व्हीस्की आणखी रम यातुनी, कोण आवडे अधिक तुला?

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in जे न देखे रवी...
6 Feb 2008 - 9:56 pm

सांग मला रे सांग मला
व्हीस्की आणखी रम यातुनी, कोण आवडे अधिक तुला?

व्हीस्की दिसते गोजिरवाणी, थोडा सोडा थोडे पाणी
बर्फ टाकूनी मजेत प्यावी, ग्लास भिडवूनी ग्लासाला
व्हीस्की आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते व्हीस्की, परंतु असते भलती रिस्की
सकाळ होता डोके चढते, जाउ न देई कामाला !
आवडते रे रम मला !

काळी, सावळी असते रम, थंडीमध्ये करी गरम
कोल्यामध्ये मिसळूनी घेता, कळे न काही कोणाला
रम आवडे अधिक मला!

थंडीमध्ये करी गरम, नशेत नसतो काही दम
व्हीस्की पिता विमान उडते, सुसाट जाई आभाळा
व्हीस्की आवडे अधिक मला !

व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते
व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला
व्हीस्की आवडे अधिक मला !

'तशी'च घेता रात्री भाई, थंडी वारा लागत नाही
सुखे बायको झोपे म्हणूनी, पुण्य लाभते पाप्याला !
रम आवडे अधिक मला !

नकोच रम, नकोच व्हीस्की, मदिरेहूनही विवाद रीस्की
थंडगार चल बियर पिऊ, काठोकाठ भरू प्याला!
बियर बरी तब्येतीला!

-अविनाश ओगले

विडंबनअनुभव

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Feb 2008 - 10:13 pm | ब्रिटिश टिंग्या

ओगलेशेठ, मान गये आपको......खुपच छान.....
बाकी जशी आईला सगळी मुलं सारखी तसे मला सुद्धा हे सगळे प्रकार एकसारखेच.....
म्हणजे उगाच भेदभाव नको...कसे?
आपला,
-(सगळ्या मदिरा आवडणारा) छोटी टिंगी

विकास्_मी मराठी's picture

6 Feb 2008 - 10:36 pm | विकास्_मी मराठी

िव्कास०१५४
नकोच रम, नकोच व्हीस्की, मदिरेहूनही विवाद रीस्की
थंडगार चल बियर पिऊ, काठोकाठ भरू प्याला!
बियर बरी तब्येतीला!

अिवनाश भाउ .....मस्त रे....

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Feb 2008 - 10:51 pm | llपुण्याचे पेशवेll

अविभाऊ कविता बाकी मस्तच जमली आहे हो....जसे रममधले कोकचे , जिनमधे लिम्काचे प्रमाण जमावे तसे.

असुरावादी..
डॅनी..
पुण्याचे पेशवे

नन्दु's picture

6 Feb 2008 - 11:01 pm | नन्दु

अविकाका
कविता खरच मस्त आहे
व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते
व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला
खरे आहे[स्व आनुभव नहि पन ऍकिव आहे]
---शेडेफळ नन्दु

विसोबा खेचर's picture

7 Feb 2008 - 1:24 am | विसोबा खेचर

व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते
व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला
व्हीस्की आवडे अधिक मला !

वा वा! क्या केहेने ओगलेसाहेब!

वरील ओळी खासच!

सुंदर काव्य!

आपला,
(ग्लेनमोरांजी प्रेमी) तात्या.

मूळ गाण्याची लिंक इन्सर्ट कशी करावी? मी केलेला प्रयत्न अयशस्वी. तात्काळ मार्गदर्शनाची अपेक्षा. नवोदित असल्याने थोडी सविस्तर.

रविराज's picture

7 Feb 2008 - 2:00 am | रविराज

समझदारोंको इशारा काफी है!!!

- रविराज.

तळीराम's picture

7 Feb 2008 - 7:08 am | तळीराम

ओगले सरकार, खूप दिवसानी मनातले एक जुने गाणे जागवलेत. शाळेच्या गॅदरींगमध्ये हे अभिनय गीत हमखास असायचेच. मूळ गाणे वाचायची खूप इच्छा झाली. विडंबन अप्रतिम.

