समर्थानी म्हटल आहे 'टवाळा आवडे विनोद' म्हणुन काही लगेच समर्थांना विनोदाचे वावडे होतं असे म्हणता येणार नाही.
थट्टा मस्करी, टिंगल, विनोद विडंबन वात्रटिका प्रहसन, खिल्ली, चेष्टा गंम्मत नसती तर जगण्यातला (जीवन शब्द नको रे बाबा ) आनंद घेता आला नसता. विनोदाला असलेली कारुण्याची झालर, वेदनेला असलेले विनोदाचे कवच, विनोदाच्या अंतरंगात खदखदणारे अपमानाचे निखारे, सुडापोटी जन्मणारे विनोद, असहाय्ये पोटी जन्मणारे विनोद, कोल्ह्याला द्राक्षे आंबट या मानसिकतेतुन जन्मणार प्रहसन, आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी इतरांना कमी लेखण्याची केलेली चेष्टा, इतरांना भानावर आणण्यासाठी उडवलेली खिल्ली. हे सर्व आपण अवती भोवती बघत असतो. मिपावरही घडत असतात. आनंद घारे सरांनी मिपाच्या वैशिष्ट्याचे वर्णन माझे मिसळपावरील पहिले वर्ष या लेखात अगदी यथार्थ केले आहे. मानवी भावनेचा तो अपरिहार्य भाग आहे. पण मग हे सर्व करावे की नाही? कुणी करावे? कशासाठी करावे? कुठल्या हेतुने करावे? कुठल्या ठिकाणि करावे? कुठल्या मनस्थितीत करावे? त्याचा कुणावर काय परिणाम होईल? याची उत्तरे ही (संकेत)स्थल, काल, व्यक्तीसापेक्ष आहेत. ती नक्कीच वेगवेगळी असणार आहेत. अगदी एका व्यक्तीची देखील वेगवेगळी असणार आहेत. कृष्णाने गोपींची केलेली टिंगल ही गोपींना हवीहवीशी वाटायची. त्यांचा कृष्णावरचा रागही लटका असायचा. आपल्या आवडत्या व्यक्तीने केलेली मस्करी हलकेच घेतली जाते. तिथे ह.घ्या चा परिचय असणे ची गरज नसते. पण आपल्या नावडत्या व्यक्तीने केलेले कौतुक देखील त्रासदायक वाटते. एखादी व्यक्ती आवडण वा नावडण हे गणित अतार्किक असते. आजच्या आवडणा-या व्यक्तीचा समावेश उद्या नावडणा-यात होउ शकतो अथवा उलटही होउ शकते. कोणाचे कोणाशी कधी व कसे जमेल व कधी व कसे फिसकटेल याचा नेम नसतो. भावनांची समीकरण / गुंता विचित्र असतो. हवस आणि नकोस वाटण एकाच वेळी घडु शकत. द्वेष आणि आदर एकाच वेळी असु शकत. आनंद आणि वेदना एकाच वेळा असु शकतात. "एकाच वेळी" चा वैज्ञानिक किस न काढता या कडे पहायचे झाल्यास भावनांची स्वरुप व्यामिश्र असते असे म्हणता येईल (गटणे चावला)
आमचा बिट्टू भुभु देखील मूड असला कि नाकाने ढुसण्या देउन मला चेष्टा मस्करी,खेळायला करायला भाग पाडायचा. अस करताना त्याच्या डोळ्यातले खट्याळ मिष्किल भाव माझा ताण कुठल्या कुठे घालवुन टाकायचा. मग आम्ही भुंका भुंकी खेळायचो. तो माझ्यावर भुंकणार मी त्याच्यावर भुंकणार अगदी त्याच्या ष्टाईलने.मग माझ्या अंगावर धाउन येउन माझी मानगुट जबड्यात पकडायचा. बघणा-या ति-हाईताचा थरकाप होत असे. मी पळुन जायला लागलो कि माझी लुंगी पकडून ठेवत असे. जाम पकडायचा. जबड्यातुन सोडायाचाच नाही. लुंगी सोडुन पळुन जाणे हाच एकमेव पर्याय.अशा चेष्टा मस्करीतून
एखादे वेळी लुंगी किंवा चादर फाटत असे. अंथरुणात तर आमच्या दंगामस्तीला उत येई. टर्र कन आवाज झाला कि डोळ्यातला मिश्किलपणाचा भाव जाउन चिंतेचा भाव येत असे. हा भावरंग इतक्या झटकन बदले. ए सॊरी हं! असा अर्थ त्यात मला वाचता येई. मग मी त्याला म्हणे ," मुद्दामुन नाही काही केलं की आमच्या बिट्टुनी. हो ना रे बिट्ट्या? " की लगेच परत तो नी मी खोड्या करायला मोकळे. मात्र त्याचा मुड नसताना मी त्याची चेष्टा केली तर तो दात विचकवुन माझ्यावर गुरकत असे. तरीही मी डिवचत राहिलो तर दुस-या खोलीत निघुन जात असे.मी त्या खोलीत गेलो कि किती माग लागाव माणसाने? अशा अर्थाचा कटाक्ष टाकत तो परत तिस-या खोलीत.मग मात्र मी थांबत असे.
