तू.
कधी कधी तुला वाटेल
की तुझ्या अंतरंगात असंख्य तारका आहेत
आणि तू उजळून निघाला आहेस
डोळे दिपवणा ऐवढा
कधी तुला असही वाटेल
की तू अशक्यप्राय लहान आहेस
आणि तुझ संपूर्ण शरीर सामावल आहे
दोन अणू मधल्या विश्वात
परत कधीही न दिसण्यासाठी
बरं तुला असही वाटू शकत
की तू कागदी खेळण आहेस
काळजीपूर्वक बनवलेलं पण सहज विस्कटणार
एवढं नाजूक की स्पर्श करायला ही भीती वाटेल
कधी कधी तुला असही वाटेल
की एखाद्या ग्रहाला थोपवण्याची ताकद
तुझ्या प्रत्येक पेशीत आहे
आणि सामर्थ्य आहे हे विश्र्व उल्थवण्याच
आणि हे वाटण साहजिकच आहे
कारण तू बनलाय स त्याच उर्जेतून
त्याच अनुरेणुतून
आणि त्याच तुटू शकणाऱ्या हाडांतून
ज्यातून हे विश्व बनलय
कारण तू तेवढा जिवंत आहेस
माणूस समजण्याऐवढा......
प्रतिक्रिया
25 Jan 2018 - 2:23 pm | जव्हेरगंज
कडक!!!
26 Jan 2018 - 12:36 am | चुकार
धन्यवाद
26 Jan 2018 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उच्च कविता...!
-दिलीप बिरुटे
26 Jan 2018 - 7:53 pm | चुकार
धन्यवाद प्राध्यापक.....
27 Jan 2018 - 11:38 am | दुर्गविहारी
उत्कॄष्ट रचना !!!! मला "त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तु आहेस का?", या कवितेची आठवण झाली.
28 Jan 2018 - 10:05 am | चुकार
तुम्ही सांगितलेली कविता मी वाचली नाही..... पण वाचेन आता.
प्रतिसादा बद्दल धनयवाद