तुझ्या भावनांची शपथ आहे (कविता) - सागर

सागर's picture
सागर in जे न देखे रवी...
7 Feb 2008 - 4:01 pm

तुझ्या भावनांची शपथ आहे
नाहीतर शब्दांचे हे बंध कधीच मी मानीत नाही

आज तू मला रोखले आहे
नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही

आज तुझा आधार आहे
नाहीतर कोसळल्यावर मी कधीच सावरत नाही

म्हणूनच सखे, आपला संग आहे
तुझ्या असण्याची मला किंमत आहे
नाहीतर तसा मी कोणासाठी सैरभैर होत नाही ...

- सागर
०७-०२-२००८ दुपारी ४.०० वा.

कविताप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

7 Feb 2008 - 7:12 pm | स्वाती राजेश

छान प्रयत्न आहे.
ओळी खुपच मस्त आहेत.
अर्थ सुद्धा छान आहे.

सागर's picture

7 Feb 2008 - 7:45 pm | सागर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद स्वाती,

खरेतर कविता खूप छोटी आहे. आज सहजच हे शब्द हृदयांत उमटले आणि लिहिले गेले. ..एवढेच...
अजून वेळ देऊन ही कविता केली असती तर अजून मोठी झाली असती... पण हृदयांत उमटलेल्या शब्दांना मग किंमत राहीली नसती.
म्हणून जशीच्या तशी टंकीत केली....

तुम्हाला मनापासून धन्यवाद
सागर

शैलजा's picture

7 Feb 2008 - 8:08 pm | शैलजा

छान आहे.आवडले.

सागर's picture

8 Feb 2008 - 10:59 am | सागर

शैलजा,
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद
- सागर

प्राजु's picture

8 Feb 2008 - 12:07 am | प्राजु

छान आहे..
खरंच.. खूप आवडले.

- प्राजु

सागर's picture

8 Feb 2008 - 10:59 am | सागर

प्राजु,

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद

- सागर

धनंजय's picture

8 Feb 2008 - 1:36 am | धनंजय

पण एक कडवे बाकीच्यांच्या संदर्भात कळले नाही :

> आज तू मला रोखले आहे
> नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही

कवीची सखी भावनांची शपथ देणारी, आधार देणारी, संग देणारी आहे. तिचा "रोखले नाही तर" न पटण्यासारखा काय दुरावा आहे?

सागर's picture

8 Feb 2008 - 10:58 am | सागर

ही कविता लिहिताना प्रियकराची अवस्था अशी आहे की तो प्रियेपासून दूर आहे आणि प्रियेच्या आठवणीने व्याकुळ आहे.
प्रियकर हा कर्तव्यांमध्ये अडकलेला असताना, तो अधीर मनाने प्रियेकडे येऊ पहात आहे. पण प्रियेने शपथ दिली असल्याने होणारा
थोडा विरहही प्रियकराला असह्य होत असतो...आहे.....तो स्वतःची नाराजी व्यक्त करत आहे.....

अशी पार्श्वभूमि आहे या ओळींची.... मला वाटते... आता पुढच्या काव्यपंक्तींशी या ओळी वेगळ्या न वाटता सुसंगत वाटतील....
धन्यवाद
सागर

वरदा's picture

9 Feb 2008 - 12:06 am | वरदा

छान आहे...खूप आवडली..

प्रतिसादाबद्दल धन्यवाद वरदा

असाच लोभ ठेवावा

- सागर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2008 - 10:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रिय मित्र सागर,
दुदैवाने आपल्याच एका कवितेवर काथ्याकूट करायची ही दुसरी वेळ त्याबद्दल क्षमस्व.
खरे तर दिसली कविता, आंणि ज्यावर लिहावे वाटले की त्यावर आम्ही ब-याचदा, मस्त, लै भारी, आवडली, असा सहज प्रतिसाद देऊन मोकळे होतो. पण वरील कवितेवरील प्रतिसाद वाचल्यानंतर एक गोष्ट आम्हाला समजली ती ही की, कवितेचा अर्थ निघतोय आणि तो आम्हाला का समजत नाही. तसे आपण एका प्रतिसादात धनंजय यांच्या प्रश्नाच्या उत्तरात----

