कंगना राणवतची मुलाखत आणि भारतीय स्त्रीवाद

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
5 Sep 2017 - 10:52 pm

सध्या संपूर्ण देशामधे कंगना राणावतच्या मुलाखतीच्या निमित्ताने वादविवाद आणि चर्चा सुरू आहेत. स्पष्ट सांगायचं तर एखादी महिला पुढे येऊन आपल्या आयुष्यातल्या वादग्रस्त भागावर प्रकाश टाकते तेव्हा अनेक शौकिनांना चघळायला एक विषय मिळतो.
पण शौकीन स्पष्टपणे ते कसे मान्य करणार. अनेकांनी स्त्रीवादाचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा, स्त्रीमुक्तीचा बुरखा घेऊन कंगना राणावत या व्यक्तीच्या कौतुकाला सुरुवात केलेली आहे.

.

टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीमधे वडिलांच्या वयाच्या, ज्येष्ठ असलेल्या एका माणसाने आपल्याला कसा त्रास दिला, आपल्याला घरामधे कसे डांबून ठेवले याचा खुलासा ती करते. ती स्पष्टपणे त्या व्यक्तीचे नाव घेऊन बोलते. या धाडसाचे खरोखर कौतुकच आहे. पुढे ती असेही सांगते की त्या माणसापासून सुटका करून घेण्यासाठी तिने पहिल्या मजल्यावरून खिडकीतून उडी मारली. यामुळे शारीरिक दुखापत झाली. त्यानंतर तिने एका हॉटेलच्या रुमचा आश्रय घेतला पण हा मनुष्य तिथेदेखील पोचला. अखेर पोलिसांची मदत घेऊन तिने स्वतःची सुटका करून घेतली.

या सर्व मुलाखतीमधे ती अनेक पुरुष अभिनेत्यांना झोडपते. त्यामधे ऋतिक रोशनचाही समावेश होतो. मुलाखतीमधे त्याच्याबरोबर असलेल्या आपल्या नात्याबद्दल ती बोलते. आपण त्याला फोन करत असू. मेलदेखील पाठवत असू. हे ती सांगते. आजही त्याने एकदा तरी आपल्या समोर येऊन आपल्याशी स्पष्टपणे बोलावे, अशी अपेक्षा ती व्यक्त करते. भले त्याला इंटरेस्ट नसेल पण आजही आपण त्याची प्रतीक्षा करतो आहोत, सात वर्षे आपले त्याच्याबरोबर अफेअर होते. हे ती अत्यंत खुलेपणाने मान्य करते. या धाडसाबद्दल तिचे कौतुकच आहे कारण एवढेही धाडस अनेकांच्या, अनेकींच्या अंगी नसते.

राहता राहिला प्रश्न केवळ स्त्री आहे म्हणून तिचे कौतुक करणार्‍या तिच्या चाहत्यांचा. तिचे कौतुक करणारे लोक आपली मुलगी अशाच प्रकारे वागली तर अशाच उदार मनाने कौतुक करू शकतील का !
आपल्यावर काहीतरी अन्याय झाला आहे आणि अत्यंत धाडसाने आपण त्या अन्यायाच्या विरोधात उभे राहिलेलो आहोत. असा तिचा अभिनिवेश आहे. यातून ती देशभरातल्या महिलांना आणि मुलींना काही संदेश देण्याची भूमिका घेते.
पण काही गोष्टी मात्र तितक्याशा स्पष्ट होत नाहीत. म्हणजे ऋतिकच्या विरोधात बोलणारी कंगना राणावत आजही त्याने आपल्या समोर यावे अशी अपेक्षा व्यक्त करते. त्यावेळी तिच्या बोलण्यामधे कंप असतो. आपण एका वेगळ्या भावनिक अवस्थेमधे असताना त्याला अनेक मेल्स पाठवल्या. त्याच्यावर शेरोशायरी देखील केली. हे ती सांगते याचा अर्थ आजही ती त्याच्यात तेवढीच गुंतलेली आहे, हे जाणवते. आपले त्याच्या बरोबर सात वर्षे अफेयर होते हे ती सांगते. याचा अर्थ ऋतिक रोशन हा सुजनीन या आपल्या पत्नीबरोबर विवाहित असताना देखील ती त्याच्या बरोबर रिलेशनमधे होती हे ती नकळतपणे मान्य करते. थोडीशी स्त्रीवादी भूमिका घेत आपल्यावर अन्याय झाला आहे, असे भासवत असताना आपण ऋतिक बरोबर रिलेशन ठेवताना दुसर्‍या स्त्रीवर, ऋतिकच्या पत्नीवर मात्र अन्याय करत असतो याचा तिला सोयीस्करपणे विसर पडतो.