एखाद्याला नाही सहन होत थट्टा. तुमची थट्टा होते पण एखाद्याचा जीव जातो. मग तुमच्या आनंदा साठी एखाद्याला दु:ख द्यायच? कुठल्या नैतिकतेत हे बसत? कुठल्याही गोष्टीला मर्यादा असतात. उगाच आपल गांजा मारल्या गत हॆहॆहॆ करत हासत सुटायचं?(स्वगत) प्रत्येक मनुष्य आनंद ,दु:ख, काम, क्रोध, मद, मत्सर या भावनांच्या मूड व मोड मध्ये कधी ना कधी असतो. त्या त्या मूड मध्ये त्याचे वर्तन तसे तसे असते. तरी देखील त्याची स्वत:ची अशी एक प्रकृती असते. कुठल्याही भावनांचा अतिरेक वाईटच. थट्टा मस्करी जरुर करावी पण बेतानं.स्वतःशी हसणे खिदळणे देखील देखील एखाद्याला थट्टा वाटु शकते. माझ्या एका बॅचमेट चा चेहरा सतत हसल्या सारखा असायचा.(त्याच्या दंताळी जबड्यामुळे) त्यामुळे त्याने साधे बोलले तरी एखाद्याला तो आपली थट्टा करतोय अस वाटायचं. गंभीर प्रसंगात त्याच्या प्रवेशानेच कधी पेच निर्माण व्हायचा. एखाद्याला गंमत केली तरी नाही आवडत. अशा वेळी क्षमस्व म्हणुन मोकळे व्हावे.जे थट्टा मस्करी करतात त्यांच्यात मिसळुन जावं . तरी देखील मनाच्या आत एखादा संवेदनशील कोपरा कळत नकळत दुखावला जाउ शकतो. एखाद्या च्या संवेदनशीलतेला मिपाची प्रकृती सर्व काळ मानवत नाही. म्हणुन म्हणतो थट्टा जरा जपुन. एकनाथांनी आपल्या भारुडात थट्टॆविषयी वर्णन केले आहे. ते म्हणतात.
अशी ही थट्टा । भल्या भल्याशी लाविला बट्टा ॥ ध्रु ॥
ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी । थट्टेने हरविली बुद्धी । केली नारदाची नारदी । अशी ही थट्टा ॥१॥
थट्टा दुर्योधनाने केली। पांचळी सभेमाजी आणिली । गदाघाये मांडी फोडीली। अशी ही थट्टा ॥२॥
थट्टा गेली शंभोपाशी । कलंक लाविला चंद्राशी । भगे पाडीले इंद्राशी। बरी नव्हे ही थट्टा॥ ३॥
थट्टेने मेला दुर्योधन । भस्मासुर गेला भस्म होउन । वालीही मुकला आपुला प्राण । अशी ही थट्टा ॥ ४॥
थट्टा रावणाने केली । नगरी सोन्याची बुडविली । थट्टा ज्याची त्यास भोवली । बरी नव्हे ही थट्टा ॥ ५॥
अरण्यात होता भृगु ऋषी । थट्टा गेली त्याचे पाशी । भुलवुनी आणला अयोध्येशी । बरी नव्हे ही थट्टा ॥६॥
विराटराजाचा मेहुणा । नाम तयाचे किचक जाणा । त्याने घेतले बहुतांचे प्राणा । बरी नव्हे ही थट्टा ॥७॥
थट्टे पासुनी सुटले चौघेजण । शुक भीष्म आणि हनुमान । चौथा कार्तिकस्वामी जाण । त्याला नाही बट्टा ॥८॥
एका जनार्दन म्हणे सर्वाला । थट्टेला भिउनी तुम्ही चाला । नाही तर नेईल नरककुंडाला । अशी ही थट्टा ॥९॥
=======================================================================
प्रतिक्रिया
5 Mar 2009 - 8:07 pm | मदनबाण
मस्त लेख... :)
काही जणांना दुसर्याची थट्टा केलेली आवडते किंवा स्वतः ते दुसर्याची थट्टा करण्यात पुढे असतात,, मात्र त्यांची केलेली थट्टा मात्र त्यांना सहन होत नाही !!! अशा लोकांनी मग दुसर्यांची थट्टा का म्हणुन करावी???
मस्करी ची कुस्करी होणार नाही याची प्रत्येकानेच काळजी घ्यावी.
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
5 Mar 2009 - 8:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थट्टेलाही काही मर्यादा असल्या पाहिजेत ते पटवून देणारा उत्तम लेख
बाय द वे, आम्ही आपली कधी थट्टा केली असेल तर क्षमा करा !
-दिलीप बिरुटे
5 Mar 2009 - 8:12 pm | प्रकाश घाटपांडे
बिरुटे सरांनी केलेली थट्टा आम्ही दागिना म्हणुन मिरवु
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
5 Mar 2009 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टेन्शन आलं होतं क्षणभर ! उपक्रमवर एका सदस्याने प्रश्न विचारले होते.
