विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!
मागे एकदा कुठेतरी ज्ञानेश्वरी तले विज्ञान किंवा असेच काहीतरी भन्नाट लिहिलेला लेख वाचला होता. त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र, ते अगदी प्रसूतिशास्त्र यांची साद्यंत माहिती कशी होती आणि त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत कसे ठायी ठायी सापडतात याचे रसभरीत वर्णन केलेले होते. तसाच काहीसा लेख समर्थ रामदासांवर सुद्धा वाचण्यात आला. मला वाटतं पावसाळ्यात जशा रोगाच्या साथी येतात हा तसाच काहीसा हा प्रकार असावा...एक पुण्यात राहणारे लेखक(?) जे चांगले mbbs डॉक्टर आहेत त्यांनी तर अशा विषयांवर भरपूर पुस्तकं लिहिली आहेत. माणूस डॉ आहे म्हणून आमच्या वडलांनी ती घेतली आणि भयंकर निराशा झाली. रामायणात जम्बो जेट काय, महाभारतात अण्वस्त्र काय, सूक्ष्मदर्शक आणि टेस्ट ट्यूब बेबी काय.राम राम राम ....हे म्हणे स्वतः योग सामर्थ्याने मंगळावरगेले होते आणि त्यांची निरीक्षणं चक्क नासाने खरी मानली आहेत.(नासाला कामधंदे नाहीत) ...असो
माझा एक मित्र आहे-देवधर म्हणून ... त्याची बायको भांडारकर संस्थेत जुन्या संस्कृत ग्रंथांचे भाषांतर करायचे काम करते. माझी तिची नुकतीच चर्चा झाली कि बुवा हे जे वेदकाली विमान ,अंतराळ यान , ब्रह्मास्त्र म्हणजे atom bomb अशा गोष्टी होत्या असं आम्ही ऐकतो, वाचतो त्यात काही तथ्य आहे का? यावर तिने सांगितलेली माहिती उद्बोधक ठरेल.
एक तर काय असत कि जुने ग्रंथ, जुने ग्रंथ असे जे महणतात ते फार फार तर ८ व्या किंवा ९ व्या शतकातले असतात ते सुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक. त्या आधी चे ग्रंथ असे मिळत नाहीत, शिलालेख, ताम्रपत्र मिळतात आणि ते अत्यंत महत्वाचे पण ते म्हणजे ग्रंथ नाही त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे(NOTICE BOARD) स्वरुपाची असते. आता यावरून प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते अशी खातरजमा करता नाही आली तरी ह्या गोष्टी निखालस खोट्या आहेत असंही काही खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे हे ग्रंथ जरी जुने असले तरी ते अस्सल असतात असे नाही म्हणजे त्यात प्रक्षेप असतात उदा महाभारत या ग्रंथाचे घेतले तर महाभारताची जी चिकित्सक आवृत्ती आहे की जी अनेक थोर इतिहास संशोधकांनी ( सुखटणकर, कोसंबी, मिश्र वगैरे )अनेक वर्षांच्या अनंत परिश्रमांन्द्वारे सिद्ध केली आहे तिच्या मध्ये सुद्धा प्रक्षेप आहेत पण ते साधारणतः २ रया किंवा ३ रया शतकातले. म्हणजे आपण असे म्हणू शकतो कि हि महाभारताची चिकित्सक आवृत्ती आपल्याला साधारण ई स १५० च्या सुमारास प्रचलित असलेल्या महाभारतकथे कडे घेऊन जाते. आता तुम्ही विचार करा इतक्या महान इतिहास संशोधकांना इतक्या प्रचंड मेहनती नंतर जर सर्वांना माहित असलेल्या महाभारत कथेच्या त्यातल्या त्यात अस्सल प्रती पर्यंत पोहोचायला एवढा त्रास होत असेल तर आजकाल उठ सुट कोणीही लुंगासुंगा प्राचीन भारतात विमाने , अंतराळ याने, अण्वस्त्रे आणि काय काय शोधून काढतात त्यांच्या विश्वासार्हते बद्दल आपण काय बोलावे.
आता रामायणात येणारा पुष्पक विमानाचा उल्लेख घ्या, एक तर हा एक प्रक्षेप आहे. तो नंतर कुणीतरी घुसडला आहे पण चला घटकाभर पुष्पक विमान होते असे गृहीत धरले तर ते कोणत्या इंधनावर चालायचे ते इंधन कुठून मिळायचे ? ते शुद्ध कुठे आणि कसे करायचे ? जिथे बनवले तिथून विमानापर्यंत कसे आणायचे? रथातून कि गाढवावर लादून?कि आजच्या सारख्या रेल्वे गाड्या , मोटारी डांबरी सडका होत्या तेव्हा? असतील त्याचे उल्लेख कसे कुठे नाहीत? कसे असतील कुणा शहाण्या माणसाने आपल्या गोष्टीवेल्हाळ स्वभावाला अनुअसरुन एक छान गोष्ट रचून दिले घुसडून झाले, अन काय? आणि एकच विमान बनवले विमानांचा ताफा नाही? कमाल आहे
तीच गोष्ट अण्वस्त्रांची, अण्वस्त्र म्हणजे काय दिवाळीचे आपट बार आहेत का? ती अण्वस्त्र काय घोडागाडी(रथ) किंवा बैल गाडीतून तीर कामठ्याने हात दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायचे, एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा टाकायचा, तर काही क्षेपणास्त्र वगैरे नाही ? कमाल आहे? अण्वस्त्र बनवायला लागणारे तंत्रज्ञान होते मग क्षेपणास्त्र बनवायचे नव्हते ते सोडा सध्या तोफा सुद्धा नव्हत्या तेव्हा.
आता मूळ मुद्दा, त्याचं असं आहे कोणी ऋषी मुनी तप:सामर्थ्याच्या जोरावर एखादे विमान किंवा तत्सम गोष्ट बनवू शकत नाही (तसच ते बनवत असतील असं कुणाच म्हणण असेल तर मग प्रश्नच मिटला)विमान सोडा एक साधा विजेचा दिवा बनवायचा म्हटला तर काय गोष्टी लागतात बघा . १) विजेचा शोध, उत्पादन आणि खात्रीशीर असा पुरवठा / वितरण करणारी यंत्रणा(नुसता दिवा पेटवायला नव्हे तर बनवायला सुद्धा) २) अत्यंत पातळ आणि स्वच्छ पारदर्शक काच बनवण्याची परिष्कृत पद्धती. ३) Tungston सारख्या धातूंचा शोध उत्पादन तसेच त्यांच्या गुणधर्माची छाननी करणारी सुसज्ज प्रयोग शाळा आणि metallurgy सारख्या शास्त्राचा पुरेसा विकास.शिवाय त्याचे अत्यंत पातळ तंतू (फिलामेंट) बनवण्याची पद्धत. ते सोडा, दिवा बनवण्याच्या निरनिराळ्या विभागात द्यायला drawings च्या असंख्य प्रती काढण्यासाठी छपाईचे तंत्र.ते लागेल कि नाही? (वेदामध्ये काचेचा उल्लेख नाही तसाच लोखंडाचा हि नाही, कोळशाचा हि नाही . वेदाइतक्याच जुन्या आणि कदाचित त्यांची जन्मभूमी असलेल्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषात काच, लोखंड, कोळसे सापडत नाहीत. आपल्या पुराणांमध्ये विमानाचे विविध अस्त्रांचे उल्लेख आहेत पण तुम्ही अनेक आधुनिक विज्ञानकथाकारांच्या गोष्टी वाचल्या तर तुम्हाला त्या सुद्धा तशाच खऱ्या वाटतील पण त्या माणसाच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत, खऱ्याखुऱ्या नाही.) आणि या सगळ्या पेक्षा महत्वाच म्हणजे प्रयोजन आणि बाजारपेठ. जर साधे तेलाचे दिवे पेटत असतील तर विजेच्या दिव्याच्या साह्याने उजेड पाडायचा कशाला? एव्हढे उपद्व्याप करून विजेचे दिवे बनवून जर घ्यायला खात्रीची बाजारपेठ नसेल तर कोण हा धंदा करेल. रामायण महाभारत या चांगल्या, मनोरंजक कथा आहेत असच नाही तर तो आपला इतिहास सुद्धा आहे हे खर पण इतिहास इतिहास म्हणून शिवाजी महाराजांना भवानी माता खरोखर प्रसन्न झाली आणि भवानी तलवार दिली यावर विश्वास ठेवण वेडेपणाच नाही का? ( खरच भवानी प्रसन्न झाली असती तर तिला महाराजांना एखादी AK47 द्यायला काय हरकत होती? भवानी मातेला काय अशक्य आहे?)
एक नीट समजून घ्या, तंत्रज्ञानाचा विकास आणि समाजात सर्वदूर त्याचा प्रसार सरंजामशाही कधीच करत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांना गुलाम करण्यासाठी त्यांना अज्ञानात आणि मागास ठेवण भाग असतं. भांडवल शाही जरी सरंजामशाहीशी हातमिळवणी करून मजूर गुलाम वर्गाला सुरुवातीला वेठीला धरते, त्यांचे शोषण करते असे दिसले तरी त्यांच्या स्वतःच्या फायद्या साठी तरी त्यांना एका मर्यादे नंतर लोकांचे राहणी मान उंचावण्यासाठी/ त्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अनिर्बंध शोषणाला आळा घालावा लागतो. लोकांची क्रयशक्ती अचानक घटली तर कसा हाहाकार उडतो ते मी काय वेगळ सांगायला हवं का ? समजा एक शाम्पू विकत घ्यायची लोकांची ऐपत नसेल तर कुणी धंदा करावा कसा? आणि खायची प्यायची भ्रांत असलेला गरीब गुलाम माणूस शाम्पू का विकत घेईल? त्याची, त्याच्या बायकोची चार लोकात उठ बस आणि किमान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असेल तर तो हा खर्च करून स्वतःला/ स्वतःच्या बायकोला सुंदर दाखवायचा प्रयत्न करेल.त्याची दोन वेळची खायची प्यायची सोय झाली तर तो पुढे पुढे काही जास्त खरेदी करू लागेल आणि उद्योग धंद्या शिवाय हे शक्य आहे का? सरंजामशाहीत मोठ मोठे शोध लागून त्याची उपयुक्तता पटल्यावर सरंजामशाही सरकार त्यांना स्वीकारते आधी संशोधकांना पदरमोड करून शोध लावावे लागतात. भांडवलशाहीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादन करण्यासाठी संशोधकांना उद्योग प्रोत्साहन देतात. आपले वेद , रामायण, महाभारत, हे सरंजामशाही समाजव्यवस्था दाखवतातच पण तेव्हा उद्योग आणि औद्योगीकरण हा प्रकारच नव्हता.तो काळ एकवेळ, सोडा आपल्या पेशवाईच्या शेवटी शेवटी म्हणजे १९व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा आपल्याकडे छापील नकाशे बनवायचे तंत्र , होकायंत्र , दुर्बिणी नव्हत्या आपण त्या इंग्रज, पोर्तुगीजांकडून विकत घ्यायचो. साधे शेतातले नगराचे फाळ लोखंडी करायाल २० वे शतक उजाडावे लागले. अन सुरुवातीला लोकांनी आगगाडी मध्ये बसावे म्हणून ब्रिटीश सरकार पैसे देत असे. आपल्याकडे औद्योगीकरण सुरु झालं तेच मुळी १९ व्या शतकाच्या शेवटी आणि ते सुद्धा जुजबी.