.
या निमित्ताने काही प्रश्न पडतातच.
त्या ज्येष्ठ अभिनेत्याच्या रूममधे ती का रहात होती. तिला तिथे आधार का घ्यावासा वाटला ? किती काळपर्यंत ती तिथे रहात होती ? सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात त्या अभिनेत्याचा तिला शिडीसारखा वापर करावासा वाटला का ?
आणि या सगळ्या प्रकरणांमधे त्या ज्येष्ठ अभिनेत्याची पत्नीदेखील तिच्यावर इतकी का बरे वैतागली होती ?

या सगळ्याचा आजच खुलासा का व्हावा. संघर्षाच्या काळात या लढाईपेक्षा करीयर तिला अधिक महत्त्वाचे वाटले का !
कंगना राणावतच्या खुलासेदार मुलाखतीमुळे असे अनेक प्रश्न आता पडू लागले आहेत.
कंगना राणावतची मुलाखत

अर्थात इथे ऋतिक आणि आदित्य पंचोली यांचीही चूक नाही असे म्हणणे नाही.

मुलाखतीच्या शेवटचे रजत शर्माचे वाक्य खूपसे बोलके आहे
कंगना राणावत इसी तरहा हमे एंटरटेन करती रहेगी !

कलाप्रतिसाद

प्रतिक्रिया

नर्मदेतला गोटा's picture

6 Sep 2017 - 7:35 am | नर्मदेतला गोटा

कृपया राणावत असे वाचावे

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2017 - 7:41 am | पिलीयन रायडर

अमोल उदगीरकरांचे फेसबुक स्टेटसही वाचनीय आहे ह्या विषयावरचे.

नर्मदेतला गोटा's picture

6 Sep 2017 - 10:31 am | नर्मदेतला गोटा

असेच म्हणताहेत का ते

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2017 - 5:23 pm | पिलीयन रायडर

हृतिक रोशन एक वेळ कोर्टातली लढाई जिंकेल पण पब्लिक पर्सेप्शनची लढाई तो अगोदरच हरला आहे हे एक कटू सत्य आहे . ह्रितिक ही पर्सेप्शनची लढाई का हरला याची कारण आपल्या समाजाच्या मानसिक जडणघडणीत आढळतात . ह्रितिकच्या बाजूने बोललो तर आपल्यावर स्त्रीविरोधी किंवा male chauvinist असा ठप्पा बसेल अशी भीती बॉलिवूडमधल्या दिग्गज लोकांच्या मनात पण आहे ,तर सर्वसामान्य माणसाची काय कथा . दुसरं म्हणजे ह्रितिक बडे बाप का बेटा आहे आणि श्रीमंत आहे म्हणजे तो या प्रकरणात चुकीचाच असणार अशी समजूत अनेकांनी करून घेतली आहे . कारण श्रीमंत , यशस्वी लोक कायदा खिशात घालून फिरतात हे बॉलिवूड सिनेमानेच वर्षानुवर्षे शिकवलं आहे .आपलं स्त्री असणं आणि अंडरडॉग असणं कंगनाने जबरदस्त एक्स्प्लॉईट करून घेतलं आहे .ह्रितिक शांत आहे आणि अजूनही काही बोलत नाही म्हणजे त्याची बाजू लंगडी आहे असा समज अनेकांनी करून घेतला आहे . 'डिग्निफाईड सायलेन्स ' नावाचा पण एक प्रकार असतो हे आपण विसरतो . ह्रितिकची स्थिती २०१४ मधल्या राहुल गांधी आणि काँग्रेस सारखी झाली आहे . त्या काळात राहुल /काँग्रेस च्या बाजूने काही बोललं की त्या समर्थकांवर चौफेर शाब्दिक हल्ले व्हायचे . त्यामुळे खूप लोक मनात असून पण त्यांच्या बाजूने बोलायला घाबरायचे . हाच पर्सेप्शनचा दहशतवाद ह्रितिकच्या विरुद्ध जात आहे . कंगनाने बॉलिवूडमधल्या प्रस्थापितांना अंगावर घेणारी बाई अशी आपली जी इमेज उभी केली आहे त्याच उत्तर ह्रितिक कडे नाही . जनमानस हे अनेकदा अंडरडॉगच्या बाजूनेच असत . ह्रितिक हा अंडरडॉग नाही हे उघडच आहे . बाकी कंगनाने पण घराणेशाही राबवली आहे आणि वेळप्रसंगी लोकांचे क्रेडिट्स हिसकावून घेतले आहेत हे उघड आहेच . प्रस्थापितांना विरोध करता करता ती स्वतःच प्रस्थापित बनली आहे . सदाभाऊ खोतांसारखी . ह्रितिक आणि कंगना प्रकरणात कोण योग्य कोण चूक हे कोर्ट ठरवेलच . पण लगेच कुणी श्रीमंत यशस्वी आहे म्हणजे तो चुकीचाच आहे आणि जो ह्रितिकची बाजू घेतोय तो anti-feminist आणि घराणेशाहीचा समर्थक आहे असे ठप्पे मारणं थांबलं तरी बरच आहे .