आणि आम्ही आपली आठवण केली होती म्हणून.. आपल्या प्रतिसादाने मोकळा झालो.. थँक्स ! :)
-दिलीप बिरुटे
5 Mar 2009 - 8:28 pm | देशपांडे१
बिरुटे सरांनी केलेली थट्टा आम्ही दागिना म्हणुन मिरवु
मस्त उपमा दिली आहे :-)
सरांचे व घाटपांडें चे मोठेमन दिसले
सन्मय देशपांडे
भावनांचा आभाव अस्ल्यास आणि शब्दांचे भांडवल व विचारांची गूतवणूक संपल्यास अस्थिरता जाणवते व ईथेच अस्तित्वासाठी कंपूच्या राजकारणाची सूरूवात होते.
5 Mar 2009 - 8:44 pm | विकास
बिरुटे सरांनी केलेली थट्टा आम्ही दागिना म्हणुन मिरवु
प्रकाशराव असे लिहून बिरूटेसरांची थट्टाच तर करत नाही आहेत ना? :?
5 Mar 2009 - 8:11 pm | नीधप
सौ चूहे खाके बिल्ली चली हाजको!
करून करून भागले न देवपुजेला लागले
हे सगळं या भंपक लिखाणाला आणि लेखकाला लागू पडतं..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
5 Mar 2009 - 8:16 pm | मुक्तसुनीत
नीधप यांच्याशी या बाबतीत असहमती व्यक्त करतो.
मला लेख आवडला. या आणि अन्य लिखाणातून प्रस्तुत लेखकाची प्रामाणिक भूमिका मला जाणवली आहे. आणि ही कारकीर्द काल-परवाची नव्हे. प्रस्तुत लेखक माझ्या मते "बिल्ली" नव्हेत आणि त्यांनी जे आजवर केले ते "सौ चूहे खाणे" नव्हे. त्यामुळे नीधप यांच्या मतातून व्यक्त झालेल्या शब्दांच्या वापराबद्दलही मला खेद वाटतो.
5 Mar 2009 - 8:32 pm | मदनबाण
१००% सहमत.
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
5 Mar 2009 - 8:25 pm | आनंद
मुक्तसुनित रावांशी सहमत.
5 Mar 2009 - 8:25 pm | नीधप
असाच खेद माझ्या लेखावर केलेल्या विडंबनाबद्दल आणि स्वतःच्या प्रत्येक पोस्टमधे नी बोल्ड करत माझ्यावर कॉमेंट करत होता हा माणूस तेव्हाही झाला असता तर अर्थ होता.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
5 Mar 2009 - 8:33 pm | मुक्तसुनीत
मला वाटते , आपण आंतरजालावर वावरताना थोडी मस्करी समजून घ्यायला हवी. "नी" बोल्ड केला म्हणजे त्यात काय कुणाचा अपमान केला, अपशब्द वापरले , किंवा इथले कुठले नियम मोडले असे होत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विडंबन. तुमचा मूळ लेख अर्थातच तुमच्या स्वतःच्या लौकिकाला साजेसा , चांगल्या दर्जाचाच होता. एखाद्याला त्याचे विडंबन करावेसे वाटले तर ती देखील एक प्रकारची दाद समजायला हवी.
दुर्दैवाने तुम्ही (या बाबतीत ) तसे करताना दिसत नाही. आणि ही तुमची वैयक्तिक बाब झाली. त्यामुळे "वुइ अग्री टू डिस-ऍग्री ऑन धिस" यापेक्षाजास्त बोलत नाही. पण इथल्या मोकळ्या व्यासपीठावर जर का तुम्ही एखाद्या सभासदावर "सौ चूहे .." म्हणणार असाल तर त्याबद्दलची असहमती अधोरेखित करणे आवश्यक ठरते.
5 Mar 2009 - 9:02 pm | नीधप
>>मला वाटते , आपण आंतरजालावर वावरताना थोडी मस्करी समजून घ्यायला हवी.<<
माझ्या मित्रमंडळींनी केली तर मला काही प्रश्न नाहीये. संपूर्ण अनोळखी माणसाने केली तीही माझं नाव घेऊन मला शिंपी म्हणणे विडंबनाच्या नावाखाली यात मलातरी कुठे थोडी मस्करी दिसत नाही. हेटाळणीच दिसते. मी तक्रार केल्यानंतर माझं नाव तिथून काढून खरं घडलेलं इत्यादी कांगावा करण्यात आला.
>>"नी" बोल्ड केला म्हणजे त्यात काय कुणाचा अपमान केला, अपशब्द वापरले , किंवा इथले कुठले नियम मोडले असे होत नाही.<<
नियमात बसवायला हे वाक्य ठीक आहे पण ते नी मुद्दामून आणि विशिष्ठ हेतूने बोल्ड करण्यात आले नव्हते यावर कुणीही विश्वास ठेवणार नाहीत. तुम्ही इथे ढीग म्हणाल पण तुम्हालाही ते माहीत आहे.
