

पाणी तुम्ही इतरांच्या घरातले नसता का ?

पाणी कुठेही नासले तरि ते नासलेलेच असते.. प्रदुषण कुठेहि झाले तरी ते प्रदुषणच आहे.. पण मग सिलेक्टीव विरोधच का?...
वर्षातुन १ दा येणार्या सणांवर बोलण्याअगोदर सोईस्कररीत्या ३६४ दिवस होणार्या समस्यांकडे जाणिवपुर्वक दुर्लक्श करताय..
तुमचा वैचारिक गोंधळ उडालेला दिसतोय.. कदाचित यालाच " बिथरलेले पुरोगामित्व " म्हणावे लागेल..

नर्मदेतला गोटा's picture

11 Apr 2018 - 8:27 pm | नर्मदेतला गोटा

यश राज,

पाणी कुठेही नासले तरि ते नासलेलेच असते.. प्रदुषण कुठेहि झाले तरी ते प्रदुषणच आहे..

धन्यवाद, अजून काय पाहिजे मला

चला तुम्हाला एकदाचे कळाले म्हणजे...

ट्रेड मार्क's picture

12 Apr 2018 - 5:19 am | ट्रेड मार्क

खरंच तुमचा गोंधळ झालेला दिसतोय. तार्किक दृष्ट्या विचार केला तर जरी मी माझ्या अंगणात फटाके लावले तरी जमिनीवर झालेला कचरा मी झाडून साफ करू शकतो. पण हवेत झालेल्या किंवा आवाजी प्रदूषणाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा त्रास माझ्यापेक्षा इतरांना जास्त होणार. याचे साधे कारण म्हणजे मी फटाके उडवतोय आणि त्याचा आनंद घेतोय. जर परिणामांचा विचार करायचा झाला तर तो माझ्यावर व आजूबाजूच्या सगळ्यांवर होणार. बरोबर?

आता ३६५ दिवसांचा विचार केला तर त्यातले ३-४ दिवस मी फटाके उडवणार, ते सुद्धा संध्याकाळी फार तर १ तास. जर आवाजी प्रदूषणाचा विचार केला तर बांग ३६५ दिवस रोज दिवसातून ५ वेळा दिली जाते. यात पहाटे ४.३०/५ ला पहिली बांग होते ज्यावेळेला सगळे झोपलेले असतात. आजूबाजूची आजारी माणसे, हॉस्पिटल्स याचा विचार न करता रोज हे नित्यनेमाने होत असतं. याचा किती लोकांना त्रास होत असेल याचा विचार करा. याविरुद्ध कोणी आवाज उठवला तर काय होतं यासाठी सोनू निगमचं उदाहरण समोर आहेच. याचबरोबर आपली गणपतीमंडळं सुद्धा १० दिवस का होईना आवाजी प्रदूषण करतात, जे थांबलं पाहिजे. गाडी चालवताना उगाच हॉर्न वाजवला जातो त्याचा त्रास तुम्ही परदेशात राहून आल्यावर कळतो.

हवेतील प्रदूषणाचा विचार केला तर कारखाने, गाड्या यामुळे ३६५ दिवस रोज प्रदूषण होताच असतं. विहिरीवरचं डिझेल इंजिन लावून जेव्हा पहिल्यांदा डुक्कर रिक्षा आल्या तेव्हापासून तर अर्धवट इंधन जाळणाऱ्या इंजिनमुळे प्रदूषणात किती वाढ झाली याची कल्पना आहे का? तरीही केवळ स्वतःची सोय म्हणून या रिक्षा भरभरून वापरल्या जातातच ना? शक्य आहे ते दुचाकी, चार चाकी वापरतातच ना? ऑफिसला जाताना किती लोक कारपूल किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात? कारखाने २४ तास जहरी धूर सोडत असतात.

पाण्याच्या नासाडीबद्दल आणि प्रदूषणाबद्दल बोलायचं तर शहरांमध्ये रोज गाडी धुण्यासाठी माणूस लावला जातो. रोज गाडी धुण्याची गरज आहे का? शहराच्या बाहेर गेलं की जिथे पाणीसाठा दिसेल तिथे ट्रक/ जीपवाले आपापल्या गाड्या धुवत असतात. दुसऱ्या बाजूला लोक कपडे धुवत असतात. शहरांमध्ये कारखान्यातील नको असलेल्या द्रव्यांचे आऊटलेट्स जवळच्या ओढ्यात किंवा पाणीसाठ्यात सोडलेले असतात.

असो. थोडक्यात माझं मत असं झालंय की अजून तुमचे विचार पक्के झालेले नाहीयेत किंवा अजून गोंधळ आहे. धागा बिथरलेल्या "हिंदुत्वा"वर आहे. पण मधेच त्यात पर्यावरण घुसडलंय. हिंदू का बिथरलेत याची कारणं मी आधीच सांगितली आहेत. बिघडलेल्या पर्यावरणाचा विचार करायचा झाला तर याला फक्त हिंदू आणि हिंदू सण जबाबदार नसून संपूर्ण मानवजात आहे. त्या जबाबदारीमधे जातीधर्माचा भेदभाव कशाला करायचा?

