याद किया दिल ने

sayali's picture
sayali in जनातलं, मनातलं
27 Oct 2017 - 4:58 pm

पु.ल यांनी इटलीतल्या सोरेन्तो गावातल्या समुद्राच्या निळाईच वर्णन करताना लिहिलं आहे.
हूरहूरत्या सांजेचं ते सौंदर्य बघताना जर चांगला पुरिया धनश्री ऐकायला मिळता तर न जाणो आनंदाने कोंदल्यामुळे माझ्या प्राणांनी कुडीचा निरोप घेतला असता.
तसा अनुभव लडाखचा पंगॉंग लेक बघितल्यावर आला. एखाद्या सरोवरत आल्यासारखे वाटले. विशाल असा निळाशार लेक दिसला त्याला चार शेड्स होत्या. हिरवा, राखाडी, फेंट निळा आणि डार्क निळा. थंडी व वारा झॉंबत होते. देवाच्या करणीने क्रुतद्न्यता दाटून आली.
कॅण्टीन मधील चायनीस पदार्थ रासना तृप्त करत होती. तेवढ्यात पन्चेन्द्रियान्ना तृप्त कॅरणारी दूर रेडिओ वर लागलेली लताबाईनची ओ....ओ.....ओ...., कही दीप जले कही दील.... ही लकेर ऐकू आली. जीवाचे कान करून आम्ही दोघांनी गाणे ऐकले. असेच आनंदातीरेकाने स्तब्ध होऊन अद्न्यात शक्तिपुढे आम्ही नतमस्तक होत होतो.

मौजमजाप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

तुम्ही आठ ओळी लिहिल्या आहेत त्यातल्या २ पुलंच्या लिखाणातल्या आहेत. एवढ्या लहान लिखाणातून काही फार पोचत नाही असे वाटते. दीर्घ लिहाल तर निश्चित काही तरी प्रत्यय येऊ शकेल.

तुमचे म्हणणे बरोबर आहे. दीर्घ लिहिणार.....

तिथल्या कॅण्टीन मधील चहाही मस्त असतो .

होय... चहा तर वातावरणाची लज्जत आणखी वाढवतो...

थोडे सविस्तर लिहायला घ्याच, ज्यांना त्या गाण्यातील मर्म कळू शकते अश्या थोडक्यात व्यक्तीमध्ये तुम्ही देखील असाल ही अपेक्षा.

आपली अपेक्षा फोल ठरणार नाही ही खात्री देते...

चांदणे संदीप's picture

31 Oct 2017 - 4:26 pm | चांदणे संदीप

आणि तो पहा समोर डोळा...... पक्ष्याचा (इथे, लेखनाचा) ;)

Sandy

हो......येथे द्रोणाचार्य अनेक आहेत.

तिमा's picture

27 Oct 2017 - 11:52 pm | तिमा

त्या लेकच्या पाण्याचा रंग, आकाशातल्या ढगांवर अवलंबून असतो. स्वच्छ निळं आकाश असेल तर निळा असतो, ढग आले तर निरनिराळ्या छटा दिसतात. त्याशिवाय, तिथे जाण्याचा रस्ताच किती रोमांचकारी आहे. त्याबद्दलही लिहा.

नक्की...बरेच काही लिहीण्या सारखे आहे...नव्याने लिहिणार....
आपणा सर्वांना धन्यवाद.....