तेव्हा आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान असावा पण असं उगाच कुणी सुबुद्ध माणूस टर उडवेल असे काही करू नये त्याने या वारशाचाच अपमान होतो. असं नाही वाटत तुम्हाला .
हा प्रश्न नास्तिक, आस्तिक, पुरोगामी, मूलतत्ववादी असा नाही. साधा बुद्धी आणि तर्काचा आहे.
आदित्य---
प्रतिक्रिया
20 Aug 2017 - 8:07 am | अत्रे
लेख आवडला. थोडा एडिट करून पेपरात छापून आणू शकता, अशा लेखांची गरज आहे.
20 Aug 2017 - 8:21 am | आदित्य कोरडे
पाठवला होता ...नाकारला पण मराठी पिझ्झा वाल्यांनी छापला ....
20 Aug 2017 - 8:33 am | पगला गजोधर
"अहो आहत कुठे ???
भारतातील 12 ज्योतिर्लिंगे म्हणजे न्यूक्लियर रिऐक्टर्स ....
एन्क्रिप्शन काय घेऊन बसलाय, आधी सर्व नॉलेज लुंग्या सुंग्या पासून दूर संस्कृत मधे एन्क्रिप्ट करुन ठेवले होते.... "
अश्या छापाच्या प्रतिक्रिया नाही आल्या म्हणजे मिळवले.
बाकी लेख चांगला, हे वे सां नलगे
20 Aug 2017 - 8:55 am | गवि
ग्रंथ हे प्रमाण नसतील. पुरावा नसतील. पण पण पण..
उत्खननाने तर प्रत्यक्ष सत्य समोर येतं ना?
अनेक ठिकाणी सुमारे २०० ते ३०० फूट उत्खनन करुन तिथे वायर्स किंवा तारा न सापडल्याने तीन हजार वर्षांपूर्वी भारतात वायरलेस आणि मोबाईल कम्युनिकेशन तंत्रज्ञान होतं हे सिद्ध झालं आहे.
पूर्वीच्या विमानांत पारा इंधन म्हणून वापरत हे तुम्हाला ठाऊक नसावं? हं. पारा जडशीळ असल्याने विमान ओझ्यासहित नेमकं वर कसं उडायचं हे नासाला विचारा. त्यांना आपलं सगळं माहिती आहे.
20 Aug 2017 - 12:19 pm | राही
'नासा'ला विचारा!!
हो ना. नासा काय काय जाहीर करत असते भारतासंबंधी.
रामसेतु मानवनिर्मितच आहे वगैरे .
नासाचे एक सर्टिफिकेट मिळवले की झाले आणि अशी सर्टिफिकिटे मिळवण्यात भारतीयांचा हात कोण धरू शकणार?
20 Aug 2017 - 2:16 pm | पगला गजोधर
हे सगळ सगळां बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कार्यस्थान आहे !
त्यांची औषंध खपावी म्हणून केलेला खटाटोप.
नै तर एड्स कॅन्सर सारखे रोग गोमूत्राने बरे करणारे बाबा आहेत या देशात.
20 Aug 2017 - 10:28 am | ज्योति अळवणी
उत्तम लेख. मनोरंजन म्हणून आपल्या पौराणिक कथांमधील उल्लेखांमधून प्रगत शास्त्र होत हे म्हणणं वेगळं आणि त्यावर अधिकाराने पुस्तके लिहिणं वेगळं. पण तरीही लोकांना तुमच्या लेखातल्या महितीपेक्षा अतिरंजित कल्पना ऐकायला जास्त आवडते हे दुर्दैव!
20 Aug 2017 - 12:24 pm | राही
लेख आवडला.
20 Aug 2017 - 12:24 pm | राही
लेख आवडला.
20 Aug 2017 - 12:24 pm | धर्मराजमुटके
मस्त लेख ! आवडला. म्हणूनच मी माझ्या संपर्कात येणार्या प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा एक तर तु विज्ञाननिष्ठ रहा किंवा श्रद्धाळू म्हणून तरी. दोन्ही डगरींवर पाय ठेवायचा प्रयत्न केला तर कपाळमोक्ष ठरलेला.
मला स्वतःला श्रद्धाळू म्हणून राहणे आवडते. कोणी अंधश्रद्धाळू म्हटले तरी त्याचा राग येत नाही.
उदा. धार्मिक कारणांमुळे
१. सकाळी उठून तुळशीला पाणी घालावे सांगीतले आहे तर मी ते श्रद्धेने घालतो. मात्र तुळशीमुळे हवा शुद्ध होते वगैरे विज्ञान कुणी त्यात घुसविले तर मला आवडत नाही.
२. रोज पुजा केल्याशिवाय अन्न पाणी घ्यायचे नाही असा दंडक आहे तर डॉक्टरने पोट साफ व्हावे म्हणून सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास पाणी पित जा असे सांगीतले तर ते माझ्या पचनी पडत नाही.
३. मी शाकाहारी आहे पण आजारी पडल्यावर डॉक्टर ने मला अंडे, मांसाहार करा, त्यामुळे तुम्हाला प्रोटीन्स मिळतील असे सांगीतले आणि ते शास्त्रीय सत्य असले तरी मी ते करु धजावत नाही. कारण एक ना एक दिवस मरायचेच आहे. उद्या मेलो तरी काय फरक पडतो ? त्यामुळे देहाची पर्वा एका प्रमाणापेक्षा जास्त करु शकत नाही.
रामायण, महाभारतातल्या कथांमधून नक्की काय शिकायचे असते ते आपण ठरवायचे. तांत्रिक गोष्टींवर वाद घालायचा की त्याचे आध्यात्मिक सार काय आहे ते घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.
थोडक्यात काय तर धर्म आपल्याला मानसिक, आत्मिक समाधान देण्याचा मार्ग दाखवितो. त्यात विज्ञान शोधायचे म्हणजे केवळ मुर्खपणा आहे. एक तर श्रद्धाळू म्हणून जगा किंवा विज्ञानवादी म्हणून. जसे आहात तसे प्रामाणिक पणे रहा. एवढेच !
20 Aug 2017 - 12:53 pm | गॅरी ट्रुमन
लेख आवडला . पण त्याबरोबरच अशा अंधश्रद्धेची दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे. ती बाजू आहे--ironically शास्त्रीय. त्याचे झाले असे की ४ वर्षांपूर्वी नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर फेसबुक वर श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा मोठा महापूर आला होता. त्यावेळी त्यासंदर्भातील अनेक इ-मेल्स आले होते. त्यावेळी एकाला विचारले होते की, 'अंधश्रद्धा निरमूलन म्हणजे नक्की कशाचे निरमूलन अपेक्षित आहे? दुसऱ्या शब्दात अंधश्रद्धा म्हणजे नक्की काय?'. त्यावर मिळालेली उत्तरे मजेशीर होती. प्रश्न व्यापक असला तरी तो दाभोलकर यांच्या खुनानंतर विचारलेला होता म्हणून त्या प्रश्नाला आणि उत्तरालाही त्या खुनाची पार्श्वभूमी होती. त्या उत्तरांपैकी एक उत्तर होते,'दाभोलकरांनी इतकी वर्षे त्या क्षेत्रात काम केले आहे म्हणजे त्यांनी अंधश्रध्दा म्हणजे काय याची व्याख्या केली नसेल हे शक्य वाटत नाही'. त्यावर माझा प्रतिप्रश्न होता की दाभोलकरांनी जी काही व्याख्या केली असेल ती. पण तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन म्हणता तेव्हा तुम्हाला अंधश्रद्धा म्हणजे नक्की काय अपेक्षित असते?' त्यावर मिळालेली उत्तरे म्हणजे एक तर पूर्ण मौनच (म्हणजे विषयच संपला) किंवा अंधश्रद्धा म्हणजे काय हे उत्तर ना देता अंधश्रद्धेमुळे होणारे गैरप्रकार (नरबळी वगैरे) आणि नुकसान (म्हणजे नक्की कशाला अंधश्रद्धा म्हणावे याची व्याख्या आधीच तयार आहे आणि तीच सर्वांना मान्य आहे असा त्याचा अर्थ झाला) किंवा काहीतरी गोलमटोल उत्तर मिळायचे.
म्हणजे अंधश्रद्धा म्हणजे नेमके काय आणि नक्की कशाला विरोध आहे हे आपल्याच मनात स्पष्ट नसताना (किंवा दाभोलकर करतील ती अंधश्रद्धेची व्याख्या--काय ते मला माहित नाही) असेच लोक इतरांना शास्त्रीय दृष्टिकोन वगैरे लेक्चर देताना दिसले की मौजच वाटायची. म्हणजे दाभोलकर इतकी वर्षे त्या क्षेत्रात काम करत आहेत म्हणजे त्यांनी काहीतरी व्याख्या केलीच असेल असा एका अर्थी डोळे मिटून विश्वास ठेवणे हे मोठे शास्त्रीय दृष्टीकोनाचे लक्षण झाले पण कुणा ठोंबेबाबांच्या मठात गेल्या २० वर्षांपासून लोक जात आहेत मग ते बाबा पाजी कसे असतील हा डोळे मिटून ठेवलेला विश्वास म्हणजे अंधश्रद्धा!! ही गोष्ट अजिबात पटली नव्हती. विशेषतः इतरांना शास्त्रीय दृष्टीकोनावर लेक्चर देणाऱ्यांकडून अपेक्षा नक्कीच जास्त असणार.