प्रियकराची अवस्था अशी आहे की तो प्रियेपासून दूर आहे आणि प्रियेच्या आठवणीने व्याकुळ आहे.
प्रियकर हा कर्तव्यांमध्ये अडकलेला असताना, तो अधीर मनाने प्रियेकडे येऊ पहात आहे. पण प्रियेने शपथ दिली असल्याने होणारा
थोडा विरहही प्रियकराला असह्य होत असतो...आहे.....तो स्वतःची नाराजी व्यक्त करत आहे.....

असे म्हटले आहे. आमच्या एका मित्राने आम्हाला अर्थ विचारल्यावर आम्ही त्यांना सांगितले की आवडत्या व्यक्तिने आयुष्यात मार्गदर्शन केले, तर जीवनाला योग्य दिशा मिळते. त्यासाठी भरकटलेल्या प्रियकराला किंवा भरकटण्यापासून ती अडवते आहे. खरे तर प्रत्येक ओळीनंतर येणा-या दुस-या ओळीचा संदर्भ निटसा लागत नाही.
जसे, नाहीतर शब्दांचे हे बंध कधीच मी मानीत नाही, नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही,नाहीतर तसा मी कोणासाठी सैरभैर होत नाही ...

आता आमच्या मित्राचा प्रश्न..........!!!
ते म्हणतात की त्यासाठी आईवडीलांचे संस्कार नाही का त्याला उपयोगाचे ? कवीचे स्वत:वरच प्रेम आहे असे वाटते ? तु आहे म्हणुन ठीक नाय तर आम्ही कोणाला भाव देत नाही ? प्रेअसी प्रियकराला कशी रोखू शकते, प्रेम तर आहेच ना ? काही कारण असेल तेव्हाच ना ?

सागरला प्रश्न,
ती का रोखतेय ? एक तर काहीतरी अनपेक्षीत घडेल म्हणुनच ना ? बरे असे काय करायला निघालाय नायक की, ती त्याला थांबवतेय .
एक मग्रुर व्यक्ती ,तिच्या रोखण्याला तु तरी काय नाव घेशील म्हणुन तिचे ऐकतोय. कवीला काय अभिप्रेत होते ?

अवांतर :- आपली कविता आम्हाला आवडते म्हणुन अधिक खूलासा होईल म्हणुन आम्ही आपणास हक्काने विचारतो.
आमच्या प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजेत असेही काही नाही.

स्नेहांकित
दिलीप बिरुटे

दिलिपराव,

एवढ्या हक्काने आणि प्रेमाने माझ्या कवितेबद्दल लिहिलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
डॉक्टरसाहेब, तुमचा हक्कच आहे तो.... आणि जवळचे आणि आपले माणूसच असा हक्क वापरते...उलट मला आनंदच आहे की माझ्या कविता आवडीने वाचून मला तुम्ही त्यामागची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहात..

खरेतर मी कवितेची पार्श्वभूमि अजून स्पष्ट करायला हवी होती....

तर प्रियकर प्रेयसीपासून नुसता दूरच नाही तर कर्तव्यांनीदेखील बांधला गेला आहे.
प्रियकराला त्याच्या प्रियेला भेटायला यायचे आहे. पण प्रेयसी त्याला स्वत:ची शपथ देऊन थांबवत आहे.
कारण प्रेयसी फक्त स्वतःचा आणि प्रियकराच्या अधीरतेचा विचार नाही करत.
प्रेयसी खूप विचारी आहे. समजूतदार आहे.
प्रेयसीला माहीत आहे की प्रियकराची कर्तव्ये आणि जबाबदार्‍या अधिक आहेत.
आणि तिच्यामुळे प्रियकराचे जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी ती प्रसंगी कठोर होऊन प्रियकराला शपथ देत आहे

आणि प्रियेवर अतिशय प्रेम असल्यामुळे प्रियकर प्रियेची शपथ मोडू शकत नाही . पण प्रियेला भेटण्याची व्याकुळता प्रियकराच्या शब्दांतून व्यक्त होत आहे. नाहीतरी प्रियकर कुठे भावना व्यक्त करणार?