नर्मदेतला गोटा's picture

6 Sep 2017 - 11:32 pm | नर्मदेतला गोटा

धन्यवाद

दुर्गविहारी's picture

6 Sep 2017 - 10:48 am | दुर्गविहारी

या संदर्भात काही लिंक देतो म्हणजे व्हिडीओ पाहण्याआधी ते बरे पडेल.
या अभिनेत्रीमुळे हृतिक- कंगनाचे झाले होते ब्रेकअप

कंगनाबद्दल अध्ययन म्हणतो…

‘कंगनाची मुलाखत म्हणजे जणू ‘सर्कस’च!’

कंगना वेडी झाली आहे: आदित्य पांचोली

हृतिकवर आरोप; सुझानने दिलं कंगनाला उत्तर

मी सिंगल नाही, एका नात्यात अडकलेय

कंगना राणावतच्या धाडसाला सलाम. या पुरुषप्रधान ईंडस्ट्रीमधे असा आवाज उठवणे सोपे नाही. बर्याच नट्यानी आवाज उठवला तर दारुण सत्य बाहेर येईल. याबाबत शक्तिकपुरचा एक ऑडिओ लिक झाला होता, त्यात बरेच काही होते, पण ति दाबण्यात आला. अर्थात स्वताची मुलगीच आता याच क्षेत्रात असल्याने तो आता काही बोलण्याची शक्यता नाही. मलावाटते कंगणा अजुन काही बोलली तर नक्कीच अनेक मुखवटे टराटरा फाटतील.
पुरस्कार सोहळ्याच्या बाबतीतही तीच्या मताशी सहमत. हिंदी चित्रपटाच्या पुरस्कार सोहळ्यात ईंग्लिशमधे बडबड करुन बक्षिस आपसातच वाटप करणारे हे तथाकथित सोहळे केव्हाच बघायचे बंद केले आहेत. स्वताचे पोट चालवणारी भाषा यांना बोलायची लाज वाटते.

कंगना राणावतच्या धाडसाला सलाम

+1

बाकी तिचा ""तनु वेड्स मनू (२) रिटर्न्स """ आपल्याला तुफान आवडला/आवडतो.
फेअर अँड लव्हली जाहरिती बाबतची तिची मते ही पटली होती.

नर्मदेतला गोटा's picture

6 Sep 2017 - 2:07 pm | नर्मदेतला गोटा

पण अनेक पुरुष तिचं इतकं कौतुक का करत असतील
खरंच हे कौतुक करणारे पुरुष इतके उदार मनस्क आहेत ?

तुमचा उपप्रतिसाद मला उद्धेशून असेल तर...

उदार मनस्क आहे की नाही ठाऊक नाही पण अगदी संकुचित वृत्तीचे सुद्धा नाही आहोत.