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2018 - 9:08 am | श्रीगुरुजी

वर्षाचे ३६५ दिवस सातत्याने प्रदूषण करणा-या अनेक गोष्टींकडे संपूर्ण कानाडोळा करून रंगपंचमी, गणेश विसर्जन इ. वरच भर देणे म्हणजे एखाद्याला अपघातात झालेल्या अनेक गंभीर जखमांवर उपचार न करता किरकोळ खरचटलेल्या ठिकाणीच उपचार करत बसण्यासारखं आहे.

डँबिस००७'s picture

11 Apr 2018 - 9:38 pm | डँबिस००७

पाणी कुठेही नासले तरि ते नासलेलेच असते.. प्रदुषण कुठेहि झाले तरी ते प्रदुषणच आहे..

हे मान्य झाल तर !! त्या पुढे जाऊन हिंदु सुद्धा बिथरलेले आहेत !! हे आता मान्य व्हायला हरकत नाहीय !

हे मान्य झाल तर !! त्या पुढे जाऊन हिंदु सुद्धा बिथरलेले आहेत !! हे आता मान्य व्हायला हरकत नाहीय !

मुळात माझा आक्शेप होळी व इतर सण यांच्यावर होणार्या आरोपांवर होता.. माझे व बहुतांश मिपाकरांचे एवढेच म्हणणे होते व आहे की बाकीच्या इतर कारणांमुळे होणार्या प्रदुषणाकडे मुद्दाम दुर्लक्श करुन फकत या सणांच्या च्या नावाने खडे फोडणे हे बरोबर नाहि.

बिथरलेले हिंदुच आता युवराजाला जनऊधारी बनण्यास भाग पाडतात आणी त्या २०१९ ला परत हिंदु धार्जिणे सरकार घेऊन येणार !!

नर्मदेतला गोटा's picture

14 Apr 2018 - 11:37 pm | नर्मदेतला गोटा

आता ही लिंक पहा

गामा पैलवान's picture

15 Apr 2018 - 1:05 am | गामा पैलवान

आता ही लिंक पहा (इंग्रजी दुवा).

१% हिंदूंपैकी कोणाची हिंमत आहे का जय श्रीराम म्हणायची? तेही बलात्कार करून? काय बकवास लावलाय?

-गा.पै.

ट्रेड मार्क's picture

15 Apr 2018 - 5:36 am | ट्रेड मार्क

आता या बाबतीत पण कसा भेदभाव केला जातोय बघा. असेच अजून ६ प्रकार गेल्या २-३ महिन्यांमध्ये घडलेत. पण ते कदाचित कोणाला माहीतही नसतील कारण मीडियामध्ये त्याला एवढं कव्हरेज मिळालं नाही. राजकारणी तर त्यांची पोळी भाजून घेण्यात मग्न आहेत.

हे वाचा.

समस्त कलाकार आणि पुरोगामी वगैरे मंडळी लगेच हिंदू असल्याची लाज वाटते म्हणायला लागली. अश्या आणि या पेक्षा कितीतरी भयानक घटना घडल्या आहेत ज्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक आरोपी आहेत. एका तरी मुस्लिम कलाकाराने किंवा विचारवंताने मी मुस्लिम असल्याची लाज वाटते असं एकदा तरी म्हणलं आहे का? हिंदू पुरोगामी, वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनेल त्या घटनेची बातमी देताना किंवा चर्चा करताना मात्र धर्माचं नाव कुठेही येणार याची काळजी घेतात. पण हेच हिंदू आरोपी असले की मात्र धर्मावर आरोप चालू होतात? या मागचं कारण सांगू शकाल का? महंमद अफरोज कोण ते आठवतंय का? एवढं भयंकर कांड करूनही महंमद अफरोजला त्याच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याला २-३ महिने कमी आहेत म्हणून ३ वर्ष किरकोळ शिक्षा होऊन सोडून दिलं. वर आपल्या लाडक्या केजरींनी त्याला १० हजार रुपये मदत देऊन लेडीज टेलर होण्यासाठी मशीन घेऊन दिलं. त्यावेळेला किती पुरोगामी लोकांना आणि मुस्लिम कलाकार/ विचारवंतांना मुस्लिम धर्माची लाज वाटली होती?

यावर तुमचं मत सांगा. नुसतं गुळमुळीत इतर घटनांमध्ये पण गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे असं नको. या धाग्यात जसं हिरीरीने हिंदुत्व बिथरलेलं म्हणताय तास अजून एक मस्त धागा काढा ज्यात मुस्लिम/ ख्रिश्चन लोकांनी केलेल्या अत्याचारावर सणसणीत ताशेरे ओढलेले असतील.

डँबिस००७'s picture

16 Apr 2018 - 12:46 am | डँबिस००७

पाणी नासावण्यापासुन मुलगी नासवण्या पर्यंत, कस ही करुन हिंदु बिथरलेत हे सिद्ध करायच दिसतय !!

कठीण आहे !

बाय द वे , कठुआ केस झाली १७ जानेवारीला , आता ऐप्रिल मध्ये केस बाहेर येतेय !! ह्या केस मध्ये बरच काळ बेर आहे ! पुरी डाळच काळी आहे !

ज्या हिंदु मुलाने तथाकथित रेप केली मर्डर केला तो त्याच दिवशी त्याच वेळेला कठुआपासुन दुर मुज्जफराबादमध्ये परीक्षा
केंद्रावर परीक्षा देत होता.