>>तुमचा मूळ लेख अर्थातच तुमच्या स्वतःच्या लौकिकाला साजेसा , चांगल्या दर्जाचाच होता.<<
इतके दिवस गायब असलेल्या माणसाला अचानक माझा लेख पेपरमधे आल्यावर जाग आली आणि पहिला लेख प्रसिद्ध झाल्या दिवशीच मुद्दामून हे असलं उथळ विडंबन या व्यक्तीने टाकलं यात त्या व्यक्तीची वृत्ती कळून येतेच येते.
>>दुर्दैवाने तुम्ही (या बाबतीत ) तसे करताना दिसत नाही.<<
एका उदाहरणावरून तुम्ही माझ्याबद्दल अंदाजही बांधलेत. तुम्हाला लक्षात नसेल तर जरा मागे जाउन बघा मी इथे टाकलेल्या प्रत्येक कवितेचं विडंबन होत आलंय. माझ्या कवितेचं विडंबन केल्याबद्दल चतुरंग यांना दादही दिलेली आहे मी. कारण ते विडंबन वैयक्तिक आकस ठेवून केलेलं नव्हतं. पण ते तुम्ही नाही बघणार. उदाहरण इथे बघा
http://www.misalpav.com/node/4049
आणि काय आहे की उपदेश देणं सोप्प असतं. पण तुम्हाला चुकीचं काय वाटलं याला माझ्यालेखी फारसं महत्व नाहीये ना. मला त्रास देण्याच्या हेतूने या घाटपांडेनी हे उद्योग केले. आता हे का केले त्याचं कारण असं की या माणसाने माझ्या खव मधे काही मेसेज टाकले. त्यावर त्याच्या अपेक्षेप्रमाणे भारावून जाउन मी प्रतिसाद दिला नाही. त्यावरून या माणसाने तुम्हाला इथली माहीती नाही, विनोद कळत नाहीत अशी काय काय बडबडही केली. शेवटी वैतागून मी दुर्लक्ष केले. तो राग डोक्यात धरून याव्यक्तीने माझ्यावर वैयक्तिक टीका केली आणि सगळ्यांनी कंपूबाजी करून त्याचीच भलावण केली. अजूनही करतायत. हेच माझ्यादृष्टीने खरे आहे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
5 Mar 2009 - 8:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सौ चूहे खाके बिल्ली चली हाजको!
करून करून भागले न देवपुजेला लागले
हे सगळं या भंपक लिखाणाला आणि लेखकाला लागू पडतं..
रागावू नका, पण प्रतिसाद पूर्वग्रह दूषित वाटला.
-दिलीप बिरुटे
5 Mar 2009 - 8:22 pm | नीधप
मी माझ्या अनुभवातून बोलले हो.
तुम्हाला नाही अनुभव त्याला मी काय करू?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
6 Mar 2009 - 9:35 am | टिउ
तुम्हाला असे अनुभव सगळीकडे येतात का? नाही, मायबोलीवरपण तुमचं बर्याच लोकांशी पटायचं नाही म्हणुन विचारलं...तुम्हालाच असे लोक भेटतात हे बघुन फार वाईट वाटलं...
5 Mar 2009 - 8:47 pm | चतुरंग
मला वाटतं तो वाद संपला होता. ह्याबद्दल मी घाटपांड्यांशीही व्यनीतून चर्चा केली होती.
तुमच्या विनंतीवरुन संपादकांनी त्या विडंबनात्मक लेखात योग्य ते बदलही केलेले होते असे मला आठवते.
एवढे सगळे असताना तोच धागा पुढे चालू ठेवणे आणि वैयक्तिक रोख, राग धरुन लिहिणे पटत नाही! सोडून द्यायला हवे.
थोडी खेळीमेळी, थट्टामस्करी चालायचीच.
चतुरंग
5 Mar 2009 - 8:59 pm | नीधप
माफ करा चतुरंग तुमची चर्चा काय झाली हे मला कळायला मार्ग नाही.
पण संपादकांनी बदल केल्यावरही नी बोल्ड करणे मुद्दामून हे बरेच दिवस चालू होते.
आणि तोच धागा पुढे धरण्याचा मुद्दा म्हणायचा तर.. जर मला सांगितलं जातं हे सगळं योग्य आहे तर मग दुसर्या एका विडंबनाबद्दल संपादकांकडून माफी का बरं मागितली जाते?
माझे मित्र माझी भरपूर थट्टामस्करी करतात पण त्यात आकस नसतो आणि आकसाने केलेली थट्टा कुठली तेवढे मला कळते.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
5 Mar 2009 - 9:04 pm | चतुरंग
पण संपादकांनी बदल केल्यावरही नी बोल्ड करणे मुद्दामून हे बरेच दिवस चालू होते.
एक्झॅक्टली नी बोल्ड करणे मलाही खटकले होते आणि त्याबद्दच मी घाटपांड्याशी व्यनीतून बोललो होतो. त्यानंतर तसे घडले नसल्याचेही आपण बघितले असेल.