अशी या कवितेची पार्श्वभूमि आहे

मला वाटते आता कविता समजण्यास अवघड पडू नये...
दिलीपराव आज मला तुमच्यामुळे एक गोष्ट शिकायला मिळाली...त्याबद्दल आपला खूप आभारी आहे...

नुसती कविता लिहून देण्यापेक्षा प्रत्येक कवीने त्या कवितेमागची पार्श्वभूमि थोडक्यात स्पष्ट केली तर कवितेची गोडी अधिक वाढेल असे मला वाटते... तेव्हा सर्व मिसळपावी कवी/कवयित्रींना हीच विनंती करतो की त्यांनीही असे करावे....

आता आमच्या मित्राचा प्रश्न..........!!!
ते म्हणतात की त्यासाठी आईवडीलांचे संस्कार नाही का त्याला उपयोगाचे ? कवीचे स्वत:वरच प्रेम आहे असे वाटते ? तु आहे म्हणुन ठीक नाय तर आम्ही कोणाला भाव देत नाही ? प्रेअसी प्रियकराला कशी रोखू शकते, प्रेम तर आहेच ना ? काही कारण असेल तेव्हाच ना ?

तुमच्या मित्राचा प्रश्न आजकालच्या प्रत्येक आई - वडीलांच्या (आणि माझ्याही )मनातला प्रश्न आहे.
हा खरे तर संस्कारांचा प्रश्न नाहीये...
पण प्रेम हे प्रेम असते... एवढेच म्हणू शकतो.... त्यामुळेच तर सगळ्या जगाचा विरोध पत्करुनही प्रियकर आणि प्रेयसी एक होतात ना?
प्रेमाला कशाचीच तमा नसते... कारण प्रेमात ध्येय एकदम स्पष्ट असते... एकत्र होणे....
पण माझ्या कवितेतली प्रेयसी खूप समजूतदार आहे... त्यामुळेच असे शब्द प्रियकराच्या हृदयांत उमटले...

मनापासून खूप खूप धन्यवाद
(हर्षोल्ल्हासित) सागर

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 9:59 pm | सुधीर कांदळकर

पण डॉ. बिरुटे साहेबांची प्रतिक्रिया वाचून वाटले की गुगली होता.

आज तू मला रोखले आहे
नाही तर तुझा दुरावा मनाला पटत नाही

म्हणूनच सखे, आपला संग आहे
दुरावा व संग एकाच वेळी कसे काय?

खरे तर मला कविता कळत नाही. सुरुवातीला छन वाटली. परंतु प्रतिक्रिया वाचून जिज्ञासा जागृत झाली. पण कविता खरोखर छान आहे हो. माझ्या पामराच्या शंकेला भिऊ नका. अजून येऊंद्यात.

सुधीरकाका,

माझी कविता आवडीने वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
नुकताच मी दिलिपरावांच्या प्रश्नाला प्रतिसाद देताना कवितेमागची पार्श्वभूमि स्पष्ट केली आहे.
कृपया ती वाचून पुन्हा एकदा कवितेचे अवलोकन करावे ही विनंती.

संग आणि दुरावा या परस्परविरोधी गोष्टी वाटतात खर्‍या... पण संग आहे म्हणूनच दुरावा आहे..
संग जो आहे तो मनाचा आणि कायमचा अभिप्रेत आहे.
आणि दुरावा आहे तो तात्पुरता आहे... पण प्रियकराच्या भावना अधिक स्पष्ट व्हाव्या यासाठी या विरोधाभासाचा वापर केला आहे.

काका, माझ्या कविता आवडीने वाचून तुम्ही नेहमी प्रोत्साहन देत असता. तुम्ही, दिलीपराव आणि तुमच्यासारख्या अनेक हितचिंतकांमुळेच
मलाही हुरुप वाढून अधिकाधिक कविता करण्यासाठी स्फुरण येते

पुनश्च धन्यवाद
सागर