सूर श्वासांच्या लयीवर स्वार झाला पाहिजे
काळजाच्या 'कोपऱ्यावर',वार झाला पाहिजे!
दुःखसुद्धा एवढे तालात आले पाहिजे
की सुखांचा,'उंबरा' तय्यार झाला पाहिजे!
जाणिवांची ओल इतकी खोल रुजली पाहिजे
जीवनाचा बाग हिरवागार झाला पाहिजे!
कागदावरच्या फुलांना रंग दे,मधु-गंध दे
शब्द-शब्दाचा तुझ्या 'गुलज़ार' झाला पाहिजे!
शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर
चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे!
—सत्यजित
प्रतिक्रिया
21 Aug 2017 - 7:45 pm | सत्यजित...
परवा गुलजार साहेबांच्या वाढदिवशी (१८/०८) सुचलेल्या ओळी!
22 Aug 2017 - 11:18 am | एस
गुलजारसाहेबांबद्दल काय बोलणार! _/\_
कविता आवडली. तुम्ही गझलांमधून बाहेर पडून कधी मुक्तछंद करून पाहा असे सुचवतो.
22 Aug 2017 - 3:46 pm | चांदणे संदीप
किंवा इतरही काही.
Sandy
22 Aug 2017 - 3:49 pm | सत्यजित...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
22 Aug 2017 - 5:22 pm | पुंबा
++११
आणखी वेगळे आकृतीबंध ट्राय करून पहा असे सुचवतो..
22 Aug 2017 - 3:47 pm | सत्यजित...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद एस!
कृपया आपल्या सुचवणीमागचे कारण सांगू शकाल का?
24 Aug 2017 - 1:16 pm | एस
तुम्ही इतर फॉरमॅटमध्ये आणि विशेषतः मुक्तछंदात तुमच्या गझलांप्रमाणेच अप्रतिम असे काही लिहित असाल असे वाटले. किंवा नसाल तर लिहून पहा. वाचायला आवडेल.
24 Aug 2017 - 10:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली गझल. अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
25 Aug 2017 - 2:48 am | सत्यजित...
मनःपूर्वक धन्यवाद सर!
26 Aug 2017 - 8:54 am | पैसा
सुरेख लिहिले आहे!
31 Aug 2017 - 3:45 pm | mr.pandit
खुप छाम सत्यजितजी
1 Sep 2017 - 1:58 am | सत्यजित...
धन्यवाद पैसा,पंडितजी!