अनेकदा 'आमचा तो शास्त्रीय दृष्टीकोन आणि इतरांची ती अंधश्रद्धा' असा काहीसा condescending प्रकार असतो तो जाम डोक्यात जातो.
लेख आवडलाच. अशाप्रकारे केलेले नासाच्या नावाने केलेले विचित्र दावे डोक्यात जातातच. एक साधी गोष्ट आहे. महाभारातकाळात जर अणुबॉम्ब असतील तर मग युद्ध धनुष्यबाण, तलवारी, गदा, रथ हे वापरून का लढली जायची? पण त्याबरोबरच या दुसऱ्या बाजूकडे दुर्लक्ष होऊ नये इतकेच.
22 Aug 2017 - 2:57 pm | arunjoshi123
दाभोळकरांच्या "आत्म्यास" शांती लाभण्यासाठी अनेक लोकांनी "इश्वराकडे" (मंजे त्याच्या चरणि) "प्रार्थना" केली होती. चालायचेच.
20 Aug 2017 - 1:12 pm | Ram ram
शिवरायांना मध्ये आणल्याशिवाय पोट भरत नाही काही लोकांचे.
21 Aug 2017 - 1:00 am | पिलीयन रायडर
तुम्ही लेख आणि त्याचा मतितार्थ समजुन घेण्याची प्रयत्न का नाही करुन पहात?! ट्राय .. ट्राय..
बाकी शिवरायांवर कुणाचा कॉपीराईट नाही, तेव्हा आपल्या राजाबद्दल कुणीही लिहु शकतंच की हक्काने. अपमान वगैरे करत नाही ना, मग झालं तर.
20 Aug 2017 - 2:06 pm | मंदार कात्रे
https://www.youtube.com/watch?v=NJNQwu4m8go
20 Aug 2017 - 2:12 pm | मंदार कात्रे
https://en.wikipedia.org/wiki/Baghdad_Battery
Wilhelm König was an assistant at the National Museum of Iraq in the 1930s. In 1938 he authored a paper[6] offering the hypothesis that they may have formed a galvanic cell, perhaps used for electroplating gold onto silver objects.[4][7] This interpretation is rejected by skeptics.[8][9]
Some believe that wine, lemon juice, grape juice, or vinegar was used as an acidic electrolyte solution to generate an electric current from the difference between the electrode potentials of the copper and iron electrodes.[4][5]
König had observed a number of very fine silver objects from ancient Iraq, plated with very thin layers of gold, and speculated that they were electroplated using batteries with these as the cells.
20 Aug 2017 - 2:16 pm | मंदार कात्रे
Mughals destroyed our culture our glory and still continues today.... Mughals destroy world's first university (tax shila) and written scripture.... they are jealous with us.....
https://www.youtube.com/watch?v=j_jqMM7Lshk
20 Aug 2017 - 3:25 pm | अनिकेत कवठेकर
ही चर्चा कितीही लांबू शकते..मूळ संस्कृतातलं वाचून त्यावर आधारित काही तंत्रज्ञान सिद्ध करण्याच्या मागे लागणं इष्ट (या साठी संस्कृत व विज्ञान दोन्ही कळावं लागतं..शिवाय डॉ, डोंगरे यांसारखा समतोल बुद्धीचा माणूस लागतो)..असं कोणाला जमलं तर Technology चं पेटंट मिळवून तो करोडपतीही होईल..समर्थ म्हणलेच आहेत..
क्रीयेवीण शब्दज्ञान | ते श्वानाचे वमन| भले तेथे अवलोकन | कदापि न करिती ||
20 Aug 2017 - 3:36 pm | अनिकेत कवठेकर
Dhvantapramapaka Yantra of Maharshi Bhardvaja
20 Aug 2017 - 7:23 pm | धडपड्या
मागे एक सद्गृहस्थ असेच तावातावाने पुराणांतली विमाने उडवत होते...
त्यांना विचारलं, अहो विमानं होती, असं मान्य केलं, तरी त्या संदर्भात निगा कशी घेतली जाई, किंवा ईंधन, विमानतळ वगैरे विषयी माहिती का नाही? लांब पल्ल्याच्या विमानांना ईंधन तर लागणारच ना... पण ते भरायला कुठे थांबल्याचे उल्लेख का नाहीत?
त्यावर त्या महाशयांनी दिलेलं उत्तर ऐकून कान धन्य झाले... त्यांचं म्हणणं होतं, कि विमानं हवेतच रिफिल व्हायची... आणि हे म्हणे त्यांना कोणत्यातरी मोठ्या सरकारी अधिकार्याने सांगितले होते...
21 Aug 2017 - 2:02 am | गामा पैलवान
धडपड्या,
ज्यांना खरोखर काही माहित करून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा धागा असावा बहुतेक. कोण कशी विसंगत उत्तरे देत होतं हा मुद्दा नाहीये.
आ.न.,
-गा.पै.
20 Aug 2017 - 9:56 pm | डँबिस००७
साधे शेतातले नगराचे फाळ लोखंडी करायाल २० वे शतक उजाडावे लागले.
२० वे शतक उजाडायच्या अगोदर २० शतके , भारतात अत्युच्च प्रकारचे लोह बनत होते व त्याचा प्रत्यक्षातला पुरावा आजही दिल्लीच्या खुतुब मिनारच्या जवळ उन्हा पावसात न गंजता गेली २० शतके उभा आहे.
20 Aug 2017 - 9:58 pm | डँबिस००७
भारतातल्या काही मंदिरातल्या विस्मयकारक गोष्टी बद्द्ल
https://www.youtube.com/watch?v=zvN8FVg7ZYw
21 Aug 2017 - 12:58 am | पिलीयन रायडर
मिपावर योगायोगाने दोन विरुद्ध बाजुंवर लेख पडत आहेत. ते ही चांगले लेख. तुम्ही ही बाजु मांडताय तर तिकडे अनिकेत कवठेकर डोंगरे सरांच्या कामावर लिहीत आहे जे नेमके जुन्या ग्रंथातील ज्ञानबद्दल आहे.
मला नेहमीप्रमाणे सगळंच पटतंय.
21 Aug 2017 - 5:01 pm | arunjoshi123
http://aisiakshare.com/node/2399
आशय बर्यापैकी वेगळा आहे.
22 Aug 2017 - 6:50 am | ट्रेड मार्क
काही गोष्टींचे स्पष्टीकरण अजून मिळत नाहीये. जे या अथवा इतर धाग्यांमध्ये आधीच सांगितलं आहे आणि समोर दिसतंय अशीच उदाहरणं घेतो. बाकी उपलब्ध असलेले पौराणिक ग्रंथ आणि रामायण/ महाभारत आणि चमत्कारिक कथा सोडून देऊ.
न गंजणारा लोहस्तंभ - ७ मीटर उंच, ६००० किलो वजनाचा हा लोखंडी स्तंभ सुमारे १६०० वर्षांपूर्वी उभारला गेला. जमिनीच्या वर ७ मीटर आणि जमिनीच्या आत सुमारे १ मीटर असून यावर काही संस्कृत मध्ये लिहिलेलं आहे. या लिखितासकट हा स्तंभ न गंजता उभा आहे.
एका दगडातून कोरून काढलेली लेणी/ देवळं - बऱ्याच ठिकाणी अश्या वास्तू आढळतात. यातली बरीचशी शेकडो वर्षांपूर्वी उभारलेली आहेत. एका प्रचंड शिळेतून असे शिल्प कोरून काढायचे हे त्यावेळच्या लोकांच्या वैज्ञानिक प्रगतीच्या मानाने फारच अवघड काम म्हणावे लागेल. जर दगड वितळवून केले असेल म्हणायचे तर दगड वितळवायला ७०० ते १४०० डिग्री सेल्सियस तापमान लागते. काही प्रकारच्या दगडांना प्रचंड दाबाखाली अत्युच्च तापमानाला वितळावयाला लागते. तर काही दगडांना गरम वा थंड होताना भेगा पडतात तर काहींना थंड व्हायला काही वर्षांचा काळ लागतो. त्यावेळच्या तंत्रज्ञानाने (?) हे त्यांनी कसे केले असेल?
तुम्ही म्हणालात नांगराचा फाळ तयार व्हायला विसावं शतक उजाडायला लागलं पण मग १६०० वर्षांपूर्वी न गंजणारा लोहस्तंभ कसा काय उभारला? कदाचित असं असू शकेल की एक संस्कृती अतिप्रगत झाली आणि अचानक नष्ट झाली? सध्याच्या विज्ञानाला स्पष्टीकरण न देता येणाऱ्या गोष्टी जगभरात बऱ्याच ठिकाणी आहेत. विज्ञाननिष्ठ सामान्य लोक उपलब्ध विज्ञानाकडे उत्तर नाही म्हणून अश्या गोष्टींना नावं ठेवतात आणि वैज्ञानिक लोक स्पष्टीकरण देता येत नाही म्हणून नजरेआड करतात.
एकतर पुराणकाळात आपल्यामध्ये असलेले ज्ञान लिहून काढायचा प्रयास फार झाला नाही. जे होतं त्यातली आपली बरीचशी ग्रंथसंपदा कालौघात नष्ट झाली किंवा केली गेली. मध्यंतराच्या काळात चमत्कारांनी भरलेल्या गोष्टींचा समावेश झाला. चमत्कार तिथे नमस्कार या उक्तीप्रमाणे लोकांना वश करून घेण्यासाठी चमत्कारांचा वापर केला गेला असावा. ज्याचा परिणाम म्हणून सध्या आपल्याला असं अर्धवट आणि चमत्कारांनी भरलेलं साहित्य वाचायला मिळतं.
अशी मॉन्यूमेंट्स भारतात आणि जगभरात शेकडो वर्षांपूर्वी कशी उभारली असतील याचे काही वैज्ञानिक स्पष्टीकरण कोणाकडे असेल तर द्यावे. सध्याच्या विज्ञानाला यातील काय काय शक्य आहे याचा पण उहापोह करता येईल.
