शेकहँड

मंगेश पंचाक्षरी's picture
मंगेश पंचाक्षरी in जनातलं, मनातलं
19 Aug 2017 - 9:16 am

©मंगेश पंचाक्षरी, नासिक.
(कृपया पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)

शेक हँड करणे ही आता एक प्रचलित पद्धत झाली आहे... कोणी ओळखीची व्यक्ती भेटली किंवा कोणाशी औपचारिक ओळख करून दिली की पूर्वी हात जोडून 'नमस्कार', किंवा 'राम राम' असं अभिवादन केले जायचे... पूर्वेकडील देशात खरं तर हात जोडण्याचीच पद्धत आहे... आपण थायलंड मध्ये गेलो तर सुहास्य मुद्रेने ते लोक हात जोडून 'सवाडीका' असे म्हणतात... जपान मध्ये वाकून अभिवादन करतात.. भारत हा उष्ण कटिबंधातील देश आहे... लोकांच्या हाताला स्वाभाविकपणे घाम आलेला असतो... त्यावर धूळ आणि जंतूही असू शकतात.. त्यामुळं स्पर्श न करता दुरून हात जोडून अभिवादन करणे जास्त योग्य वाटते... पण आम्ही परदेशाचे अनुकरण करतो... यूरोप मध्ये हवा थंड असते... घाम येत नाही.. हातात हात घेतल्याने उबदार स्पर्शातून आपले पणा वाटतो म्हणून तेथे शेक हँड म्हणजेच warm welcome केले जाते..
आपल्याकडे सर्रास शेक हँड केला जातो, अगदी स्रियाही पुरुषांना शेक हँड करतात, तसे करणे प्रतिष्ठेचे समजले जाते... पूर्वी अंग चोरून बसणाऱ्या स्त्रिया आता शेक हँड करणे, टाळ्या देणे, पाठीवर हात ठेवणे, आलिंगन देणे हे आधुनिकतेचे लक्षण मानू लागले आहेत... मोठया शहरातील महिला तर त्यास अभिमानास्पद मानतात, आणि तसे न करणाऱ्यास बुरसटलेले मानू लागले आहेत... शेक हँड करण्याचे काही नियम आहेत हे ही त्यांना माहीत नसते ही गोष्ट वेगळी! पुरुष दोन पायांवर, कुत्रा तीन पायांवर तर महिला चार पायांवर (म्हणजे खुर्चीत बसून) शेक हँड करू शकतात,असे संकेत आहेत... आपण मात्र खुर्चीवर बसून हस्तांदोलन करणारे पुरुष(?) बघत असतो... शिवाय सर्वच पुरुष निरागसपणे स्त्रियांना शेक हँड करत असतात, हा देखील गैरसमज आहे... त्यात काही विकृतही असतात... मुली ही काही कमी नाहीत... माझी एक मैत्रीण फक्त पुरुषनाच शेक हँड करते, शेजारी त्याची बायको उभी असेल तर तिला मात्र ती 'शेकहँड' करत नाही.... एकूणच हा इंग्रजी प्रकार आपण फार पोरकटपणे स्वीकारला आहे... इंग्रज घालतात म्हणून आपला नवरदेवही भर एप्रिल- मे महिन्यात दुपारी (सासरच्या खर्चाने घेतलेला) रेमंडचा कोट घालून घाम पुसत घोड्यावर बसलेला आपण सर्वांनी पाहिला आहे.... इंग्रजांना भारतातील उन्हाळा सहन होत नसे म्हणून ते एप्रिल व मे महिन्यात इंग्लंड ला जात, त्यापूर्वी मार्च मध्ये सर्व महसूल ते गोळा करून नेत... आता इंग्रज गेले पण आपण अजूनही 'मार्च एन्ड' साजरा करतोय... देश स्वतंत्र झाला, पण आपण मात्र अजूनही गुलाम च आहोत !

-© मंगेश पंचाक्षरी, नासिक.

हे ठिकाणमांडणीसंस्कृती

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Aug 2017 - 10:29 am | अमरेंद्र बाहुबली

देश स्वतंत्र झाला, पण आपण मात्र अजूनही गुलाम च आहोत !
:)

अभ्या..'s picture

19 Aug 2017 - 10:45 am | अभ्या..

घाणा लैच जोरात चालुय राव, ब्लॉगजिल्ब्या काय?