कौतुक करण्याबद्दल म्हणाल तर कौतुक तिच्या धाडसाचे केले आहे. फेअर अँड लव्हली जाहिरात न करण्याचे तिचे कारण पटले होते. सगळ्यांनी गोरे होण्याचाच का अट्टाहास धरावा असा काहीतरी आशय होता.

(अवांतर: तुम्ही नकळत त्या घाऱ्या मीच मीच्या डोळ्यांच्या पुरुषांच्या हितचिंतकाची जवाबदारी पार पाडत आहात असे जाणवले)

नर्मदेतला गोटा's picture

6 Sep 2017 - 11:34 pm | नर्मदेतला गोटा

जे म्हणायचे ते मूळ धाग्यात तुमच्या प्रतिसादापूर्वीच म्हटले आहे
तुम्हाला उद्देशून कसे असेल

रेवती's picture

6 Sep 2017 - 6:35 pm | रेवती

हम्म. मला वाटते कंगनाबद्दलच्या बातम्या आजच्या नाहीत. बरीच वर्षं तिच्याबद्दल काही ना काही कानावर येत होतं. 'एकदा बात काय आहे हे पाहूया' म्हणून वरील कोर्टातील मुलाखत पाहिली. कोण बरोबर आणि कोण चूक हे तिर्‍हाईताला सांगता येणे कठिणच! कोर्टातही जे बेकायदा आहे त्यावरच निर्णय दिला जाऊ शकेल. या सगळ्या प्रकरणात बाय्का काय म्हणतात किंवा पुरुष कसे व्यक्त होतात यापलिकडे जाऊन पाहिल्यास कंगना, ऐश्वर्या, रती अग्निहोत्री, जिया खान आणि अनेक प्रकरणात एक साम्य दिसते की गर्लफ्रेंड असू दे किंवा पत्नी असू दे, महिलेवर हात उगारायला, फसवायला धजावतात.
अभिनेत्यांची लग्ने त्यांनी मनात आणताच बरेचदा होतात पण करियर माईंडेड अभिनेत्रींची लग्ने हा मोठा इश्यू होऊन बसतो.
हाच न्याय कॉर्पोरेट क्षेत्रालाही लागू होऊ शकेल असे वाटते.
कंगनाच्या मुलाखतीत कच्चे दुवे होते. (मुलाखत फार अर्थ समजावून घेण्याच्या दृष्टीने पाहिली नव्हती तरी.....) आदित्य पंचोली प्रकरणात मुलगी लहान होती, चित्रपट क्षेत्राशी संबंधित नव्हती व मुख्य म्हणजे निराधार होती. प्रकरण निस्तरताना अगदी हाणामारी वगैरे झाली तर यापासून धडा घ्यायला हवा होता.
अध्ययन सुमन प्रकरण सोडून देऊ. त्याबद्दल चर्चा करण्यासारखं काही नाही. ;)
ऋतिक रोशन हा विवाहित होता व तिला समाजात स्विकारण्यायोग्य स्थान देऊ शकत नव्हता असे आधीच माहित होते. जो मनुष्य आपल्या बायकोला (व उदंड झालेल्या लेकरांना) फसवतोय तो आपल्याला कधीही फसवू शकतो हे लक्षात न येणे हा गाढवपणा आहे. ज्या नात्याला नाव नाही त्या मार्गाला न लागणे हे जास्त सोपे आहे हे घरी कोणी कान पकडून सांगायला नव्हते का? जो माणूस आज लग्न करण्यास होकार देतो व उद्या नकार देतो त्याच्यावर भरवसा ठेवताना सत्रांदा विचार करायला हवा कारण या लोकांचे लग्न होणे, मोडणे यात तगडे पैसे गुंतलेले असतात. अभिनय करून करून मनाची अवस्था बिकट झालेली असते.
आणखी कुठल्या अभिनेत्रीच्या मोहात पडून हा बुवा अपेक्षित असलेला फोन करायला विसरला म्हणताच आपला मान सांभाळून बाजूला होणे इष्ट होते पण बया त्यातच गुंतत गेली.
ऋतिकने बायकोला आधी फसवले, मग एका किंवा अनेक प्रेयसी मंडळाला फसवले. बायकोवरील प्रेम संपले आहे असे वाटल्यास वेगळा हो व दुसरीकडे गुंतवणूक कर ना बाबा! पण नाही! आपण 'घर का ना घाट का' होण्यापेक्षा हे बरं चाललय, तर चालू दे! कोणीतरी एक बाई बरोबर असेलच! एवढे करून तुझी रिलेशनशिप २०१४मध्ये संपली ना बाबा, मग गप्प बैस ना! पण नाही , आता प्रकरण उकरून काढून पुढील अचरटपणा केला व तोंडावर आपटला. आता कंगना म्हणतिये की समोर ये आणि माफी माग! काय चूक आहे? आणि या बयेनंही ध्यानात घ्यायला हवं की एकदोनदा काहीतरी गाजावाजा होणारी प्रकरणे झाली तर निस्तरता येण्याइतपत एनर्जी असते पण सारखेच व्हायला लागले तर आपल्याकडेही पहावे. किती थकलिये ती!
की अभिनेत्री/ मोठ्या पोझिशनवरील महिला त्यांच्या करियरमुळे संसार करण्यास अस्विकारार्ह वाटतात (अगदी अभिनेतांनाही) त्यामुळे जो आपल्याशी लग्न करेल तो नवरा! या विचाराने आयुष्य जगायला भाग पडते? बॉयफ्रेंडस तर अनेक होऊ शकतात, असतातही त्यामुळे नैसर्गिक आयुष्य तसंही असतच पण त्यापलिकडे जाऊन आपलं लग्न होणे, (शॉर्ट लिव्हड) संसार, (कदाचित मुलेबाळे) या पसार्‍याच्या मोहात पडत असाव्यात? नेहमीच्या बघण्यात मुली (मुलेही) जोडीदाराने दिलेल्या (खोट्या) आश्वासानांना भूलतात व दु:खद आठवणी निर्माण करतात तेंव्हा "हे सिनेमे बघून तुमची डोकी फिरलियेत" असं वडीलधारे म्हणतात. अभिनेते मंडळी कश्याला भूलत असतील? सिनेमातील पोकळपणा तर त्यांना आधीच माहित असतो. प्रेम आंधळं असतं असं म्हणायला वाव आहे. ;)
त्या सुझन खानचं काही ऐकायला नको. ती त्याला 'गुड सोल' म्हणतिये. अगं बाई, मग त्या गुड असलेल्या मनुष्याला डिव्होर्स करून सोलून का काढलस? तुला नाही ना संसार करायचा, नको करून पण जरा धडपडला तर त्याची आई होऊन बाळाला उचलायला जाऊ नकोस. की या सगळ्याचेही काही कोटी चार्ज करते कोणास ठाऊक? ती मनात म्हणत असेल की बाबारे, तू काय काशी करायचिये ती कर, माझी दोन मुलं मोठी होणं महत्वाचं आहे.