..दुसर्या एका विडंबनाबद्दल संपादकांकडून माफी का बरं मागितली जाते?
नेमकं कुठल्या विडंबनाबद्दल हे आहे आणि कोणी माफी मागितली हे समजले नाही.
असो. हा धागा भरकटू नये यासाठी पुढीच चर्चा आपण खरड/व्यनीअतून करु शकतो.
चतुरंग
5 Mar 2009 - 8:57 pm | विकास
प्रकाशरावांचा लेख आवडला. एकनाथांच्या भारूडाला मराठी (कोणी दिले ते माहीत नाही पण) एका वाक्याचे समान उत्तर आहे : मस्करीची कुस्करी होणार नाही ना ह्याची काळजी घ्यावी.
बाकी आपण एकमेकांची जेंव्हा थट्टा-मस्करी करतो तेंव्हा वर भारूडात दिलेल्या उदाहरणातील विशेष करून दुर्योधन, रावण, किचक अगदी इंद्रासारखी कुणाची थट्टा करत नाही. किंबहुना आजच्या काळात तशा वागण्याला थट्टा काय क्रूर थट्टा पण म्हणणार नाहीत. ते वागणे हे एकतर व्याभिचारात मोडते अथवा असुरी वृत्तीत मोडते.
थोडक्यात मला वाटते की "थट्टा" या शब्दाच्या अर्थात "सांस्कृतिक बदल" झाला आहे. ;)
थट्टेस "चेष्टा" असेपण मराठीत म्हणतात. मात्र याचा अर्थ हिंदीत प्रयत्न का असाच काहीसा होतो. अगदी लहानपणी दूरदर्शनवरील हिंदी बातम्यात - एकदा, "भारत-चीन के बीचमे सीमाप्रश्न सुलझानेके लिये चेष्टा", असे काहीसे ऐकून गोंधळलो. मग समजले की चेष्टा म्हणजे प्रयत्न. आता वाटते सरीता सेठीस मराठीच "चेष्टा" म्हणायचे असावे... असो.
5 Mar 2009 - 9:00 pm | प्रकाश घाटपांडे
विडंबनातुन रोष ओढवू शकतात. तो ही समजुन घेतला पाहिजे. मात्र हा विडंबनकाराचा दोष समजायचा का हे मी मिपाच्या समृद्ध वाचकांवरच सोपवतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
5 Mar 2009 - 9:05 pm | नीधप
विडंबनकाराने आकस ठेवून केलेले विडंबन ओळखता येते. ते ओळखलं गेलंय आणि तिथेच घोळ झालाय.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
प्रतिसाद संपादित.
5 Mar 2009 - 9:17 pm | प्राजु
या धाग्यामध्ये वैयक्तिक टिका असणारे प्रतिसाद लिहून नयेत अशी सर्वांना विनंती करते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Mar 2009 - 9:35 pm | धनंजय
आपले स्वतःचे अनुभव आणि भारुडाचे आवर्तन - लेख चांगला उतरला आहे.
ज्यांची लेखकाशी आधीपासून ओळख आहे, त्यांच्यापैकी अनेकांना लेखन प्रामाणिक वाटले. (त्यांच्यापैकी मी आहे. याला एका दृष्टिकोनातून "कंपूबाजी" म्हटले जाऊ शकते, हे मान्य आहे; पण दुसर्या दृष्टिकोनातून "ओळख" असेही म्हटले जाऊ शकते.)
काही थोड्यांना वेगळा अनुभव आहे, त्यांना अप्रामाणिक वाटला असेल. तरी फारतर "एक चूहा खाके बिल्ली हजको चली" असे म्हणावे...
आपणापैकी कित्येक लोक आध्यामिकदृष्ट्या परिपूर्ण जन्माला येत नाही, थोडेफार बदलण्यासाठी झटत असतो. (विकास म्हणतात त्याप्रमाणे हिंदीतली "चेष्टा" करत असतो.) तस्मात् आपणा सर्वांना हजला जाण्यापूर्वी एक-दोन चूहे खाणे सामान्य असावे - "क्षम्य" आहे की नाही याबाबतीत प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवावरून ठरवेल.
(वर नीधप म्हणतात की ठळक नीकारांची प्रदीर्घ मालिका होती. बाकीच्यांच्या दृष्टीने ते एक उदाहरण मात्र ठरते. त्यामुळे चूह्यांचा हिशोब १ की १०० हे करणे कठिण आहे. तरी...) त्या एका अनुभवमालेचा जर वर्मी आघात झाला तर काहीच क्षम्य वाटणार नाही. पण साक्षेपाने विचार केल्यास क्षम्य वाटावे.
मराठी संकेतस्थळांच्या इतिहासात एकदोन शब्दांच्या "बूंदसे" सौजन्याची आबरू गेलेले हे लेखक प्रथम नाहीत. नंतर हौदभरून स्पष्टीकरणे दिलीत तरी दुखावलेल्या व्यक्तीला ती अप्रामाणिक वाटतात. काय करावे - चालायचेच.