बाकी पृथ्वी सपाट आहे असं मानणारा अजूनही एक गट/ समाज असताना, पृथ्वी गोल आहे व पृथ्वीभोवती वातावरणाचे ७ थर असतात हे आपल्या पूर्वजांना कसं माहित होतं? नक्षत्रांची, ग्रहमालांची, आकाशगंगांची माहिती कशी काय होती? याविषयी चर्चा वरील प्रश्नांची उत्तरं मिळाली की करता येईल.
29 Aug 2017 - 8:58 am | भंकस बाबा
लोहस्तंभ अपघाताने बनल्याची शक्यता जास्त आहे, जसे पेनिसिलिन अपघाताने बनलेले होते, फ्लेमिंगने निरीक्षण लिहून ठेवले म्हणून त्याला शोध लागला , आपल्याकडे पाककृती लिहायला विसरले असतील!
22 Aug 2017 - 9:55 am | सुबोध खरे
http://home.iitk.ac.in/~bala/journalpaper/journal/journalpaper_17.pdf
दिल्लीतील न गंजणारा लोखंडाचा खांब याची शास्त्रीय मीमांसा वरील दुव्यात आहे. तो न गंजण्याचे कारण म्हणजे त्यात असणारे अतिरिक्त फॉस्फरस आणि त्याची संयुगे हे आहे. धातू विज्ञान किंवा रसायनशास्त्र याबद्दल भारतीय पारंपरिक ज्ञान हे तेंव्हा त्याकाळच्या मानाने बरेच पुढे होते आणि आता ते लुप्त होत चाललंय हि वस्तुस्थिती आहे. परंतु म्हणून आमच्या कडे पुष्पक विमान अणुबॉम्ब इ. होते हे म्हणणे हे छदमशास्त्र आहे. आपल्याकडे जुन्या रुढी आणि परंपरांमध्ये रममाण व्हायचं पण स्वतः काहीच करायचं नाही अशी माणसं भरपूर आहेत त्यामुळे या विषयावरील वाद कधीच संपणार नाही.
22 Aug 2017 - 8:28 pm | ट्रेड मार्क
असे फोर्ज्ड लोखंड बनवायला फर्नेस असायला पाहिजे. ८ मीटर लांबीचा (उंचीचा) सलग स्तंभ बनवायचा म्हणजे तेवढी मोठी भट्टी पाहिजे. ६००० किलो वजन उचलून जमिनीत सरळ रोवायचं आणि हे सर्व शेकडो वर्ष टिकू शकेल असं बनवायचं. यात फक्त धातू आणि रसायनशास्त्र यापेक्षा अजून काहीतरी माहिती पाहिजे.
भारतीयांचं सोडून द्या पण तथाकथित प्रगत देशांतील हुषार वैज्ञानिकांना लोखंड आणि क्रोमियम यांचं मिश्रण केल्यावर न गंजणारं लोखंड बनू शकतं हे कळायला १८२१ साल उजाडलं. मग जर १६०० वर्षांपूर्वी असा स्तंभ बनवू शकत असतील तर हे ज्ञान त्याआधी बरेच वर्ष मिळवलेलं असणार. मग आपल्यावर साधा लोखंडी फाळ बनवता यायला परत विसावं शतक उजाडायला लागलं? हे ज्ञान लुप्त कसं झालं?
अजून कुठलं कुठलं असं ज्ञान त्याकाळी होतं पण ते नंतर लुप्त झालं आणि त्यापैकी अजून काय काय आधुनिक विज्ञानाला पण शक्य होत नाहीये याचा कोणी शोध घेतलाय किंवा घेतंय का?
23 Aug 2017 - 5:05 am | अत्रे
कोणीही वैज्ञानिक एखादा प्रश्न पडला की लगेच पुराणे चाळत उत्तरे शोधत नाही. सध्या अव्हेलेबल असलेल्या ज्ञानावर, आणि प्रायोगिक पद्धतीवर त्यांचे बरे चालू आहे.
बाकी इतिहासातून विज्ञान शोधण्यासाठी लागणार वेळ आणि पैसे भारत सरकारकडे आहेत का हे बघायला पाहिजे. मुळात इतिहास शोधण्यात तरी आपण पुढे आहोत का? त्यातले विज्ञान ही अजूनच नॅरो कॅटेगरी झाली. पाश्चत्त्य देशात इतिहास सिरिअसली घेतला जातो - उदाहरणार्थ हा व्हिडीओ बघा https://www.youtube.com/user/britishmuseum/playlists
23 Aug 2017 - 5:49 am | अत्रे
ही लिंक वाचा. यात कालौघात जगभरातले लुप्त झालेले तंत्रज्ञान यावर छान माहिती आहे
History of Scientifc Regression
23 Aug 2017 - 10:16 pm | ट्रेड मार्क
मी जे विचारलंय त्याचा साधासरळ अर्थ असा आहे - जर तुमचा क्लेम आहे की आपले पूर्वज विज्ञानाच्या बाबतीत मागासलेले होते, तरी सुद्धा अश्या ज्या टेकनॉलॉजिकली ऍडव्हान्स पुरातन गोष्टी डोळ्यासमोर दिसतात, त्यांचा आत्ताच्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे का?
म्हणजेच, लोहस्तंभाचं नुसतं कंपोझिशन माहित करून नव्हे तर १६०० वर्षांपूर्वी (जर आपला क्लेम आहे कि त्यावेळचे लोक्स वैज्ञानिकदृष्ट्या मागासलेले होते) तर त्यांनी तो कसा तयार केला आणि तो त्याजागी कसा स्थापित केला?
शेवटी विज्ञान म्हणजे काय? केलेल्या प्रयोगांतून आणि अनुभवांतून शिकलेल्या गोष्टी जेव्हा अपेक्षित रिझल्ट देतात. यात काही प्रयोग कमी वेळात सिद्ध होतात तर काहींना कित्येक वर्षे लागतात. हे प्रयोग आणि अनुभव इतरांचे सुद्धा असू शकतात, ज्यातून लीड घेऊन कोणी एक व्यक्ती पुढे प्रयोग सिद्ध करू शकते. फक्त आत्ता सिद्ध होत असेल तरच खरं मानू असं म्हणलं तर विज्ञान पुढेच जाणार नाही कारण प्रयोग हे सिद्ध करता न आलेल्या गोष्टींवरच करत राहायला लागतं.
इतिहास सिरियसली घ्यायचा म्हणजे काय करायचं? आपल्या पूर्वजांना अजूनही आपल्याला उलगडत नसलेल्या काही गोष्टी माहित होत्या म्हणलं की लगेच चोहीकडून हल्ला होतो. माझा एक आर्किओलॉजिस्ट मित्र मनमोहन सिंगांच्या मुलीने हिंदू संस्कृतीवर लिहिलेले पुस्तक प्रमाण मानतो. जर खरंच संशोधन करायचं असेल तर फक्त अशी नंतर कोणीतरी लिहिलेली पुस्तकं वाचून कसं चालेल? असो.
24 Aug 2017 - 6:18 am | अत्रे
खूप ब्रॉड प्रश्न आहे त्याचे उत्तर देणे मला जमणार नाही.
इतिहास सिरियसली घ्यायचा म्हणजे इतिहासाचे संशोधन करणाऱ्यांना फंडिंग द्यायचे, अशा संस्था स्थापन करायला सपोर्ट द्यायचा, ऐतिहासिक वास्तू, वस्तू व दस्तावेज यांची काळजी घ्यायची, त्यांना डिजिटाइझ करायचे.. अजून बरेच काय काय करणे. हे सर्व भारतात होत नाही असे मला म्हणायचे नाही पण पाश्चात्य देशात खूप मोठ्या प्रमाणात होते.
25 Aug 2017 - 5:05 am | ट्रेड मार्क
या कंपोझिशनची एवढी मोठी वस्तू तयार कशी केली आणि ती कशी स्थापन केली?
होयसळेशवर मंदिरातले खांब कसे तयार केले? याचं उत्तर "लाकडी लेथ चा वापर करून" हे कसं पटकन दिलंत. तसंच याचं पण काहीतरी असेलच की. बादवे लाकडी लेथ वर १२ फुटाचे दगडी खांब कसे बरं केले असतील?
स्तंभाच्या कंपोझिशनचा अभ्यास करून आपण म्हणतो तेव्हाचे लोक धातू शास्त्रात आणि रसायनशास्त्रात पारंगत होते. पण त्यापुढे जाऊन जर क्रेन आणि पुलीज शिवाय ६००० किलो वजन नीट उचलून स्थापित करायचे याला काहीच स्किल लागले नसेल? मग अभियांत्रिकीमध्ये पण हुशार होते म्हणायचे का?
28 Aug 2017 - 7:06 pm | नितिन थत्ते
तंत्रज्ञानात अनेकदा अपघाताने अलौकिक गुणधर्माच्या वस्तू तयार होतात.
त्यामागचे विज्ञान ठाऊक असतेच असे नाही.
28 Aug 2017 - 10:58 pm | ट्रेड मार्क
बहुतेक वेळेला अपघातानेच शोध लागले आहेत. अश्या शोधांमधून जी वस्तू तयार होते तशीच परत तयार करण्यासाठी कुठल्या स्टेप्स वापरल्या याची सविस्तर नोंद करून ठेवणे आवश्यक असते. फक्त यशस्वीच नव्हे तर यश न आलेल्या प्रयोगांचीही नोंद ठेवणे आवश्यक असते. कारण स्टेप्स करत असताना तुम्ही यशस्वी होणार का नाही याची शाश्वती नसते. तसेच एकदा वस्तू तयार झाली की मग त्यावर संशोधन करून त्या वास्तूचे गुणधर्म तसे का आहेत यावरही संशोधन होत असते. म्हणजे ते लोक्स एवढे मेथॉडिकल आणि संशोधन करण्याएवढे हुशार होते. अपघाताने शोध लागलेल्या वस्तूसारखीच वस्तू परत तयार करता येण्याएवढे प्रगत होते.