नर्मदेतला गोटा's picture

7 Sep 2017 - 6:42 pm | नर्मदेतला गोटा

सगळेच पैशात मोजता येत नाही. सुझानला पैसेच हवे असतील असे नाही.

तुम्ही म्हणताय तेही असेल की! सेलेब्रिटींचं सगळं कळायच्या पलिकडलं असतं. आता लग्न केलं, उद्या मोडलं, मग फक्त मित्र असणं, नंतर एकमेकांचा जीव घेणं सगळं चालतय आणि मिडियामुळं चर्चाही यथासांग होते. आजकाल कलाकार पब्लिकही चांगलं ओळखून आहे की बदनामीची त्सुनामी टाळता येणार नाहीच तर दणादण मुलाखती देऊन प्रसिद्धी तरी करून घेऊ. ते म्हणतात ना "बदनाम हुवे तो क्या हुवा...................."
लोकांना तरी काय पडलय एवढं कळत नाही. त्या सेलेब्रिटीजची परिस्थिती असते ते बघून घेतील पण तरणी पोरे आदर्श ठेवणार आणि आईबापांच्या डोक्याला नसता कहार होणार. या बड्या लोकांनाही हे समजणार नाही की आपला शिनेमा हिट झाला म्हणजे वागणुकीची जबाबदारीही येते. जौ द्या ना! तसंही आपलं कोण ऐकून घेणारेत. त्यांच्याकडे स्वयंपाकाला माणूस ठेवलय. आज माझी स्वयंपाकाला सुरुवात नाही.

