ती त्सुनामी...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
27 Nov 2017 - 10:13 am

सागराच्या गहनगर्भी ती अचानक प्रकटते
मोडुनी दिक्काल तिथले, ती पुन्हा ते सांधते
वितळणारा तप्त लाव्हा प्राशुनी ती झिंगते
गूढ अंध:कार तिथला ढवळुनी फेसाळते
गाज दर्याची चराचर भेदुनी रोरावते
व्यापते भवताल अन मग ती अनावर उसळते
आतले सगळे किनारी ओतुनी आक्रंदते

प्रलयतांडव ती त्सुनामी
आतले उधळून जाते
साचले सांडून जाते
घडविले उखडून जाते
वेचले विखरून जाते
मांडले मोडून जाते

....ती त्सुनामी विप्लवी
पण केवढे शिकवून जाते !

माझी कविताकवितामुक्तक

प्रतिक्रिया

गबाळ्या's picture

28 Nov 2017 - 1:17 am | गबाळ्या

पृथ्वीच्या मनातील खदखद सुनामीरुपे उफाळून येते, ती आक्रंदुन काही तरी सांगू पाहते ही कल्पना खूप आवडली.
तिचे दुःख, तिची अफाट शक्ती, रौद्र रूप, घडणारा विनाश आणि त्याच बरोबर घडणारे नवनिर्माण यांची उत्तम सांगड घातली आहे.

अनन्त्_यात्री's picture

28 Nov 2017 - 10:09 am | अनन्त्_यात्री

धन्यवाद.