आता १६०० वर्षांपूर्वी सुद्धा असेच प्रयोग करत करत न गंजणाऱ्या लोखंडाचा शोध लागला असेल. म्हणजेच त्या लोकांना सुद्धा लोखंड कसे तयार करायचे याचे ज्ञान होते तर. त्या बेसिक लोखंडात काही मूलद्रव्य टाकून किंवा काढून आणि त्यांचे प्रमाण कमी जास्त करून वेगवेगळ्या गुणधर्माचे लोखंड बनवता येते हे पण माहित होते. याचाच अर्थ मूलद्रव्ये असतात, ती कशी मिळवता येतात, ती लोखंडात कशी मिसळायची हे सर्व ज्ञान होते. पण हे लोखंड गंजणारे नाही हे समजायला पण काही काळ जावा लागलाच असेल ना? मग हे न गंजणारे लोखंड परत बनवण्यासाठी त्याची रेसिपी पण लिहून ठेवली असेल का? असेल तर मग ते सर्व लिखित कुठे गायब झालं? आणि सगळ्यात महत्वाचे प्रश्न, १६०० वर्षांपूर्वी न गंजणारं लोखंड कसं बनवायचं याची माहिती होती, मग
१. आपल्याला साधा लोखंडी फाळ बनवायला परत विसावं शतक का उजाडायला लागलं?
२. जर का ते लोक प्रयोग करण्याइतके आणि ते परत सिद्ध करण्याइतके हुशार होते, तर वाहतुकीसाठी आत्तासारखी वाहने का विकसित केली नाहीत?
३. ते लोक वाहतुकीसाठी काही वेगळे काही मार्ग वापरत होते का?
४. असतील तर ते कुठले मार्ग होते?
५. असे अजून काय काय आहे जे काही शे वर्षांपूर्वी माहित होतं, पण मधल्या काळात माहित नव्हतं आणि १८, १९ व्या शतकात त्याचा नव्याने शोध लागला?
28 Aug 2017 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा
अख्ख्या भारतात एकच खांब
पण समर्थन कित्ती कित्ती लां.. .. ब ! ;)
29 Aug 2017 - 12:18 am | ट्रेड मार्क
तो एकच खांब कसा तयार केला असेल आणि स्थापित केला असेल त्याचं स्पष्टीकरण द्या. मग पुढे बोलू.
22 Aug 2017 - 12:02 pm | मराठी_माणूस
एक शंका : त्या न गंजणार्या खांबाचे रहस्य ज्ञात झाले असेल तर ते तंत्रज्ञान आता का वापरले जात नाही ?
22 Aug 2017 - 2:17 pm | राही
काही बाबतीत पूर्वीच्या प्रक्रिया अत्यंत किचकट असत. त्या वस्तूच्या उत्पादनासाठी सोप्या प्रक्रिया तयार झाल्या असाव्यात. किवा small scale production साठीच त्या उपयुक्त होत्या असाव्यात. मोठ्या प्रमाणातल्या उत्पादनासाठी वेगळी पद्धत सोयीची ठरून तीच रूढ झाली असेल. किंवा त्या काळात वापरली गेलेली raw materials नंतरच्या काळात दुर्मीळ' महाग झाली असतील त्यामुळे वेगळी संसाधने वापरता येण्यासाठी उत्पादनाची वेगळी प्रक्रिया शोधावी लागली असेल. Reinvent the wheel असे सहसा होत नसते.
आज स्टेनलेस स्टील नावाचा गंजविरहित मिश्रधातू सहज उपलब्ध आहे. तो स्तंभबांधणीसाठी उपयुक्त आहे की नाही हा वेगळा प्रश्न.
22 Aug 2017 - 2:43 pm | मराठी_माणूस
स्तंभबांधणी आजच्या काळात गरजेची नसेल पण काही ठीकाणी भक्कमपणा आवश्यक आहे जसे की पुल, अशा ठीकाणी हे तंत्रज्ञान उपयोगी पडु शकते. अमर महाल (घाटकोपर ) इथला पुल त्याच्या ठरवलेल्या वेळेच्या कीतीतरी आधी निकामी झाला.
22 Aug 2017 - 2:57 pm | अत्रे
न गंजणे आणि वजन पेलवणे या वेगळ्या गोष्टी आहेत असे वाटते. एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीबद्दल निष्कर्ष काढू शकणार नाहीत असे वाटते.
ज्या लोकांनी हा स्तंभ उभारला - त्या लोकांनी तेच तंत्रज्ञान वापरून अजून काही गोष्टी बनवल्या का हे पहावे लागेल.
22 Aug 2017 - 3:12 pm | मराठी_माणूस
गंजुन खराब होणार्या वस्तु साठी वापरता येइल का ?
22 Aug 2017 - 3:18 pm | अत्रे
होय असे दिसते.
हे पहा http://www.misalpav.com/comment/955404#comment-955404
फक्त स्तम्भ कसा बनवला हे महत्वाचे नसून दिल्लीच्या विशिष्ट हवामानाचासुद्धा न गंजण्यास हातभार लागला आहे.
22 Aug 2017 - 3:37 pm | arunjoshi123
पण त्यातही ती मायक्रोफिल्म थेरीच सांगीतली आहे. मग इतके वर्षे तो कसं काय तग धरू शकतो हा प्रश्न उरतोच.
22 Aug 2017 - 3:42 pm | अत्रे
नो आयडिया. त्याचा बेस किती खोल आहे बघावे लागेल.
22 Aug 2017 - 7:44 pm | ट्रेड मार्क
हा स्तंभ जमिनीवर ७ मीटर आणि जमिनीच्या आत १ मीटर आहे.
प्रश्न फक्त त्याचं कंपोझिशन काय होतं, बेस किती खोल आहे हा नाही तर अज्ञानी आणि विज्ञानाची जाण नसलेल्या लोकांनी हे कसं केलं असावं हा आहे. ६००० किलो वजन असलेला, टोटल ८ मीटर उंची असलेला स्तंभ बनवायचा, तो पण एकदम गुळगुळीत आणि सुबक. त्यावर १६०० वर्षांनीही वाचता येईल असे संस्कृत श्लोक कोरून काढायचे. आणि मग तो व्यवस्थित जमिनीत बसवायचा.
जरी वाहून आणण्यासाठी हत्तींचा वापर केला असेल तरी जागेवर आणल्यावर सरळ उभा करून एवढ्या प्रिसिजनने जमिनीत कसा काय रोवला असेल? त्याकाळचे लोक अज्ञानी असल्याने पुलीज नावाची भानगड, लेव्हरेज वगैरे संकल्पना माहित नसणारच. मग एवढी वजनदार आणि मोठी वस्तू त्यांनी कुठे बनवली आणि जागेवर कशी बसवली?
22 Aug 2017 - 7:48 pm | गवि
आणि का?
22 Aug 2017 - 8:03 pm | पगला गजोधर
सोप्पय ......
सूर्याला आवाहन करून त्याला पृथ्वीवर उपस्थित राहायला सांगितले, त्याच्या तेजोवलयाने
पृथ्वीची काया करपून गेली, तेव्हा त्या कायेच्या खपलीला पुराणातल्या मंत्रोच्चारणाद्वारे स्तंभरुपी सिद्ध केले व
त्याजागी प्रस्थापित केला ......
22 Aug 2017 - 8:24 pm | गवि
काहीतरी पुराणातल्या भाकडकथा सांगू नका.
पारद इंधन, अर्थात आयन मर्क्युरी व्होर्टेक्स इंजिन वगैरे पुराणकालीन तंत्रज्ञानाची काहीच माहिती दिसत नाही तुम्हाला. नासा पण वापरते ही टेक्नॉलॉजी, स्पेसमधे प्रिसिजन हालचालीसाठी.
विचारा नासाला.. जरा अभ्यास वाढवून या. भारतीय जुन्याला कमी लेखणं बंद करा.
22 Aug 2017 - 11:28 pm | राही
मध्य/ प्राचीन काळात एखाद्या दैदीप्यमान घटनेच्या स्मृत्यर्थ असे ध्वजस्तंभ (फ्लॅगस्टाफ) बनवले जात. मेहेरौली इथला स्तंभ हा उदयगिरीजवळ (मध्य प्रदेश) इथे बनवला गेला असे बरेच इतिहासतज्ज्ञ मानतात. अनंगपाल तोमर याने तो दिल्लीत आणला आणि रोवला. पुढे त्याच्या वंशातील पृथ्वीराज चौहानाचा घोरीकडून पराभव होऊन तो मारला गेल्यावर घोरीचा गुलाम कुत्बुद्दिन याने तो खणून सध्याच्या जागी उभारला असे मानले जाते. या स्तंभाच्या निर्मितीमागे अनेक कारणे सांगितली जातात. त्यातले एक म्हणजे हे एक कालमापक असे सन डायल होते. त्याच्या सावलीवरून ऋतुकाल ठरवीत असत. काहींच्या मते तो एक गरुड स्तंभ होता .
एंशंट इंडिअन मेटॅलर्जी या शीर्षकाखाली विकीवर अनेक शोधनिबंध आहेत. त्यातले काही copy righted आहेत.
आयर्न पिलर कोलंबिया एड्यु वर या स्तंभाचे दोनशे वर्षांपूर्वीचे फोटो आहेत.
.
22 Aug 2017 - 2:51 pm | arunjoshi123
न गंजणे, १५०० वर्षे टिकून राहणे आणि स्टील स्टेनलेस असणे हे दोन भिन्न प्रकार आहेत. तुमचे सहज उपलब्ध असलेले स्टेनलेस स्टील हे "स्टेनलेसलि गंजणारे स्टिल" आहे आणि चर्चा त्यावर चालली नाहिये.
=============
सबब व्यक्त केलेल्या आश्चर्याचे महत्त्व कमी करू नकात.
22 Aug 2017 - 3:38 pm | राही
माझा प्रतिसाद हा मराठी माणूस यांच्या ' हे तंत्रज्नान आता का वापरले जात नाही' या शंकेस अनुलक्षून उत्तरांच्या काही शक्यता सुचवणारा होता .
बाकी ठीक.
22 Aug 2017 - 6:31 pm | arunjoshi123
ओके. स्टेनलेस स्टील हा शब्द मिसलिडिंग नसला तरी स्टेनलेस स्टील गंजते हा लगेच विरोधाभास वाटेल. पण आहे तसंच. फक्त ते रावडी लोखंड न गंजता क्रोमियम गंजतं. अर्थातच, क्रोमियम एक दिवशी संपून जातं आणि नि मग लोखंड गंजतं. या स्तंभाच्या बाबतीत आय आय टी ने क्रोमियमच्या जागी दुसरं काहीतरी गंजतं असं म्हटलं आहे, पण शेवटी त्याचे देखिल गंजून गंजून एक दिवस स्टेनलेस स्टिल सारखे भजन होणारच ना?
