हायकूचा पहिला प्रयत्न !

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
23 Aug 2017 - 9:01 pm

एक पक्षी अंधारात
बरसणाऱ्या जलधारात
घरट्यात एकटाच . . . .

झाडावरचं एक फूल
उमलून कोमेजलेलं
झाडाच्याच पायाशी ......

पाहतो शून्यात मी
आजकाल नेहमी
विश्व निर्मिती तिथूनच !

जुळवले शब्द काही
अर्थ उमगलाच नाही
तरीही अर्थपूर्ण !

अभय-काव्यकविता माझीफ्री स्टाइलकवितामुक्तकभाषा

प्रतिक्रिया

चांगला प्रयत्न आहे. पण बहुतांशी कविता ह्या तीन ओळी कविता आहेत. हायकू नाहीत. हायकूमध्ये पहिल्या दोन ओळींत एखाद्या घटनेचं वर्णन असते आणि तिसऱ्या ओळीत एक कलाटणी असते जिच्यामुळे संपूर्ण हायकूचा अर्थ बदलतो. कवी हायकूमध्ये मनस्थिती किंवा भावना कधीही मांडत नाही. तो फक्त घटना मांडतो. आणि त्यामागे काय भावना असतील हे वाचकांवर सोडून देतो. अत्यंत सूचक असा हा काव्यप्रकार आहे. मराठीत आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांनी हायकू लोकप्रिय केल्या.

ही एक प्रसिद्ध हायकू पहा:
Old pond
A frog leaps in
Sound of water!

अत्रे's picture

24 Aug 2017 - 8:25 am | अत्रे

Old pond
A frog leaps in
Sound of water!

यातल्या तिसऱ्या ओळीतून या हायकूचा अर्थ कसा बदलतो ते नाही कळाले. मुळात या हायकूचा अर्थ काय आहे तेच नाही कळाले. थोडे विवेचन कराल का प्लिज? धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Aug 2017 - 9:54 am | ज्ञानोबाचे पैजार

अशीच अजून एक कविता वाचली होती, त्याचेही विविचन कराल का?
Old Monk
A peg goes in
Lot of Sound!

पैजारबुवा,

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Aug 2017 - 9:20 am | माम्लेदारचा पन्खा

माझ्या माहितीनुसार ५ ७ ५ हा जपानी हायकूचा नियम आहे हे अगदी खरे पण तो जेव्हा शिरीष ताईंनी मराठीत आणला तेव्हा हे नियम शिथील केले ... त्यांच्या पुस्तकातले हायकू सुद्धा याची साक्ष देतील ... मात्र यमक साधले गेलेच पाहिजे तीन पैकी कोणत्याही दोन ओळीत . आणि कमित कमी शब्दांत ... शेवटच्या ओळीत कलाटणी आवश्यक ...

हो, ते ५-७-५ जपानीतून मराठीत किंवा अन्य भाषांमध्ये (इंग्लिश वगैरे) जसेच्या तसे ठेवणे कठीण आहे. त्यामुळे अक्षरसंख्या लवचिक ठेवली तरी चालते. पण तुम्ही म्हणता तसे यमक पाहिजे आणि शेवटी कलाटणी आवश्यक आहे.

या विषयावर मायबोली आणि बहुतेक मिपावरही बरीच उत्तम चर्चा झाली होती. मला सापडल्यास देतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2017 - 10:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तिसर्‍या किंवा चौथ्या ओळीत एकदम अनपेक्षित कलाटणी हवी.

-दिलीप बिरुटे

बाजीप्रभू's picture

24 Aug 2017 - 12:45 pm | बाजीप्रभू

To be honest,
असा पण काही प्रकार असतो आजच कळलं. हायकूची माहितीही मिळतेय या निमित्ताने.
धन्यवाद!!

मृत्युन्जय's picture

25 Aug 2017 - 8:36 pm | मृत्युन्जय

पन हायकू कायकू मापकू?

वकील साहेब's picture

27 Aug 2017 - 12:34 pm | वकील साहेब

मागे कधीतरी एकदा मटा की कोणत्या तरी पेपर मध्ये नियमित हायकू येत असत. तेव्हा त्याचा अर्थच उमगत नसे ( तो तसा अजूनही उमगत नाही म्हणा ) पण आत्ता त्याबद्दल वाचून उत्सुकता वाढली आहे. अधिक माहिती मिळाल्यास जाणकारांनी स्वतंत्र धागा काढावा. वाचायला आवडेल

पैसा's picture

27 Aug 2017 - 10:03 pm | पैसा

तुम्ही कविता चांगल्या लिहीत असणार असे वाटते. तीन ओळीच्या मर्यादेत बांधून का घेताय?

माम्लेदारचा पन्खा's picture

28 Aug 2017 - 2:46 pm | माम्लेदारचा पन्खा

सहज म्हणून लिहिलंय .....

चाणक्य's picture

28 Aug 2017 - 4:26 pm | चाणक्य

आवडेश.

या कवितेवर शिरीष पै यांची आठवण काढली होती. काल त्यांच्या निधनाची बातमी आली. शिरीषताईंना भावपूर्ण श्रद्धांजली! _/\_

गामा पैलवान's picture

4 Sep 2017 - 9:57 pm | गामा पैलवान

श्रद्धांजली! :-(

-गा.पै.