हा लेख ते हौदभरचे स्पष्टीकरण होय. अकबर बादशहा एक थेंब वाचवायला गेला खरा. पण पुढेही तो खरोखरचा चिक्कू राहिला की नाही, ते प्रत्येकाने ठरवावे.
5 Mar 2009 - 9:39 pm | अवलिया
धनंजय यांच्या संपुर्ण प्रतिसादाशी सहमत.
--अवलिया
5 Mar 2009 - 9:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
घाटपांडे काकांचा लेख आवडला आणि विकासरावांचा प्रतिसादही!
काका, तुमच्या बिट्टूचं वर्णन वाचून मला आमची पांढरू मांजर आठवली. रोज आम्ही एकत्र जेवायचो; उन्हाळ्यात पंख्याखाली आणि इतर दिवसांत कंप्यूटर-चेअरवर कोण बसणार म्हणून भांडायचो आणि थंडीच्या दिवसात कधीतरी ती माझ्या पांघरूणात शिरून रात्री दीड-दोन वाजता उड्या मारायला लागायची.
(वर झालेल्या वादासंदर्भात किंचीतः नी आणि काका या दोघांशीही मी अधूनमधून गप्पा मारते. पण एकदा जाहीर विनंती: झालेलं विसरून जा, एकमेकांशी बोलायचं नसेल तर दुसर्याकडे दुर्लक्ष करा, अगदी समोरचा माणूस नाहीच आहे, त्याचं नाव नाहीच आहे असं! आणि माझा लहान तोंडी मोठा घास पटला नसेल तर मी काय बोलते तेही सोडून द्या; मी काही बोललेच नाही असं!)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
5 Mar 2009 - 10:01 pm | प्रकाश घाटपांडे
बिट्टूच्या स्मृतीनी मी खूप हळवा होतो. त्याला कावीळ झाली होती (संशय किंवा विडंबनाची नव्हे) उपाय थकले. २ फेब्रु २००८ ला त्याला डॉक्टरांनी वेदनाविरहीत मृत्यु दिला. मी डोळ्यातल पाणी थोपवण्याचा खुप प्रयत्न केला पण नाही जमलं. बायकोनी सावरल. चेष्टा मस्करी करणारा मिष्किल बिट्टू डोळ्यासमोर येतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
6 Mar 2009 - 12:27 pm | सखाराम_गटणे™
(वर झालेल्या वादासंदर्भात किंचीतः नी आणि काका या दोघांशीही मी अधूनमधून गप्पा मारते. पण एकदा जाहीर विनंती: झालेलं विसरून जा, एकमेकांशी बोलायचं नसेल तर दुसर्याकडे दुर्लक्ष करा, अगदी समोरचा माणूस नाहीच आहे, त्याचं नाव नाहीच आहे असं! आणि माझा लहान तोंडी मोठा घास पटला नसेल तर मी काय बोलते तेही सोडून द्या; मी काही बोललेच नाही असं!)
पुर्णपणे सहमत, सगळ्यात चांगली शांती हेच आहे. नाही तरी भांडुन काय उपयोग??
सगळ्यांनीच हे लक्षात ठेवायला हवे.
संपादक आदितीजींनी अगदी योग्य शब्द वापरले आहेत. पुर्वग्रहदुशीतपणा प्रत्येकाने टाळायला हवा. उगाच भांडणासाठी भांडण काय कामाचे???
प्रस्तुत लेखकाला मी व्यक्तीगतरीत्या ओळखतो. एकदम दिलखुलास माणुस आहे.
टिपः हा प्रतिसाद कोणालाही व्यक्तीगत नाही.
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
6 Mar 2009 - 12:22 pm | विनायक प्रभू
बै नी म्हट्ल्याप्रमाणे मागे एकदा मी केले. आता कसे शांत शांत आहे.
5 Mar 2009 - 10:12 pm | लिखाळ
लेख आवडला.. काही वेळा चेष्टा आपली करमणूक करते पण दुसर्याला दुखावते. मनात एक हेतू धरुन केलेल्या चेष्टेने समोरच्या माणसाच्या मनावर फार परिणाम होतो असा अनुभव आहे. चेष्टा करणार्याला अपेक्षित असा तो परिणाम असतोच असे नाही. अश्या वेळी दुसर्याची आधीची चूक काही असली (असे वैयक्तिक मत असले) तरी माघार घेणेच चांगले वाटते. तेच उमदेपणाचे आणि मोठेपणाचे वाटते. स्पष्ट बोलणे हे अनेकदा द्राविडी प्राणायामापेक्षा सरस ठरते असे वाटते. असो. (काय झाले याची नेमकी माहिती नसल्याने लहान तोंडी मोठा घास घेतला असे वाटले तर मोठेपणाने सोडून द्यावे.)
लेख छान आहे. भारुडही छान आहे.
हॉस्टेलवरच्या रॅगींग म्हणून केलेल्या चेष्टा एखाद्याचे भावविश्व/आयुष्य उधळुन टाकताना दिसतात.