======================
शिवाय आय आय टी चं उत्तर आत्ताच्या मेटॅलर्जिच्या मर्यादांतच आहे.
22 Aug 2017 - 1:54 pm | arunjoshi123
चलो मान लेते हैं। आता तुम्ही आम्हाला शाळेत शिकवता कि ब्रह्मांड, सॉरी विश्व, एका अतिसूक्ष्म पार्टिकलपासून बनलं (त्याला सिंग्यूलॅरिटी हे नाव आहे.) आहे. हे पार्टिकल म्हणे कोणाच्या योगसामर्थ्यावर (किंवा सामर्थ्ययोगावर वा योगायोगावर) उपलब्ध झालं? ते पार्टिकल स्वतः अस्तित्त्वात नसताना (अस्तित्त्वात नसलेल्या) अवकाशाच्या पोकळीत अवतीर्ण होऊ शकत असेल, तर लोकांनी अजून दुसरं काय काय होऊ शकतं असं मानायला बंदी घालणार?
22 Aug 2017 - 1:58 pm | arunjoshi123
ज्ञानेश्वरकालीन शास्त्रांचा आपला अभ्यास आहे, तसेच ज्ञानेश्वरीचा आहे आणि वरील गृहितक चुकिचे आहे असे आहे कि हे चुक आहे असे समजण्याची आपण घाई केलेली आहे?
23 Aug 2017 - 6:43 am | आदित्य कोरडे
ज्ञानेश्वर हे उत्तम कवी साहित्यिक तत्व चिंतक होते खरेच पण ते वरील कुठल्याही शास्त्राशी अवगत नव्हते , तुंच्या कडे तसा काही पुरावा आहे का? यादव कालीन सरंजामशाही काळात हाल भोगलेली ती भावंड होती ...
22 Aug 2017 - 2:04 pm | arunjoshi123
तुम्हाला सत्य प्रस्थापित करता येत असेल तर करा, नैतर लोकांना जे मानायचं आहे ते मानू द्या. चिकित्सा न करता अंधश्रद्धा ठेवणे हा लोकांचा लोकशाहीत एक अधिकार आहे.
22 Aug 2017 - 2:46 pm | arunjoshi123
याचा फायदा अंधश्रद्धा ठेवणार्या लोकांना नको का द्यायला?
===============================================
आज ईजिप्तमधे प्रत्यक्ष पिरॅमिड नसते आणि पिरॅमिड होते असं कुठे फक्त लिहिलं असतं किंवा लोकवंदता असती तर कोणाच्या बापाने त्याच्यावर विश्वास ठेवला नसला. का? ४००० वर्षापूर्वी जे झालंय ते डोळ्यासमोर दिसत असून इतकं कॉम्प्लिकेटेड आहे कि समोर सगळं असून जे काय झालं ते नक्की काय झालं यातली कोणतीही थेरी विश्वास ठेवायच्या लायकीची नाही.
पण जो आउटपुट आहे तो समोर आहे आणि आश्चर्यजनक आहे.
पिरॅमिड बनवायला भूमितीचं किमान ज्ञान किती लागतं ते इथं लिहिलं आहे. https://www.goldennumber.net/phi-pi-great-pyramid-egypt/ त्यातही त्यांनी केलेले चॉइस अजूनच आश्चर्यजनक आहेत.
==========================================
http://www.ancient-origins.net/ancient-places-africa-opinion-guest-autho...
इथे पिरॅमिडच्या डायमेंशन्सचा आणि पृथ्वी आणि चंद्राच्या त्रिज्यांचा अद्भूत "योगायोग" (आता योगायोगच म्हणायचा, अजून काय जास्त लायकी त्या पिरॅमिडची?) कमालीचा आहे. आणि हे फक्त बाह्य आकाराबद्दल चाललंय.
==============================
आता इजिप्तमधे प्रत्यक्ष पिरॅमिड नसते आणि होते अशी लोकवंदता असती, त्याला पोकळ आधार देखिल नसते (कारण प्रत्येक गोष्टिने आपला पुरावा ठेऊनच लुप्त व्हावे असा काही निसर्गाचा नियम नाही.), इजिप्तच्या पुरोगाम्यांनी अशा दावेकर्यांना असाच धुतला असता.
==================================
याचा अर्थ कोणीही उठून काहीही दावे करावेत का? अर्थातच नाही. मात्र वैज्ञानिक, आधुनिक जगत जितके दावे करते १/१०० दावे करायचे स्वातंत्र्य असायला हवे. कमॉण. आज कॉफी हृदयाला चांगली. उद्या मेंदूला वाईट. परवा सेक्सला चांगली. तेरवा लांब आयुष्यासाठी घातक. नेरवा हृदयाला अत्यंत घातक. पेरवा मेंदूला चांगली उत्तेजनाजनक.
=======================
मी गेली तीस वर्षे पेपर वाचतो आहे. अशा अवैज्ञानिक दाव्यांचे आणि मायथॉलॉजिकल दाव्यांचे गुणोत्तर १०००:१ इतके आहे. मूर्खपणा तरी किती करावा?
22 Aug 2017 - 3:00 pm | अत्रे
याला कारणीभूत वैज्ञानिक नाहीत - उतावळे पत्रकार आहेत. मूळ संशोधन नीट समजावून न घेताच त्याला सनसनाटी ठरवायला निघतात. आणि मग सामान्य लोकांचा अशा विज्ञानाबद्दल विश्वास कमी होऊ लागतो.
22 Aug 2017 - 3:16 pm | arunjoshi123
हसवून मारू नकात हो.
==========================
पत्रकारांना कळणारा विज्ञान हा शेवटचा विषय असतो. ते व्हर्बॅटिम कोट करतात.
=====================
बहुतेक तुम्ही (आपला तो बाब्या च्या नादात)* कधी पुढे जाऊन त्या शास्त्रज्ञांच्या साइटवरचीच वर्डिंग वाचत चला.
================================
* व्यक्तिगत आरोप नाही हा, एक आपलं.
22 Aug 2017 - 3:22 pm | अत्रे
Bad science reporting या विषयावर वाचा. ज्ञानात भर पडेल.
lies damn lies and statistics हे पुस्तक कुठे मिळाले तर वाचा.
22 Aug 2017 - 3:11 pm | arunjoshi123
आपणांसही एक सद्गृहस्थ मानून खालिल लिंकेत तावातावाने केलेल्या टेलिपोर्टेशन क्षेत्रात रिसर्च आणि डेवलपमेंट करणार्या गुगल (नाव ऐकले असेल) कंपनीच्या दाव्यांबद्दल हेच्च प्रश्न विचारू करू शकतो काय?
म्हणजे इंधन, तळ वैगेरे फार पुढची गोष्ट झाली, पण बेसिकली तुम्ही कशाचं टेलिपोर्टेशन करणार? मंजे क्ष ठीकाणी प्रवासी गायब होऊन तत्क्षणी य ठीकाणी उगवणार? याला काही वेळ लागणार का इंस्टंटेनियसली होणार? याला उर्जा लागणार का?
लक्षात घ्या, आधुनिक दाव्यांना तुम्ही जे प्रश्न पुराणवाद्यांना विचारत होतात त्याही पेक्षा मूलभूत, एक पायरी अगोदरचे प्रश्न विचारत आहे. आणि एक शिक्षित माणूस म्हणून पु ना ओकांची पुस्तके घेऊन जो भ्रमनिरास झाला, तसा तुम्हाला गुगलची बातमी वाचताना होतो का आनंद होतो? आणि का?
==============================
टिका कोणावर करायची यावर तुमच्या मनात बायस नाहीये का?
22 Aug 2017 - 3:28 pm | मराठी_माणूस
टेलीस्कोपचा शोध जर साधारणपणे १६ व्या शतकातला, मग ग्रहांची माहीती त्याच्या आधिपासुन कशी होती ?
22 Aug 2017 - 3:49 pm | अत्रे
रोचक प्रश्न!
पाच ग्रह डोळ्यांनी दिसू शकतात (नीट लक्ष देऊन पाहिले तर) .
अजून माहिती - https://www.quora.com/How-did-ancient-Indians-find-that-there-were-nine-...
यावर छानशी डॉक्युमेंट्री कुठे असेल तर कोणी सांगा. धन्यवाद.
22 Aug 2017 - 4:49 pm | arunjoshi123
शून्यातून सुरु करून आपण पाच ग्रह आहेत हा निष्कर्ष काढायला चालू केले तर किती वेळ लागेल?
मंजे पहिले ग्रह आणि तारे असं काही असतं ते कळायला. नंतर आभाळात गोष्टी कशा फिरतात त्याचा एक पॅटर्न आहे हे कळायला. नि मग पुढे लक्ष ठेऊन त्यांनी जी निरिक्षणे मांडली आहेत तितकी मांडायला.
भारतीयांची अवकाशाबद्दल एकूण किती गणिते होती आणि ती करायला त्यासंबंधीत निरिक्षणे किती काळ करावी लागत राहीली असतील? किती पिढ्या? किती जागून (मंजे जागांवरून आणि न झोपता या दोन्ही अर्थी) ति केली गेली असतील?
22 Aug 2017 - 5:58 pm | अत्रे
त्या काळातल्या लोकांनी (भारतीय आणि इतर - चायनीज, ग्रीक, इजिप्शिअन) हे सगळे शोध कसे लावले असतील हे एक गूढ आहे. मला वाटते हे सगळे शोध लागायला एखाद्या समाजात पुरेशी आर्थिक समृद्धी असायला हवी, अशी निरीक्षण करणाऱ्या लोकांना सांभाळणारी अर्थव्यवस्था पाहिजे, त्यांनी आपली निरीक्षणे पिढ्या-न-पिढ्या पुढे शेअर करण्यासाठी एखादे माध्यम पाहिजे .
१०० - २०० हजार वर्षांपूर्वी होमो सेपियन उदयास आले आणि ४ हजार वर्षांपूर्वी मनुष्याला ग्रहांची माहिती होती.
मधल्या काळात काय झाले असेल हे जाणून घ्यायला टाईममशीन असती तर किती बरे झाले असते!!