ओल्डमंक's picture

7 Feb 2008 - 7:18 am | ओल्डमंक

कुठे मिळेल?

ओल्डमंक's picture

7 Feb 2008 - 7:22 am | ओल्डमंक

मिळाले

धोंडोपंत's picture

7 Feb 2008 - 10:34 am | धोंडोपंत

हा हा हा हा हा हा हा,

पंत,

हसून हसून पुरेवाट. अप्रतिम विडंबन. क्या बात है!!!

अजून येऊ द्यात.

आपला,
(व्होडकाप्रेमी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धमाल मुलगा's picture

7 Feb 2008 - 11:45 am | धमाल मुलगा

व्हीस्की दिसते गोजिरवाणी, थोडा सोडा थोडे पाणी
बर्फ टाकूनी मजेत प्यावी, ग्लास भिडवूनी ग्लासाला
व्हीस्की आवडे अधिक मला !

अविनाशराव, व्हीस्कीच आवडे अधिक मला ! :)

एकुणच झक्कास...

बाकी, काय हो, आम्हाला क॑टाळा येतो ना नेहमी नेहमी त्याच त्या प्रतिक्रिया द्यायचा. आता काय म्हणाव॑ तुम्हाला, सतत आपल॑..झकास, फर्मास, सु॑दर, अप्रतीम..कस॑ काय त्याच त्या पद्धतीच॑ लिहिता येत॑ हो?

साहित्यातली कविता तर ला॑बच, कविता नावाची एखादी मुलगी असेल तर तीही आमच्यापासून चार हात ला॑बुनच जाते, काय सा॑गायच॑?

असो,
आपला
- ('शिक्षका॑ची' मनापासून आवडणारा) ध मा ल.

केशवसुमार's picture

7 Feb 2008 - 1:23 pm | केशवसुमार

ओगलेशेठ,
अप्रतिम विडंबन. क्या बात है!!!
अजून येऊ द्यात.
केशवसुमार.

अवांतर, विडंबनात ज्या काही मिश्रणां बद्दल लिहिले आहे त्याचा आस्वाद घेऊ शकलो नाही
(लिंबूपाण्यात सोडा घालून पिणारा) केशवसुमार

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 9:16 pm | सुधीर कांदळकर

नाही. आपली प्रतिक्रिया कवितेतच पाहिजे.

मनस्वी's picture

7 Feb 2008 - 1:48 pm | मनस्वी

वा अविनाश क्या बात है!

====================

संत्ररसात मिसळूनि जाइ

व्होडका आवडे अधिक मला!

(मिल्कमेड पल्पी ऑरेंज आवडणारी) मनस्वी

वाह, क्या बात है ........
"संत्ररसात मिसळूनि जाइ

व्होडका आवडे अधिक मला!"

यालाच काही "उच्चमध्यमवर्गीय" कॉकटेल "स्क्रू ड्रायवर" म्हणून पितात ....

पण माझ्या मते जेव्हा "व्हिस्की" ची पूर्ण एक "क्वार्टर" रिचवल्यावर मग "व्होडक्याचा" आस्वाद घेणे योग्य आहे.
त्यानंतर अशी सॉलीड "किक" बसते की विचरू नका .......
यालाच आम्ही गावठी "कॉकटेल" म्हणतो ...........

[ व्हिस्की + सोडा + व्होडका + संत्रेरस ] प्रेमी - छोटा डॉन ...

ॐकार's picture

7 Feb 2008 - 3:19 pm | ॐकार

:)
विडंबन मस्त आहे. मी व्हीस्की समर्थक!

ओल्डमंक's picture

10 Feb 2008 - 8:56 pm | ओल्डमंक

झकास विडंबन आहे. एकदम चढले. आम्ही रमवाले. नावच ओल्डमंक. सोड्याचा कंटाळा आला तर रममध्ये बिअर घालतो. व्हीस्की अजिबात चालत नाही. एक्स सर्व्हीसमन असल्याने असेल कदाचित.

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 9:15 pm | सुधीर कांदळकर

एकट्याने पिण्यात मजा नाही. म्हणून मित्रांनाही ऑफर केली. आणखी येऊद्यात. आता केशवसुमारहि याचे विडंबन करतीलच. मजा येईल.