भारूडामध्ये वर्णन केलेया भृगु, कीचक यांच्या कथा नक्की काय आहेत?
-- लिखाळ.
5 Mar 2009 - 11:00 pm | आनंद घारे
थट्टा, मस्करी, किडिंग वगैरे करणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. अगदी एक शब्द सुद्धा बोलू न शकणारे मूलसुद्धा आपल्याला खिजवते आणि आपण बुद्दू बनलेले पाहून मिश्किलपणाने हसते हे मी पाहिले आहे. मग आपण सुद्धा त्याला 'बदमाश', 'डँबिस', 'शैतान' वगैरे उपाध्या कौतुकाने देतो. कोणाकोणाला थट्टा आवडत नाही असे समजले तर त्या बाबतीत संयम बाळगावा नाहीतर मस्करीची कुस्करी होते हे प्रकाशरावांनी छान दाखवले आहे.
मी लिहिलेल्या लेखाचा मुद्दाम उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. त्यावर अनेक प्रतिसाद आले होते, पण त्यातल्या कोणीही 'चिडलेला स्थितप्रज्ञ' दिसला नाही. या लेखात मी केलेली मस्करी सर्व लोकांनी 'हं.घ्या.' या भावनेतून घेतली आहे असे दिसते. थट्टा करतांना त्यामागे कसलाही हेतू असल्याची शंका जर वाचकाला आली तर ती त्याला आवडत नाही. माझा तसा इरादा नव्हताच.
१ ते १०० उंदीर खाऊन हजला निघालेल्या मांजरीबद्दल मला कौतुकच वाटते. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर मांजरीला सुधारण्याची संधी कां मिळू नये? मी कहावतीतल्या बिल्लीबद्दल बोलतो आहे. मिपावर काय घडले याबद्दल मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
5 Mar 2009 - 11:35 pm | सुक्या
थट्टा, मस्करी, चेष्टा याशिवाय जगण्यातला बराच आनंद नाहीसा होइल. परंतु थट्टेला व ती करण्यार्याला स्थळाकाळाचे भान असावे.
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. लेख आवडला.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
6 Mar 2009 - 12:39 am | विसोबा खेचर
प्रकाशभावजींचा लेख चांगला आणि त्यावरील चर्चाही चांगली वाटली!
चालू द्या! :)
तात्या.
6 Mar 2009 - 10:07 am | प्रकाश घाटपांडे
या निमित्ताने स्वतः सकट सर्वांना आत्म व पर परिक्षणाची संधी मिळाली. चिडणे हे मानवी स्वभाव आहे. तो जर व्यक्त करता आला नाही मनातल्या मनात माणसे कुढत जातील. त्याचा निचरा होणे ही गरजेचे आहे. एखादा चिडत असेल तर लोक त्याला सारखे चिडवतात असे मी होस्टेलला शिकलो. मुलांच्या खेळात सुद्धा चिडका बिब्बा चिडला पाण्यात जाउन बुडला ही वक्रोक्ती हाच संदेश सांगतो. यातुन च माणुस घडत नी बिघडत असतो. जर आम्ही कोणाच्या कौतुकास पात्र असु तर रोषासही पात्र असण्याची तयारी असली पाहिजे. व्यक्तिमत्व विकासा साठी ते आवश्यकही आहे. बर्याच वेळा वाद नको म्हणुन संवादच नको ही भुमिका घेतली जाते. ती योग्य का अयोग्य या वादात जाउ इच्छित नाही. तो एक स्वतंत्र धागा होउ शकतो. संवेदनशील मनाला शब्दांनी झालेल्या जखमा भरुन येत नाहीत. विवेकाधारे थोडीफार मलमपट्टी करता येते.
प्रत्येक व्यक्तित काही ना काही 'दोष' धर्मित गुण वा 'गुण' धर्मित दोष असतात. (धर्मित चा अर्ध गर्भित घेतला तरी चालेल) तस संकेतस्थळांचे ही आहे. एखादी विवक्षित बाब एका संकेतस्थळावर दोष असेल तर दुसर्या संकेतस्थळावर तीच बाब गुण ठरु शकते. यांचे मिश्रण असेल तर नीर क्षीर विवेकाने ते वेगळे करता येते पण त्याचे संयुग बनले तर मात्र ते तसेच स्वीकारावे / नाकारावे लागते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
6 Mar 2009 - 10:56 am | विसुनाना
हे एकदम पटले.
एखाद्या व्यक्तीला दुसरी व्यक्ती जितकी 'आपली' वाटते तितकी त्या दुसर्या व्यक्तीला पहिली व्यक्ती 'आपली' वाटेल याची ग्यारंटी नाही.
6 Mar 2009 - 11:24 am | परिकथेतील राजकुमार
गंमतच चालु आहे की एकुण....