तुषार काळभोर's picture

19 Aug 2017 - 11:24 am | तुषार काळभोर

कॉपीराईटेड आहे ते...

पाया पडण्याबद्दल लेखकाचे विचार काय आहेत?

अभिजीत अवलिया's picture

19 Aug 2017 - 12:31 pm | अभिजीत अवलिया

काही दिवसांपूर्वी एक शीघ्रकवी आले होते मिपावर. आपल्या प्रत्येक कवितेखाली स्वतःचे नाव टाकून C लिहीत. त्यांची आठवण झाली तुमचे © बघून.

लोकांच्या हाताला स्वाभाविकपणे घाम आलेला असतो... त्यावर धूळ आणि जंतूही असू शकतात.. त्यामुळं स्पर्श न करता दुरून हात जोडून अभिवादन करणे जास्त योग्य वाटते...

ह्याचा काय फायदा. कारण घाम,धूळ आणि जंतू शेकहॅण्ड करणाऱ्या दोघांच्याही हातावर असणारच ना. मग शेकहॅण्ड नाही केले तरी स्वत:च्या हातावर असलेले जंतू, धूळ, घाम आहेच की.

काही दिवसांपूर्वी एक शीघ्रकवी आले होते मिपावर. आपल्या प्रत्येक कवितेखाली स्वतःचे नाव टाकून C लिहीत. त्यांची आठवण झाली तुमचे © बघून

ते पाटणकर झाले, तरी तुम्हाला आद्य कॉपीरायटेड पियुष मृदंग म्हैते नाही. ते लैच खत्तरनाक शीघ्र होते. इकडून ओळी पडल्या की तिकडून उत्तरे पडायला लागायची. जिलब्यांची जुगलबंदी नुसती.

कृपया पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)

तुम्ही याचा ट्रेस कसा ठेवणार आहात? समजा एखाद्याने तुमचे साहित्य केले फॉरवर्ड किंवा प्रिंट्करून गुपचुप घरात दारुगोळा लपवावा तसे ठेवले, तुम्ही काय करणार आहात? आंतरजालावर जिथे गोपनीय कागद विकीलिक्सच्या माध्यमातून फुटतात, तिथे अश्या सुचना तेही काही विशेष चोरण्यासारख्या नसलेल्या धाग्यात कश्यासाठी देता आहात? जालावर आपला धागा टाकावा आणि विसरुन जावे असे माझे मत. अशी भिती वाटत असेल तर ब्लॉगवर लिहा हे बरे. अर्थात तिथेही तो चोरला जाणारच.
बाकी

मुली ही काही कमी नाहीत... माझी एक मैत्रीण फक्त पुरुषनाच शेक हँड करते,

हे वाक्य वाचले आणि दोनशेसाठी शुभेच्छा.

धडपड्या's picture

20 Aug 2017 - 2:38 pm | धडपड्या

"विशेष चोरण्यासारख्या नसलेल्या धाग्यात"
हे विशेष पटले, आणि आवडलेले आहे...

बाकी धागा, "हं... चालू दे.." कॅटेगरीतला आहे...

ज्योति अळवणी's picture

19 Aug 2017 - 7:46 pm | ज्योति अळवणी

अगदी स्रियाही पुरुषांना शेक हँड करतात, तसे करणे प्रतिष्ठेचे समजले जाते... पूर्वी अंग चोरून बसणाऱ्या स्त्रिया आता शेक हँड करणे, टाळ्या देणे, पाठीवर हात ठेवणे, आलिंगन देणे हे आधुनिकतेचे लक्षण मानू लागले आहेत... मोठया शहरातील महिला तर त्यास अभिमानास्पद मानतात, आणि तसे न करणाऱ्यास बुरसटलेले मानू लागले आहेत...