22 Aug 2017 - 6:24 pm | arunjoshi123
एक्झॅक्टली. २ लाख वर्षांपूर्वी मनुष्य बनला. १० हजार वर्षांपूर्वी मनुष्य सुसंस्कृत झाला (मंजे अजून एक प्राणी न राहता थोडा वेगळा झाला). "किमान" ४००० वर्शांपूर्वी बरीच माहिती होती.
=================
आणि आता गेल्या १०० वर्षांत एकही म्यूटेशन न होता, पूर्वीच्या माणसाला फार मूर्ख का समजायचं? मंजे आता होतंय तशा किती सायकल्स २.२ लाख वर्षांत संभव आहेत ? मागे इथेच आपल्यापेक्षाही प्रगत संस्कृती नव्हतीच याची इतकी खात्री कशी? उत्क्रांती २ कोटी वर्षांत आद्यमातेची साद्यमाता बनवते तर आपल्याकडे अशी ३६० कोटी वर्षे आहेत आरंभापासून!!!
=====================
बाय द वे, तुमच्या यु के एक "महान" शास्त्रज्ञ काळात मागे पुढे करून आलेत. आहात कुठे? तुम्ही नेहमी शेंडी, धोतरवाल्यांच्या मागे धावता म्हणून "किती बरे झाले असते" इ इ वाटतं तुम्हाला.
22 Aug 2017 - 6:43 pm | अत्रे
पूर्वीच्या माणसाला फार मूर्ख समजायचे काहीच कारण नाही. मी कुठेतरी वाचले होते की हजारो वर्षांपूर्वीसुद्धा ह्यूमन आय-क्यू फारसा वेगळा नव्हता. त्या काळातले एखादे बाळ अचानक आजच्या काळात आणून वाढवले तर कोणाला फरक देखील सांगता येणार नाही.
एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे - विज्ञान फक्त ज्या गोष्टी सिद्ध करता येतात त्या बद्दलच बोलते. बाकी सर्व "असे झाले असेल - तसे झाले असेल" असे विना पुरावे तर्क सायन्स फिक्शन च्या सदराखाली टाकावेत. बेनिफिट ऑफ डाऊट नको, ते सायन्स फिक्शन म्हणूनच एन्जॉय करा.
--
कोणते हो ते टाईम मशीन ने प्रवास करणारे शास्त्रज्ञ?
22 Aug 2017 - 6:58 pm | arunjoshi123
यानं शाळेत शिकवलं जाणारं ३/४ विज्ञान फिक्शन म्हणून टाकावं लागेल.
================
एक उदाहरण देतो. रोगप्रतिकाराकरिता आपण मृत विषाणूंचे इंजेक्शन देतो. आता फक्त निरिक्षणे करून शास्त्रज्ञांनी मानवतेची भारीच्च सोय केली आहे आणि याबद्दल त्यांचे ऋणि असले पाहिजे. पण आपण काही प्रश्न विचारू आणि पाहू मज्जा:
१. मृत आणि जीवंत देहांशी लढणे एकच कसे? मी मेलेल्या अख्ख्या अमेरिकन सैन्याला हरवू शकतो. तेच मी जिवंतला करू शकतो का?
२. डबल्यूबीसी फार तर फार २० दिवस जगतात. मग ज्यांना विषाणूंना मारायची ट्रेनिंग मिळाली त्या मेल्या कि ते ज्ञान उरतं कसं? त्या पुढच्या पिढिला "तोंडी" (तोंडी कारण आता मेलेल्या विषांणूंचे देह नसतात.) देतात कि काय? त्यांचं कुठे ट्रेनिंग सेंटर असतं जिथे पास्ट वॉर्सची हिस्टोरी लिहिलेली असते?
====================
विज्ञान म्हणजे संपूर्ण कारणमिमांसा आणि या निकषावर शेष काही उरणार नाही.
23 Aug 2017 - 2:20 am | थॉर माणूस
१. मृत आणि जीवंत देहांशी लढणे एकच कसे? मी मेलेल्या अख्ख्या अमेरिकन सैन्याला हरवू शकतो. तेच मी जिवंतला करू शकतो का?
>>> आर्मीला लढाईचे प्रशिक्षण देताना जिवंत पाकीस्तानी नाहीतर चीनी सैनिक आणतात का सरावासाठी? का वेगळी काही पद्धत असते? इंजेक्शन विषयी (व्हॅक्सिन म्हणायचंय बहुतेक आपल्याला) फारच ओव्हरसिंप्लिफिकेशन होतंय असं नाही वाटंत? ते काय दोन चमचे मेलेले फ्लूचे विषाणू एक लिटर पाण्यात ढवळून बनवतात का काय?
२. डबल्यूबीसी फार तर फार २० दिवस जगतात. मग ज्यांना विषाणूंना मारायची ट्रेनिंग मिळाली त्या मेल्या कि ते ज्ञान उरतं कसं? त्या पुढच्या पिढिला "तोंडी" (तोंडी कारण आता मेलेल्या विषांणूंचे देह नसतात.) देतात कि काय? त्यांचं कुठे ट्रेनिंग सेंटर असतं जिथे पास्ट वॉर्सची हिस्टोरी लिहिलेली असते?
>>> उत्तम प्रश्न, असे प्रश्न पडायला हवेत. उत्तराच्याही जवळपासच आहात. माझ्या माहिती प्रमाणे अशी हिस्टरी खरंच आपल्या रक्तात असते, प्रत्येकाच्या प्रतिकारकसंस्थेच्या क्षमतेप्रमाणे ती ७०-१०० वर्षापर्यंत रक्तात राहू शकते (म्हणूनच म्हातारपणात इम्यूनिटी कमी होत जात असावी)
23 Aug 2017 - 11:10 am | arunjoshi123
प्रश्न असा उरतो, जो अत्रेंना आहे, कि रोगप्रतिकारकशक्तिमागची थेरी पुराणातली वांगी म्हणून त्यागावी का?
23 Aug 2017 - 12:17 pm | अत्रे
ऐवजी आपण विज्ञान म्हणजे संपूर्ण कारणमिमांसेकंड वाटचाल असे म्हणूया. म्हणजे ऑबसेर्व्हशन -> हायपोथेसिस -> प्रयोग -> नवीन हायपोथेसिस -> नवीन प्रयोग -> .. -> (खूप वेळा लोकांनी करून पहिल्यांनंतर) _> वैज्ञानिक थेरी
पण विज्ञान असे म्हणत नाही की मूळ कारण शोधेपर्यंत जगणे थांबवा म्हणून! जर एखादी जडीबुटी एखाद्या रोगावर काम करत असेल (आणि प्रयोगातून तसे सिद्ध होत असेल की ती काम करत आहे) तर खुशाल वापरावी. तिचे काम करण्याचे मेकॅनिझम शोधून काढण्याचे काम वैज्ञानिक सुरूच ठेवतात.
तुमचे विषाणूंचे उदाहरण समजले नाही. या बद्दल माहित नाही. वाचावे लागेल.
23 Aug 2017 - 1:58 pm | arunjoshi123
आजच्या विज्ञानाचं वाटचाल हेच्च रुप आहे. एका कोणत्या विषयाची त्यांनी संपूर्ण कारणमिमांस करून संपवली अस्सेल तर शप्पथ.
आणि हीच खरी लुच्चेगिरि आहे विज्ञानाची. "आम्ही म्हटलेलं फायनल नाही" पण "तुम्ही म्हटलेलं नक्कीच चूक आहे." खरं तर दोन विधानं विरोधाभासी आहेत. अरे तुम्ही म्हटलेलं फायनल नसेल, तर कदाचित पुढे तुम्ही आज मी जे म्हणतोय ते म्हणायची शक्यता आहेच. मग तुमच्या आजच्या भूमिकेशी माझी आजची भूमिका जमत नसेल तर मी चूक कसा? त्यामुळं विज्ञानवाद्यांना कोणालाही चूक म्हणायचा तार्किक अधिकार नाही. नैतिक पण नाही. (बघे म्हणून तुम्ही एखाद्या भूमिकेचा विरोध करा लॉजिकलि, इल्लॉजिकलि, चालेल.)
==============================
शिवाय पुराणकाळि विमान होते म्हणणारांची "अंतिम भूमिका" विज्ञानवादी त्यांचं जे काय ते फायनल झाल्याशिवाय चूक कि बरोबर म्हणू शकत नाहीत.
23 Aug 2017 - 2:08 pm | अत्रे
काही गोष्टी चूक आहेत हे नक्कीच सिद्ध करता येते. इतर काही गोष्टी- माहित नाही या सदराखाली येतात. आणि जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत तो पर्यंत त्या "माहित नाही" या सदराखालीच राहतात. त्यांना चूक ही म्हणू नये आणि बरोबर ही म्हणू नये.
23 Aug 2017 - 2:47 pm | arunjoshi123
(हे पहा, आपण माहिती नसण्याबद्दल तर बोलतच नैय्यौत.) एखादी गोष्ट विज्ञान जेव्हा चूक म्हणून सिद्ध करतं तेव्हा "फूल अँड फायनल कंक्लूजन. फाइल क्लोज" असा प्रकार नसतो. ते पुन्हा "चूक नाही" असं सिद्ध होईपर्यंत चूक असं ते असतं. याला काही अर्थ आहे का? तुम्ही चूक म्हणेपर्यंत आम्ही चूक म्हणायचं आणि तुम्ही स्टँड बदलला कि आम्ही बदलायचा याला काही अर्थ आहे का?
असं का नाही कि तुम्हाला फायनली नक्की काय ते माहीत होईपर्यंत आम्ही काहीही म्हटलं तर चालतं? तुमच्याशी जुळलं तर ठिक, नाही जुळलं तर निर्भत्सना हे काय लॉजिक आहे?
==================
न्यायालयात निकाल खालच्या ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत उलटे होत जातात. पण शेवटपर्यंत निकालच्या विरुद्ध बाजूला खरं मानणारांना मूर्ख मानलं जात नाही. शेवटचा निकाल आला अन्य काही खपवून घेतलं जात नाही. पण हा फेअरनेस विज्ञानाच्या बाबतीत () लोक चालवून घेत नाहीत.
23 Aug 2017 - 2:57 pm | अत्रे
चुकीच्या विधानाचे एक उदाहरण देतो -
विधान 1 - पृथ्वी चेंडूच्या आकाराची नसून सपाट आहे.