च्यायला आम्ही पडलो वयानी लहान, त्यातुन आम्ही आमच्याहुन लहान असलेल्या विनायक पाचलग अका कोदा ह्याची जाता येता यतेच्छ टिंगल करतो, अगदी त्याचे लेख, खरडी ह्यांचे सुद्धा विडंबन करतो आणी त्यालाच पाठवतो, पण त्या बिचार्यानी आत्तापर्यंत तरी खुप मनावर घेतले आहे किंवा मनाला लावुन घेतले आहे असे जाणवले नाही :) उलट परत आमच्या खव मध्ये येउन त्रास देउन जातो मेला [;)] नाहि ना आवडले पुन्हा मी लिहिलेले ? मग आता काय लिहु तुच सांग म्हणतो ! बर आम्ही किती निर्लज्ज ? आम्ही त्याला तु आता ६ महिने काहि लिहु नको म्हणतो आणी तो शहाणा लगेच पुढच्या १० मिनिटात 'मनाची कुपी' उघडुन आम्हाला वाकुल्या दाखवतो ;) एकुणच आमचे संबंध हे साप मुंगुस पातळीवरचे असावेत असा प्रत्येकाचा समज होईल, पण एकमेकांना धोबीपछाड मारणे ह्या पेक्षा जास्ती आम्ही ते कधिच वैयक्तीक घेतले नाहित :) तुम्ही लोक वयानी अनुभवानी आमच्या पेक्षा जेष्ठ आहात, मी तुम्हाला काय अगाध ज्ञान देणार ? वरच्या ओळी / अनुभव ह्या कोणालाही उपदेश करण्यासाठी नसुन फक्त वैयक्तीक अनुभव दिला आहे.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
6 Mar 2009 - 11:29 am | बेसनलाडू
मराठी संकेतस्थळांवरची थट्टा, खिल्ली वगैरे जे काही म्हणाल ते काडीमात्रही किंमत देण्याच्या लायकीचे नसते/नसावे,असे वाटते. हे लगेच कळत नाही (निदान मला तरी लगेच कळले नव्हते; वावरून, अनुभवावरून कळले). यावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे दुर्लक्ष. सगळ्यांनाच ते करणे जमते असेही नाही; काही रोखठोक बोलून दाखवतात. ठीकच आहे. पसंद अपनी अपनी, ख्याल अपना अपना.
अशा थट्टांमध्ये निखळपणा क्वचित असतो; विषारीपणा अनेकदा असू शकतो, हे आजवरच्या मराठी संकेतस्थळांवरील वावरातून अनुभवायला मिळाले आहे. आणि अगदी मराठी संकेतस्थळांवरच झालेल्या काही ओळखींमधून नि मैत्रीमधून होणारी थट्टामस्करी विखारी नसते, हेही अनुभवायला मिळाले. मुळात अशा ओळखींमधून, परस्पर संवादातून नि मैत्रीतून दुसर्या व्यक्तीबद्दलचे आणि मुख्य म्हणजे तिच्या सहनशीलतेबद्दलतेचे (टॉलरन्स्) आडाखे अधिक चांगल्या प्रकारे बांधता येतात नि पूर्वग्रह दुरुस्त करता येतात; आणि कदाचित यामुळेच फरक पडत असावा.
(अनुभवी)बेसनलाडू
कोणताही पूर्वसंदर्भ लक्षात न घेता, पूर्वग्रह न ठेवता त्रयस्थपणे वाचल्यानंतर लेखातील मुद्दे पटले.
(वाचक)बेसनलाडू
6 Mar 2009 - 11:33 am | आनंदयात्री
असेच म्हणतो.
बेलाने आमच्या मत अगदी करेक्ट मांडले आहे.
6 Mar 2009 - 11:34 am | छोटा डॉन
आख्ख्या प्रतिसादाशी सहमत ...
अवांतर :
बर्याच दिवसांनी/महिन्यांनी खास बेला स्टाईल भरपुर कंस्/विरामचिन्हे/शक्यता/तर्क वापरलेला त्याचाच अतिशय समर्पक/अभ्यासपुर्ण प्रतिसाद वाचायला मिळाला.
तो जे काही (भलेबुरे) सांहतो आहे त्याच्याशी ( कमीत कमी मी तरी ) सहमत आहे/असेन.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
6 Mar 2009 - 7:21 pm | मुक्तसुनीत
बेलाशी पुन्हा एकदा सहमती.
बेलाशेट , तुमच्यासारख्या लोकांनी येऊन लिहीत रहायला पाह्यजे हे आम्ही तिन्हीत्रिकाळ म्हणतो त्याचे कारण हेच :-)
6 Mar 2009 - 1:01 pm | राघव
आवडला.
श्री एकनाथ महाराजांचे भारूडही छान. धन्यवाद :)
नीरजा ताई,
लेख भरकटू नये यासाठी आपल्या खरडवहीत लिहिले आहे. पटले तर घ्यावे नाही तर सोडून द्यावे.
मुमुक्षु
7 Mar 2009 - 10:30 am | प्रदीप
छान लिहीले आहे आपण, प्रकाश. असेच लिहीत रहा.
7 Mar 2009 - 10:33 am | सहज
लेख व काही प्रतिसाद चिंतन करण्याजोगे.