डूआयडीचे आठवावे लेख । डूआयडीचा आठवावा ताप ।
डूआयडीचा आठवावा प्रतिसाद । मिपामंडळी ।।१।।
डूआयडीचे कैसें लिहिणें । डूआयडीचे कैसें पिंकणें ।
डूआयडीचे काडी टाकणे । कैसें असे ।।२।।
मुळायडीचा केला त्याग । म्हणोनि साधिजें ट्यार्पीचा योग ।
जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।।
वापरावे विविध आयपी । तेव्हा मिळे डूआयडी ।
वापरावे फेक आयडी । पाडण्या जिल्बी ।।४।।
सकल डूआयडी आठवावे । फेकायडी डिलीटवत् मानावे ।
आंजालोकी मिपालोकी उरावे । पिंकरूपें ।।५।।
प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू ।
अखंड जिल्बीचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।६।।
प्रतिक्रिया
3 Sep 2017 - 10:25 pm | बाजीप्रभू
जमलंय जमलंय
3 Sep 2017 - 10:29 pm | कपिलमुनी
भारी
3 Sep 2017 - 10:31 pm | पैसा
=)) =))
3 Sep 2017 - 11:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
4 Sep 2017 - 9:55 am | ज्ञानोबाचे पैजार
हे डु आयडी कसे ओळखावे | कोण कोणाचा अवतार कसे शोधावे |
या बद्दलही मार्गदशन करावे | आम्हा पामरांना ||
पैजारबुवा,
4 Sep 2017 - 7:36 pm | चामुंडराय
पैजार बुवा,
आपल्या तुकोबांनी फार पूर्वी सांगून ठेवलंय
जे का ट्रोलले पिंकले, त्यासी ज्याने अंजावर पीडले ।
तोची डूआयडी ओळखावा, फेकायडी तेथेची जाणावा ।।
4 Sep 2017 - 10:21 am | sagarpdy
भारीच.
4 Sep 2017 - 11:43 am | संजय पाटिल
आणी एवढा अभ्यास!
6 Sep 2017 - 7:11 am | चामुंडराय
आयडी ते डू-आयडी
करिता सायास
कारण नवा आयपी
मिपा म्हणे
4 Sep 2017 - 12:14 pm | धर्मराजमुटके
मुजरा घ्यावा म्हाराज !
4 Sep 2017 - 12:17 pm | जेम्स वांड
खल्लास!!!!
4 Sep 2017 - 12:22 pm | कंजूस
नमस्कारहो दमामि।
4 Sep 2017 - 12:56 pm | arunjoshi123
कल्ला.
4 Sep 2017 - 1:13 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
हल्ली खूप डुआयडी दिसत नाहीत पुर्वीसारखे ,२०११ १२ १३ हा डुआयडींसाठी सर्वोत्तम काळ होता.
4 Sep 2017 - 1:15 pm | जव्हेरगंज
झब्री!!!
4 Sep 2017 - 1:27 pm | गामा पैलवान
संजय पाटिल, धर्मराजमुटके, जेम्स वांड आणि कंजूस यांचे प्रतिसाद एकत्र वाचले की ओवी तयार होते.
यावरून हे चार एकमेकांचे डूआयडी धरावेत का?
-गा.पै.
4 Sep 2017 - 1:43 pm | वरुण मोहिते
जमलंय. लगे रहो.
5 Sep 2017 - 5:17 pm | अजया
=)))))))
13 Dec 2017 - 12:44 pm | सुबोध खरे
हुच्च्भ्रुनची लक्षणे वरून इकडे आलो
तुमची पण कविता जबरी आहे.
दंडवत घ्यावा साहेब __/\__
13 Dec 2017 - 2:02 pm | सूड
हे कसं राहून गेलं वाचायचं!!
15 Dec 2017 - 8:21 am | चामुंडराय
जोहार मिपाकर जोहार। तुमच्या प्रतिसादांचे आभार ।
बहु संतुष्ट जाहलो। तुमच्या प्रेमासाठी आलो।।
15 Dec 2017 - 9:17 am | नाखु
खणखणीत आहे
"आयडी"यांची कल्पना नसलेला नाखु
16 Dec 2017 - 7:50 pm | रंगीला रतन
लै भारी
16 Dec 2017 - 8:43 pm | मूकवाचक
कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे
जिथे तिथे पिंका टाकी, तुझ्या कळा ही नाना रे ...
18 Dec 2017 - 4:01 am | चामुंडराय
व्वा मूवाजी, छान
या निमित्ताने माझे दोन पैसे....
दादा बाबा रूपे तुझी, बाई माई अन ताई रे
मी फुरो तू फ्रती गामी, नाना विध कळा अंगी रे ...
16 Dec 2017 - 10:29 pm | पगला गजोधर
डुआयडी जीवनभर भक्तची, रहाणे || धृ ||
विदा नसो वा, लॉजिक नसू दे |
सभ्य भाषा, फिकिर नसू दे ||
फुगवु छाती, मठ्ठ बाण्याने |
ट्रोलिंग निरंतर करीत रहाणे || १ ||
कधी फेकीतो, कधी नेमाने |
दंश नकळत, कधी सवयीने ||
कधी फुत्कारने, कधी बांग देणे |
उगळीत बसतो विष सहाणे || २ ||
व्हा, मिपाकरहो, भक्त माझ्यासंगे |
जिव्हेवरी घ्या, तर्कट तरंगे ||
तुमच्या मुखीही, सक्तीचे हे |
उसळो भक्ती, भलेतो देशही भंगे || ३ ||
28 Dec 2017 - 12:39 am | चामुंडराय
व्वा पग साहेब, एक सेपरेट जिलबीच होऊन जाऊ दे या विषयावर !