समजा - कोणी म्हणाले की सगळ्या मनुष्याला कसलेतरी सम्मोहन झाले आहे आणि म्हणून पृथ्वी गोल वाटते (मॅट्रिक्स चित्रपट आठवा)
हा इतका एक्सट्राऑर्डिनरी क्लेम आहे की सामान्य भाषेत याला चूक असेच म्हणावे लागेल. उद्या कोणी म्हणेल अरे त्या मॅट्रिक्स चे संशोधन करा, त्यात वेळ आणि पैसे घाला. म्हणून काय त्याचे ऐकायचे?
विधान 2 - महात्मा गांधींचा खून आईन्स्टाईनने केला आणि इतर सर्व लोकांना असे भासले कि खून गोडसे ने केला आहे. खुद्द गोडसे ला सुद्धा संमोहीत करून तसे भासवले गेले होते
हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या चूक = असत्य आहे. तुम्ही असे म्हणू शकत नाहीत की उद्या असा शोध लागू शकतो की खून आईन्स्टाईननेच केला. तो एक अतिशय एक्सट्राऑर्डिनरी क्लेम आहे - ज्यासाठीकी पुरावे सुद्धा तेवढेच तगडे लागतील. तोपर्यंत त्याला चूक असे म्हणावे नाही का?
23 Aug 2017 - 3:18 pm | arunjoshi123
चूक कसं? पृथ्वीच नव्हे तर अखिल विश्व सपाट आहे. हे पहा.
http://www.worldsciencefestival.com/videos/a-thin-sheet-of-reality-the-u...
हा अजिबात विचित्र क्लेम नाही. सारं जग २ डी फ्लॅट आहे असे कितीतरी क्लेम्स आहेत (यातला कोणीही पुराणे वाचणारा नाही. सगळे वैज्ञानिक संस्था आहेत नि विज्ञानाची कॉलेजेस आहेत.). तर माझ्यासारख्या माणसाला सगळं ब्रह्मांड फ्लॅट आहे तर पृत्थ्वी त्यातला एक भाग म्हणून फ्लॅटच असणार असं वाटायला काय हरकत आहे?
तर बिनासम्मोहनाचे याच विषयावर खूप संशोधन चालू आहे. उद्या हे खरे निघाले तर पृथ्वी पुन्हा सपाट म्हणायला लावणार! याला काय मतलब आहे का?
====================================
खूनाचे संम्मोहन झालेच नाही हा क्लेम आणि त्याचा पुरावा देखिल तितकाच अवघड आहे. कुठे त्याचं रेकॉडिंग आहे नि साक्षीदार आहेत? आणि असले तरी पाहणारे आजचे जज सम्मोहित नाहीतच हे कशावरून?
=====================================
मुद्दा असा आहे कि मेनस्ट्रिम मत प्रिव्हेल व्हावं, पण असं १००% लोकांचं तेच्च मत असावं हा दुराग्रह का?
23 Aug 2017 - 3:32 pm | अत्रे
पॉझिटिव्ह क्लेम करणाऱ्याने पुरावे द्यावेत असे अभिप्रेत असते. ही चर्चा वाचा, खूप रोचक आहे
https://philosophy.stackexchange.com/q/678/८३१४
जज सम्मोहन वगैरे लॉजिक काँस्पिरसी थेरिस्ट लावतात आणि त्यांच्या कोंस्पिरसी ची त्रिज्या हळूहळू वाढतच जाते. त्यांना समजावून सांगणे अशक्य आहे. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाला जसे भास आणि सत्य यातला फरक कळणे अवगढ़ होते, तसेच कोंस्पिरसी थेअरी वाल्यांचे असते.
100% लोक मेनस्ट्रीम ला सत्य मानणार नाहीत यावर सहमत. पण त्यातल्या कुंपणावरच्या लोकांशी वाद घालण्यात काहीच गैर नाही.
23 Aug 2017 - 3:36 pm | अत्रे
बरोबर लिंक
Why negative claimant does not have burden of proof?
23 Aug 2017 - 3:54 pm | arunjoshi123
सहमत.
24 Aug 2017 - 6:56 am | अत्रे
तुम्ही सहमत झाल्यामुळे चुकल्या-चुकल्यासारखे वाटत आहे. भांडायला मुद्दाच नाही की राव. :)
24 Aug 2017 - 11:49 am | arunjoshi123
आपला मूळ विषय इतिहासातील, इतिहासाबद्दल कोणते एक स्पेसिफिक विधान सत्य आहे काय, असू शकते काय. तिथे तुमची भूमिका कट्टर नाही. मग सत्य प्रस्थापित करायचा खर्च तुम्ही उचलायचा का मी हे माझ्यासाठी गौण आहे, म्हणून सहमत व्हायला काय हरकत आहे?
25 Aug 2017 - 6:42 am | आदित्य कोरडे
फक्त वाद म्हणून मुद्दा मांडताय कि तुम्हाला खरेच असे वाटते कि पृथ्वी सपाट आहे घनगोलाकार नाही?मग गुरुत्वाकर्षण बळाबद्दलही तुमची काही मत असतीलच तीही ऐकायला आवडेल ...
28 Aug 2017 - 11:10 am | arunjoshi123
मला काहीच वाटत नाही. पृथ्वीसकट अखिल ब्रह्मांड सपाट आहे, होलोग्राफिक आहे असा एक मतप्रवाह आहे. यांचा नि बायबलवाल्यांचा काही संबंध नाही, हे चांगले प्रोफेशनल शास्त्रद्न आहेत. उद्या त्यांचे संधोधन मेनस्ट्रिम झाले तर माझ्यासमोर दुसरा काही उपाय नाही.
22 Aug 2017 - 11:04 pm | राही
असे म्हणतात की आणीबाणीच्या परिस्थितीत मनुष्य जास्तीत जास्त कार्यक्षमतेने काम करतो. संकटकालीन स्थितीला समाज मात्र दोन तऱ्हांनी सामोरा जातो. एक तर गलितगात्र होऊन परिस्थितीला शरण जातो अथवा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत संकटाला भिडतो. त्याला नवनवीन तंत्राची कास धरणे भाग पडते. गरज ही शोधाचे जननी आहे हे वाक्य घिसेपिटे असले तरी आधुनिक विज्ञानाला लागू पडते. अलीकडच्या काळातील बरेचसे शोध युद्धांच्या धामधुमीत लागले आहेत किंवा त्यांच्या संशोधनाला गती मिळाली आहे .
" तारा ताणिलियावरी पिळुनिया खुंट्यास वाद्याचिया
त्यांच्यातून अहा ध्वनी उमटती जे गोड ऐकावया"!
22 Aug 2017 - 3:43 pm | arunjoshi123
आमच्या मते जपानवर टाकलेला बाँम्ब फक्त काही ग्रॅम्सचा होता. (मंजे बाँब असेल मोठा, पण युरेनियम इतकंच होतं. आता जुन्या काळात "युरेनियमला आग लावायची" जर कै सोप्पी रित असेल, तर तामझामाची गरज नाही.) त्यातलाही प्रत्यक्ष "जळला" तो अजूनच कमी.
==================
बेसिकली, त्यांना बेनेफिट ऑफ डाऊट द्यायचा का नाही हा प्रश्न आहे.
22 Aug 2017 - 5:04 pm | पगला गजोधर
होय होय, बरोबर आहे, त्यांना बेनेफिट ऑफ डाऊट द्यायला हवा.....
नै काये नं, लहानपणी दिवाळीत आम्ही न वाजलेले फटाके गोळा करायचो, त्यांच्यातली दारू काढून एका कागदावर ठेवायचो, व सरळ काडेपेटीतील काडीने आग लावायचो. मस्त मश्रुम क्लाउड दिसायचा दारू जळल्यावर.
जुन्या काळात पण तसंच असेल कदाचित, थोडंस युरेनियम द्रोणामधे घ्यायचं आणि गारगोटीतून ठिणगी लावायची, काही तामझाम नाही.
गारगोटीतील ठिणगी युरेनिअममधे, फिशन का ते फ्युजन अशी चेन रिऍक्टिव प्रक्रिया आपोआप सुरु करून द्यायची.
22 Aug 2017 - 6:46 pm | arunjoshi123
आपल्या नर्व्हस सिस्टिममधले करंट कसे प्रवाहीत होतात आणि कसे इंसूलेट होतात हे प्रस्थापित इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं ज्ञान डिफाय करतं. लक्षात घ्या मी मेंदूचं संगणकीय काय इ इ म्हणत नैयय. फक्त विद्युतप्रवाह. त्याच्यामुळे ठिणगी लावायचा कोणता तामझाम असू शकतो.
=========================
तुमची जी मानसिकता आहे* त्यात एक विचित्र लॉजिक आहे. शोध फक्त आधुनिक पद्धतीने शोध करणारांनाच लागू शकतात. बाकी सायंटिफीक मेथडने शोध नाही घेतला तर काही गवसू शकत नाही. का? असे दांडके घेऊन इतरांची खिल्ली का उडवायची. सायंटिफिक मेथड जेव्हापासून प्रचलित झाली आहे त्यापूर्वी अस्सेच तुक्क्याने लाखो शोध लागले आहे. तुमच्या/माझ्या आणि प्राण्याच्या जीवनातले हजारो फरक पहा, हा प्रत्येक फरक एक शोध आहे, कोणी ना कोणी कधी ना कधी लावला आहे.
===============================
बाय द वे, ज्यांनि आण्विक प्रक्रियेचा शोध लावला त्यांनी रेडियम असं कागदी द्रोणातच गुंडाळून ठेवलं होतं, आणि ज्यांनी ठिण्गीचा शोध लावला त्यांनी गारगोटीनंच लावला होता.
===============
शिवाय आपण लागलेल्या आधुनिक शोधांची खिल्ली उडवायचे देखिल थोडे कष्ट घेत जा.
===============
*(वाक्यरचना व्यक्तिगत नाही. जनरल आहे.)
22 Aug 2017 - 7:01 pm | पगला गजोधर
तुमच्यासारख्यान्ची जी मानसिकता आहे* त्यातही एक विचित्र लॉजिक आहे, आता बायबलच्या जागी कुरान, गीता, पुराण इ इ टाकुन बघा
*(वाक्यरचना व्यक्तिगत नाही. जनरल आहे.)