केवळ स्त्री आहे म्हणून शेक हँड नाही करायचा? कारण तस केलं तर ती स्त्री आंग्राळलेली आहे अस लेखकाचं मत आहे का? असल्यास ही केवळ वैचारिक गरिबी म्हणता येईल

पगला गजोधर's picture

19 Aug 2017 - 7:59 pm | पगला गजोधर

शिवाय सर्वच पुरुष निरागसपणे स्त्रियांना शेक हँड करत असतात, हा देखील गैरसमज आहे... त्यात काही विकृतही असतात...

असंच काही नाही, जे विकृत आहेत, त्यांना शेकहैंडचीच गरज नाही.

मागे बातमी आली होती, एकजन सी एस टी मधे, एका स्त्री कड़े पाहुन स्वतःच शेक विथ हैंड करत होता..

जेम्स वांड's picture

19 Aug 2017 - 8:03 pm | जेम्स वांड

कृपया पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये

आपल्याला हा कॉन्फिडन्स लैच आवडला आहे बुआ, दुनिया गेली तेल लावत आपल्या लेखनाचं आपण रक्षण करणे इष्ट, न जाणो उद्या कोणी हा लेख चोरून न्यू यॉर्क टाइम्स मध्ये लिहिला तर लेकाचा साहित्यचौर्यावर बुकर अवॉर्ड घेऊन जायचा!. नकोच ते अशी सणसणीत वॉर्निंग हवीच सुरुवातीला!, मी तर तुम्हाला आदर्श मानतो, आता प्रत्येक कॉमेंटखाली मी पण '©वांडोबा' असं खणखणीत लिहिणारच.

©वांडोबा

विशुमित's picture

19 Aug 2017 - 8:17 pm | विशुमित

गोलातला c कसा काय मिळवायचा मिपावर?

जेम्स वांड's picture

19 Aug 2017 - 8:29 pm | जेम्स वांड

मालक, ठावकी नाय, आम्ही आपला मोबल्यावरचा उधार उसनवारी करून आणलाय, आणायलाच लागला. येळकोट कुठं कमी वाटायला नको

© असा चोप्य पस्ते करायचा. त्यासाठी कॉपीराईट नाय!
:)

हरवलेला's picture

21 Aug 2017 - 7:14 am | हरवलेला

:)

आदूबाळ's picture

19 Aug 2017 - 10:14 pm | आदूबाळ

:) लोल.

प्रमोद देर्देकर's picture

19 Aug 2017 - 8:47 pm | प्रमोद देर्देकर

. माझी एक मैत्रीण फक्त पुरुषनाच शेक हँड करते, शेजारी त्याची बायको उभी असेल तर तिला मात्र ती 'शेकहँड' करत नाही>>>>
मैत्रिणिची बायको हे काय अजबच !
बरं तुमच्या कुटुम्बातील स्त्री सभासद कसं अभिवादन करतात ?

आणि धागा काढल्यावर निदान प्रतिसादासाभिमानी हा मिपाचार पाळा की.

हा लेख नक्की तुम्हीच लिहिला आहे का..? मला मागच्या आठवड्यात व्हॉट्सप वर आला होता.

आदूबाळ's picture

19 Aug 2017 - 10:15 pm | आदूबाळ

परवानगीसह आला होता की परवानगीशिवाय?

मंगेश पंचाक्षरी's picture

20 Aug 2017 - 12:07 am | मंगेश पंचाक्षरी

होय, मीच लिहिला आहे.

मग ते सौदी प्रकरण या लेखात कसे काय नाहीये..?

मंगेश पंचाक्षरी's picture

20 Aug 2017 - 8:52 am | मंगेश पंचाक्षरी

सौदी प्रकरण माहीत नाही मला. मी वरील लेख लिहिला आहे.

मोदका व्हाट्स अँप वर पण कॉपी राईट होता का रे? नाही म्हणजे "तो पण तसाच ढापला कि काय?" असे वाटून गेले म्हणून विचारले . बाकी आमची काही ना नाही . चोरी हि पण एक कला आहेच ना . वापरली थोडी तर त्यात वाईट काय?

बाकी चालू देत . दोनशे ला काही मरण नाही

विदेशी वाचाळ

श्रीमान विदेशी वाचाळ साहेब आणि श्री आदूबाळचंद्ररावजी,

मला व्हॉट्सअपवर लेख आला त्याला मिशेल ओबामा सौदीच्या दौर्‍यावर शेख सोबत शेकहँड करणार की नाही असा रेफरन्स होता. "शेख सोबत हात मिळवणार म्हणून शेकहँड" अशी एक थिल्लर कोटीही त्यात होती.