गामा पैलवान's picture

6 Sep 2017 - 6:54 pm | गामा पैलवान

रेवती,

सगळ्याचेही काही कोटी चार्ज करते कोणास ठाऊक?

अगदी माझ्या मनातलं बोललात पहा !

आ.न.,
-गा.पै.

पैसा's picture

6 Sep 2017 - 10:08 pm | पैसा

1

त्यांना स्वतःच्या अकला असायला पाहिजेत. नसतील तर प्रोफेशनल मदत घ्यावी. "मला अमक्याने फसवले" म्हणून काही वर्षानी गळे काढण्यात पॉइंट नाही. त्या त्या वेळी लेकाच्यांनी मजा मारलीच असणार.

सगळ्यात वाईट परिस्थिती नट लोकांच्या नट नसलेल्या बायकांची असते. हामेरिकेतल्या नटांच्या पत्न्या पैसे वाजवून घेऊन मोकळ्या होतात. भारतातल्या पतिदेवाचे जोडे खात रहातात किंवा मग निदान पतिदेवाची लक्तरे वेशीवर टांगायचे मनावर घेत नाहीत.

गामा पैलवान's picture

7 Sep 2017 - 12:16 am | गामा पैलवान

न.गो.,

एक प्रश्न पडलाय. या कथेत भारतीय स्त्रीवाद कुठे आलाय? जरा टोटल समजावून सांगा की राव !

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

7 Sep 2017 - 9:29 am | जेम्स वांड

स्त्रीवादाचा काय संबंध आहे कळलं नाही.

काय वांड राव
या सर्व मुलाखतीमधे ती अनेक पुरुष अभिनेत्यांना झोडपते
काय हे वाक्य स्त्रीवाद स्पष्ट नाहि करत.
पंचोलि ते रित्विक रोशन (मध्ये खुप अध्ययन झाले) कोणा कोणाला नाहि वापरले. पंचोलिच्या बाबतीत चुक झालि होती पण त्यानेहि भयंकर झोडपले होते धरून.

पुरता हनुमान केला होता.

थिटे मास्तर's picture

8 Sep 2017 - 1:37 am | थिटे मास्तर

घरी कुठलितरी पुजा होती, सतत हात पुसावा लागतो म्हणुन आदल्या दिवशी खरेदि केलेल्या टॉयलेट पेपर जो कि अजुन सामानातच होता, मि थोडा फाडुन हातात ठेवला होता. काका ने ते पाहिल अन ईतकि ऐशी तैशी केली म्हणता बायको समोर अन लेकरासमोर का अजुनहि मुला ला रागावले की तो मला धाक दाखवतो कि काका आजोबांना सांगेन म्हणुन. काका म्हणतो लेका तुला समजायला नको कुठली 'वस्तु' कुठे वापरतात.

(संपादित)

नर्मदेतला गोटा's picture

9 Sep 2017 - 12:13 pm | नर्मदेतला गोटा

अगदी बरोबर थिटे मास्तर

मोठे व्हा थिटे मास्तर! जमलं तर!!

धर्मराजमुटके's picture

7 Sep 2017 - 6:56 pm | धर्मराजमुटके

चित्रपटातले नायक असोत की नायिका. कुणीच बाजू घेण्याच्या लायकीचे नाहित. त्यांचे चित्रपट करमणूक म्हणून पहावेत आणि त्यांना विसरुन जावे एवढीच त्यांची लायकी आहे. त्यात कोणतेही तत्त्वज्ञान शोधणे म्हणजे तद्दन मुर्खपणा आहे. (अपवाद क्षमस्व !)

बऱ्याच अंशी सहमत आहे.

सुबोध खरे's picture

9 Sep 2017 - 12:35 pm | सुबोध खरे

आपण मिठाई खावी
कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये
श्री व्यंकटेश माडगूळकर (१९४६)

नर्मदेतला गोटा's picture

9 Sep 2017 - 6:05 pm | नर्मदेतला गोटा

अध्ययन सुमन काय सांगतोय हे