बाकी गोलातला C आणि सदाशिव पेठ पुणे ३० सारखी (म्हणजे फालतू!!) सडेतोड सूचना असले काहीही त्यात नव्हते.

सॉरी सॉरी.. मिशेल बाई नाही.. ट्रंप ची जी कोण बायको आहे ती. फर्स्ट लेडी बदलली हे अजून लक्षात येत नाही राव.

अरे मोदका असा आदरार्थी बहुवचनांतला उल्लेख फारच जोरात झटका देतो रे . त्येपेक्षा एकेरी आपुलकी छान वाटते. तेव्हां "अरे वाचाळ " असे म्हणा चालेल! पण श्रीमान वैगेरे म्हणालास ना कि मेल्याहून मेल्यासारखे होते.

ते असू देत, तुझे मिशेलताई आणि मेलॅनिया बाई यांच्यात होणारे कन्फयुजन गमतीचे वाटले . काही म्हणता काही साधर्म्य नाही आहे रे त्यांच्यात.

आणि जाता जाता सदाशिव पेठेवर घसरलास बारा ? का पुणेरी नसल्यामुळे "झाड दुगण्या !!! पडल्या जिलब्या तर पडू देत " असा विचार केलास?

कसे असू देत बाबा , तू एक गोड मोदक आहेस . सगळ्यांचा आवडता !

विदेशी वाचाळ

मोदक's picture

20 Aug 2017 - 1:18 am | मोदक

:D

सपे पुणे ३० शी आपले वाकडे नाही... पण धागा ३०० ऐवजी ४०० पर्यंत लांबला झाले तरी आपली मुळीच हरकत नाही. :))

आर बाबा प्रेशिडेंट च बदलला ना म्हनुनशान ते काय म्हंतेत ते फर्स्ट लेडी बि बदलली हायती.

धर्मराजमुटके's picture

20 Aug 2017 - 12:41 pm | धर्मराजमुटके

पुर्वी कॉर्पोरेट वर्ल्डात असताना मीच स्त्रियांशी शेकहँड करायला घाबरायचो. माझ्या मनात नुसताच अभिवादनाचा विचार असायचा पण समोरचीच्या चेहर्‍यावर अगदी हा पाणीग्रहण करायला आलाय की काय असा भाव दिसायचा. त्यामुळे मग मी दोन्ही करकमल जोडून त्यांना अभिवादन करत असे आणि समोरच्या काचेच्या ग्लासातले पाणी ग्रहण करत असे. मात्र घरात असो किंवा बाहेर पाणी नेहमी पात्राला तोंड न लावता प्यायची सवय असल्यामुळे काचेच्या ग्लासातील पाणी हमखास तोंडात न जाता दुसरीकडेच जात असे आणि आमचा पाणीग्रहण समारंभ यथासांग पार पडत असे.

माफ करा पण 'पाणिग्रहण' असं हवं आहे...

पूर्वी अंग चोरून बसणाऱ्या स्त्रिया आता शेक हँड करणे, टाळ्या देणे, पाठीवर हात ठेवणे, आलिंगन देणे हे आधुनिकतेचे लक्षण मानू लागले आहेत..

संस्क्रुती बुडाली वाट्टं..

पुंबा's picture

21 Aug 2017 - 6:08 pm | पुंबा

©मंगेश पंचाक्षरी, नासिक.
(कृपया पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)

मंप, बघा, एवढा ढोस देता तुम्ही सुरुवातीला तरी पण तुमचे लेख चोरतात षिंचे वॉट्सॅपवर..(आजकाल चोरांना काई श्टँडर्डच राहिलं नैय्ये..)

जयंत कुलकर्णी's picture

22 Aug 2017 - 11:03 am | जयंत कुलकर्णी

तुम्ही त्यांच्या नावाचे लघूरूप चुकीचे केले आहे. ते पंपं सारखे मंपं असे पाहिजे.... नाही ते रजिस्टर्ड आहे म्हणून म्हटले...